श्रावस्तीतील एका धनिकाचा एकुलता एक तरुण मुलगा अकाली मरण पावला. पित्याला हा आघात सहन झाला नाही. मुलाच्या विरहाने व्याकुळ होऊन तो रोज स्मशानभूमीत जाई, मुलाच्या चितेच्या राखेजवळ बसे आणि आक्रोश करत राही.
एके दिवशी एक बौद्ध भिक्खू तिथून जात होते. धनिकाचे दुःख पाहून ते त्याच्याजवळ बसले आणि अचानक लहान मुलासारखे रडू लागले.
धनिकाने आश्चर्याने विचारले,“भंते, तुम्ही का रडत आहात?”
भिक्खू म्हणाले,“मला एक सुंदर रथ हवा आहे. पण त्याला चाकेच नाहीत. म्हणून मी विचार करतोयएक चाक सूर्याचं आणि दुसरं चंद्राचं केलं तर किती छान होईल! मला जे एक चाक सूर्याचे आणि दुसरे चाक चंद्राचे हवंय ते हाताशी येत नाह्यीये आणि ते कसं मिळेल ह्या चिंतेने मला रडू अनावर होतंय.”
धनिकाला त्याच्या आक्रोशाचे क्षनभर विस्मरण होऊन, त्यांच्या बोलण्याचे हसू आले. तो म्हणाला,“भंते, पण हे कसं शक्य आहे? सूर्य आणि चंद्र रथाची चाकं कशी होतील? अशा गोष्टीसाठी रडून काय मिळणार?”
भिक्खू हळूच म्हणाले,“बरोबर आहे. जे मिळणं शक्य नाही, त्यासाठी रडण्यात अर्थ नाही.”
थोडा वेळ शांत राहून त्यांनी विचारले,“मग तू इथे रोज कशासाठी येतोस?”
धनिक काहीच बोलला नाही.
भिक्खू पुढे म्हणाले,“तुला तुझा मुलगा पुन्हा हवा आहे, नाही का? पण तो आता परत येणार नाही. सूर्य आणि चंद्र माझ्या हातात येऊ शकत नाहीत, तसंच गेलेला जीवही परत आणता येत नाही.”
“जे जन्माला येतं त्याचा अंत होतो. जे आपल्याला मिळतं, त्याच्यापासून एक दिवस दूर व्हावंच लागतं. हा जीवनाचा नियम आहे.”
धनिकाने समोरची राख पाहिली. वाऱ्याची एक झुळूक आली आणि राख हवेत मिसळून गेली.
त्या क्षणी त्याला उमगले की मृत्यू हा मुलावर झालेला अन्याय नव्हता; तो जीवनाचा अटळ नियम होता.मुलावरचे प्रेम त्याने सोडले नाही; पण त्याला धरून ठेवण्याचा हट्ट मात्र सोडला.
जे आले आहे ते जाणारच; जे भेटले आहे ते विभक्त होणारच; अनित्याला नित्य समजून धरून ठेवले की दुःख निर्माण होते, हा अनित्यबोध त्या धनिकाला झाला.
डिस्क्लेमर: हे मत्तकुंडल जातक (अनित्यता आणि दुःखाचे मूळ) ह्या जातककथेच स्वैर रुपांतर आहे
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान बोधकथा. मिपा आता…
छान बोधकथा.
मिपा आता अल्लडतेकडून गंभीरपणाकडे झुकले आहे.
साधु... साधु,,, साधु...
फ्लॉलेस ? थेट शेल्फ सरटीफिकेट? नक्की?
मिपाकरांना तुम्ही लैच अन्डरेस्टिमेट करताय राव...
रच्याकने :- 😃 मिपावर एक फ्लॉलेस फ्लॉलेस बोधकथा स्पर्धा आयोजित व्हायला पाहिजे 😃
(छिद्रान्वेशी) पैजारबुवा,
>>मिपाकरांना तुम्ही लैच…
In reply to साधु... साधु,,, साधु... by ज्ञानोबाचे पैजार
>>मिपाकरांना तुम्ही लैच अन्डरेस्टिमेट करताय राव...
बास का पैजारबुवा, का गरीबाची थट्टा करताय! 😀
- (पामर) सोकाजी
छान...
आवडली कथा.
-दिलीप बिरुटे
सोत्री आता द्राक्ष…
सोत्री आता द्राक्ष संस्क्रुतीतून रुद्राक्ष संक्रुतीकडे वळताना दिसताहेत
पण छान आहे गोष्ट
पण छान आहे गोष्ट
वाह मस्तच
कथा आवडली.
