हा लेख या आधी कुठेही प्रकाशित झलेला नाहीं. सर्वप्रथम मिसळपाववर प्रसिद्ध करताना मला हर्ष होत आहे.
काळेसाहेब,
'मनापासून धन्यवाद!' इतकेच म्हणू इच्छितो..!
'खास मिपाकरता म्हणून काही लेखन करेन..'असा आजच दिलेला शब्द आपण इतक्या तातडीने आणि कसोशीने पाळलात हे निश्चितच अभिनंदनीय आहे!
एका उत्कृष्ठ भाषणाचा मुद्देसूद अनुवाद केल्याबद्दल धन्यवाद.
चित्रे साहेबांशी सहमत...
तात्या.
कर्कसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे हा अनुवाद नसून संक्षिप्त परिचय आहे. त्यात "ओबामांची एक खासियत आहे. ते कधीच तिरकस बोलत नाहींत. आणि बोलायची शैली अशी कीं ऐकणार्याला खात्री वाटते की हा माणूस जे बोलतो तेच त्याच्या मनात असतं व जे मनात असतं तेच तो बोलतो. यात कांहींही आत-बाहेर नसतं. विषय-मग तो सोयीचा असो किंवा गैरसोयीचा-त्याला ते थेट हात घालतात." किंवा (टीप: याची माहिती "Dream from my father या ओबामालिखित पुस्तकात वाचायला मिळते-सुधीर काळे) यासारखी माझी वाक्ये आहेत, पण एरवी ६००० शब्दांना २००० शब्दात मी मांडले आहे.
भाषणाच्या मध्येच ११००/२००० हे काय असा प्रश्न पडला होता.
पण तुमच्या वरील खुलाश्यावरुन ते काय हे समजले.
बाकी भाषणाचे कॉम्प्रेहेन्शन तुम्ही सुंदर केले आहे.
ओबामा जसे मनात आहेत तेच बोलतात किंवा बोलतात तेच मनात असते. असे तुम्ही म्हणालात, आजपरर्यंन्तची त्यांची भाषणे एकून/ वाचून हा माणूस फक्त बोलतोच की काय असे वाटते. कुणी राजकिय निरिक्षकाने हे भाषण म्हणजे " अॅज युज्वल हेवी ऑन प्रॉमिसेस" असे नमूद केल्याचे आठवते.
पण हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे तुमच्या भाषण- संक्षेपाचे ( आत्त आठवला मराठी प्रतिशब्द!) सौंदर्य कमी होत नाही.
(११००/२०००) हा भाग खोडण्याचा मी (बहुदा यशस्वी) प्रयत्न केला आहे!
खरं तर सध्या बोलताहेत तरी बरे, आता त्यांनी घेतलेल्या कृतींचा कसा आणि किती उपयोग होईल हे कळायला एकादे वर्ष तरी लागेल. काल मी लिहिलेले एक पत्र पणजीच्या नवहिंद टाईम्समध्ये प्रसिद्ध झाले आहे त्याचा एक छोटासा भाग खाली दिला आहे, पहा कसा वाटतो ते. पण हा भाग इंग्लिश भाषेमध्ये आहे, तरी क्षमस्व.
पूर्ण पत्र वाचायचे असल्यास http://tinyurl.com/kjk5km ही लिंक वापरावी!
In Pursuit of an Untrodden Path
by K B KALE Posted on 2009-06-19
Link: http://www.navhindtimes.com/story.php?story=2009061922 किंवा http://tinyurl.com/kjk5km
SUCCESS of a speech can be gauged by how it is attacked and what it leads to. From both these counts, Mr Barack Obama’s speech in Cairo seems to be a great success with Muslim audiences all over the world.Firstly, it attracted pre-emptive attack from his biggest adversary, the Al Qaeda, two full days before he gave it (“Obama’s bloody messages would not be concealed by polished words”)!
And then, last Sunday, the Israeli PM accepted the two-nation theory to create a Palestine state. Though he added a lot of conditions, these are just pre-loaded stuff for trading at the negotiating table in subsequent ‘give-and-take’.
So the US President, Mr. Obama is worthy of congratulations for this success.
सर्वप्रथम मराठीतून मिपावर टंकन केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.
भाषण ऐकले होतेच (रेकॉर्डेड) तुमचा स्वैर संक्षिप्त-अनुवाद छान झाला आहे. तुम्ही नियमीत इंग्रजीत लेखन करता असे वाटते.. तरीही ह्या अनुवादात योग्य मराठीचा वापर कौतुकास्पद आहे.. अनेक प्रतिशब्द चपखल आहेत..
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
<<<सर्वप्रथम मराठीतून मिपावर टंकन केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.>>>
हेच म्हणतो...
यु हॅव केप्ट युवर प्रॉमीस...
<<ओबामा जसे मनात आहेत तेच बोलतात किंवा बोलतात तेच मनात असते. असे तुम्ही म्हणालात, आजपरर्यंन्तची त्यांची भाषणे एकून/ वाचून हा माणूस फक्त बोलतोच की काय असे वाटते. कुणी राजकिय निरिक्षकाने हे भाषण म्हणजे " अॅज युज्वल हेवी ऑन प्रॉमिसेस" असे नमूद केल्याचे आठवते>>>
सहमत्....
जे ते म्हणतायत ते जर त्या॑च्याकडुन झाल तर चा॑गलच आहे..
बाकी" अमेरिकेनी" जर "जगाचे पोलीस" ही भुमीका सोडली तर मुस्लीमच काय पण सर्व राष्ट्रा॑चे (अमेरिका धरुन )भले होईल,असे मला वाटते....एक मात्र चा॑गल आहे की " हिलरी क्लि॑टन" परराष्ट्र खाते स॑भाळत आहे.बाकी काही ही असो म॑त्रालय आणी त्याला लागणारा पैसा स॑भाळण्यात ह्या बाई बाकबगार आहे असे म्हणतात.पद ग्रहण करताच पाकीस्तानला दिलेल्या पैशाचा हिशेब मागीतला होता म्हणतात या बाईने,
बाकी ह्या सर्व प्रकारात आज आमच्या "क्लि॑टन" साहेबा॑ची आठवण झाली..आय्.आय्.एम मध्ये आहेत सध्या,मिपावर असते तर त्या॑नी नक्की काहीतरी चा॑गले खरडले असते....
सुहास
खरं की काय?
नुकताच यमसदनास पाठवलेला प्रभाकरन मुसलमान होता वाटतं?
बिहारमधील माओवादी मुसलमान आहेत का?
त्रिपूरातील एन्.एल्.एफ्.टी. हे ख्रिश्चन आतंकवादी आहेत ऐकून आहे.
जेडीएल हे ज्युईश आतंकवादी नाहीत तर कोण आहेत?
आतंकवाद्यांना धर्म नसतो असे वाटते .. नाहि का?
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
प्रतिक्रिया
धन्यवाद
सुंदर!! अप्
अग अग बशी
हा लेख या
कर्कसाहेबांचा शेरा
११००/२०००
भाषणाचा
(११००/२०००)
सर्वप्रथम
काळे साहेब...धन्यवाद...
All Muslims are not
खरं की काय?
मालेगावची साध्वी ?