अहो पण, हे पाणी सध्या वापरण्यायोग्य नाही असा रिपोर्ट आहे.. मनपाने कुठेतरी याला मैला वाहून नेणारी पाईप जोडलीयते..."लोकसत्ता" म्हणते... (नक्की दुवा सापडत नाही.. मिळाल्यास देईन..)
केवळ २१ हजार २७० रुपये खर्च होत असतील तर मनपा ने सुभेदार नारो अप्पाजी यांना काँन्ट्र्याक्ट का दिले नाही अजून? नक्कीच यात काहीतरी पैसे खाण्याचा डाव दिसतो आहे.
मला तर यात काँन्ट्र्याक्टर सरदार आनंदराव भिकाजी रास्ते यांची व स्रि. नाना फडणीस यांची हातमीळवणी झाली असल्याची खबर मनपा चे आयूक्तांच्या खाजगी सचीवाच्या घरी काम करणार्या बायकोच्या धाकट्या बहीणीने सारसबागेत संध्याकाळी आम्ही फिरावयास गेलो होतो तेव्हा सांगीतले होते हे आठवते.
हेच मी सकाळला सांगीतले होते व त्यांनी तिसर्या पानावर छापले पण होते. (पहा:''लाल्या पुन्हा शाकाहारी झाला' या बातमीशेजारची बातमी. शेजारी नसा टणक ( आपले कडक हो. ) होण्याची जाहीरात आहे. )
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
मनपा प्रेमी - व मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
हा हंत ! हा हंत !
अतिशय दुर्देवी बातमी आहे.
यामुळे देश एकविसाव्या शतकात जात नसुन मनुवाद्यांच्या ताब्यात गेला आहे हे अतिशय शरमेची गोष्ट आहे. मी मनापासुन धिक्कार करतो !!
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवतो, मोठा प्रतिसाद झाल्यास लेख स्वरुपातच टाकतो.
(पुरोगामी) अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
एकुणच अवांतर धागा...........................
यातून कोणाला कसला बोध अथवा मनोरन्जन झाले असेल असे वाटत नाही. हे असले लिखाण उदंड झाले. कन्टाळा आला य आता या असल्या निरर्थक लिखणाचा
एकूणच इतिहासाकडे खास करून पुण्याच्या इतिहासाकडे पहाण्याचा तथाकथीत प्रदूषीत पुरोगामी दृष्टीकोन ठळकपणे जाणवतो.
काय ते धागे आणि काय ते प्रतिसाद? कंटाळा आला या सर्वांचा!
तात्या, मिपाचा मुळ उद्देश भरकटल्यासारखा नाही वाटत या असल्या निरर्थक धाग्यांमुळे?
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
मराठेशाहीकडून काही बोंब पडली नाही
त्यामुळे पेशवाईचा आसरा घ्यावा लागला.
येता जाता पेशवाईच्या नावाने खडे फोडणार्यांना
फक्त नानाचा भोगविलासच दिसतो हे दुर्दैव.
एकूणच सर्वत्र झुंडशाहीचे दिवस आहेत.
मिपा तरी याला अपवाद कसे असेल?
>>मराठेशाहीकडून काही बोंब पडली नाही
>>त्यामुळे पेशवाईचा आसरा घ्यावा लागला.
आम्हाला वाटत होते पेशवाई हा मराठेशाहीचाच भाग होता. पण ते वेगळे होते असे दिसते. :?
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
मजेदार. वरती अमित अभ्यंकर म्हणतात ते विचार करण्यासारखे. जेवणावळींसाठी पाण्याची व्यवस्था केली असे असावे. :)
महत्वाच्या विरंगुळ्यात कमी महत्वाची माहिती :) -
पुण्यात कात्रज पासून आलेल्या भूअंतर्गत नळांतून जे उच्छ्वास आहेत त्यावरच बहुधा बदामी हौद, काळा हौद, पुष्करिणी (?) इत्यादी आहे अशी माझी लहानपणासूनची माहिती आहे. खरी खोटी पेशवे जाणोत !
तसे असेल तर त्या पाण्याचा उपयोग जनसामान्यांच्या घरातील जेवणावळीत सुद्धा होत असावा :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
लिखाळराव खरे आहे तुमचे म्हणणे.. काळा हौद, फडके हौद, बदामी हौद, पुष्करणी इ. २७ हौद पुण्यामधे होते. त्यातील काळा हौद, फडके हौद(विठ्ठलदास नारायणदास सुगंधी हे दुकान ज्या इमारतीत आहे त्याच्याखाली) इ. अजूनही आहेत. त्यात अजूनही ते पाणी अखंड चालू आहे. तसेच शनिवारवाड्यातल्या विहीरीत (ज्यात भुयारासारखा एक बोगदा दिसतो) देखील एक नळ येतो.
जनसामान्यांसाठीच त्या उच्छावासांवर हौद बांधले होते. सरदारांच्या वाड्यात हे पाणी वेगळे नळ हौदापासून काढून वाड्यांमधल्या विहीरीत नेऊन सोडले होते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
"नळ स्टॉप" आणि या सगळ्या नळांचा काही संबंध आहे का?
