टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन धडकले. जरांगे यांनी उपोषण आरंभले. सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स एक आणि एकच बातमी चालवू लागले ते म्हणजे मराठ्यांचे आंदोलन. सरकार कसे आंदोलकांचे हाल करत आहे, अशा प्रकारच्या आंदोलकांच्या प्रतिक्रिया, व्हायरल व्हिडिओ, जरांगे यांचे नवे नवे अल्टिमेटम तासा-तासाला येऊ लागले. राज्यातील इतर सर्व समाज भेदरून एका बाजूला जाऊन बघत राहिले. शासनाने जरांगे यांचे समाधान करण्यासाठी नेहमीप्रमाणे एक अध्यादेश काढला आणि गुलाल उधळत जरांगे हे आपल्या गावी निघून गेले. आता तो अध्यादेश कसा मराठा समाजाच्या फायद्याचा आहे हे जरांगे समर्थक व सरकारमधील मराठा मंत्री सांगत आहेत तर तो कसा कायद्याला धरून नाही असे ओबीसी आंदोलक, व सरकारमधील ओबीसी मंत्री व काही मराठा आंदोलन अभ्यासकही सांगत आहेत. जरांगे यांच्या आंदोलनानंतर सर्वसाधारणपणे असेच होत आलेले आहे.
जरांगे यांच्या आंदोलनांचा इतिहास खूपच रोचक आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांवर फार मोठा अन्याय होत आहे असा आर्त टाहो फोडत जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यांची ग्रामीण भाषा, थेट बोलणे आणि साधे व्यक्तिमत्व यामुळे ते मराठा आंदोलनाचे सर्व मान्य नेते झाले. पण त्यांची भाषा नंतर मुख्यमंत्र्यांना नुसते अरे तुरे करण्यापर्यंत गेली एवढेच नव्हे, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची आय माय काढायला सुरुवात केली. 'कसा देत नाहीस तेच बघतो' अशी अतिशय उर्मट भाषा वापरून जरांगे आरक्षण मागू लागले. खरे तर गरजवंत माणूस दबलेला असतो, दुर्बळ असतो. तो सत्ताधाऱ्यानी आपल्या पदरात काहीतरी टाकावं म्हणून विनंती करत असतो. परंतु मराठा समाजाचे जरांगे आणि सामान्य आंदोलकही अत्यंत आक्रमक भाषेत 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं' अशा प्रकारच्या घोषणा देऊ लागले. मराठा समाज एका बाजूला आम्ही मागास आहोत म्हणून आरक्षण द्या अशी मागणीही करत होता आणि त्याच वेळी आपण कसे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, हा गंडही कुरवाळत होता. एका पोस्टरवर तर एक आंदोलक आरक्षण ही आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे, आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील असे लिहिलेले पोस्टर बरेच व्हायरल झाले होते. बहुधा ही सध्याचे ओबीसी व अनुसूचित जाती जमाती यांना उद्देशून होते. असाच मस्तवाल माज मराठा समाजाचे आय ए एस अधिकारी विश्वास पाटील यांनी व्यक्त केला होता दुवा: यांच्या बेछुट तोंडावर आळा कोणी आणेल का ? विश्वास पाटील यांनी आपल्या निवृत्तीच्या महिन्यात मुंबईच्या धानदांडग्या बिल्डरांच्या तीसहून अधिक फाईल्स निकालात काढल्या होत्या. ही अफाट कार्यक्षमता अर्थातच फुकट आणी केवळ पगारातून आलेली नाही. त्यांच्या लेखनावर त्यांच्या भावानेच वाङमय चौरयाचा आरोप केला होता. दुवा: विश्वास पाटील यांची जातीय गुर्मी
राजेंद्र लाखे नावाचे मराठा आंदोलनाचे नेते सध्या जरांगे यांच्यावर टीका करतात. ते म्हणाले की मराठा समाजाने पूलापुलावर पाच पन्नास लाख रुपये खर्च केले आहेत आणि समाजाने आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच लाखे हे असेही म्हणत आहेत की जरांगे यांनी केलेल्या मागण्या अजिबात घटनेनुसार कायद्यानुसार व संविधानिक नाहीत. दुवा: जरांगेंची एकही मागणी वैध नाही. आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च केले
आंदोलनात झालेल्या एकूण खर्च, मुंबईत आलेली हजारो वाहने आणि आंदोलनाची एवढी भव्य व्याप्ती पाहिल्यानंतर आपल्या जरांगे यांच्यासारख्या नेत्यावर जेसीबी वापरून फुले उधळणारा मराठा समाज कोणत्या अंगाने गरजवंत आहे तेच कळत नाही.बापट आयोग, सराफ आयोग, खत्री आयोग, गायकवाड आयोग, राणे समिती इत्यादी अनेक आयोग व समित्या आल्या आणि गेल्या पण कोणालाही मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे व त्यांचे शासनातील व नोकऱ्यातील प्रतिनिधित्व कमी आहे असे सिद्ध करता आले नाही. ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. ती काही फक्त मराठा समजाचीच वाईट झाली आहे असे नव्हे. पण मराठा समजासाठीची आरक्षणाची मागणी मात्र अधिक अधिक तीव्र स्वरूप धारण करत गेली आहे.
