Skip to main content
लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 19/10/2026 13:59 या दिवशी प्रकाशित केले.

जय देव जय देव जय झुरळ देवा,

खुर्ची मिळवून दे, करीन तुझी सेवा 

तुमच्या चरणाचे आम्ही आहोत दास

तुमच्या कृपेची लागलीये आस जय देव जय देव . . .

 

अमू-नरूला तुमची किती भीति,

तुमचे गुण गाई आमची ही जेंझी

सातासमुद्रापार तुमची ही ख्याती, 

होऊ दे पामरास सत्ताप्राप्ती जय देव जय देव . . .

 

स्वतःच्या पक्षाची करून माती,

रागौठा सुसुममता लोटांगण घालती

अभिआषु सौरभ नेहाचे चरण चुंबिती

त्यांचे भविष्य तुमच्याच हाती जय देव जय देव . 

 . 

 

आम्ही असू किती येडे बावळे,

आमचे तारणहार तुम्हीच झुरळे

तुमचे आशीर्वाद असो आमच्या माथी,

स्मरण करू तुमचे दिवसराती जय देव जय देव |

________________________________________

 

(तैलप: - या संस्कृत शब्दाचा अर्थ झुरळ)

 

लेखनविषय:

वाचने 227
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मस्त लिहिली आहे आरती! 

तैलप या  संस्कृत शब्दाचा अर्थ झुरळ असा होतो हे माहित नव्हतं.‌ बाकी या झुरळ आंदोलनाच्या निमित्ताने तिलचट्टा हा शब्दही माहीत नव्हता तो माहीत झाला!


In reply to by कांदा लिंबू

हो तिलचट्टा पण नव्हता माहिती, झुरळ आणि कॉक्रोच एवढंच माहिती होतं.


In reply to by कांदा लिंबू

त्यावेळी माझ्या मनात तिलचट्टा व सिलबट्टा या शब्दांत काहीशी संदिग्धता होती आणि बोलताना त्या शब्दांची अदलाबदली व्हायची. तेंव्हा "अरे, झुरळ म्हणजे तिलचट्टा असतं, सिलबट्टा नाही; झुरळाला पुन्हा सिलबट्टा म्हणालास तर तुझ्या डोक्यात तोच सिलबट्टा घालीन" अशी जाहीर धमकी मला घरून मिळाली होती! 😁


In reply to by कांदा लिंबू

हा हा 

तुम्ही हे सांगितल्यावर सिलबट्ट्याचा अर्थ बघून आले 🤭

सिलबट्टे तर तिलचट्ट्यांच्या डोक्यात पडलेत आता 🙃


भारत बहुभाषिक देश आहे. बाकी काही नाही तरी झुरळाला इतर भाषांत काय म्हणतात याचे ज्ञान झालेच की!

 

• हिंदी: कॉकरोच (Cockroach) किंवा तिलचट्टा (Tilchatta)

• गुजराती: वांदो (Vando)

• बंगाली: तेलापोका (Telapoka)

• तामिळ: कारप्पां पूछी (Karappan Poochi)

• तेलुगु: बोडिंक (Bodinka) किंवा बोंडिंगा

• कन्नड: जिुरळे (Jirale)

• मळयालम: पाटा (Paatta)

• पंजाबी: तिलचट्टा (Tilchatta)

 

🤣🪳


In reply to by कर्नलतपस्वी

बंगाली तेलापोका आणि संस्कृत तैलप: यांचे साधर्म्य आहे. हिंदी/पंजाबी तिलचट्टा हा सुद्धा जवळचा शब्द आहे. तैलप म्हणजे तेल पिणारा, तेल चाटणारा. झुरळ तेलापाशी असते म्हणून हे नाव पडले असावे.

 

कन्नड जिरूळेशी मराठी झुरळाचे साधर्म्य आहे.