अर्थ नेमका संसाराचा
कधी कुणास कळला आहे
उंबरठ्यावरी तडजोडीच्या
जीव सतत हा जळला आहे
कुणी जपावे? का जपावे?
अन कोणाचे मोठेपण?
किती पुरावे? किती उरावे?
आकांक्षांचे आत्मसमर्पण..
अहंकार तव फ़ोल पणाचा
सर्व समक्ष मी लपवावा
घेऊन सार्या चुका मजवरी
दुभंगलेला जीव जपावा
हसरा चेहरा जनांत राही
मनांत सार्या गर्द छटा
शांत जळाच्या अंतरी असती
गढूळलेल्या वादळी लाटा
नाव तुझे नि गाव तुझे
ओळख माझी विरून गेली
कर्तव्याच्या मढ्याखाली
स्वप्ने सारी पुरून गेली..
- प्राजु
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6206
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचार करायला लावणारी, फार सुंदर कविता
संसारी
टाइपकास्टींग नको
In reply to संसारी by अवलिया
यू सेड इट!!
In reply to टाइपकास्टींग नको by बेसनलाडू
दिपा खुप
प्राजु
छान
ह्म्म
उंबरठा..
छान कविता.
सुंदर
शेवटचे कडवे...
चांगली कविता
सर्वांचे
छान
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच म्हणतो..
In reply to मस्त by नंदन
अर्थ नेमका