Skip to main content
लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 09/10/2026 22:21 या दिवशी प्रकाशित केले.

तुला पाहिले 
मला वाटले 
जशी सुरंगी सांज
रंग फुलांचे 
लेऊन आली
परी नभीची आज.

क्षितिजापरी
हे भाळ असे 
ये उगवून लाली 
सांज लाली ही
कुणी रेखिली 
सांग तुझ्या गाली.
 

येई फुलता 
जसा फुलांचा 
तसा आगळा 
गंध तनुचा 
किती दिलांच्या 
छेडून तारा 
तुझ्या कुंतला
झुलवी वारा 
तुझी पाऊले 
रुणझुणती 
लेऊनी संगीत साज 
रंग फुलांचे 
लेऊन आली
परी नभीची आज.

 

https://youtu.be/X0AdTCXvgcw

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 14
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया