कंटाळा आला आहे यार!
कंटाळा आला आहे यार!
तोच तोच गंजलेला किनारा
त्याच बोथट पावसाच्या धारा
आणि जोडीला नेभळट वारा
चार दिशांचा पिंजरा
आणि आभाळाचं ओझं
नकोय हे सगळं...
एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो!
दुःखाचा गुडघाभर चिखल
सोबत विचारांचं जंगल
शंकांच्या वावटळी
अज्ञाताचा ताण
आणि तत्वांची हेळसांड!
नकोय हे सगळं
एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो!
जुन्या विचारांचा बुजबुजाट
पोथीवादाची रटरट आणि
कुत्र्याच्या छत्र्यांचा बाजार!
मूर्खांचा सुळसुळाट
भीतिची जळमटं!
नकोय हे सगळं
एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो!
झाडाला फ़ुलं येतात पण
झाड बहरत नाही
समुद्र रोज खवळतो पण
त्यात गांभिर्य नाही,
उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा
चंद्र-सूर्य येतात जातात
रुतू आपलं काम करतात
सकाळ रात्रीला भेटत नाही
आणि पहाटेला संध्याकाळ दिसत नाही
कंटाळा आलाय यार!
एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3810
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता !!!
+१
In reply to छान कविता !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमच्या पृथ्वीवर यायला ...
छान..
समुद्र रोज खवळतो पण
त्यात गांभिर्य नाही,
उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा
या ओळी चांगल्या आहेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
सही ... काय लिहिलं आहे राव ? एकदम मस्त....
मस्त कविता
मित्रा, कवि
सही पकडला
In reply to मित्रा, कवि by chirag