✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिवसेना पुन्हा उभी राहील?-उत्तरार्ध

स
सुधीर काळे यांनी
Wed, 06/17/2009 - 16:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4498 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

अदितीला धन्यवाद

सुधीर काळे
Wed, 06/17/2009 - 16:58 नवीन
अदितीने दिलेल्या एका छोट्याशा टिपमुळे माझा शिवसेनेवरचा उत्तरार्ध शेवटी एकदा घोड्यावर चढला! थँक यू, अदिती.
  • Log in or register to post comments

आधीचा धागा

नितिन थत्ते
Wed, 06/17/2009 - 17:07 नवीन
आधीचा धागा कुठे गेला? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

काळेसाहेब,

विसोबा खेचर
Wed, 06/17/2009 - 17:16 नवीन
काळेसाहेब, आपल्या वैचारिकतेला, व्यासंगाला दाद देतो. आपली कळकळही वाखाणण्याजोगी आहे. पण खरं सांगू का? शिवसेना काय, राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय किंवा कुठला इतर राजकीय पक्ष काय, सगळे एकाच माळेचे मणी! प्रत्येक राजकीय नेता आपल्याच तुंबड्या भरून पुढच्या ४२ पिढ्यांची सोय करण्यात मग्न असतो. त्याला आम पब्लिकशी काहीही देणंघेणं नसतं! "फिनिक्स" पक्षाप्रमाणे शिवसेनेने २००९च्या निवडणुकीतील पराभवाच्या राखेतून पुनर्जन्म घ्यायलाच हवा. ती काळाची गरज आहे व मराठी जनतेची तशी शिवसेनेला आर्त हाकही आहे. कार्य खूप विशाल व व्यापक आहे, पण मा. बाळासाहेबांच्यासारख्य़ा नेत्याने मनात आणले तर माझ्यासारखे "मावळे" लाखांनी येतील व त्यांना पूर्णपणे सहकार्य करून "सोनियाचा (गांधी नव्हे) दिवस अजी अमृते पाहिला"चा प्रत्यक्ष प्रत्यय अखिल महाराष्ट्राला आणून देतील. मला एक सांगा काळेसाहेब, शिवसेनेकडे ५ वर्ष सत्ता होती तेव्हा तिने काय असे झेंडे गाडले? किती स्थानिक भूमिपूत्र मराठी माणसांकरता ते वरदान ठरलं? म्हणून "शिवसेना" कीं "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" हा वाद इथेच संपवावा असे मला वाटते. शिवसेना हीच जननी आहे व तिचेच नांव पुढेही चालावे, माननीय बाळासाहेबांनी श्री राज ठाकरे यांना त्यांच्या अनुयायांसह मोठ्या मनाने शिवसेनेत परत बोलवावे व श्री राज ठाकरेंनी तितक्याच नम्रपणे ते निमंत्रण स्वीकारून आपल्या सर्व अनुयायांसह स्वगृही परत यावे. आणि अगदी ठासून सांगायची गोष्ट अशी कीं शिवसेनेतून बाहेर न पडलेल्या नेत्यांनी स्वत:च्या एकनिष्ठेचा दुरुपयोग करून श्री राज ठाकरेंना व त्यांच्या अनुयायांना हिणवूही नये. माफ करा काळेसाहेब, परंतु याला मी भाबडा आशावाद असं म्हणेन! आता ज्या काही थोड्याफार आशा आहेत त्या मनसेकडूनच आहेत..! अवांतर - केव्हातरी आपला एखाद दुसरा लेख मिपावर प्रथम प्रकाशित होईल अशी आशा करतो. मिपाच्या वाट्याला नेहमी पूर्वप्रकाशित लेख येतात हे तेवढंसं बरं वाटत नाही.. काय म्हणता? आपला, तात्या.
  • Log in or register to post comments

"तय्यार Ready-to-eat माल" नव्हता

सुधीर काळे
Wed, 06/17/2009 - 19:52 नवीन
तात्यासाहेब, आपण सुचवलंत व मी मिसळ-पाव जॉईन केलं. असं मी करेन असं माझ्या ध्यानी-मनीही नव्हतं. त्यामुळे "तय्यार Ready-to-eat माल" नव्हता. म्हणून इतरत्र प्रकाशित झालेले कांहीं लेख इथे दिले. (शिळासप्तमी!) त्यातला काळे प्रणाली हा विषय जरी मी पूर्वी लिहिला असला तरी नवीन-नवीन उदाहरणे मी त्यात घालतच असतो. पण, अपने दोस्तीकी कसम, यापुढचा लेख अस्सल 'मिसळ-पाव'साठी लिहिलेला असेल. कुठले तरी चार पाच विषय सुचवाल कां? दुसरी गोष्ट म्हणजे इथले सभासद कसे आहेत याची अजीबात कल्पना नव्हती, पण ज्या मोकळेपणानं आणि आपुलकीनं माझं इथं स्वागत झालं आणि ज्या खुबीने सभासदांची "शेरेबाजी" चालते ती पाहून इथं लिहायला मी खूप उत्साहात आहे. <<केव्हातरी आपला एखाद दुसरा लेख मिपावर प्रथम प्रकाशित होईल अशी आशा करतो. मिपाच्या वाट्याला नेहमी पूर्वप्रकाशित लेख येतात हे तेवढंसं बरं वाटत नाही.>>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