सध्या मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून ए ई बी सी आरक्षण दिले गेलेलेच आहे. घटनेनुसार आरक्षण कधीच एका जातीला मिळत नसते. ते प्रवर्गाला मिळत असते. परंतु मराठा या एकाच जातीसाठी वेगळा प्रवर्ग तयार करून तब्बल दहा टक्के आरक्षण देण्यात आले. इतर कोणती जात सरकारकडून अशी तरतूद करून घेऊ शकेल? याशिवाय ई डब्लु एस प्रवर्गात मराठा समाजाला आधीच दहा टक्के जागा आरक्षणात उपलब्ध आहेत. त्यातील साधारणपणे 80 टक्के आरक्षण हे मराठा समाजाने घेतलेले आहे तरीही जरांगे यांचे नुकतेच संपलेले आंदोलन हे मराठ्यांसाठी ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आहे, या कारणासाठी होते. आमचे म्हणणे मानले नाही तर आता मुंबईचे दाणापाणी बंद करू अशी धमकी ते देत आहेत. जरांगे यांची ताजी मागणी मान्य करताना शासनाने मराठा समाजाला जात प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक अध्यादेश काढलेला आहे. शासनाने असा कोणताही आदेश एकाच जातीसाठी कधी काढला असेल असे वाटत नाही.
आर्थिक तरतुदींचा विचार केला तर गेल्या तीन वर्षात मराठा समाजाच्या भल्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या सारथी संस्थेला फक्त कार्यालयसाठी मिळालेला निधी २५४८ कोटी रुपये आहे. मराठा समाजाच्या मुलांसाठीच्या वस्तीग्रूहसाठी १३०० कोटी रूपये देण्यात आलेले आहेत. मराठ मुलाना उद्योगासाठी थेट कर्ज म्हणून १२४८ कोटी रुपये दयेण्यात आलेले आहेत. बँकांकडून जे कर्ज त्यांना वितरित केले गेले आहे ते आहे १२६०० कोटी रुपये. मात्र गेल्या 23 वर्षात महाज्योती या ओबीसींच्या संस्थेला मिळालेला निधी साधारण 2500 कोटी आहे. आर्थिक तरतुदींचा विचार दुवा: https://www.youtube.com/live/w6AZyc-6Z1Q?si=w1UvS8R927RPpCPW इतर आरक्षित जातीच्या मुलांच्या विद्यावेतन व शैक्षणिक बाबतीत शासन कमालीचे उदासीन आहे. मराठा समाजाच्या अजित पवार यांच्याकडे गेले अनेक वर्षे आहे आणि ही आकडे केवळ योगायोग नव्हेत.
जेव्हा जरांगे यांचे आंदोलन चालू होते तेव्हा पार शरद पवार, महाजन, भुमरे, भरणे, विखे, कोकाटे यांच्यासारख्या अनेक मंत्र्यांनी जरांगेंच्या गादी शेजारी बसून त्यांची विचारपूस केली. माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील आंदोलनाच्या वेळी मध्यरात्री त्यांच्याजवळ आपले सचिव पाठवून दिले व पहाटे पहाटे जरांगे यांना हवा तसा अध्यादेश काढण्याची आधीसूचना जारी केली. असे लक्ष कुणा इतर जातीकडे शासनातील लोकप्रतिनिधी आणि बडे अधिकारी यांनी दिले आहे असे उदाहरण आढळून येत नाही. आठवा: सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण.