(वरील प्रश्न माहीतीसाठी विचारला आहे, विरंगुळा म्हणून नाही, तेंव्हा कृपया, तो वाचून विनोद समजून हसू नये :) )
नळ स्टॉप आणि नळाचा संबंध आहे. नळस्टॉपच्या चर्चच्या दरवाजाजवळ कुठेतरी एक मोठे नळ कोंडाळे होते. किर्लोस्करांच्या कोथरुडच्या फॅक्टरीत सायकलींवरून जाणारे कामगार त्या कोंडाळ्यावर पाणी प्यायला थांबत. त्याच्याच आसपास कुठेतरी फिनोलेक्सची पण फॅक्टरी पूर्वी होती. तेथील कामगारही या नळ स्टॉपवर पाणी प्यायला थांबत. तूर्तास इतकी माहीती आहे. पुढील माहीती मिळवून सांगीन.
पण हा नळस्टॉप पेशवेकालीन नाही :) अलिकडचा आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
पुण्याच्या पेशव्यांनी तत्परतेने उत्तर दिले त्याबद्दल आभारी आहे.
मराठीच्या पुस्तकात जुन्या बखरीमधला एक धडा होता असे अंधुक आठवते आहे. त्यामध्ये कात्रज येथील तलाव पाणीपुरवठ्यासाठी निवडला त्याची कथा होती. काही दिवस सतत त्या तलावातले पाणी उपसून तो पुन्हा किती जलद वेगाने भरतो आहे अश्या तर्हेची परिक्षणे करुन मगच तो वापरासाठी घेण्याचे ठरवले. मग त्यातून नळ काढले, उच्छ्वास काढले इत्यादी.
कात्रज तलावाचे वैशिष्ठ्यापूर्ण बांधकाम.
हा लोकसत्ताच्या वास्तुरंग पुरवणीमधला कात्रज तलाव कसा बांधला, गाळ खाली बसण्यासाठी काय योजना केली वगैरे वर्णकरणारा लेख वाचा. लेख बरीच माहिती देणारा आहे.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
>>पेशवाईमधे काय झाले हे आपल्यासर्वांनाच माहीत आहे. जेवणावळी उठत होत्या, पुजाअर्चाच चालत होत्या, फारतर त्यात भर अभिषेक (देवघरातील अथवा देवळातील देवावर, बच्चन नाही!)... नाना फडणविसाने तर काय फक्त बावनखणीतच आयुष्य काढले त्याला कसला आलाय वेळ आंबेगावाहून नानावाड्यापर्यंत नळ आणायला?<<
थोडासा अभ्यास केलात तर तुमच्या विधानातला फोलपणा तुम्हालाच लक्षात येईल.
नाना फडणविसाने कात्रजहून पुण्यापर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या योजना राबवल्या होत्या ही कागदोपत्री पुराव्यानिशी माहीत असलेली बाब आहे.
कधीतरी भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन वाचा संदर्भ. कधी मनातली जळमटं सारून जमलं तर निनाद बेडेकरांशी चर्चा करा या विषयावर. थोडा उजेड पडेल.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
हा हा हा
प्रतिसाद आवडला. ;)
--अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
>>कधीतरी भारत इतिहास संशोधक मंडळात जाऊन वाचा संदर्भ. कधी मनातली जळमटं सारून जमलं तर निनाद बेडेकरांशी चर्चा करा या विषयावर. थोडा उजेड पडेल.<<
तुमचा वरील मुद्दा (जो विस्तारलेला नाही, फक्त दुव्याविना संदर्भ आणि तज्ञाचे नाव सांगितले आहे), तो मला जे काही अधोरेखीत करायचे आहे त्याच्या बाजूने आहे की विरुद्ध हे न समजल्याने मी अगदी confused झालो आहे. 8|
ते एकदा कळले की मग जळमटे कुठे आहेत आणि ती कशी काढायची ते ठरवता येईल. :-)
मिपाकरांच्या विनोदबुद्धीबद्दलच्या माझ्या कल्पना फारशा अवास्तव नव्हत्या तर!!
असो, चालू ध्या!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
नीधप, विशाल व इतर
अरे बाबांनो विकासराव पर्यावरण / पाणी या क्षेत्रात काम करतात. नुस्ती मटाची रंजक बातमी फक्त दुवा द्यायच्या ऐवजी अशी धमाल केली. विरंगुळा ह्या सदराखाली ही बातमी आहे हे बहुदा वाचले नसावेत.