मिपा मूळपदावर येत आहे असे वाटते. अर्थात, माझे अकलन.
जो उपज्या सो बिनसिहै, परो सो कौने काम।कबीर तहाँ लौं थिर रहो, जहाँ न दूजा नाम॥
कबीरदासजी का पंखा.
छान!पण अनित्यता म्हणजे नेमके…
छान!पण अनित्यता म्हणजे नेमके काय?
समजले नाही, काही उदाहरणे सांगू शकाल का?
अनित्यता म्हणजे जगातील…
In reply to छान!पण अनित्यता म्हणजे नेमके… by Bhakti
अनित्यता म्हणजे जगातील कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी, स्थिर आणि तशीच राहणारी नाही. ती निर्माण होते, बदलते आणि शेवटी नष्ट होते.
पण अनित्यता म्हटलं की फक्त “जन्म आहे म्हणून मृत्यू आहे” एवढाच अर्थ नाही. मृत्यू हा बदलाचा शेवटचा टप्पा आहे.
अनित्यता म्हणजे प्रत्येक क्षणी चालू असलेला बदल.
“हे असेच कायम राहील” अशी कोणतीही हमी अनुभवाच्या जगात नाही हीच अनित्यता
- (अनित्य) सोकाजी
चेंज इज ओन्लि कॉन्स्टंट
In reply to अनित्यता म्हणजे जगातील… by सोत्रि
चेंज इज ओन्लि कॉन्स्टंट
फ्लॉलेस????????????????…
फ्लॉलेस?????????????????खिखिखिखि.....
सोताच सांगायचे... सोताच पाठ थोपटायची.. सोताच सोताची कुरवाळायची......दाढी बरं का.....
म्हणुनच तिनदा सोता .... सोता तिर्री.... सोत्तिर्री..... सोतिरी... सोतरी... सोत्री !!
शोधला बघा नावाचा उगम...
बाकी चालू द्या.
कथेत काही फ्लॉ असेल तर सांगा
In reply to फ्लॉलेस????????????????… by राज जोशी
उगाच आयडीची खिल्ली उडवण्याचे प्रयोजन कळले नाही.
अरेच्या !! नावाचे…
In reply to कथेत काही फ्लॉ असेल तर सांगा by अनन्त अवधुत
अरेच्या !! नावाचे व्युत्पत्ती शोधून दाखवली तर आम्ही आयडीची खिल्ली उडवत आहोत असा आरोप?
छ्या ! छ्या ! छ्या ! कृबुच्या युगात मानवी मेंदू आणि बुद्धीचा वापर उपहासात्मकच ठरतोय म्हणायचा.
आता तुमच्या नावाचा विचार केला तर अवधुत म्हणजे काय?
आता तुम्ही धु धु असा न लिहिता धू लिहायला हवा... पण ते असो.
अवधूत म्हणजे असा आत्मज्ञानी साधु किंवा संत, ज्याने संसाराच्या सर्व बंधनांचा, सुख-दुःखाचा आणि संकल्प-विकल्पांचा त्याग केला आहे.
पण तुम्ही मात्र नावाच्या व्युत्पत्ती (ती सुद्धा दुस-याच्या (!) ) व्यथित झालात. खुप पल्ला गाठायचा आहे तुम्हाला !! सोत्रींचे मार्गदर्शन घ्या त्यांना नाही जमले तर दुसरा गुरु घ्या. गुरु काय पैशाला चार मिळतात म्हणे..
- निरुक्तकार यास्काचार्य जोशी
श्रावस्तीतील एका धनिकाचा…
धनिकच का ? गरीबाचा मुलगा असता तर सादर भिक्खू गेले नसते का ? कि धनिकाला इम्प्रेस करून स्तूप वगैरे बांधण्यासाठी पैसे गोळा करण्याचा डाव वाटतो. फ्लॉ लेस नाही.
धनिकच का?बरोबर प्रश्न आहे.मी…
In reply to श्रावस्तीतील एका धनिकाचा… by साहना
धनिकच का?
बरोबर प्रश्न आहे.
मी खफवरही असाच प्रश्न विचारला होता.जवळपास इ. स. पु तीन ते अकरा -चौदाव्या शतकपर्यंत कायम बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणात राजश्रय मिळत आला आहे. तरीही त्यांनी तळातल्या लोकांना, स्त्रियांना का ज्ञान दिले नाही???की पुढे जाऊन त्यांनी कधी अन्याय होऊच दिला नसता??