जरांगे हे फडणीसांना नेहमीच शेलक्या आक्रमक भाषेत दूषणे देत असतात परंतु शिंदे यांनी काढलेला आधीचा अध्यादेश कितीही कूचकामाचा असला तरी जरांगे यांनी एकदाही चकार शब्दाने कधी शिंदे यांच्या विषयी नापसंती व्यक्त केली नाही. तीच बाब अजित पवार यांच्याबाबत. हे पुढारी केवळ आणि केवळ मराठा जातीचे आहेत म्हणून जरांगे त्यांच्याविषयी कधीच काहीही नकारात्मक बोललेले नाहीत, हे अगदी स्पष्ट आहे.
1994 साली गोवारी समाजाने केलेल्या आंदोलनाची आता आठवण होते. तेव्हा त्यांच्यावर लाठीमार झाला, चेंगराचेंगरी झाली व 114 गोवारी आंदोलकांचा मृत्यू झाला. या समाजाला शासनाने काय दिले?
जरांगे यांनी आता हैदराबाद गेझेट लागू करण्याची मागणी करून सरसकट मराठ्यांना कुणबी करूनच घेतो अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. त्यावर आता लक्ष्मण माने हे त्याच हैदराबाद गेझेट चा आधार घेऊन भटक्या विमुक्त समाजाला आदिवासींचे सवलती लागू कराव्यात अशी मागणी करून त्याच आझाद मैदानात आंदोलनास बसले आहेत. त्यांची उपद्रवक्षमता अर्थातच जरांगे व मराठ समाजाइतकी नाही. भटक्या विमुक्तांना मराठ्यांइतका मोठा मोर्चा ट्रक, ट्रॅक्टर, हजारो वाहने घेऊन काढणे शक्य नाही. त्यांना मुंबई जाम करून सरकारच्या नाकी दम आणणे शक्य नाही. परंतु लक्ष्मण माने यांची मागणी मराठा समाजाच्या मागणीपेक्षा कमी न्याय आहे असे मात्र अजिबातच नाही. आता शासन लक्ष्मण माने यांच्या आंदोलनाला फुल मराठा समाजाच्या आणि जरांगे यांच्या आंदोलन इतकेच महत्त्व देते की त्यांच्यासाठी काही वेगळा अध्यादेश काढते ते पाहावे लागेल. अन्यथा एका जातीचे एका जातीसाठी चाललेले हे शासन आहे का, असा प्रश्न पडतो.
वाचने
4841
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
पोस्टर
असा लेख लिहायला खूप धैर्य
<जरांगे हे फडणीसांना नेहमीच
अभ्यासपूर्ण उत्तम लेख !
आता समाजातील दरी अजून वाढेल
In reply to अभ्यासपूर्ण उत्तम लेख ! by मारवा
Productivity आणि Quality आणि
जरांगे यांची भाषा नक्कीच
सरसकट मराठे गॅजेटचा वापर करुन कुणबी ठरविणे हाच तर हेतु आहे
यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही.हैद्राबाद गॅजेट लागु करण्याची मागणी करणे आणि या मागणीच्या माध्यमातुन सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणे यात वेगळेपणा काय आहे ? ते गॅजेट कोर्टात टिकणार कि नाही हे पुढची गोष्ट पण आज तरी त्या गॅजेटचा वापर हा "सरसकट सर्व मराठे कुणबी ठरविणे" या हेतुनेच केलेला आहे ना ?महाराष्ट्राच्या वर्तमान पत्रात ही काहीशी गुढ जाहीरात झळकली
राजकारण किती व्यक्तीपुजक होत
In reply to महाराष्ट्राच्या वर्तमान पत्रात ही काहीशी गुढ जाहीरात झळकली by मारवा
हैद्राबाद गॅझेटनुसार ज्यांची
उत्तम लेख.
