आधीच्या भागात आपण घटना बनविण्यामागची भूमिका आणि भारतीय घटनेचे गठन प्रस्तावनेच्या रूपात बघितले. आता या भागापासून भारतीय घटनेची महत्त्वाची अंगे आपण जरा विस्ताराने विचारात घेऊयात. प्रत्येक देशाच्या नागरिकांना विविध प्रकारचे हक्क असतात, तसे ते भारतीय घटनेने भारतीय नागरिकांना काही हक्क दिलेले आहेत. त्या घटनादत्त हक्कांचा व अधिकाराचा उहापोह आपण या भागात करणार आहोत.
बिल ऑफ राईटस (अधिकारसुची)
देशातील प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी असण्याचा/नाकारण्याचा हक्क असतो. घटना अश्या हक्कांची यादी बनविते. अश्या घटनेत दिलेल्या नागरिकांच्या हक्कांच्या यादीला बिल ऑफ राईटस (अधिकारसुची) म्हणतात. ही सुची सरकारच्या निर्णयांनादेखील बांधील असते म्हणजे सरकार जेव्हा निर्णय घेते तेव्हा ती एखाद्याच्या अधिकारांवर नियमबाह्य गदा येणार नाही याची शाश्वती करणे गरजेचे असते. घटना नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करते. पण कुणापासून? तर कोणत्याही दुसऱ्या व्यक्ती, समूह, संस्था आणि अगदी सरकारकडून नागरिकांचे हक्क डावलले जात असतील तर घटना त्या हक्कांचे रक्षण करते.
हि अधिकारसुची घटना बनविताना अस्तित्वात आली नाही तर स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी शी. मोतीलाल नेहरू यांनी १९२८मध्ये ब्रिटिश सरकारकडे भारतीयांच्या काही अधिकारांची मागणी केली होती. तीच यादी घटना बनविताना घटनाकारांना वापरता आली. घटनेमध्ये मोतीलाल नेहरूंनी बनविलेल्या यादीला बऱ्याच अंशी समाविष्ट केले गेले आणि त्या हक्कांना "मूलभूत हक्क " / "पायाभूत हक्क" (फंडामेंटल राईटस) असे म्हटले आहे. या हक्कांशिवाय नागरिकांना इतर सर्वसामान्य हक्क आहेतच. सर्वसामान्य हक्क हे साध्या कायद्यांनी/नियमांनी/धोरणांनी संरक्षित आहेत. मात्र मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी मात्र घटनेने स्वतःवर घेतली आहे आणि घटनेने सरकारला या हक्कांचा आदर करण्याचा 'सल्ला' न देता बंधनकारक केले आहे. केवळ "आणीबाणी" अशी वेळ आहे जेव्हा राष्ट्रपती / सरकार नागरिकांचे हे मूलभूत हक्क नाकारू अथवा संकुचित करू शकते.
भारतीय नागरिकांचा प्रत्येक हक्क या लेखात देणे हा उद्देश नाही आणि शक्यही नाही. आपण फक्त मूलभूत हक्कांचा ढोबळ धांदोळा घेऊया:
१. समानतेचा अधिकारः
भारतीय समाजाला विविधप्रकारच्या वर्गीकरणाअंतर्गत व्यक्ती व्यक्तीमध्ये भेद होण्याचा काळा इतिहास (आणि काही प्रमाणात वर्तमान) आहे. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकाला घटना समान वागणुकीचा अधिकार देते. या मूलभूत अधिकाराअंतर्गत प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे वगैरे ठिकाणी प्रवेश करण्यास समान हक्क दिला आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जात, पंथ, रंग, लिंग, धर्म अथवा जन्मस्थानामुळे भेदभाव केला जाऊ शकत नाही. याच सूत्रानुसार सरकारी नोकऱ्या देताना या बाबींमुळे भेदभाव केला जाऊ शकत नाही.
अस्पृश्यता ही भारतीय लागलेली कीड समाजसुधारकांनी दूर करण्याचा बराच प्रयत्न केला. त्यालाच पूरक असा हा कायदा झाल्यापासून देशात अस्पृश्यतेचे प्रमाण घटले आहे.
अशावेळी प्रश्न पडतो की मग जातीय आरक्षण हा समानतेच्या हक्कांचा संकोच नाही का? तर घटनाकारांनी याचे उत्तर तेथेच (आर्टिकल १६(४) मध्ये)दिले आहे
आर्टिकल १६(४) नुसार "एखाद्या मागासलेल्या अथवा पीछेहाट झालेल्या समाजाला सर्वांबरोबर आणण्यासाठी जर सरकार त्या घटकाला एखादी विशेष सवलत अथवा आरक्षण देऊ इच्छित असेल तर समानतेचा अधिकार अश्या आरक्षणाआड येऊ शकणार नाही"
सारांश द्यायचा तर समानतेच्या अधिकारात पुढील गोष्टी येतातः
- कायद्यांमधील (कायद्यांद्वारे अंमलबजावणी होणारी) समानता
- कायद्याद्वारे समान संरक्षण
- धर्माच्या आधारे भेदभावावर प्रतिबंध
- दुकाने, स्नानगृहे/नदीवरील घाट, उपाहारगृहे आदी ठिकाणी कोणत्याही भेदभावास मज्जाव
- नोकऱ्यांमध्ये समान संधी
- संस्थाने व पदव्या व त्यांचे अधिकार रद्दबातल
- अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी
- भाषणस्वातंत्र्य
- विचार स्वातंत्र्य
- शांततामय जमावाचे स्वातंत्र्य
- एकत्र येण्याचे (संस्था/पक्ष उभारण्याचे स्वातंत्र्य)
- भारतातील कोणत्याही भागात फिरण्याचे स्वातंत्र्य
- भारतातील कोणत्याही भागात स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य
- भारतातील कोणत्याही भागात कायद्याने वैध असा कोणताही व्यापार करण्याचे स्वातंत्र्य
- जगण्याचे स्वातंत्र्य
- वैयक्तिक स्वातंत्र्य
- अटक झालेल्याचे व आरोपींचे स्वातंत्र्य
- सामाजिक कल्याण
- सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय
- जीवनमान उंचावणे
- असलेल्या संसाधनांचे समान वाटप
- आंतरराष्ट्रीय सलोखा व शांततेला उत्तेजन देणे
- स्त्री व पुरुषांना कामाचा समान मोबदला
- आर्थिक शोषणास रोख
- काम करण्याचा अधिकार
- मुलांच्या स्वतंत्र आणि बंधनकारक शिक्षणाचा अधिकार
- समान नागरी कायदा
- दारूबंदीचा कायदा
- कुटीरोद्योगास चालना
- पशुहत्या
- पंचायतींस चालना
वाचने
8343
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
उत्तम!
+१
In reply to उत्तम! by स्वाती दिनेश
१००%
उत्तम लेख.
उत्तम
उत्तम
उत्तम
+१
In reply to उत्तम by नितिन थत्ते
हाही लेख आवडला.
गुड वन...
लेखमाला आवडते आहे
माहितीपूर्ण
उत्तम
आभार