जय देव जय देव जय झुरळ देवा,
खुर्ची मिळवून दे, करीन तुझी सेवा
तुमच्या चरणाचे आम्ही आहोत दास
तुमच्या कृपेची लागलीये आस जय देव जय देव . . .
अमू-नरूला तुमची किती भीति,
तुमचे गुण गाई आमची ही जेंझी
सातासमुद्रापार तुमची ही ख्याती,
होऊ दे पामरास सत्ताप्राप्ती जय देव जय देव . . .
स्वतःच्या पक्षाची करून माती,
रागौठा सुसुममता लोटांगण घालती
अभिआषु सौरभ नेहाचे चरण चुंबिती
त्यांचे भविष्य तुमच्याच हाती जय देव जय देव .
.
आम्ही असू किती येडे बावळे,
आमचे तारणहार तुम्हीच झुरळे
तुमचे आशीर्वाद असो आमच्या माथी,
स्मरण करू तुमचे दिवसराती जय देव जय देव |
________________________________________
(तैलप: - या संस्कृत शब्दाचा अर्थ झुरळ)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
227
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
😃तैलप = झुरळ हे नव्हते माहिती
😃
तैलप = झुरळ हे नव्हते माहिती
हा हा हा !!!
मस्त लिहिली आहे आरती!
तैलप या संस्कृत शब्दाचा अर्थ झुरळ असा होतो हे माहित नव्हतं. बाकी या झुरळ आंदोलनाच्या निमित्ताने तिलचट्टा हा शब्दही माहीत नव्हता तो माहीत झाला!
हो तिलचट्टा पण नव्हता माहिती…
In reply to हा हा हा !!! by कांदा लिंबू
हो तिलचट्टा पण नव्हता माहिती, झुरळ आणि कॉक्रोच एवढंच माहिती होतं.
तिलचट्टा व सिलबट्टा
In reply to हा हा हा !!! by कांदा लिंबू
त्यावेळी माझ्या मनात तिलचट्टा व सिलबट्टा या शब्दांत काहीशी संदिग्धता होती आणि बोलताना त्या शब्दांची अदलाबदली व्हायची. तेंव्हा "अरे, झुरळ म्हणजे तिलचट्टा असतं, सिलबट्टा नाही; झुरळाला पुन्हा सिलबट्टा म्हणालास तर तुझ्या डोक्यात तोच सिलबट्टा घालीन" अशी जाहीर धमकी मला घरून मिळाली होती! 😁
हा हा तुम्ही हे सांगितल्यावर…
In reply to तिलचट्टा व सिलबट्टा by कांदा लिंबू
हा हा
तुम्ही हे सांगितल्यावर सिलबट्ट्याचा अर्थ बघून आले 🤭
सिलबट्टे तर तिलचट्ट्यांच्या डोक्यात पडलेत आता 🙃
😂 तिलचट्टा म्हणजे तेल…
In reply to तिलचट्टा व सिलबट्टा by कांदा लिंबू
😂
तिलचट्टा म्हणजे तेल चाटणारे असा संबंध असावा.
आंदोलनाचा काहीतरी फायदा झालाच ना!
भारत बहुभाषिक देश आहे. बाकी काही नाही तरी झुरळाला इतर भाषांत काय म्हणतात याचे ज्ञान झालेच की!
• हिंदी: कॉकरोच (Cockroach) किंवा तिलचट्टा (Tilchatta)
• गुजराती: वांदो (Vando)
• बंगाली: तेलापोका (Telapoka)
• तामिळ: कारप्पां पूछी (Karappan Poochi)
• तेलुगु: बोडिंक (Bodinka) किंवा बोंडिंगा
• कन्नड: जिुरळे (Jirale)
• मळयालम: पाटा (Paatta)
• पंजाबी: तिलचट्टा (Tilchatta)
🤣🪳
बंगाली तेलापोका आणि संस्कृत…
In reply to आंदोलनाचा काहीतरी फायदा झालाच ना! by कर्नलतपस्वी
बंगाली तेलापोका आणि संस्कृत तैलप: यांचे साधर्म्य आहे. हिंदी/पंजाबी तिलचट्टा हा सुद्धा जवळचा शब्द आहे. तैलप म्हणजे तेल पिणारा, तेल चाटणारा. झुरळ तेलापाशी असते म्हणून हे नाव पडले असावे.
कन्नड जिरूळेशी मराठी झुरळाचे साधर्म्य आहे.