सॉरी सोत्री अवांतर झाले. पण होत काय, आस्तिक वैदिकवर इतक भरभरून लिहितात की इतर मानणारे wow फॅक्टरमध्ये वाहवतात. नास्तिक अभ्यास स्वत करायच्या ऐवजी वाकड्यातले प्रश्न विचारतात. सगळा मुद्दा जैसे थे तसाच राहतो.
नास्तिक वा इतर तत्वज्ञान यांनी लिहिले तर प्रश्न विचारण्याची संधी, माझ्यासारख्या अज्ञेयवादीला मिळेल ना, त्याचा प्रसार होईल.
>> तरीही त्यांनी तळातल्या…
In reply to धनिकच का?बरोबर प्रश्न आहे.मी… by Bhakti
>> तरीही त्यांनी तळातल्या लोकांना, स्त्रियांना का ज्ञान दिले नाही?
संघामधे सुरुवातीला स्त्रियांना प्रवेश नव्हता. त्याला समाजिक कारणं होती. पण महाप्रजापिता गौतमी (गौतम बुद्धाचा सांभाळ केलेली मावशी) यांच्यापासून स्त्रियांना संघामधे प्रवेश सुरू झाला. संघ समता ह्या तत्वावर आधारित होता त्यामुळे वरच्या स्तरातले किंवा तळातले असा भेद नव्हता. समाजातल्या सर्व स्तरातल्या स्त्रिया संघात होत्या आणि बुद्धाच्या ध्यानमर्गाचे अनुसरण करत होत्या. तुमच्या ह्या मुद्याला काही आधार (रेफरन्स) असेल तर तो द्या, त्याबद्दल शोधाशोध करता येईल.
>> नास्तिक अभ्यास स्वत करायच्या ऐवजी वाकड्यातले प्रश्न विचारतात.
हा सरसकट निष्कर्ष (किंवा तुमचं वेयक्तिक मत) तुम्ही कशाच्या आधारावर काढला आहे ?
>> आस्तिक वैदिकवर इतक भरभरून लिहितात की इतर मानणारे wow फॅक्टरमध्ये वाहवतात.
उलट आहे, अस्तिक तत्त्वज्ञानावर लिहीणारे मुळ मुद्दा सोडून wow फॅक्टरमध्ये वाहवतात आणी सगळा मुद्दा जैसे थे तसाच राहतो.
- (चर्चोत्सुक) सोकाजी
छान प्रतिसाद! बुद्धांचा भक्त…
In reply to >> तरीही त्यांनी तळातल्या… by सोत्रि
छान प्रतिसाद! बुद्धांचा भक्त आनंद ह्यांच्या आग्रहावरून भिक्षुनी संघ चालू झाला, (जो आजही बुद्धिस्ट देशात चालू आहे!) नंतर मनुस्मृतीद्वारे स्त्रियाना उंबरठ्याआड डांबण्यात आले.
>>>बुद्धांचा भक्त आनंद…
In reply to छान प्रतिसाद! बुद्धांचा भक्त… by अमरेंद्र बाहुबली
>>>बुद्धांचा भक्त आनंद ह्यांच्या आग्रहावरून भिक्षुनी संघ चालू झाला, (जो आजही बुद्धिस्ट देशात चालू आहे!)
अरे वा ! उत्तम.
>>>नंतर मनुस्मृतीद्वारे स्त्रियाना उंबरठ्याआड डांबण्यात आले.
हे समजले नाही कसे ते? बुद्धाच्या बौध्द धर्मीय अनुयायांनी पण मनुस्मृतीचे पालन सुरु केले का? मनुस्मृती तर फक्त वैदिक किंवा हिंदू (आजच्या अर्थाने) पाळत होते ना?