उत्तम लेख आणि प्रतिसाद!!
सलाम
एखाद्या समाजाला नपुंसक करायचे
काही संदर्भ
चांगला लेख,
मराठा
छान
In reply to मराठा by धर्मराजमुटके
अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही.हे तर आहेच. कीती काळ आरक्षण द्यायचे? कोण देतंय आरक्षण असे समजायचे? घटनाकाराच्या मूळ हेतू ला सर्वानीच समजून घ्यायचे? कसे? वनटाईम सेटलमेंट केल्याप्रमाणे एकदमच भरपाई देऊन मिटवायचे उत्तम असे काहीही ठरले तरी इम्प्लीमेंटेशन किती अवघड आहे? एक नवे गृहयुध्द छेडण्याचा प्रकार होइल हा. अन्याय झालेले इतर वर्ग जसे की ज्यू, कृष्ण्वर्णीय, आदीवासी ह्या प्रत्येकाच्या केसीस वेगवेगळ्या आहेत. समाजासाठी योगदान देऊन विकास वगैरे लाँग टर्म गोष्टी प्रबोधन करुन किंवा अगदी शिकवून होतील असे वाट्त नाही. ती आतून येण्याची प्रक्रिया आहे. मोर्च्यात खाणे पिणे मोफत वाटणे अशा इंस्टंट योगदानाला सगळे तयार आहेत. अर्थात तुम्ही म्हणल्याप्रमाणे फायदे उपटायला मागास आणि समाजात वावरताना उच्च्वर्णीय असा दांभिकपणा असताना, घटनेला अभिप्रेत उतरंड आणि समाजातली खरी उतरंड ह्यातला फरक सतत राहणार. जातव्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षणव्यवस्था राहणार हे सर्वांनी कायमचे कोरुन घेईपर्यंत आरक्षण आणि जात भारतातून जाणार नाहीत.सरसकट सर्व जातींच्या
बरोबर एक वर्षाने
बरोबर एक वर्षाने...
जरांगे यांनी ऐन सप्टेंबर २०२५ प्रमाणे सप्टेबर २०२६ लाही गणपतीत मुंबईला धडक देण्याची घोषणा केली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचे १२ वे उपोषण स्थगित केले. या उपोषणाचे कारण होते ४ मराठा लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने फेटाळली. जरांगे यांनी आता 'मी एकटा पडलो आहे' असे म्हणायला सुरूवात केली आहे. त्यांच्या उशा पायश्याशी बसून त्यांच्या कानात बोलणारे मंत्री, जाणते राजे वगैरे आता त्यांच्याकडे येत नाहीत. खुद्द आंतरवालीत त्यांना विरोध सुरू झाला आहे. अजय बारस्कर हे त्यांचे एकेकाळचे साथी त्यांच्यावर अनेक आरोप करत आहेत. संदर्भ: https://www.youtube.com/live/p6mZfKhfNSk?si=aoplwgEfsaBrh-a1
आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी इतरही अनेक गंभीऱ आरोप केले: https://www.youtube.com/live/tQvfK_rarpA?si=AnhmMtHuUCX-CEOT
प्रत्येक वेळी जरांगे कंत्राटे आपल्या लोकांना मिळावी यासाठी बंद दाराआड चर्चा करतात असे त्यांचे म्हणणे आहे. जरांगे यांच्या निकटवर्तीयांवरील वाळू चोरीचा ४.५ कोटींचा दंड माफ करण्यात आला होता. तो आदेश आता शासनाने मागे घेतला आहे व दंड भरावा लागणार आहे.
या आंदोलनासाठी त्यांनी 'माझ्या उपोषणासाठी आपाआपल्या गाड्या व पैसे घेऊन मुंबईला या असा 'आदेश' दोन कोटी रुपयांच्या डिफेंडर गाडीत बसून मराठ्यांना दिला होता पण त्यांनीच मग 'त्यांचा गोरगरीब गरजवंत मराठ्यांसाठी पुकारलेला लढा' मागे घेतला. आजच्या पत्रकार परिषदेत बारस्कर यांनी सारथी या फक्त मराठा समाजासाठीच्या महामंडळाला सरकारने व मुख्यमंत्र्यांनी कसे हजारो कोटी रूपये दिले आहेत हे सांगितले. ते गेल्या पंचवीस वर्षात ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या महामंडळाला दिलेल्या निधीपेक्षा जास्त आहेत. वर आकडे दिले होतेच.