काळे साहेब्...शतश : धन्यवाद...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 06/17/2009 - 20:13 नवीन
<<<दुसरी गोष्ट म्हणजे इथले सभासद कसे आहेत याची अजीबात कल्पना नव्हती, पण ज्या मोकळेपणानं आणि आपुलकीनं माझं इथं स्वागत झालं आणि ज्या खुबीने सभासदांची "शेरेबाजी" चालते ती पाहून इथं लिहायला मी खूप उत्साहात आहे.>>> आम्ही ही अजुन मिपावरती रा॑गतच आहोत.आपण सभा॑सदाना जी सन्मानाची पावती दिली त्याबद्दल धन्यवाद... अरे कोणी आहे का तिकडे..काय जरा बघा की काळे साहेब काय म्हणतायत आपल्याबद्दल... सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

मिपा!

Nile
गुरुवार, 06/18/2009 - 12:44 नवीन
पण ज्या मोकळेपणानं आणि आपुलकीनं माझं इथं स्वागत झालं आणि ज्या खुबीने सभासदांची "शेरेबाजी" चालते ती पाहून इथं लिहायला मी खूप उत्साहात आहे.
येउद्या हो अजुन. आम्ही वाट पाहतो आहोत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

आशा

सुधीर काळे
Wed, 06/17/2009 - 17:36 नवीन
आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा: प्रधावन्ति, मुक्ता: तिष्ठन्ति पंगुवत I never stop hoping!
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

नम्रता राणे
गुरुवार, 06/18/2009 - 11:56 नवीन
काळेसाहेब अभ्यासपुर्ण लेख लिहल्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!!! राज ठाकरेंनी पुन्हा परतावं, हि केवळ शिवसैनिकांचीच इच्छा नसुन तमाम मराठी माणसांचीच असेल असे मला वाटते... राज यांनी सेनेचा राजीनामा दिल्यानंतर उध्दव म्हणाले होते कि सेनेची दारे राज यांना सदासर्वदा खुली असतील. नुकत्याच राज यांना दिलेल्या उत्तराच्या पत्राच्या अखेरीस राज यांना शुभेच्छा व आशिर्वाद देऊन उध्दव यांनी राजकीय मुत्सुदीपणा दाखवला असे राजकीय विश्लेषकांचेसुध्दा मत आहे. असो .भाउबंद्की विसरुन दोन्ही भाऊ एकत्र आले तर बाळासाहेबांनी केलेल्या संस्काराचे सार्थकच होईल. भाऊबंदकीच्या आणि दुहीच्या शापापासून महाराष्ट्र कधी शापमुक्त होणार हे जगदंबेसच ठाऊक. जगदंबे अंत पाहू नकोस.. महाराष्ट्रास आतातरी उ:शाप दे
  • Log in or register to post comments

जर रा़ज

चिरोटा
गुरुवार, 06/18/2009 - 12:26 नवीन
जर राज ठाकरे परतले तर शिवसेनेची भूमिका काय असेल? गेल्या काही महिन्यांत मनसे मराठी प्रश्नावरुन मुद्दे उठवते आणि सेना मग तिचे अनुकरण करते असे चित्र होते. आतापर्यंत सामनामधील अग्रलेख 'पाकड्यांचा नायनाट करा/बांग्लादेशीना हाकला' अशा स्वरुपाचे असायचे. गेल्या काही महिन्यात स्थिती बदलली आणि उध्धव ठाकरेही राज ठाकरे ह्यांच्यासारखे वक्तव्य करु लागले. शिवसेना ह्यापुढे कथित हिंदुत्वाचा मुद्दा लावुन धरणार की मराठीचा मुद्दा लावुन धरणार? जर रा़ज ठाकरे परत शिवसेनेत आले तर तो त्यांचा नैतिक पराभव नाही काय? सेनेने त्याना परत घेतले तर सेना आणि काँग्रेस ह्यात फरक काय उरला? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नम्रता राणे

गाजावाजा न करता दोघांनी मुकाट्याने एक व्हावे

सुधीर काळे
गुरुवार, 06/18/2009 - 14:57 नवीन
दोघांनी एक होण्यात त्यांचे व मराठी माणसांचे भले आहे. मान-पान बाजूला ठेऊन, एकमेकांना कोपरखळ्या न मारता, गाजावाजा न करता दोघांनी मुकाट्याने एक व्हावे व सर्व मराठी जनतेच्या दुवा घ्याव्यात. हे कदाचित स्वप्नरंजन असेल, पण स्वप्ने असतील तरच तिच्यामागे माणुस लागतो ना? जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवसेना! सुधीर काळे
  • Log in or register to post comments

झाले गेले

नम्रता राणे
गुरुवार, 06/18/2009 - 17:35 नवीन
झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे. मराठी माणसाच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी कसला अपमान ?आणि कसला नैतिक पराभव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा