सहज मात्र
सहज लिहून पाठवतोस तू
जे सूचतं तुझ्या मनात...
मी मौनात घुसमटते अन्
शोधत राहते शब्द मात्र...
सहज फिरतोस कुठे कुठे
अन् म्हणतोस, "येशील का?"
मनपाखरू झेपावतं पण...
पाय तिथेच चौकटीत मात्र...
सहज गातोस गाणे कधी
तालसुरांत बरसून जातोस
स्वरधारांच्या वर्षावात मी
चिंब भिजत राहते मात्र...
सहज येऊन बसतोस समोर
आणि बोलतोस असंच काही
दिवस जातो कसा तरी
रात्र सरत नाही मात्र...
अशा अनेक सहज गोष्टी
सहजपणेच केल्या असशील
त्यानंतर जगणे माझे
सहज राहिले नाही मात्र...!!
- श्वेता २४ © 2026
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
188
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहज
सहज बनवतेस जेवण,
सुग्रास,सुंगध दरवळत रहातो
पोट केव्हांच भरते !
बोटे चाटत रहातो मात्र.......🤣
आवडली.
दुरूस्ती
सहज करून जातेस,
सुग्रास,सुंगध दरवळत रहातो
पोट केव्हांच भरते !
बोटे चाटत रहातो मात्र.......🤣
आवडली.
विडंबन करू क्या,कच्चा माल चांगला आहे.
😂 मस्तच कर्नलसाहेब
विडंबनाची आतुरतेने वाट पाहत आहे...
जरुर करा...
सुरेख
साधी सरळ आणि तरीही मस्त,
पैजारबुवा,
धन्यवाद पैजारबुवा
In reply to सुरेख by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद पैजारबुवा
सुंदर innocent कविता आहे.
सुंदर innocent कविता आहे.
छान.
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
@मारवा @प्रा.डॉ.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्याला कविता आवडली हे वाचून आनंद झाला.
तिचं भावविश्व हळुवारपणे प्रकट करणारी कविता...
किती सहजपणे मनातलं व्यक्त केलं आहे! काही क्षण आपल्यासाठी सहज असतात, पण समोरच्याच्या मनात तेच क्षण भावनांचं वादळ उठवून जातात… ❤️
या कवितेपासून प्रेरणा घेऊन इथे चार ओळी खरडल्या आहेत.
@कांदा लिंबू
In reply to तिचं भावविश्व हळुवारपणे प्रकट करणारी कविता... by कांदा लिंबू
माझी कविता इतकी प्रेरणादायी ठरेल असं वाटलं नव्हतं...🤣
काही क्षण आपल्यासाठी सहज असतात, पण समोरच्याच्या मनात तेच क्षण भावनांचं वादळ उठवून जातात…
अगदी कवितेच्या मूळ भावनेला हात घातलात तूम्ही...
आणि 'त्याच्या' दृष्टीकोनातून लिहीलेली तुमची कविताही फार आवडली...
मस्तच!
मस्तच!
धन्यवाद श्वेता
In reply to मस्तच! by श्वेता व्यास
तुम्हाला कविता आवडली हे वाचुन आनंद झाला.
कविता छान आहे. बाकी काही…
कविता छान आहे.
बाकी काही म्हणा, काही कविता/लेख तात्काळ विडंबनासाठी उद्युक्त करतात.
@श्रीगुरुजी
In reply to कविता छान आहे. बाकी काही… by श्रीगुरुजी
धन्यवाद. आपले विडंबन ही आवडले...
सहज कोणी लिहून जातेमनाची…
सहज कोणी लिहून जाते
मनाची दारे उघडून देते.
कल्लोळ वाहून जातो
होतो मी नि:शब्द मात्र
छान कविता आहे ही
@विजुभाऊ वा!
In reply to सहज कोणी लिहून जातेमनाची… by विजुभाऊ
वा! प्रतिसाद आवडला...
खूप धन्यवाद..
निरागस!
कविता आवडली.
@अनन्त यात्री
In reply to निरागस! by अनन्त्_यात्री
मनापासून धन्यवाद...
छान कविता! समजेल अशी!
छान कविता! समजेल अशी!
वाह ...सुंदर ! +१०१
वाह ...सुंदर !
+१०१
@अबा@चौकौ
In reply to वाह ...सुंदर ! +१०१ by चौथा कोनाडा
आपल्याला कविता आवडली हे वाचून आनंद झाला.
प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद
तुम्ही सहज कविता लिहिली…
तुम्ही सहज कविता लिहिली मात्र विडंबनांचं गाजर गवत माजलं.
@श्रीगुरुजी
In reply to तुम्ही सहज कविता लिहिली… by श्रीगुरुजी
असुदेहो गुरुजी...
सगळीच विडंबने एकापेक्षा एक आनंद देणारी आहेत...
शिवाय वेगळ्या दृष्टिकोनातून लिहीलेल्या कविता व प्रतिसादातल्या ओळी देखील कौतुकास्पद आहेत..
सगळे लिहीते झाले व आस्वाद घेत आहेत हे जास्त महत्वाचे...निमित्त काही का असेना...
@गाजर गवत माजलं.
तुम्हीं पण बी बीयाण ,खतपाणी टाकलत की?
विखारी,बिन बुडाच्या टिका टिप्पण्या करण्यापेक्षा विंडबन बरे ना....