जमलाय हा पण लेख. अगदी मनापासून आवडला. फोटोही खूप खास! [तुझ्या या लेखामुळे गिनीज बुकात नोंद झालेल्या ४० लाखांच्या साडीचा फोटो तरी पहायला मिळाला! ] अजून असंच लिहित रहा.
:)
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
कलंदरबाई, छान लिहिता हो. ओघवती आहे शैली. एकदा वाचायला सुरूवात केली तर शेवटपर्यंत वाचावेसे वाटते.
काही निरिक्षणांशी पूर्ण सहमत मात्र नाही. काही काही गोष्टी वैश्विक असतात. केवळ एखाद्याच समूहाला लागू नाही पडत.
अवांतर: आता पुढचा लेख कधी? कशावर?
बिपिन कार्यकर्ते
>>काही काही गोष्टी वैश्विक असतात. केवळ एखाद्याच समूहाला लागू नाही पडत.
मान्य करते.. तिथल्या मराठी/तमिळ लोकांचं राहाणीमान/जीवनपद्धती कशी असतं हे तरी नक्कीच माहित नव्हतं.... शेवटी मी जे ऐकलं ते फक्त शब्द्बबद्द केलं... हे माझं स्वतःचं मत नाही...
बाकी हा मराठी समाज म्हणजे.. पांढरपेशा समाज नव्हे.. तर सोन्या-चांदीची दुकाने चालवणारे की ज्याना गलाईवाले (सोने गाळणारे नि गाळता गाळता मारणारे) म्हणतात, असे लोक आहेत.. हे दागिने बनवत नाहीत.. सबब सोनार नव्हे... मराठा समाजाचं अशा "दुकानला" (त्यासाठी प्रचलित शब्द)असण्याचं प्रस्थ अधिक आहे.... सांगली जिल्हयातल्या बर्याचशा लोकांची अशी दक्षिण व उत्तर भारतात दुकाने आहेत.. इतर ठिकाणच्या लोकांचीही असतील तर मला माहीत नाही... इथल्या विटा या तालुक्याच्या गावातले ७०% हून अधिक लोक या व्यवसायात आहेत....
शिकलेल्या नि नोकरी करणार्या लोकांचं जीवनमान नक्कीच वेगळं असावं..
पुढचा लेख यापेक्षा खूप वेगळा असेल.. कथा/कविता वगैरे काही माझा प्रांत नाही.. आणखी एक अनुभव.. पण अगदी हटके... :)
अवांतरः ख्वाहिश या चित्रपटात खुर्जुवेकर आडनावाची मल्लिका या विट्याची असल्याचं दाखवलं होतं
अतिअवांतरः चित्रपट तर नाही पाहिला पण केबलवर लागला तेव्हा एक लग्नातलं एक दृष्य पाह्यलं होतं.. जमिनीवर बसून पत्रावळीवर जेवणार्या पंगतीचं.. काही प्रमाणात खरं असलं तरी मला मात्र ते ज्या प्रकारे प्रोजेक्ट केलं होतं ते नव्हतं आवडलं..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
मस्त वर्णन..
मी ३ वर्ष चेन्नाईला राहिलो. असेच अनुभव आले. कंपनीत कामानिमित्त कोठल्या मुलीशी बोलायचा संबंध आला की ती मुलगी आणि आजुबाजूचे सर्वजण बावचळून बघायचे. मुळ कारण म्हणजे मी त्यांच्या द्रुष्टीने उत्तर भारतीय...जणू काही कोठल्या तामिळ मुलीला पळवणारच होतो.
एकदा असेच गिंडीहुन लोकलने एगमोरला चाललो होतो. लोकल थोडी भरलेली होती. समोरासमोरच्या खुर्च्यांवर एक जोडपे बसले होते. त्या पुरूषाशेजारी कोणी बसले होते म्हणून मी त्या बाईशेजारी (थोडी जागा सोडून) बसलो. त्यानंतर अरे बापरे..असे काही रामायण घडले ...तो पुरूष आणि बाजूवालेतर चेकाळलेच. काय वाट्टेल ते बोलायला लागले. पहिल्यांदा तर ते काय सांगतात तेच कळत नव्हते. नंतर आमची भाषेची अडचण समजल्यावर एका सभ्य (?) ग्रुहस्थाने मला थोडे दटावूनच सांगितले की बाईच्या शेजारी कशाला बसला. मी साधा सरळ प्रश्न केला की जर त्या पुरूषाला आपल्या बायकोशेजारी कोणी बसलेले खपत नव्हते तर तो तिच्या शेजारी का नाही बसला? हे म्हणजे उघड्याने हिंडायचे आणि मग सर्व बघतात म्हणून बोंबलायचे.
एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की सगळी तामीळ माणसे त्यांच्या चित्रपटात असणारा बिभत्सपणा कसा काय खपवून घेतात?
त्यांच्या स्वभावामुळे मी तामिळ भाषा पुर्ण शिकू शकलो नाही. काही बोलायचा प्रयत्न केला की माझ्या होणार्या चुकांवर हसायचे आणि मला अतिउपदेश करायचे की तामिळ कसे शिकावे. आमच्या कंपनीत मिटिंग्ज पण तामिळ मध्ये व्हायच्या. एकदा असेच तामिळ बोलायचा प्रयत्न करत असताना एका वरिष्ठाने मला "Do'nt **** our language."
असे सांगितले. त्यानंतर त्या रागात तामिळ शिकणे बंद केले आणि सरळ कंपनीत तक्रार केली. त्यानंतर मी असलो की मिटिंग्ज इंग्रजीत होऊ लागल्या.
खादाडमाऊ
खरंतर मला आधी वाटलं होतं की पंधरवड्याच्या वास्तव्यात असं मत बनवण बरं नाही.. नि कदाचित जास्त दिवस्/महिने तिकडे राहिले असते तर त्या लोकांच्या स्वभावाची दुसरी चांगली बाजूही समजली असती.. पण तीन वर्षांनंतरही जर तुमचा हा अनुभव असेल... तर आता वाटतंय की १५ दिवस पुष्कळ झाले...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
प्रतिक्रिया
सुन्दर
खुप छान
सुंदर...
शक्य आहे..
मस्त!
छान लिहता.
मस्त!
मस्त
अरे बापरे..
एकदम कलंदर
मस्त..
छान सफर! चारही भाग फार आवडले.