चतुरंग यांची खरडवही.
खरडवहीत स्वागत आहे! मनसोक्त खरडा. सवडीने उत्तरे देईनच. (म्हणजे वाटले तर देईन नाहीतर सवड न्हवती असे समजा ;)) आणी छानसा बुध्दीबळाचा पट घेउन आपल्या स्वागताला हजर असणारी अशी हि खरडवही.
अक्षरश: मिपावरील सगळ्या थरातील सदस्यांचा ह्या खरडवहीतील वावर खरडवही मालकाच्या लोकप्रीयतेची साक्ष देणारा.
फुलपाखरी अश्रुपात वगैरेला खरडवहीत बिलकुल थारा दिसत नाही. अथ पासुन इथपर्यंत फक्त 'हे हे हे' आणी 'ठॉ !!' करायला लावणार्या खरडींनी भरलेली अशी हि खरडवही.
विडंबनापासुन ते संपादकीय तक्रारींपर्यंत आणी विश्वनाथ आनंदपासुन मार्क्स पर्यंतच्या सर्व विषयांनी भरलेल्या विविध खरडींचा साठा येथे आढळतो. जेष्ठ आणी गंभीर वाटणार्या काही काही मिपा सदस्यांच्या इथल्या गंमतीशीर खरडी वाचुन मजा येते.
येथे तुम्हाला रोज खरडींचा पुर आलेला आढळणार नाही पण ज्या येतील त्या खरडी अत्यावश्यक असतील येव्हडे नक्की. 'मनात आले म्हणुन खरडले' ह्या शैलीतल्या खरडी येथे बिलकुल आढळणार नाहीत.
साधी सरळ खरडवही असे हिचे वर्णन करता येईल. येथे गुढ, राजकारणी खरडी आढळणार नाहीत. सगळा सरळ मामला.मुखपृष्ठावर घोडे, उंट स्वागताला हजर असले तरी ह्या खरडवहीतील खरडींची चाल मात्र हत्तीसारखी अगदी सरळ आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
आनंदयात्री यांची खरडवही.
चारी बाजुला आनंदी आनंद पसरलेली आणी पसरवणारी अशी ही खरडवही आहे. मिपावर घडु पाहणार्या बर्याचशा मोहिमांचे 'खल' ह्या ठिकाणीच चालते.
'अंदीटलु'पासुन 'काय रे भाड्या' पर्यंत सुरुवात करणार्या विविध प्रकारच्या खरडींनी येथे नुसता पुर आलेला असतो. मिपावरील सर्वात जास्ती खरडींचा साठा असलेली ही खरडवही आहे हे आम्ही आनंदाने आणी अभिमानाने नमुद करुन इच्छीतो.
खरडवहीची रचना अत्यंत साधी पण वेधक. एखादी सुंदर कवीता अथवा गजल डकवलेली, आजकाल येथे एक नाजुक फुलाचे चित्र पण दिसुन येते. यात्री साहेबांचे विविध मुड त्यांच्या खवमध्ये दिसुन येत असतात. खवच्या अग्रभागी लावलेला 'मेसन्स'चा लोगो नाना विविध तर्कांना वाव देणारा.
ह्या खरडवही माध्यमातुन आनंदयात्री ह्यांनी छोटा डॉन व धमाल मुलगा यांच्याशी साधलेले संवाद त्यांच्या 'व्यासंगाची' जाणीव करुन देणारे व अंतरजालावरील होतकरुंच्या ज्ञानात त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे भर टाकणारे.
'मोहिमेच्या तयारीपासुन' नविन वाचलेल्या पुस्तकाच्या रसग्रहणापर्यंत कुठल्याही विषयाचे ह्या खरडवहीला वावगे नाही.
सर्व मित्रांना, (आत्यांना) हक्कानी बागडायला दिलेली खरडवही असे हिचे वर्णन करता येईल.
-----------------------------------------------------------------------------------------------
३_१४ विक्षिप्त अदिती हिची खरडवही.
'जहबर्या !' ह्या एकाच शब्दात ह्या खरडवहीचे वर्णन करावे लागेल. ह्या खरडवहीच्या अग्रभागी कधीकाळी कंपुबाज़ खेकडा मानाने नांग्या वर करुन उभा होता. सध्या ती जागा व्यंगचीत्र, भुमीतीचे खेळ आणी माशा मारण्याचे साधन ह्यांनी घेतली आहे हे सांगताना आम्हाल अतीव दु:ख होत आहे.
मिपावरच्या चालु घडामोडींचा सविस्तर वृतांत मिळणारे हे ठिकाण. मुक्तसुनीत, श्रावण मोडकांपासुन अगदी काल परवा खरडवही चालु झालेल्या सदस्याचाही मुक्तवावर हे ह्या खरडवहीचे वैशीष्ठ्य.
