✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ... भाग-२

छ
छोटा डॉन यांनी
Wed, 06/24/2009 - 11:24  ·  लेख
लेख

Book traversal links for पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ... भाग-२

  • ‹ पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ....
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13926 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

लगे रहो डान भाई!

सचीन जी
Wed, 06/24/2009 - 11:31 नवीन
डान्या लेका, तु फुल टाईम लेखक का होत नाहीस? सांगीतलं नाही तर कणेकरांच्या नावावर हा लेख सहज खपुन जाईल! तुला एकदा भेटलच पाहीजे!
  • Log in or register to post comments

-०.५ (किंवा +०.५)

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/24/2009 - 12:15 नवीन
डान्राव, अतिशय सुंदर लेख, कथन, वर्णन आणि माफक चिंतनही! खरंच आवडला दुसरा भाग. त्यासाठी केलेली २४ (+२४) तासांची प्रतीक्षाही सुफळ संपूर्ण.
सांगीतलं नाही तर कणेकरांच्या नावावर हा लेख सहज खपुन जाईल!
डान्रावांचा फारच कमी वेळेला एवढा अपमान झाला असेल. त्याचा साफ निषेध. राहत फतेह अली खानांचं हे गाणं, "मै जहां रहूं..." मलाही आवडतं. ही घ्या त्याची यू ट्यूब लिंक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन जी

गाणं...

श्रावण मोडक
Wed, 06/24/2009 - 15:17 नवीन
सोडून बाकी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

>>राहत फतेह

घाटावरचे भट
Wed, 06/24/2009 - 21:47 नवीन
>>राहत फतेह अली खानांचं हे गाणं, "मै जहां रहूं..." जरा थोडंसं त्या हिम्मेश रेशाम्मियालाही क्रेडिट द्या की... त्यानं बांधलंय ते गाणं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चेहर्‍याव

विजुभाऊ
Fri, 06/26/2009 - 14:39 नवीन
चेहर्‍यावर कुत्रे खाल्यासारखे किंवा शिष्ठ भाव ठेऊन समोरच्याला उत्तरे देणे वगैरे कॉमन लक्षणे. धन्य .....कै च्या कै रे डोन्या. बाकी सचिन शी सहमत सहमत हा शब्द "हस मत" असाही होउ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन जी

छान लेख ..

अश्विनि३३७९
Wed, 06/24/2009 - 11:33 नवीन
मनापासून आवड्ला .. अश्विनि ....
  • Log in or register to post comments

असेच

दशानन
Wed, 06/24/2009 - 11:35 नवीन
असेच म्हणतो.... छान रे डॉन्या... तुझी नजर चांगली आहे... आवडले ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

अफाट निरिक्षन शक्ती

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 06/24/2009 - 11:46 नवीन
मानल बुवा डानराव तुम्हाला तुमच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यावीशी वाटते बसल्या जागेवर सर्वांचे मस्त निरीक्षण केलेत =D> ************************************************************* नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

हेच

अवलिया
Wed, 06/24/2009 - 12:03 नवीन
हेच म्हणतो. :) अवांतर -पहिल्यांदा डान्रावांची 'नजर' चांगली असल्याचे सर्टिफिकेट कुणी दिल्याचे पाहिले. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

हा हा हा ...

छोटा डॉन
Wed, 06/24/2009 - 13:56 नवीन
>>अवांतर -पहिल्यांदा डान्रावांची 'नजर' चांगली असल्याचे सर्टिफिकेट कुणी दिल्याचे पाहिले. नेहमीप्रमाणेच वैयक्तिक चिखलफेक करणारी प्रतिक्रिया. मिपावर आलेल्या "चान्स पे डान्स्"च्या लोंढ्यात हात धूऊन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न. =)) असो, अवलियासाहेबांशी सहमत आहे ... :) अवांतर : खरं तर हा भाग-२ अत्यंत गडबडीत व म्हणावी तशी बैठक न जमवता लिहला आहे, काल दिलेल्या २४ तासांच्या डेडलाईनचे पालन काही वैयक्तीक अडचणींमुळे करणे जमले नव्हते, त्याचीच मनाला टोचणी लागुन राहिली होती ... अर्थातच हा भाग माझ्या मनासारखा उतरला नाही, आत्ता पुन्हा वाचुन पाहिल्यावर तसे कंफर्म झाले ... तुर्तास जरा गडबडीतच आहे, थोडा वेळ मिळाला की अजुन थोड्या सुधारणा करेन अशी ग्वाही देतो. कंटेन्ट आणि शैली अजुन थोडी चाळायची गरज आहे असे राहुन राहुन वाटते आहे. असो, वेळ मिळाल्यावर नक्कीच करेन ... तोवर हा आमचा लंगडा लेख आवडुन घेतलेल्या सर्व मायबाप मिपाकरांचे आभार, तुमच्या कौतुकामुळेच लिहण्याचे प्रोत्साहन मिळले हे नमुद करतो. अजुन थोडी सुधारणा करुन अजुन तुमच्या अपेक्षा पुर्ण करणारा लेख देईल असे आश्वासन देतो ( डेडलाईनचे आता नाव नका कढु, आधीच पुरता बदनाम आहे ;) ) आभारी आहे ..!!! ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>उदयनराजें

