Skip to main content

कंटाळा.....

लेखक विवेकवि यांनी शुक्रवार, 22/02/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
कंटाळा आला आहे यार! कंटाळा आला आहे यार! तोच तोच गंजलेला किनारा त्याच बोथट पावसाच्या धारा आणि जोडीला नेभळट वारा चार दिशांचा पिंजरा आणि आभाळाचं ओझं नकोय हे सगळं... एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! दुःखाचा गुडघाभर चिखल सोबत विचारांचं जंगल शंकांच्या वावटळी अज्ञाताचा ताण आणि तत्वांची हेळसांड! नकोय हे सगळं एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! जुन्या विचारांचा बुजबुजाट पोथीवादाची रटरट आणि कुत्र्याच्या छत्र्यांचा बाजार! मूर्खांचा सुळसुळाट भीतिची जळमटं! नकोय हे सगळं एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो! झाडाला फ़ुलं येतात पण झाड बहरत नाही समुद्र रोज खवळतो पण त्यात गांभिर्य नाही, उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा चंद्र-सूर्य येतात जातात रुतू आपलं काम करतात सकाळ रात्रीला भेटत नाही आणि पहाटेला संध्याकाळ दिसत नाही कंटाळा आलाय यार! एक नवीन प्रुथ्वी बांधू म्हणतो!
लेखनविषय:

वाचने 3810
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कवितेचा रचनाबंध आणि त्यातला आशय आवडला.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो. "गंजलेला किनारा" आवडला.

समुद्र रोज खवळतो पण
त्यात गांभिर्य नाही,
उगाच तोच तोच पणाचा बालीशपणा

या ओळी चांगल्या आहेत.


- (सर्वव्यापी)प्राजु


मित्रा, कविता चोरण्याइतकी चांगली आहे का? मग मी खरोखर भाग्यवान आहे !! धन्यवाद माझी कविता चोरल्या बद्दल !! http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2584253509602561334 www.shabdayogi.blogspot.com/2008/02/blog-post_7312.html www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2592603.cms