भेसूर रात्र (आणि आस्वाद)
काल अचानक मी
बसलो उठून रात्री
लक्षात आले मजला
अमावस्या ती सर्वपित्री
कुठलेच नव्हते आवाज
कुठलाच रव नाही
थरथरत्या फांद्या अन्
झाडाला झोप नाही
पिंपळावरील मुंजा
हसतो भेसूर तेव्हा
सळसळत्या पानांचा
उच्चार अस्फुट होई
भुंकती मध्येच तेव्हा
रस्त्यावरील कुत्री
ऐकण्यासाठी त्यांना
कानांची लक्तरे उरली ...
१. वरील कविता अक्षरगणवृत्तात आहे की मात्रावृत्तात की मुक्तछंदात यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
२. कवितेचा नक्की आशय काय असे कुणी विचारल्यास आम्ही पानभर लिहायला तयार आहोत.
३. या कवितेत लपलेला सामाजिक आशय सापडला का? नसेल तर ही कविता वातावरणाचे वर्णन करणारी कलाकृती आहे असे समजावे.
४. पहिल्या कडव्यामध्ये 'बसलो उठून रात्री' या पेक्षा ' उठलो बसून रात्री' अशी रचना जास्त वैचित्र्य निर्माण करेल का?
५. कवीवर कुणा कवीचा प्रभाव आहे असे वाटते का?
आस्वाद
आमच्याच कवितेचे तिर्हाईतपणे समिक्षण करून (म्हणजे भलावण करुन) आम्ही तिचे गांभीर्य आणि सौंदर्य आपणापर्यंत पोहोचवतो. (तसेही कोण याचे समिक्षण करणार! म्हणून ते ही आम्हीच करतो आहोत. ;) )
ही कविता आम्हाला विशेषत्वाने आवडण्याचे कारण असे की कोणतेही अवजड शब्द न वापरता सहज तर्हेने कवीने केलेली ही रचना आहे. केवळ चार साध्या कडव्यांमध्ये कवी फार मोठी वातावरण निर्मिती करतो.
पहिल्या कडव्यातच दिसते की एक सामान्य स्थितीतला माणूस (की ज्याला अपरात्री वीज गेल्यामुळे उकाडा सहन न होऊन जाग येऊ शकते) अचानक झोपेतून जागा होतो. आणि त्याच्या मनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा त्याला सर्वपित्री अमावस्येची आठवण करून देतो. कवी फार खुबीने 'अंधश्रद्धा' या विषयाला येथे स्पर्श करतो. आता तो सामान्य माणूस आपल्या भावनांचे प्रक्षेपण किती सहज तर्हेने खिडकीबाहेरील झाडावर करतो ते पहा. त्या झाडाला झोप नाही असे त्याला वाटते. कवीने किती सूक्ष्म तर्हेने मानवी स्वभावाचा अभ्यास केला आहे तेच येथे दिसते. मानवी मनाच्या या खेळामध्ये कवी आता अजूनच मजा आणतो. तो आता असे काही संकेतचिन्हं वापरतो की त्याने वातावरणाचे अजूनच पोषण होते. मुंजा या संकेताचा इतका प्रभावी वापर क्वचितच काव्यामध्ये सापडेल. त्याच्या जाणिवेने आणि हसण्याने खरेतर अंगावर शहारे येतील. पण इथे मात्र 'पानांची सळसळ' हा ध्वनीवाचक शब्द योजून कवी भलतीच कमाल करतो.
आता ध्वनीवाचक शब्दांनंतर येणारे 'कुत्र्याचे भुंकणे' इतके स्वाभाविक आणि कवितेच्या प्रवाहाशी निष्ठा दाखवणारे आहे की कवीचे या बाबतीतले कसब विशेषत्वाने कौतुकास पात्र ठरते. अश्या या भेसूर रात्रीच्या विचित्र परिस्थितीत तो अचानक 'कानांची लक्तरे' या तर्हेचा शब्दवापर करुन एका वेगळ्याच उंचीवर कवितेला नेऊन ठेवतो.
खरेतर या नंतर उषःकाल होईल, मनावरचे भीतिचे सावट दूर होईल या तर्हेच्या कडव्याची वाचक मनात अपेक्षा धरत असतो. मनावरचा ताण त्याला हलका करायचा असतो. पण कविता या वळणावरती सोडून देऊन तिचा प्रवाह खंडित न करता तिला वाचकाच्या मनामध्ये तसेच प्रवाहित ठेवण्यात कवी यशस्वी झाला आहे. ;)
--(कवी आणि आपल्याच कवितेचा समिक्षक) लिखाळ.
वाचने
19587
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
विशेषणांत कंजूषपणा
दखल
In reply to विशेषणांत कंजूषपणा by धनंजय
:)
In reply to विशेषणांत कंजूषपणा by धनंजय
रसास्वाद
आस्वाद
In reply to रसास्वाद by प्रियाली
आदरणीय
In reply to रसास्वाद by प्रियाली
हा हा
In reply to रसास्वाद by प्रियाली
लिखाळगुरु
आभार
In reply to लिखाळगुरु by विसोबा खेचर
हाहाहा..
प्रेताचे
झकास
>>अवांतर -
In reply to झकास by सहज
अज्जुकाताई ...
In reply to >>अवांतर - by नीधप
>>त्याबद्दल
In reply to अज्जुकाताई ... by मुक्तसुनीत
कृपया हलके घ्या अज्जुकाताई/काकू
In reply to >>अवांतर - by नीधप
सहजरावांशी सहमत
In reply to झकास by सहज
ह. ह. पु. वा.
सहमत
In reply to ह. ह. पु. वा. by ऋषिकेश
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ह. ह. पु. वा.
फंटास्टिश..
छान
:)
In reply to छान by सुनील
भय कविता ..
असेच म्हणतो -
In reply to भय कविता .. by मनीषा
वाढा
हा हा हा
In reply to वाढा by विजुभाऊ
आता तुम्ही
In reply to हा हा हा by लिखाळ
हा हा
In reply to आता तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
सर्वांचे
भिषॉन शुंदोर...
:)
In reply to भिषॉन शुंदोर... by बिपिन कार्यकर्ते
लिखाळ,
हा हा
In reply to लिखाळ, by चतुरंग
हरकत नाही!
In reply to हा हा by लिखाळ
:)
In reply to हरकत नाही! by चतुरंग
व्य. नि. पाठवला आहे !
In reply to हरकत नाही! by चतुरंग
.
In reply to व्य. नि. पाठवला आहे ! by शाल्मली
+१
मस्त मजा
हल्लीच्या राजकारणावरची
सामाजिक
In reply to हल्लीच्या राजकारणावरची by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
लिखाळरावा
याची आठवण आली
मस्त!
त्यावरचं परीक्षण
In reply to मस्त! by प्रियाली
म्हणूनच वर काढण्याची सुपारी
In reply to मस्त! by प्रियाली
कावळा
In reply to म्हणूनच वर काढण्याची सुपारी by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा हा!
"भेसूर" विडंबन!
In reply to हा हा हा हा! by चतुरंग
ऑक्टोबरचा महिना
अजून भुते खेते येऊ द्या.
In reply to ऑक्टोबरचा महिना by प्रियाली
हा हा हा ...
In reply to अजून भुते खेते येऊ द्या. by बेसनलाडू
हेडलेस
In reply to अजून भुते खेते येऊ द्या. by बेसनलाडू
निषेध निषेध