ज्ञानेशकुमारांना घालवा, त्यांना जायला लावणारच असा निर्धार करून, माध्यमांनी झूम करून दाखविलेले एक किरकोळ आंदोलन संपूर्ण मृत झाले. अनेकांनी या आंदोलनात आपल्या पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला, परंतु पोळ्या जळून कोळसा झाला.
विमानाच्या महागड्या व्यावसायिक वर्गातून देशभर उंडारणारे रिकामटेकडे तथाकथित विद्यार्थी नेते दिपके, रांका, दास इ. राणा भीमदेवी थाटात गर्जना करीत होते. त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला. विमानातून उतरतानाच तिघांनाही पोलिसांनी पकडले. महिला पोलिस असल्याने त्यांच्या अंगचटीला जाऊन झटापट करणे अशक्य झाले. विमानातील सहप्रवाशांनी या तिघांना भरपूर शिव्या हासडल्या व टाळ्या वाजवून आणि कचरा गेला अशी प्रतिक्रिया देऊन यांना पकडल्याचा आनंद व्यक्त केला.
दुसऱ्या दिवशी न्यायाधीशांनी तिघांना सशर्त मुक्त केले, परंतु शांतताभंग होईल अशी कोणतीही कृती एक वर्ष करणार नाही असे ५० हजार रूपयांच्या बंधनपत्रावर लिहून दिल्यानंतरच सुटका झाली.
त्याच दिवशी दिपकेची चुलत आजी गेली. मुक्त झाल्यानंतर दिपकेने सांगितले की मला पोलिसांनी आजीच्या मृत्यूचे वृत्त दिले नाही, कोणाशीही संपर्क करून दिला नाही. पोलिसांनी तात्काळ त्याला वृत्त सांगितल्याचे, घरी संपर्क करण्यासाठी मदत करण्याचे व घरी परतण्यासाठी मदत करण्याचे सांगितले असल्याची चित्रफीत दाखवून त्याचा खोटारडेपणा उघड केला.
दरम्यान, या तिघांवर सर्व माध्यमे लक्ष केंद्रित करीत आहेत हे पाहून अस्वस्थ झालेल्या रागा कंपनीने स्वतःची वेगळी चूल मांडली. आधी सहकाऱ्यांसमवेत राष्ट्रपतींना जाऊन भेटला व बाहेर आल्यावर राष्ट्रपतींच्या नावाने खोटे सांगितले. हाच खोटारडेपणा त्याने मृत्युशय्येवर असलेल्या मनोहर पर्रीकरांना भेटून आल्यानंतरही केला होता व तो वाचून संतप्त पर्रीकरांनी त्याचे वाभाडे काढले होते.
नंतर दुसऱ्या दिवशी हीच मंडळी मोर्चा काढून सरन्यायाधीशांना भेटण्यास गेली व न्यायाधीशांनी सूज्ञपणे भेटण्यास नकार दिला. तुम्ही न्यायालयात पुराव्यासहित याचिका दाखल करा असे सांगितले.
या मोर्चात या बंधुभगिनींची गुंडगिरी व माज दिसला. रागाने एकदा डाव्या हाताचे कोपर व एकदा उजव्या हाताचे कोपर आपल्याच पक्षकार्यकर्त्याच्या पोटात मारले. भगिनीनेही तेच केले. रागाने एका महिला पोलिसाच्या कंबरेला मागून अत्यंत असभ्य पद्धतीने धरून तिला ढकलण्याचा प्रयत्न केला. नंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री शिवकुमार यांच्या कॉलरला धरून मागे खेचले. पराशर नामक ३ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिला पत्रकाराला ढकलून खाली पाडले. हरयाणातील एक नेता दीपक हूड्डा यालाही ट्रकवरून खाली उतरण्यास भाग पाडले.
अजून एक वाईट प्रकार म्हणजे पत्रकारांसमोर आपल्या वयोवृद्ध पक्षाध्यक्ष खरगेंना बॅटमॅनचा मुखवटा घालून उभे केले, तेव्हा ते अत्यंत केविलवाणे व दु:खी दिसत होते.
एकंदरीत हे दोन्ही बंधुभगिनी अत्यंत उद्दाम झाले असून मनसोक्त गुंडगिरी करीत आहेत.
१० ऑक्टोबरला काही ठिकाणी थोडे लोक जमून आंदोलन करीत होते. ते माध्यमांनी झूम करून अति प्रचंड आंदोलन असल्याचा भास निर्माण केला.