या सगळ्यात जरांगे मागे पडतीलही कदाचित, व या धाग्याचा विषय पण ती व्यक्ती नाही. पण या असल्या आंदोलनासमोर खरोखरचे ओबीसी, भटके विमुक्त कसे आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेणार? त्यांच्याकडे ना तेवढी ताकद आहे, ना त्यांच्यातले कोणी मंत्री आहेत, ना गाड्या, ना पैसा. परंतु जरांगे यांच्या चार लोकप्रतिनिधींच्या कुणबी प्रमाणपत्रांची मागणी जरी अमान्य झाली असली तरी ५४ लाख प्रमाणपत्रे दिली असे सरकारच सांगत आहे. पिंपरी चिंचवड, सातारा जि प., दौंड नगराध्यक्ष व अशी अनेक पदे मराठा समाजाच्या नेत्यांनी कुणबी सर्टीफिकेट काढून ओबीसींकडून हिरावून घेतली आहेत. मराठा आंदोलनाचे एक तज्ञ सराटे यांनी यात नवीन काय असे म्हणून राज्यातल्या एका पोलीस आयुक्तांचेच उदाहरण दिले होते. थोडक्यात हातावर पोट असलेला कमकुवत समाजगट आता त्यांच्या मागण्या घेऊन कोणी ऐकणार नाही अशा कोपऱ्यात जाऊन एखादे दुर्लक्षित आंदोलन करण्याशिवाय काहीच करू शकणार नाही. एवढे करून गावागावात समाजात दुही माजली ती वेगळीच.
Coercive bargaining is a…
Coercive bargaining is a strategic negotiation process where one party uses threats, pressure, or the implied power to inflict harm to force an opponent into making concessions or changing their behavior
"सक्ती ची वाटाघाटी" किंवा "बळजबरीची घासाघीस"
जरांगे हे बुजगावणे आहे.
ते कुणी उभे केले आहे ते हि सर्वाना माहिती आहे.
भाजप ला सज्जड बहुमत असल्यामुळे जरांगे यांचा उपयोग होत नाही.
सध्या त्यांची उपयुक्तता संपली आहे.
त्यामुळे त्यातील हवा काढण्याचे काम चालू आहे
सहमत आहे
In reply to Coercive bargaining is a… by सुबोध खरे
सहमत आहे. जरांगे हा विषयच नाही. त्यांना आरक्षण हवे होते ते फक्त मराठा मुलांच्या कल्याणासाठी असा लोकांचा समज होता. त्यांनी एकदाही सरकारी नोकऱ्या ज्या सरकार मुळातच कमी कमी करत चालले आहे त्यावर सरकारला एकही प्रश्न विचारला नाही. जेवढा खर्च त्यांना बुलडोझरने फुले वाहण्यावर केला त्यात अनेक मराठा मुलांचे शिक्षण झाले असते. यावरून त्यांचा हेतू आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने दबाव निर्माण करून काही वेगळेच पदरात पाडून घेण्याचा होता हे स्पष्ट होते. तेच आता समोर येत आहे. पण ज्याला वाटाघाटी करायची क्षमता आहे त्याचे भले करणे म्हणजे सरकार नव्हे तर दलाल म्हणून काम करणे आहे. सरकारने न्याय हे महत्त्वाचे मूल्य पाळावे अशी अपेक्षा असते, जी दलालाकडून नसते.
परंतु या सगळ्या आंदोलन राजकारणात समाजात एक प्रकारची दुही माजणे हे अतिशय वाईट घडले आहे. आजपर्यंत एकाही आयोगाला मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण किंवा जात म्हणून त्यांच्यावर झालेला अन्याय सिध्द करता आलेले नसल्यामुळे सरकारने त्यांची आरक्षणाची मागणी एंटरटेनच करायला नको होती. त्यातून कुणबी दाखल्याची चोरवाट उपलब्ध करून देणे ही तर दांडगाव्यापुढची शरणागतीच होती. दुर्दैवाने सरकारनेही यात अतिशय पक्षपाती भूमिका घेतली आहे आणि खऱ्या ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या जखमांवर मीठ चोळले आहे.
