तुला पाहिले
मला वाटले
जशी सुरंगी सांज
रंग फुलांचे
लेऊन आली
परी नभीची आज.
क्षितिजापरी
हे भाळ असे
ये उगवून लाली
सांज लाली ही
कुणी रेखिली
सांग तुझ्या गाली.
येई फुलता
जसा फुलांचा
तसा आगळा
गंध तनुचा
किती दिलांच्या
छेडून तारा
तुझ्या कुंतला
झुलवी वारा
तुझी पाऊले
रुणझुणती
लेऊनी संगीत साज
रंग फुलांचे
लेऊन आली
परी नभीची आज.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
171
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्षितिजापरीहे भाळ असे ये…
क्षितिजापरी
हे भाळ असे
ये उगवून लाली
सांज लाली ही
कुणी रेखिली
सांग तुझ्या गाली.
भारी
धन्यवाद.
In reply to क्षितिजापरीहे भाळ असे ये… by गणेशा
मन:पूर्वक धन्यवाद.
वा!
वा!
धन्यवाद.
In reply to वा! by पाषाणभेद
मन:पूर्वक धन्यवाद.
छानच.
छानच.
आवडली कविता.
धन्यवाद.
In reply to छानच. by चांदणे संदीप
मन:पूर्वक धन्यवाद.
आवडली
पूर्ण कविता आवडली
धन्यवाद.
In reply to आवडली by आगाऊ म्हादया
मन:पूर्वक धन्यवाद.
छान!!!!
छान!!!!
धन्यवाद.
In reply to छान!!!! by धनावडे
मन:पूर्वक धन्यवाद.