हे समजले नाही कसे ते?…
In reply to >>>बुद्धांचा भक्त आनंद… by राज जोशी
हे समजले नाही कसे ते? बुद्धाच्या बौध्द धर्मीय अनुयायांनी पण मनुस्मृतीचे पालन सुरु केले का? मनुस्मृती तर फक्त वैदिक किंवा हिंदू (आजच्या अर्थाने) पाळत होते ना? >>>
बुद्धांचे अनुयायी पळवण्यात आले नंतर मनुवादी राजांकडून आक्रमणे होऊ लागल्यावर, नंतर मनुस्मृती लागू केली गेली, बुद्धांचेच चांगले गुण उदाहरनार्थ शाकाहार नी अहिंसा घेतले गेले, बुद्ध आपलेच आहेत असे घोषित केले गेले, सामान्य माणूस जो हिंदू संस्कृतीतला होता त्याला मनुवाद्यांनी भ्रमित केले नी त्याच्यावर मनुस्मृती लादली, त्या सोबतच स्त्रियाही उंबरठ्याआड डांबल्या गेल्या. (नी नवरा मेल्यावर सतीच्या जिवंत जाळल्या गेल्या) बुद्ध भारतातून जाणे इतरांसाठी असो नसो पण स्त्रियांसाठी प्रचंड मोठी आपदा ठरली ते तर बेयर इंग्रज आले नी त्यांनी कायदे केले नाहीतर आजही काळोख नी हाहाकार असता.
अरे बाप्परे... बरे झाले ते…
In reply to हे समजले नाही कसे ते?… by अमरेंद्र बाहुबली
अरे बाप्परे... बरे झाले ते इंग्रज आले ते नाही तर अवघडच होते ब्वा ! म्हणजे हिंदू संस्कृती आणि मनुस्मृती भिन्न आहेत तर... बरे झाले कळाले. बघा तुमच्या सारख्यांमुळे आमच्या ज्ञानात किती भर पडते नाही तर आमचे अवघड होते...
-कमलाकर भट्ट जोशी
मनुस्मृती बुद्धक्रांतीनंतर…
In reply to अरे बाप्परे... बरे झाले ते… by राज जोशी
मनुस्मृती बुद्धक्रांतीनंतर प्रतिक्रांती दरम्यान पुष्यमित्र शुंगाच्या काळात लिहिली गेली! हिंदू (सिंधू) संस्कृती त्याहून जुनी आहे!
अच्छा !! चांगली माहिती. आता…
In reply to मनुस्मृती बुद्धक्रांतीनंतर… by अमरेंद्र बाहुबली
अच्छा !! चांगली माहिती. आता मनुस्मृती लिहिली गेली की तत्कालीन व्यवस्थेमधे असलेल्या गोष्टी संकलीत केल्या गेल्या आणि तयार झाली? कारण स्मृती शब्द जे आठवले तसे नोंदवले असे सुचित करतो. म्हणजे आधी तशी काही संस्कृती असेलच ना की नवीनच कायदा तयार झाला असा?
बाकी सहज शोधले तर विकीवर खालील उल्लेख सापडला की ब्रिटीशांनी हिंदू कायदा करायला मनुस्मृतीच वापरली. गोंधळच दिसतोय सगळा.
मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. ब्रिटिश काळात इ.स. १७९४ इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला.
स्मृतीचा अर्थ काहीही असो, ति…
In reply to अच्छा !! चांगली माहिती. आता… by राज जोशी
स्मृतीचा अर्थ काहीही असो, ति एकानेच लिहिली आहे नी का लिहिली आहे हे वेगळे सांगायलाच नको.
आपल्या ठाम निष्कर्षाला…
In reply to स्मृतीचा अर्थ काहीही असो, ति… by अमरेंद्र बाहुबली
आपल्या ठाम निष्कर्षाला चिकटून रहाण्याची वृत्ती प्रशंसनीय आहे.
च्यायला
In reply to आपल्या ठाम निष्कर्षाला… by राज जोशी
हा कलगीतुरा कसा मिस झाला म्हणायचं ?
😛😛😂😂
अरेच्या ! आम्ही इथे…
In reply to च्यायला by वृषभ खोंडे
अरेच्या ! आम्ही इथे ज्ञानसागरातील तुषार प्राशन करुन ज्ञानपिपासा शमवण्याचा प्रयत्न करत आहोत आणी तुम्ही त्याची कलगीतुरा म्हणून संभावना करत आहात ! नरकात जाल... दुष्ट कुठले.
- चातक जोशी
नरक वगैरे असे काही नसते!…
In reply to अरेच्या ! आम्ही इथे… by राज जोशी
नरक वगैरे असे काही नसते! ह्या मनुवाद्यांदावरे सामान्य हिंदूना घाबरवण्यासाठी पसरवलेल्या कंड्या आहेत.
काव काव
In reply to नरक वगैरे असे काही नसते!… by अमरेंद्र बाहुबली
>>>नरक वगैरे असे काही नसते!
ते आमचे आम्ही पाहून घेऊ !