मराठा कधीही मागास नव्हते…
In reply to सहमत आहे by स्वधर्म
मराठा कधीही मागास नव्हते. त्यांच्यावर कधीही सामाजिक अन्याय झाला नाही. अनेक मराठा मुले मुली डॉक्टर, अभियंता, संगणक तज्ज्ञ, बांधकाम व्यावसायिक, वकील, अर्थतज्ज्ञ आहेत. परदेशात अनेक मराठा स्थायिक आहेत. कोणत्याही सभागृहात दोन तृतीयांश पेक्षा जास्त प्रतिनिधी मराठा आहेत.
मराठा मतपेढी करण्यासाठी फडणवीसांनी एक सर्वेक्षण केल्याचे दाखवून मराठा अत्यंत मागास, शिक्षणाची संधी न मिळणारे, प्रचंड सामाजिक अन्याय झालेले आहेत असा धडधडीत असत्य अहवाल तयार करून त्यांना १६ टक्के राखीव जागा दिल्या व अनेक सवलती आणि शिष्यवृत्तींचा वर्षाव केला. मुळात असे कोणतेही सर्वेक्षण केले नव्हते. खोलीत बसून हा अहवाल लिहिला होता व अहवाल सादर केल्याच्या दुसऱ्या दिवशी १६ टक्के राखीव जागा दिल्या.
यामुळे अराखीव वर्गाची संधी खूप कमी झाली. मुळात मराठ्यातील कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी या उपवर्गांचा आधीपासूनच इतर मागासवर्गीयात समावेश आहे. बहुसंख्य मराठ्यांना या वर्गातून राखीव जागा मिळतात. तरीसुध्दा मुद्दाम मराठ्यांना मागास दाखवून वेगळ्या राखीव जागा दिल्या. म्हणजे मराठा इतर मागासवर्गीय, मराठा आणि अराखीव या ३ दारातून प्रवेश करू शकतात.
हा कायदा २०२१ मध्ये न्यायालयाने अपात्र ठरविल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री असताना हेच सर्वेक्षणाचे नाटक पुन्हा रंगविले व पुन्हा एकदा मराठा अत्यंत मागास आहेत असे कागदावर दाखवून पुन्हा एकदा मराठ्यांना स्वतंत्र राखीव जागा दिल्या.
या कायद्याविरोधात मार्च २०२४ मध्ये सदावर्ते व इतर काही जण उच्च न्यायालयात गेले. १० महिन्यात जेमतेम ३-४ वेळा सुनावणी झाल्यानंतर ३ न्यायाधीशांच्या खंडपीठातील एकाची बदली दुसऱ्या राज्यात झाली. त्यामुळे तोपर्यंत झालेले खटल्याचे संपूर्ण कामकाज बासनात गुंडाळलै व ४ महिन्यांनी ३ नवीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करून नव्याने शुन्यापासून सुनावणी सुरू झाली. नंतरच्या १५ महिन्यात जेमतेम ५-६ वेळा सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा एका न्यायाधीशाची बदली केली व पुन्हा एकदा आतापर्यंतची सुनावणी कचऱ्यात टाकली.
आता म्हणून पुन्हा एकदा ३ नवीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करून शुन्यापासून नव्याने सुनावणी सुरू करणार.
हा चावटपणा किती वर्षे सुरू राहणार? मुळात हातातले खटले अर्धवट असताना बदली होतेच का? बदली झाली म्हणून आतापर्यंतचे सर्व कामकाज अपात्र का होते?
एकंदरीत हा खटला पुढील अनेक दशके असाच लोंबकळत राहणार. अराखीव वर्गासाठी आता जेमतेम १५-२० टक्के जागांवर संधी आहे ज्या इतर सर्वांसाठी सुद्धा आहेत.
तुम्ही म्हणाले ते खरं असल्यास
In reply to मराठा कधीही मागास नव्हते… by श्रीगुरुजी
एकाचे हक्क ओरबाडून दुसऱ्याला देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांना का करावे वाटले असेल, हे विधान जेव्हा त्यांनी केले त्याला काय पार्श्वभूमी होती ? तसेच आधी १६% देऊन मग ही उपरती का झाली असावी असे आपणास वाटते ?