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/24/2009 - 20:35 नवीन
>>उदयनराजेंना आपल्या पक्षात घेणे व रोज त्यांच्याकडुन शिव्या खाणे हम्म. सामन्याचा प्रभाव दिसतो आहे.. :) जसा जसा लेख वाचत जाईन पुढे तसा तसा प्रतिक्रिया देईन. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

वा..

स्वाती दिनेश
Wed, 06/24/2009 - 11:55 नवीन
डॉन्या, हा भाग जास्त आवडला. मस्त लिहिले आहेस रे.. स्वाती
  • Log in or register to post comments

झकास

तात्या विन्चू
Wed, 06/24/2009 - 12:03 नवीन
झकास लेख्.....फार उत्तम .....आवडला..... आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
  • Log in or register to post comments

छान लिहिले

यशोधरा
Wed, 06/24/2009 - 12:04 नवीन
छान लिहिले आहेस डान्या.
  • Log in or register to post comments

खासच!!!

मनिष
Wed, 06/24/2009 - 12:13 नवीन
ए
कंदर संध्याकाळ मस्त गेली, फार नाही पण जास्तीत जास्त २० ते २५ मिनीटांची कथा आहे ही. गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्‍या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्‍या, गाफील असणार्‍या किंवा कमालीचा सावध असणार्‍या, लहान मुलाची निरागसता घेऊन वारणार्‍या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्‍या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्‍या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मताल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी..... "गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ... जाता जाता हे सर्व करत असताना ऐकलेले "राहत फतेह अली खान" चे एक अप्रतिम गाणे " कहने को साथ आपने एक दुनियाँ चलती है, पर छुपके इस मन मे एक तनहाई पलती है ...." बासच ...!!!!
मस्त लेख! मलाही असेच निरीक्षण करायची आवड आहे, आणि राहत फतेह अली खानचे ते गाणे म्हणजे तर..........अशक्य आहे! :) डॉन्या, वरचेवर/रेग्युलर लिहीत जा रे जरा!
  • Log in or register to post comments

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/24/2009 - 12:24 नवीन
श्रीमान डानचंद्ररावजीसाहेब, अतिशय आवडलेलं आहे लिखाण. मजा आली वाचताना. काही विशिष्ट कथासूत्र नसताना देखिल ओघवती भाषा, अचाट निरिक्षणशक्ती, ती लक्षात ठेवण्याची स्मरणशक्ती आणि गंमतिदारपणे मांडण्याची हातोटी यामुळे वाचताना मजा आली. यातली बरीचशी निरिक्षणे आमच्या स्वत:च्या निरिक्षणांशी तंतोतंत जुळतात हे पाहून "ग्रेट मेन थिंक अलाइक" या वचनाची सत्यता पटली. (काही लोक कुत्सितपणे हसतील या वाक्यावर, पण एकदा ग्रेट मेन्सनी अलाइक थिंक केलं तर मग बाकीच्यांची तमा कशाला बाळगा? हो की नाही? असो. आम्ही पण तुमच्यासारखेच विषयांतरं करायला लागलो.) तर मुद्दा असा की लेखन आवडलेलं आहे. जास्तीत जास्त लिखाण करत जा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

बिका चोर है !!

