Skip to main content

अश्वत्थ

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 24/06/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या कोरड्या डोळ्यात आता नुरला विश्वास शांत घरातली भासे खिन्न ओसरी उदास झाले कवाड पोरके नाही अंगणाची साथ चुडा भरल्या हातात बूजगावण्याचा हात अश्वत्थाच्या झाडावर किती पक्ष्यांची घरटी पारावर हिंडणारी बघ साळुंकी एकटी खोली भरून दाटला खुळा अंधाराचा जीव बाहेरचा कव डसा शोधी जमिनीचा ठाव वारा झपाटून आला होई क्षणात बेभान स ळ स ळू न उठते पिंपळाचे पान पान
लेखनविषय:

वाचने 2616
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

प्रत्येक कडवे सु रे ख!!!

दत्ता, सुरेख कविता रे! फारा आवडली.. तुझा, (फ्यॅन) तात्या.

खोली भरून दाटला खुळा अंधाराचा जीव बाहेरचा कव डसा शोधी जमिनीचा ठाव ... सुंदर !

वारा झपाटून आला होई क्षणात बेभान स ळ स ळू न उठते पिंपळाचे पान पान खास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

सुंदर लिहिलंत. पण अश्वत्थ(पिंपळ) हा उदास वृत्ती दर्शवत नाही असं मला वाटतं.. :) कसं कुठेही उठतं रोप पिंपळाचं थोर.. उभा जन्म एकलाच कुठे मिळतो आधार? आज पिंपळ बोलतो नको जगणे उदास माझं अश्वत्थाचं रूप पुन्हा देईल विश्वास राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

मनाला हुरहुर लावणारं काव्य !

कविता.आवडली.

अश्वत्थाच्या झाडावर किती पक्ष्यांची घरटी पारावर हिंडणारी बघ साळुंकी एकटी वा .. फार छान कविता ! -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)