(चौकस) खोंडे.
सहमत आहे
In reply to मराठा कधीही मागास नव्हते… by श्रीगुरुजी
सगळे एकाच बलाढ्य जातीला देण्याचे सरकारचे धोरण अजिबात न्यायाचे नाही. हेच मांडले होते.
कुठल्याही सरकारचे कुठलेही…
In reply to सहमत आहे by स्वधर्म
कुठल्याही सरकारचे कुठलेही धोरण हे न्यायाचे कधीच नसते.
त्यामागे फक्त पुन्हा निवडून कसे येता येईल हाच आणि एवढाच विचार असतो.
देश, भविष्य, विकास आणि प्रगती या केवळ बाता असतात.
दाखवण्यासाठी जसे दिल्लीत आंदोलन करणारे आणि ज्यांच्या विरुद्ध आंदोलन आहे ते सर्व गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन नंतर एकमेकांची डोकी फोडतात तसेच अगदी.
म्हणजे अच्छे दिन हा जुमला…
In reply to कुठल्याही सरकारचे कुठलेही… by राज जोशी
म्हणजे अच्छे दिन हा जुमला होता ?
तुम्हाला जास्त माहीती. केवढा…
In reply to म्हणजे अच्छे दिन हा जुमला… by अमरेंद्र बाहुबली
तुम्हाला जास्त माहीती. केवढा प्रचंड व्यासंग तुमचा !!
३३ टक्के लोकसंख्या असलेल्या…
३३ टक्के लोकसंख्या असलेल्या जातीला कोणता राजकारणी दुखावू शकेल?
मुळात घटनेमध्ये आर्थिक मागासले पण हा निकषच नाही तर सामाजिक मागासलेपणा हाच एकमेव निकष आहे.
ज्यात मराठा समाज अजिबात बसवता येणार नाही.
पण सरकारात सह सचिव( जॉईंट सेक्रेटरी) असणाऱ्या आणि मिळकतीच्या किती तरी पट माया जमवलेल्या व्यक्तीनेसुद्धा जरांगेच्या कृपेने काही आरक्षण मिळाले तर पाहू असे आश्चर्य जनक वक्तव्य मी स्वतः ऐकले आहे.
माणसं स्वार्थासाठी काय पातळीपर्यंत खाली उतरु शकतील याचा हा उत्तम नमुना आहे.
३३ टक्के लोकसंख्या असलेल्या…
In reply to ३३ टक्के लोकसंख्या असलेल्या… by सुबोध खरे
३३ टक्के लोकसंख्या असलेल्या जातीला कोणता राजकारणी दुखावू शकेल?
मराठा लोकसंख्या ३३ टक्के नाही. इतर मागासवर्गीय म्हणतात आम्ही ५२-५४ टक्के, मागासवर्गीय २६-२७ टक्के, मराठा ३३ टक्के यांचीच बेरीज १११-११४ टक्के होते. त्यात मुस्लिम १३-१४ टक्के, साडेतीन टक्के ब्राम्हण, इतरधर्मीय ३-४ टक्के टाकले तर एकूण लोकसंख्या १३०-१३२ टक्के होते.
म्हणजे मराठा, इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय यांची टक्केवारी फुगविलेली आहे.
कोणत्याही राज्यात सर्वाधिक मोठ्या जातीची टक्केवारी १७ टक्क्यांहून अधिक नाही. कर्नाटकात लिंगायत १७ टक्के व वोक्कलिंग १६ टक्के, गुजरातेत पटेल १२-१३ टक्के, आंध्रात रेड्डी १३-१४ टक्के, बिहार व उत्तर प्रदेशात यादव १३-१४ टक्के आहेत. कोणत्याही राज्यात एक विशिष्ट जात १७ टक्क्यांहून अधिक नाही.
महाराष्ट्रात मराठा साधारणपणे १६-१७ टक्के, इतर मागासवर्गीय २८-३० टक्के व मागासवर्गीय २० टक्क्यांच्या आसपास असावे.