टारझन
Wed, 06/24/2009 - 17:29 नवीन
सदर प्रतिक्रिया आमची होती .. ह्यांनी चोरून लावलीये इथे !!! डाणब्या !! चोच्या .. इकडं यं रं बाबा एकदाचा !@! तुला कंठाशी धरेल म्हणतो :) डाणरावाच्या काकसमान नजरेला आमचा प्रणामा !! निसर्गाने डाणरावांना हा "नजरा"णा च दिलाय !! (डाणपंखे) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

>>हे पाहून

यशोधरा
Wed, 06/24/2009 - 12:32 नवीन
>>हे पाहून "ग्रेट मेन थिंक अलाइक" या वचनाची सत्यता पटली. =)) <:P
  • Log in or register to post comments

सही शेवट...

सुबक ठेंगणी
Wed, 06/24/2009 - 12:39 नवीन
बाहेरच्या जगातून बाहेर येऊन नकळत पटकन स्वतःच्या मनात पाहिलंच! :) एक कै च्या कै कस्पट "लहान मुलाची निरागसता घेऊन "वारणार्‍या" झालंय! :P
  • Log in or register to post comments

डॉन

सहज
Wed, 06/24/2009 - 12:53 नवीन
तुम्ही डॉन आहात!!!! गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्‍या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्‍या, गाफील असणार्‍या किंवा कमालीचा सावध असणार्‍या, लहान मुलाची निरागसता घेऊन वारणार्‍या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्‍या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्‍या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मताल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी..... "गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ... एकदम आवडले बॉस.
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Wed, 06/24/2009 - 13:43 नवीन
वा! दुसर्‍‍या भागाची वाट पाहतच होतो.. लेखनशैली आणि निरिक्षणशक्ती दोन्हीला मनापासून दाद! :) मस्त उतरला आहे लेख.. आता पुढला लेख येऊ दे.. क्रमशः अर्थातच चालेल ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

निषेधाचा निषेध!

सचीन जी
Wed, 06/24/2009 - 13:59 नवीन
डान्रावांचा फारच कमी वेळेला एवढा अपमान झाला असेल. त्याचा साफ निषेध. हे मात्र फारच झालं! कणेकर हे अत्यंत छान लिहितात. डान्याच्या लिखाणावर त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो आहे. हवे तर विक्षिप्त ताई, तुम्ही या साठी मिपावर मतदान घेउ शकता!!
  • Log in or register to post comments

कणेकर हे

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/24/2009 - 17:19 नवीन
कणेकर हे अत्यंत छान लिहितात
हे तुमचं मत असेल, माझं नाही! आणि नाही जुळली आपली मतं तर एवढं काय त्याचं? पण उगाच काही झालं की उठल्याबसल्या मिपाकर जनतेकडे कौल मागायची पद्धत रूढ होऊ पहात आहे, झाली आहे त्याचाही निषेध! उगाच काहीही काय लोकांना विचारत सुटायचं? कधीतरी स्वतःचा स्वतः विचार करून स्वतःची स्वतः मतं बनवायला काहीही प्रत्यवाय नसावा. ज्या लोकांना मी धड ओळखतही नाही त्या लोकांना "तुमचं डॉन्याच्या लिखाणाबद्दल काय मत आहे?" हा प्रश्न मी का विचारू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचीन जी

मतभेदांचा निषेध!

धमाल मुलगा
गुरुवार, 06/25/2009 - 15:18 नवीन
आयला, ए अरे ओय, काय चाल्लंय रे? गपा की जरा. ज्याला जे आवडतं त्यानं ते वाचावं, पहावं, करावं, खावं, प्यावं....वाट्टेल ते! का आपापली मतं एकदुसर्‍याशी पडताळायला जाताय? अवांतरः कणेकर हे डानरावांचे आवडते लेखक! कणेकरांनी लिहिलेलं जवळपास सगळं साहित्य डानराव बाळगुन आहेत असं आम्ही जाणतो :) अगदी, त्यांच्या लेखनातले अर्धविराम, स्वल्पविरामदेखील डानरावांना पाठ आहेत म्हणलं तरी चालेल ;) अतिअवांतरः डान्या भैताडा, भारी निरिक्षण चाल्लंय हो! आता एखाद्यावेळी एनिग्मामधलंही निरिक्षण येऊ दे ;) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच म्हणतो

