असला सोडा हो... गंभीर धागा काढायची पण हिम्मत होणार नाही त्यांची काही दिवस...
उगाच वेडी आशा बाळगू नका ;) खरे झाले नाही तर लोकं तुम्हाला अंधश्रद्ध ठरवतील :-)
बाकी विरंगुळ्याचा "विनोद" कसा होवू शकतो हे मात्र नक्कीच समजले!
विकासराव, बोला असला धागा (आम्ही एकमेकांना ओळखत्तो असे न लिहिता) काढणार का परत?
अहो लेखन हे प्रकट असते. कोणीही वाचा, वाचू नका, त्यावर हवे ते प्रतिसाद द्या... मात्र खरडवही ही ओळखत असलो तरच लिहायला वापरावी असे मात्र वाटते. त्यातविचार करा, जर एखाद्या लॉगईन नाव पुरूषाचे असलेल्याने व्यक्तिने एखाद्या लॉगईन नाव स्त्रीचे असलेल्या व्यक्तीच्या खरडवहीत अरेरावीने लिहीले तर काय म्हणले जाते/जाईल? आता तसेच उलटेपण होऊ शकते. नियम सर्वांना सारखे असावे असे किमान तुमच्या सारख्या पुरोगामी व्यक्तींना तरी नक्की पटेल अशी खात्री आहे. ;) .
थोडक्यात, माझे नवीनच लेखन येथे येईल... काळजी नसावी का असावी हे तुमचे तुम्ही ठरवा :-)
एकदम खुसखुशीत :-)
क्षणभर घाशीराम कोतवाल या नाटकाचा अंधुक संदर्भ लागला. पुण्याच्या समृद्धतेने दूरदूरहून कोणीच आकर्षित होत नव्हते, आणि पुण्याची दौलत शून्य होती अशी काही सुरुवात होती. (अशीच सुरुवात आहे ना - कोणाला आठवते आहे का?)
मग "जाने भी दो यारों" नावाचा चित्रपट मनात आला. लहानपणी तो बघून मुंबईतले सरकार आणि बिल्डर १००% भ्रष्ट, ०% कार्यक्षम असल्याचा समज मला झाला होता. मुंबईत एकूणएक फ्लायओव्हर कोसळले होते असे चित्रपटात दाखवले होते. मग मुंबईत एकदा गेलो तेव्हा उभे असलेले कित्येक फ्लायओव्हर दिलले. चित्रपटातले मुंबईविषयी अज्ञान किती गाढ होते ते तेव्हा लक्षात आले. या चित्रपटवाल्यांना मुंबईच्या महापौरांना-बिल्डरांना हीनच करून दाखवायचे असते - चांगले काही काम बघायची दृष्टीच नसते. हा गमतीदार धागा बघून त्या विचित्र हास्यास्पद चित्रपटाची आठवण आली. पुन्हा हसलो.
श्रीयुत विकास हे इथलं जगप्रसिद्ध आणि महान व्यक्तिमत्व असल्याचं मला माहीत नसल्याबद्दल त्यांची व त्यांच्या चाहत्यांची मी माफी मागते.
त्यांनी लिहिलेले कुठले लेखही मी वाचले नसल्याबद्दलही क्षमस्व.
तसेच त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला केवळ वा वा छान छान असेच म्हणायचे असते हा नियमही माहीत नसल्याबद्दल क्षमस्व.
मूळ पोस्टमधली शेवटची वाक्ये मला फोलपणाची वाटली आणि त्याच्या बरोबर विरूद्ध माहीती माझ्या वाचनात आलेली होती ही पण माझीच चूक आहे.
या धाग्याच्या मूळ पोस्टमधे उपहास, विनोद इत्यादी काय काय ठासून भरलेले आहे जे बघायची दिव्यदृष्टी माझ्याकडे नाही त्याबद्दलही क्षमा.
इथे वाद होऊ नये म्हणून लिहिलेल्या खरडीला तुम्ही अरेरावी म्हणता म्हणजे ते तसेच असणार कारण आपण एवढे महान व्यक्तिमत्व आहात.
झालं समाधान?
आजवर मिसळपावावरचा हा सर्वोत्कृष्ट प्रतिसाद.
अज्जुकांचा विजय असो.
फोलपणाअचा विजय असो.
विरंगुळ्याचा विजय असो.
घाटपांड्यांनी ह्याविषयी लेख लिहावा अशी त्यांना विनंती.
-- मिसळभोक्ता
ईकासरावांच्य ध्यानीमनी नसतानी हे चौथ युद्ध. आमाला काय ही भानगडच कळानी ब्वॉ. पन मुळ पोष्ट पेक्षा प्रतिसादच भारी !
चालुऽ दे चालूऽ देत काय गो तुझा हा नखरा- नाना
श्री गणराय नर्तन करी आमी पुन्याचे बामन हरी
(घाशीराम कोतवाल)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
दंगा पाहून छान करमणूक झाली. आणि इतिहासाविषयी नव्याने काही दृष्टिकोन मिळाले. म्हणजेच ज्ञान आणि रंजन असा दुहेरी हेतू आज मिपाने साध्य केला म्हणता येईल. :)
पेशवाईच्या नावाने खडे फोडणार्यांची कीव कराविशी वाटते. पेशवाईत फक्त जेवणावळी उठत होत्या, पुजाअर्चाच चालत होत्या, इत्यादी बेसलेस विधानं करणार्यांसाठी ही माहिती.
सदर भाग एक मिपाकर आणि माझा मित्र सौरभ वैशंपायन ह्याने लिहिलेल्या 'आम्ही चित्पावन' या लेखातील आहे. त्याच्या ब्लॉगवरून इथे कॉपी पेस्ट करतोय. कारण शाळेतली इतिहासाची पुस्तकंही न वाचणारे ब्लॉग वरचा लेख शोधून वाचतील अशी अपेक्षा नाहिये. आता पुन्हा ब्राम्हणानेच ब्राम्हणाची स्तुती करावी असा बिंडोक सूर ज्यांना आळवायचा असेल त्यांनी तो ब्लॉग बघावा त्यात संदर्भ कुठून कुठून घेतले त्याची यादी दिली आहे. (www.sahajsuchalamhanun.blogspot.com)
बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदय्पुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढुन जिंकु शकतो हे मराठी सैन्याला जाणवुन द्यायला कारणीभुत झाली. बर्नाड मोन्ट्गोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटीश ’फिल्ड्मार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहील्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवुन दिले. शनिवारवाड्या बद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट कील्लाच बांधुन घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालुन येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.
दिल्लीचा वजिर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालुन आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकालेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपुर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवुन त्याने हेरां मार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालुन गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द गढीत बंदीस्त वजिरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.
या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानि" बाजिरावास दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतिल.
या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासुन बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधुन घेतला.
चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखिल कोकण घाट आणि कीनार्यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला.
बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाउ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडुन ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकुन घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणिव ठेवुन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकुन मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडुन, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फुट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील एकमेव अपराजित सेनापती होते.
बाजीरावाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास शाहु महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. नानासाहेबाने पुण्याला खर्या अर्थाने शहराचे रुप दिले. सदशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ आणि पर्वती हे नानासाहेबाच्या आज्ञेवरुन बांधेले गेले. शिवाय मुठेवर "लाकडी पुल" त्यानेच बांधुन घेतला. पुण्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होत रहावा म्हणुन यानेच "कात्रज" वसवले.
नानासाहेबाने खर्या अर्थाने मराठे शाहीचा अटकेपार गेलेला सुवर्णकाळ बघितला त्याच बरोबर मराठ्यांना पानिपतचा प्राणांतिक फटका याच्याच करकीर्दीत बसला. व्यवस्थापनाच्या दृष्टिने मात्र नानासाहेबाने आपले काम चोख बजावले. रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षीच अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे १७५८ रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे - "आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे."
बाजीरावापासुन राघोबांपर्यंतच्या या सगळ्या विजयांमुळे मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले. निजामाला तर मराठ्यांनी मिळेल तिथे पिटुन काढले. सदाशिवराव भाऊ ने हैदराबादच्या निजामाला सळो की पळो करुन सोडले. दिल्लीचे सिंहासन मरठ्यांनी आपल्या टाचेखाली आणले. शिवछत्रपतींची "थोरली मसलत" म्हणजेच दिल्लीवरचा हक्क पेशव्यांनीच प्रस्थापित केला. इथे एक गोष्ट सांगाविशी वाटते - मराठी घोडे ज्या मार्गाने अटकेवर चालुन गेले आज बरोबर त्याच्या अलीकडचा भाग "हिंदुस्थान" आहे. बाकीचा "पाकीस्तान", एखाद्या घटनेचे खुप दुरवर कसे पडसाद उमटतात याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे.
आदी,
काही उपयोग नाही. हे लोक असं बोलणार आधी आणि मग मी तर उपहासाने म्हणत होतो अशी पलटी मारणार. आणि तुम्हालाच मुर्खात काढायचा प्रयत्न करणार.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
विकासरावांचा लेख उपहासात्मक असल्याचे (सुरुवातीसच) लक्षात आल्याने काही सिरिअस प्रतिसाद दिले नव्हते.
पण इथे पेशवाईचा मुद्दा घेऊन बरेच सिरिअस लेखन होत आहे ते पाहून खराटा हाती घ्यावा काय असा प्रश्न मनात आला. :?
नितिन थत्ते
प्रतिक्रिया
उगाच वेडी आशा...
>>बाकी
काढू की!
लई लई मजा
गमतीदार धागा
श्रीयुत
धो धो धो...
हा हा हा
हॅहॅहॅ
एकूण
इतिहास
डोकं वापरा, मिपा वाचवा.
आदी, काही
.
खराटा हाती घ्यावा काय?
Pagination