बरोबर
In reply to ३३ टक्के लोकसंख्या असलेल्या… by श्रीगुरुजी
३३% म्हणजे भेटणारा प्रत्येक तिसरा माणूस मराठा... वस्तुस्थिती तशी नाहीच.
हा घोळ निस्तरायचा तर जातनिहाय जनगणणा हाच मार्ग आहे आणि कॉंग्रेसने तशी मागणी आधीच केलेली आहे. सरकारने मात्र याला मान्यता दिलेली नाही.
मग मराठा लोकसंख्या ३२-३४…
In reply to बरोबर by स्वधर्म
मग मराठा लोकसंख्या ३२-३४ टक्के आहे म्हणजे काय?
३३% गृहितक चुकीचे आहे
In reply to मग मराठा लोकसंख्या ३२-३४… by श्रीगुरुजी
ते गृहितक चुकीचे आहे, वस्तुस्थिती तशी नाही असेच म्हटले आहे. म्हणूनच नक्की टक्केवारी समजण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. त्याशिवाय न्याय होऊ शकत नाही.
Marathas make up…
Marathas make up approximately 28% to 33% of the total population in Maharashtra, according to state backward class commission findings and government reports.
State Commission Data: The Maharashtra State Backward Class Commission led by Justice Sunil Shukre and the earlier panel headed by Justice M.G. Gaikwad estimated the Maratha community constitutes 28% of the state's population.
Wider Estimates: Commonly cited political and historical estimates place the share between 30% and 35%, depending on whether sub-groups or the allied agrarian Kunbi community are factored into the broader count
गायकवाड आयोग व शुक्रे आयोग…
In reply to Marathas make up… by सुबोध खरे
गायकवाड आयोग व शुक्रे आयोग हे दोन्ही आयोग फ्रॉड आहेत. गायकवाड आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण नाकारला आहे. शुक्रे आयोग अहवालाचे तेच होणार असल्याने खटल्याचा निर्णय जवळ आला की खंडपीठातील एका न्यायाधीशाची बदली करून खटल्यात झालेले कामकाज कचऱ्यात टाकून नवीन खंडपीठ नेमून खटला शुन्यापासून नव्याने सुरू करतात. आतापर्यंत दोन वेळा हेच झाले आहे. भविष्यातही तेच होणार.
समजा या आयोगांच्या…
In reply to Marathas make up… by सुबोध खरे
समजा या आयोगांच्या अहवालानुसार असे मानले की मराठा २८ ते ३३ टक्के आहेत. मग ५२-५४ टक्के इतर मागासवर्गीय (असे तेच म्हणतात) आणि २२.५ टक्के मागासवर्गीय (त्यांना २२.५ टक्के म्हणजे १०० टक्के राखीव जागा आहेत) आणि मराठा यांची बेरीज एकूण लोकसंख्येच्या १०२.५ ते १०९.५ टक्के होते. त्यात मुस्लिम, इतर धर्मीय, ब्राह्मण इ. टाकले तर एकूण टक्केवारी १३० टक्क्यांहून अधिक होते. म्हणजे मराठा, इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय यांच्यापैकी किमान एका गटाची टक्केवारी फुगविलेली आहे.
Muslims make up 11.54% of…
Muslims make up 11.54% of the total population in Maharashtra,
महाराष्ट्रात मुसलमानांची लोकसंख्या साडे अकरा टक्के आहे तरी पण म वि आ पक्ष त्यांची दाढी कुरवाळायचे प्रयत्न का करतात? तर एक गठ्ठा मते आपल्या पारड्यात पाडावीत म्हणून.
मग जर मराठा समाज त्यांच्या दुप्पट संख्येने असेल आणि सर्वात जास्त लोक संख्या असलेली एक जात असेल तर कोणता राजकीय पक्ष त्यांना दुखावण्याची हिम्मत करू शकेल? तसे केले तर ती राजकीय आत्महत्या ठरेल.
जरांगे पाटलांचे बुजगावणे उभे करणे हे त्याच साठी आहे.
त्याला उतारा म्हणून मग हे कुणबी प्रमाणपत्र आर्थिक मागासले पण असल्या पळवाटा शोधायच्या.