आनंदयात्री
Fri, 06/26/2009 - 22:03 नवीन
असेच म्हणतो, सहमत आहे. वॉटरच्या परिक्षणाची वाट पहातोय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हॅटस ऑफ

परिकथेतील राजकुमार
Wed, 06/24/2009 - 15:04 नवीन
हॅटस ऑफ ! उच्च लिहिलयस रे डॉन्या. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

डॉन्या,

मेघना भुस्कुटे
Wed, 06/24/2009 - 16:37 नवीन
डॉन्या, सुटला आहेस तू. अफाट सुरेख झाला आहे का लेख. कैच्याकैच आवडला... शेवटासकट.
  • Log in or register to post comments

झ्क्कास रे..........मित्रा.........!!

मसक्कली
Wed, 06/24/2009 - 17:02 नवीन
:) तुझ्या गोट्यान्च(डोळे) निरिक्षण लै झक्कास वट्ल बग........ B) आनि त्यात्ल्या त्यात ते ............ लिपस्टिक कसे जपावे?" ह्याचे कोर्सेस निघाले पाहिजेत, खुप फायदा होईल त्याचा ( मला नव्हे, माझ्याबद्दल बोलत नाही मी, मी लिपस्टिक वापरत नाही पण माहिती असलेली काय वाईट हो ?). ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात, कुठे ना कुठे त्याच्या "योग्य वापर" होईलच की ............ =)) पुढची तयारि जोर्दार चललि आहे वाट्त... :)) सहि मामु तुच आहेस ;) बाकि लेख आगदि तुफान झालाय बग........:) तुझ्या गोट्यान्च (डोळे)विशेश कौतुक.......... ;) =D>
  • Log in or register to post comments

सह्ही

अनामिक
Wed, 06/24/2009 - 17:19 नवीन
सह्ही जमलाय रे लेख! (फक्त ते कंस जरा कमी करता आले असते तर अजून मजा आली असती असे वाटले.) -अनामिक
  • Log in or register to post comments

मस्तच !

जृंभणश्वान
Wed, 06/24/2009 - 18:48 नवीन
एकदम भारी !
  • Log in or register to post comments

पीक्झ्झा आवडला....

अनिल हटेला
Wed, 06/24/2009 - 19:06 नवीन
दोन्ही भाग सलग वाचले.... हुच्च लिहीलयेस.......;-) असेच लिहीत रहा बंगलोरी बाबा :-D बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

डान्या, तुझं लिखाणाचं इंजान

चतुरंग
Wed, 06/24/2009 - 19:29 नवीन
एकदा तापलं की काय खरं नसतंय बघ! कसलं लिहिलं आहेस. चाबूक, एकदम चाबूक! B) (चिलीफ्लेक)चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त!

क्रान्ति
Wed, 06/24/2009 - 19:50 नवीन
हा लेख जास्त आवडला. त्यातल्या त्यात आजीपाजोबा आणि मंडळी! त्यांना घेऊन येणार्‍या त्या घरातल्या "कर्त्या पुरुषाच्या" चेहर्‍यावरच्या भावांची शब्दात ओळख करुन देणे मला शक्य नाही, माझ्यापुरता प्रश्न म्हणजे " त्या सुखी माणसाचा सदरा त्याने कुठुन घेतला" असा होता. ह्याचेही उत्तर खचितच एवढे सोपे नाही. खूपच खास वर्णन सुखी कुटुंबाचं! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

भारी रे

घाटावरचे भट
Wed, 06/24/2009 - 21:44 नवीन
भारी रे डान्या. लेख एकदमच आवडला.
  • Log in or register to post comments

हा भाग जास्त आवडला रे डॉन्या

संदीप चित्रे
Wed, 06/24/2009 - 22:31 नवीन
मस्त जमलाय लेख.. तुझ्याबरोबर एक पिझ्झा हटची सैर करून आलो :) >> आश्चर्य म्हणजे आजोबा मस्तपैकी ऑथेंटिक पद्धतीने पिझ्झा काटा-सुरी वापरुन खात होते च्यायला .. पिझ्झा खायची ही कुठली 'ऑथेंटिक' पध्दत रूढ झालीय तिथे? पिझ्झा स्लाइस हाताने खाल्याशिवाय मजा नाही येत राव :) तुझं निरीक्षण चांगलं आहे. लिपस्टिक वगैरे सत्राशे साठ भानगडी सांभाळणं बायकांना कसं जमतं ते त्यांचं त्यांनाच माहिती ! आजोबांपासून ते नातवापर्यंत कुटुंब एकत्र पिझ्झा हटमधे पाहून नो वंडर मस्त वाटलं असेल.
  • Log in or register to post comments

