(( सहज मात्र ))
सहज खाऊन जातोस तू
जे पडतं तुझ्या पानात...
मी घास चिवडत राहते अन्
गिळत बसते घास मात्र...
सहज लोळतोस कुठेही
अन् म्हणतोस, "लोळशील का?"
जांभई झेपावते पेंग येते पण...
डोळे तारवटतात मात्र...
सहज पितोस मद्य कधी
धूम्रकांडी पेटवून जातोस
घोटभर पाण्याच्या प्रतीक्षेत मी
तृषार्त राहते मात्र...
सहज चावतोस दशगुणी तांबूल कधी
गायछाप खाऊन जातोस
लवंग सुपारीच्या शोधात मी
मेंटॉस चघळत राहते मात्र ....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
123
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
2 Bad,गुरूजी...
वैधानिक चेतावणी दिली नाहीत. FDA वाले कवीता नक्कीच जप्त करणार.
🤓
In reply to 2 Bad,गुरूजी... by कर्नलतपस्वी
🤓
मिपाखरं शॉक्स्, श्रीगुरुजी…
मिपाखरं शॉक्स्, श्रीगुरुजी रॉक्स् !
😆 काय हे गुरुजी
सहज लोळतोस कुठेही
अन् म्हणतोस, "लोळशील का?"
जांभई झेपावते पेंग येते पण...
डोळे तारवटतात मात्र...
सहज चावतोस दशगुणी तांबूल कधी
गायछाप खाऊन जातोस
लवंग सुपारीच्या शोधात मी
मेंटॉस चघळत राहते मात्र ....
🤣
हा हा हा 🤣
हा हा हा 🤣
गुर्जींची कविता...लै भारी
गुर्जींची कविता...
लै भारी
गुरुजी... गुरुजी....
पाय इकडे पाठवुन द्या
पैजारबुवा,
हे घ्या 😃 🦶 🦵
In reply to गुरुजी... गुरुजी.... by ज्ञानोबाचे पैजार
हे घ्या 😃
🦶 🦵