'म्त्रि क्र्न्र क ?' या सारखे प्रश्न विचारण्यासाठी आसुसलेल्या मैत्रीकिड्यांच्या विरुद्ध येथुन चालवल्या गेलेल्या मोहिमा अभ्यासपुर्ण. अनेक माहितीपुर्ण, मेंदुला चालना देणार्या खरडींचे आगार. मिपावरील 'राजकीय मोहिमा' चालवल्या जाणार्या काही प्रमुख केंद्रांपैकी एक असे हिचे वर्णन करावे लागेल.ह्या खरडवहीतील अदिती व छोटा डॉन, धम्मु यांच्या चर्चा अभ्यासनीय. अदिती व आनंदयात्री ह्यांच्या 'लढाया' वाचनीय.
आवर्जुन भेट द्याव्यात अशा ज्या काही खरडवह्या आहेत त्यापैकी एक अशी ही खरडवही. सध्या अदिती संपादक नसल्याने पुन्हा एकदा ह्या खरडवहीला 'वाचनीय' असे स्वरुप आले आहे. ;)
----------------------------------------------------------------------------------------------
अवलिया यांची खरडवही.
नावाप्रमाणेच अवलिया खरडवही. हिचे अंतर्बाह्य स्वरुप कसे आणी केंव्हा पालटेल ह्याची शाश्वती नाही. एका कलंदर (आणि बिलंदर) माणसाची खरडवही.
सध्या ह्या खरडवहीच्या मुखपृष्ठावर मोहक असीन विराजमान आहे. त्या खालोखाल सध्या अवलियांनी भेट देणार्या प्रत्येकाची नाष्ट्याची सोयही करुन ठेवलेली आढळते, हे पदार्थांचे फोटो ठरावीक काळाने बदलत असतात. सध्या खरडवहीत केव्हाही भेट दिली तर ज्यांना उत्तरे दिली नाही अशा खरडी वाट पहात असतात.
मात्र अवलिया ऑनलाईन असताना अचानक भेट दिल्यास ह्या खरडवही मधील अवलिया व पर्नल अका चुचु ह्यांचे संवाद वाचनीय (?) व अभ्यासपुर्ण आढळतील. तर कधी कधी प्रा. डॉ. आणि अवलियांच्या गप्पा बहरात आलेल्या दिसतात. कधी बिपीन शेट उंटाचे की उंटीणीचे दुध पितात यावर चर्चा होत असते, तर कधी पराशी मुलींना पटवायच्या मार्गांची चर्चा होत असते. सरळ साध्या विषयांपासुन तर कुटनीती.... या खरडवहीला कोणताही विषय वर्ज्य नाही. वयाचे बंधन नाही. अरे तुरे पासुन अहो जाहो, नान्स पासुन नानासाहेब, अव्लेया पासुन अवलियाजी काहीही बोला, कोणतेही बंधन नसलेली सर्व वयाचे सक्रिय आणि निष्क्रिय सदस्य कधी ना कधी ज्या वहीत खरडत असतात अशा पैकी एक खरडवही.
कधी कधी ज्यांच्याशी अवलियांच्या गप्पा होत असतात त्या सर्वाच्या खरडगप्पा नीट पाहिल्या तर अनेक गुढ गोष्टी कळतात. ज्यांचा खुलासा अनेक वेळेला दोन तीन दिवसांनी होतो. मात्र अगदी जागरुकतेने ह्या पहाव्या लागतात, कारण अशा खरडींचे आयुष्य दोन मिनिटांपेक्षा जास्त नसते. वाचता आली तर नशीब!
कोणे एकेकाळी भरभरुन वाहणारी ही खरडवही आजकाल मात्र ओकीबोकी असते ह्याचे आतुन खुप दु:ख होते. एकेकाळी ह्या वहितील प्रभु गुर्जी व अवलिया यांची जुगलबंदी वाचताना जी मजा यायची ती आठवण अजुनही ताजी आहे.
पुन्हा एकदा ही खरडवही 'हरीभरी' होवो आणि आतल्या खरडी सर्वांना वाचायला उपलब्ध राहो हीच इच्छा.
----------------------------------------------------------------------------------------------
वाचने
5732
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गाढा
"हॅहॅहॅ,
जोरदार टाळ्या.
छान
परा झकास
In reply to छान by आनंदयात्री
???
पुढल्या
In reply to ??? by श्रावण मोडक
पुन्हा
चालु द्या.
हम्म
"खरडवह्या ऊचकपाचक महाम॑डळाचा'
In reply to हम्म by अवलिया
मस्त!
>>लेखमाला
In reply to मस्त! by ऋषिकेश
परा के
In reply to >>लेखमाला by धमाल मुलगा
अरे ध.मु.
In reply to परा के by सुबक ठेंगणी
अस्च लिहीत
मनापासून
गाढा
चालू द्या