Skip to main content
लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 16/10/2026 13:42 या दिवशी प्रकाशित केले.

(( सहज मात्र ))

 

सहज खाऊन जातोस तू

जे पडतं तुझ्या पानात...

मी घास चिवडत राहते अन्

गिळत बसते घास मात्र...

 

सहज लोळतोस कुठेही

अन् म्हणतोस, "लोळशील का?"

जांभई झेपावते पेंग येते पण...

डोळे तारवटतात मात्र...

 

सहज पितोस मद्य कधी

धूम्रकांडी पेटवून जातोस

घोटभर पाण्याच्या  प्रतीक्षेत मी

तृषार्त राहते मात्र...

 

सहज चावतोस दशगुणी तांबूल कधी

गायछाप खाऊन जातोस

लवंग सुपारीच्या शोधात मी

मेंटॉस चघळत राहते मात्र ....

 

लेखनविषय:

वाचने 123
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सहज लोळतोस कुठेही

अन् म्हणतोस, "लोळशील का?"

जांभई झेपावते पेंग येते पण...

डोळे तारवटतात मात्र...

 

सहज चावतोस दशगुणी तांबूल कधी

गायछाप खाऊन जातोस

लवंग सुपारीच्या शोधात मी

मेंटॉस चघळत राहते मात्र ....

 

🤣