मनोरंजक

रेवती
Wed, 06/24/2009 - 23:49 नवीन
मनोरंजक लेखन! डॉनच्या नजरेनं वाचक पिझ्झाहटमध्ये निरिक्षण करत असल्यासारखे वाटत होते. रेवती
  • Log in or register to post comments

मस्तच

शितल
गुरुवार, 06/25/2009 - 11:08 नवीन
निरिक्षक डॉन राव, पिझ्झा व्यवस्थित पचला ना. ;) बाकी मस्त लिहिले आहेसच हे सां. न्.ला.:)
  • Log in or register to post comments

गुड

अभिज्ञ
गुरुवार, 06/25/2009 - 13:18 नवीन
गुड वन. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

जबरा

दिपक
Fri, 06/26/2009 - 11:26 नवीन
भारी लिहलंय डॉनभाऊ... तिथेच बसुन सगळं बघितल्यासारखं वाटलं :)
  • Log in or register to post comments

डॉन्याभाऊ,

विसोबा खेचर
Fri, 06/26/2009 - 14:43 नवीन
डॉन्याभाऊ, उत्तम बॅटिंग रे... लिहिते रहा, छान लिहिताय तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ...

छोटा डॉन
Fri, 06/26/2009 - 15:01 नवीन
(आता अनायसे धागा वर आला आहेच तर ) प्रतिसाद देणार्‍या, न देणार्‍या, कौतुक करणार्‍या व आपलेपणाने ४ दुरुस्त्या सुचवणार्‍या सर्व वाचकांचे आभार मानतो ...!!! धन्यवाद मित्रांनो ...!!! ------ (आनंदी) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

छान लिहिले

लिखाळ
Fri, 06/26/2009 - 20:07 नवीन
छान लिहिले आहेस :) असे निरिक्षण करायला मजा येते. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments

मस्त छंद

Nile
Sat, 06/27/2009 - 00:46 नवीन
मस्त छंद आहे डॉनराव! मला पण असे निरिक्षण करायला फुल्ल मजा येते. येउ द्या अजुन. पण नातंवंड वगैरे पाहुन हेवा वाटतोय! काय खरं नाही राव तुमचं. ;)
  • Log in or register to post comments

पिझ्झा मस्त

पाषाणभेद
Wed, 07/01/2009 - 15:20 नवीन
पिझ्झा मस्त झालाय. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग आवडले! ललित असावे

इंटरनेटस्नेही
Sun, 08/29/2010 - 12:35 नवीन
दोन्ही भाग आवडले! ललित असावे तर ते असे!
  • Log in or register to post comments

सुंदर!!

पैसा
Sun, 08/29/2010 - 13:11 नवीन
खूपच छान.
  • Log in or register to post comments

मस्त,

स्वाती
Sun, 08/29/2010 - 18:56 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

ल अ ई ब हा री ही

शिल्पा ब
Sun, 08/29/2010 - 21:52 नवीन
ल अ ई ब हा री ही
  • Log in or register to post comments

आजकाल बर्‍याच वेळा "हास्य

नाना चेंगट
Fri, 07/13/2012 - 18:50 नवीन
आजकाल बर्‍याच वेळा "हास्य ओठात साठलेले, जाते कुठे सांग ना.. आश्रु नजरेत साचती कसे सांग ना!!" असे होत आहे, कशामुळे ते माहित नाही, बहुतेक काहीतरी बिघडलेले आहे नक्की.
डानरावांचं अजूनही बिनसलेलंच दिसतंय.. बर्‍याच दिवसांत त्यांचे दमदार लेख पहायला मिळाले नाहीत. अर्थात त्यांना विचारलं तर ते मी सध्या वाचनमात्र आहेत असे सांगून बोळवण करतात. ठीक आहे. वाट पाहू. मिटलेच डोळे तर डान्राव आणि कावळा पाहून घेतील काय करायचं ते... आपल्याला काय !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा