<<एका हातात काठी असेल आणि दुसर्या हातात केवड्याचं फूल असेल तर ह्या डांसांचा उपद्र्व आणि गुणगुणणं चुकवायला दोन्ही हाताचा खांद्या कडचा भाग कानाजवळ उंचावून उपयोगात आणल्या शिवाय गत्यंतर नसायचं.>>
सही, किती बारीक निरिक्षण आहे तुमचं. लेख तर मस्तच. वाचताना मी नकळत माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये ओढला गेलो, कोकणातल्या घरी जाउन पोचलो.
खारीला चानी हे नाव आहे हे माहित नव्हतं...
आमच्या घरी स्वयंपाक घरात बर्याच वेळा खार येत असे...मग तिच्यासाठी मी बर्याच वेळा एखादा फळाचा तुकडा किंवा बिस्कीटाचा तुकडा एका को पर्यात ठेवुन देत असे,,,खारीची पिल्ल (तिच्या घरट्यासकट) मी पाहिली आहेत्...त्या घरट्यात पिल्लांना मऊ वाटावे म्हणुन तिने शेवरीचा कापुस निट लावुन ठेवला होता...आता सिमेंटची घरे वाढल्या पासुन खारींची संख्या मात्र रोडावली आहे!!!
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
लेख आवडला सामंतकाका. माझ्या समोरच्या गुलमोहरावर आणि औदुंबरावर तुरूतुरू धावत येणा-या खारुलीला पाहून मला लग्नातल्या करवलीचीच आठवण होते, काम काहीच नाही, नुसतंच इकडून तिकडे लगबग लगबग मिरवत रहायचं. कशाची इतकी घाई अस्ते तिला देव जाणे! औदुंबराची फळं खाताखाता मध्येच काहीतरी आठवल्यासारखं करून धावत सुटते! माझी सकाळ या चिमुकल्या मैत्रिणीचे खेळ पहाण्यात कशी जाते, कळत नाही!
:) क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
प्रतिक्रिया
<<एका हातात
खारीला
करवली!