११ ऑक्टोबरला त्रिमूर्ती बंधनपत्र देऊन बाहेर आल्यानंतर आंदोलन मृत झाले. १३ ऑक्टोबरला रांका आणि दासने जंतरमंतरवर विनाअनुमती प्रवेश करून गोंधळ करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना पकडण्यात आले व आता त्यांना न्यायाधीशांनी १९ ऑक्टोबरपर्यंत तिहार तुरूंगात पाठविले आहे.
दरम्यान १२ ऑक्टोबरला रागा टोळीने मोर्चाने जाऊन ज्ञानेशकुमारांना घालविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु त्यात अनेक त्रुटी आहेत.
आता दिपके घरी आहे व घरातून कृबुच्या मदतीने मोदींची घाणेरडी चित्रे तयार करून माध्यमांवर प्रदर्शित करीत आहे. रांका व दास अजून ४ दिवस सरकारी पाहुणचार घेणार आहेत. रागा आणि मंडळींनी आंदोलन पुढे ढकलले आहे कारण जनतेचा पाठिंबा नाही, पण कारण दिलंय की नवरात्रौत्सवामुळे आंदोलन तात्पुरते थांबविलंय.
प्रत्यक्षात हे आंदोलन मेल्यात जमा आहे. आंदोलनाचा शून्य प्रभाव जनतेवर पडलेला दिसतोय. किंबहुना जनता झुरळांवर संतापली आहे. ज्ञानेशकुमार, मोदी व शाह आहे तेथेच आहेत. त्यांना शष्प धक्का लागलेला नाही.
तमाशा संपला आहे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका खऱ्या विषयाला वाचा…
एका खऱ्या विषयाला वाचा फोडण्यासाठी जे आंदोलन सुरु झाले होते ते अपेक्षेप्रमाणे राजकिय अजेंड्यावर गेले. नीट परीक्षा हा विषय आता ईतिहासजमा झालाय. नंतर घेतलेले विषय जसे की वोट चोरी , एस आय आर वगेरे ह्याला जनाधार तर नाहीच पण कोर्टात भक्कम केस उभी राहील असे पुरावे पण नाहीत. मग फक्त अजेंडा रेटण्यासाठी चुकीच्या बाबी पसरवणे सुरु झाले. एकजात सारे म्हणजे विदेशी पत्रकार, युएन, भारतातील पत्रकार, भुछत्राप्रमाणे उगवलेले इंडीपेंडंट पत्रकार, तुनळी पत्रकार ह्यांनी एकदम डराव केले तर ते खरे मानले जाईल असा बहुदा ह्या लोकांचा अंदाज होता. ह्या बाबी कदाचीत २० वर्षापुर्वी होत होत्या. आजकाल बातम्या सगळीकडुन येतात मग लोकांना त्याची सत्या सत्यता पहायला मिळते. त्यामुळे ह्या २.० आंदोलनाला कुणाचाही सपोर्ट मिळत नाहिये.
आता तर हसे होतेय. म्हणजे जे दोन कॉकरोच म्होरके अटकेत आहेत त्यांना तिरंगा फडकवला म्हणुन अटक केली असा तो राग यच्चयावत सगळे आळवता आहेत त्यांचे हसे होतेय. लोकांना त्यांच्या अटकेचे खरे कारण माहीत आहे. पण वेड घेउन पेडगावला जायचे प्रयत्न करता करता आपणच वेडे ठरतोय हे ह्यांना कोण सांगणार?
बाकी काहीही म्हणा, या…
बाकी काहीही म्हणा, या आंदोलनकर्त्या तथाकथित नेत्यांच्या पांचट चाळ्यांमुळे भविष्यातील होऊ शकणाऱ्या आंदोलनांवर विपरीत परिणाम झाला आहे. भविष्यातील आंदोलने कदाचित चांगल्या हेतूने केली जाणार असतील तरीही त्यांच्याकडे लोक संशयानेच पाहतील. १४-१५ वर्षांपूर्वी केजरींनी केलेले आंदोलन आणि त्या जोरावर सत्ता प्राप्त केल्यानंतर केलेले पांचट चाळे यामुळे लोकांचा असल्या आंदोलनावरचा विश्वास आधीच उडालेला होता. झुरळांच्या फडफडीमुळे राहिला साहिला विश्वास सुद्धा उडून गेला आहे.