फ्रायडे अफ्टरनून सिड्रोम म्हणुन आता तरी चालवून घ्या. :-)
हा आयडी अमुक तमुक क्षेत्रात काम करतो असं कुठेही लिहिलेलं नाही. त्यामुळे ते कळायचा काही संबंध नाही. बर त्या क्षेत्रात काम करतो हा आयडी म्हणजे त्यांनी जी विधाने केली आहेत ती योग्य हे गणित काही कळलं नाही. विरंगुळा या सदराखाली का होईना एकाच पद्धतीने पेशवाईबद्दल बोंब मारण्याची तशीही फॅशन आहेच त्यामुळे आमचा गैरसमज (खरंच गैरसमज की काय कोण जाणे!) होणे शक्य आहे.
तुम्ही लोक एक करत जा आपापसातल्या या सो कॉल्ड चर्चांच्या धाग्यावर लिहीत जा वरती की इथे बोलणारे आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो त्यामुळे आम्ही आमच्यापुरतं बोलणार आहोत. इतरांनी मधे यायचं कारण नाही. म्हणजे काय की मग असल्या धाग्यांकडे आम्ही ढुंकूनही बघणार नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
च्यामारी १५० वर्ष झाली पेशवाई जाउन तरी पेशव्यांच्या नावाने खडे फोड्ण चालुच आहे.
त्यान्नी १५० वर्ष पुर्वी डोक लावुन आख्या पुण्यात पाणी आणल, तुम्ही खुप नाही पण निदान थोड डोक लावुन निदान तुमच्या परीसरात तरी पाणी आणा आणी मग पेशव्यांना बोला..
उगाच आपल वाटेल ते बोलायच..इकडुन तिकडुन धागे आणायचे आणी छापायचे...
<<<च्यामारी १५० वर्ष झाली पेशवाई जाउन तरी पेशव्यांच्या नावाने खडे फोड्ण चालुच आहे. >>>
खडे कसे फोडतात...? ते ह्या॑ना http://www.misalpav.com/user/2692 विचारा..
<<<त्यान्नी १५० वर्ष पुर्वी डोक लावुन आख्या पुण्यात पाणी आणल>>>
डोक का नळ लावुन...
<<<थोड डोक लावुन निदान तुमच्या परीसरात तरी पाणी आणा >>>
ते कस लावणार बुवा....
सुहास
(खदान-कामगार)
विकासच्या या धाग्यावर पूर्णपणे अनपेक्षित प्रतिसाद पाहून करमणूक झाली.
(मी जनरली 'जुने जाउ द्या मरणालागुनी' म्हणणारा. पण लेख वाचताच उपहास हा उद्देश लक्षात आला होता. त्यामुळे त्यावर प्रतिसाद दिला नाही. पण आता राहवले नाही)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
हाहाहाहाहाहा.....सही आहे स्माईली..
(:)) हा गालावर हात ठेऊन अय्या खरंच असे म्हणणारा स्माईली आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
परवाच त्यांची परीक्षा घेतली मी, अजून अभ्यास करा म्हटलं. बघूया आता ऑ़क्टोबरला बसतील पुन्हा!!
तुम्ही मला प्रॉमिस केले होते की कुणाला सांगणार नाही म्हणून? >:P
वा! मस्त !!
विचारप्रवर्तक धाग्याबद्दल विकास यांचे अभिनंदन आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
(हा प्रतिसाद फक्त जवळच्या मंडळींसाठी आहे, बाकीच्यांनी वाचु नये)
--अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
हा हा हा!!
लेख वाचून हसत होतो.. खालील काहि 'विषेश' प्रतिक्रीया वाचून फुटलोच
=)) =))
विकासराव, बोला असला धागा (आम्ही एकमेकांना ओळखत्तो असे न लिहिता) काढणार का परत? :) ;)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
असला सोडा हो... गंभीर धागा काढायची पण हिम्मत होणार नाही त्यांची काही दिवस... :)
मग काही खास ओळखीच्या लोकांच्या आग्रहाखातर काढतील ते धागा.. पण वरती नीट लिहितील... गंभीर की उपहास ते ;)
--अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
प्रतिक्रिया
हा हा हा
बावनखणी
अहो पण, हे
हा हा हा
२१ हजार २७० रुपये खर्च
याला म्हणतात!
हा हंत ! हा
एकुणच
विजुभाऊंना सहमती
दुर्दैव
>>मराठेशाही
होताच
लय भारी हो
श्श्या
छा:
दोनदा
मला वाटले
आता
मजेदार.
लिखाळराव
एक प्रश्न
आगायाया !!
नळ स्टॉप
सहमत आहे.
पुण्याच्य
खरी खोटी
>>पेशवाईमधे
हा हा
पुर्णपणे सहमत
गोंधळलो...
तुमच्या
नाही कळलं
हा हा हा!
हम्म..
मित्रांनो
हॅहॅहॅ
हा आयडी
पुण्याची समस्या काय आणि विकास राव बोलता काय
खडे कसे फोडतात...?
विकासच्या
हा हन्त हन्त!!
हाहाहाहाह
स्मायली
पेशवाइ,
दहावीतच काय ते अजूनही इतिहासात नापास आहेत!
हे काय?
इतिहास,
वा! मस्त
हा हा हा
असला सोडा
Pagination