>>>ह्या मनुवाद्यांदावरे सामान्य हिंदूना घाबरवण्यासाठी पसरवलेल्या कंड्या आहेत.
काय सांगता काय? उगी उगी आपण मनुवाद्यांचे घर उन्हात बांधू हं.. तुम्ही त्यांच्या गच्चीवर बसून गंमत पहा हं !
- सेमेटीक आणि मनुवादी नरकाचा जाणकार जोशी
ते आमचे आम्ही पाहून घेऊ >>…
In reply to काव काव by राज जोशी
ते आमचे आम्ही पाहून घेऊ >>>
तुमचे तुम्ही काय पाहणार? काही संदर्भ लागेना.
काय सांगता काय? उगी उगी आपण मनुवाद्यांचे घर उन्हात बांधू हं.. तुम्ही त्यांच्या गच्चीवर बसून गंमत पहा हं ! >>> आपण? आपण म्हणजे कोण? तुम्ही आणि मी? मी का बंधू मनुवाद्यांचे घर? शुद्धीत आहात ना? विसर्जन होऊन २ दिवस झालेत!
नरकात
In reply to अरेच्या ! आम्ही इथे… by राज जोशी
तुम्ही असालच ह्या दुर्दम्य आशावादावर हा चाबरा पिंड बेतलेला आहे.
अर्थात... आमची जागा नरकातच…
In reply to नरकात by वृषभ खोंडे
अर्थात... आमची जागा नरकातच... च्यामारी स्वर्गात जाऊन म्हाता-या अप्सरांपेक्षा उकळते तेल बरे.
नरक वगैरे नसते! स्वर्गही…
In reply to अर्थात... आमची जागा नरकातच… by राज जोशी
नरक वगैरे नसते! स्वर्गही नसतो, अंधश्रद्धा आहेत!
>>>नरक वगैरे नसते! स्वर्गही…
In reply to नरक वगैरे नसते! स्वर्गही… by अमरेंद्र बाहुबली
>>>नरक वगैरे नसते! स्वर्गही नसतो, अंधश्रद्धा आहेत!
अगदी बरोबर. पण जन्नत जहन्नूम या श्रध्दा आहेत यात शंका नाही.
स्वर्गाला जन्नत हेवन काहीही…
In reply to >>>नरक वगैरे नसते! स्वर्गही… by राज जोशी
स्वर्गाला जन्नत हेवन काहीही म्हणा नावे बदलल्याने अंधश्रद्धा आहे हे बदलत नाही.
अच्छा !
In reply to स्वर्गाला जन्नत हेवन काहीही… by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे पवित्र कुराण, होली बायबल, जुना/नवा करार, तालमुंद इत्यादी सेमेटीक पंथीयांचे धर्मग्रंथ अंधश्रद्धांचे प्रतिपादन करतात असे तुमचे म्हणणे आहे.
अवांतर: यावरून एअर इंडिया…
In reply to अर्थात... आमची जागा नरकातच… by राज जोशी
अवांतर: यावरून एअर इंडिया आठवले 😄
हा हा हा पण अर्ध्या…
In reply to अवांतर: यावरून एअर इंडिया… by श्वेता व्यास
हा हा हा
पण अर्ध्या चड्डीतल्या मसालाजेट पेक्षा साडीतल्या ब-या.
मग तुम्ही ७२ हुरांकडे जा. 😝
In reply to अर्थात... आमची जागा नरकातच… by राज जोशी
मग तुम्ही ७२ हुरांकडे जा. 😝
जन्नत नको
In reply to मग तुम्ही ७२ हुरांकडे जा. 😝 by अमरेंद्र बाहुबली
त्यांच्या मांडीवर तुम्हीच बरे..
आम्ही नको, तुम्हालाच हौस आहे.
In reply to जन्नत नको by राज जोशी
आम्ही नको, तुम्हालाच हौस आहे.
छे छे.. जन्नत, स्वर्ग, हेवन…
In reply to आम्ही नको, तुम्हालाच हौस आहे. by अमरेंद्र बाहुबली
छे छे.. जन्नत, स्वर्ग, हेवन आम्हाला नको. आम्हाला नरकच हवाय. वर लिहिलेले नीट वाचत नाही का तुम्ही? की बडवता कळफलक बदाबद... :)
बुद्धांचेच चांगले गुण उदाहरनार्थ शाकाहार नी अहिंसा घेतले गेले
In reply to हे समजले नाही कसे ते?… by अमरेंद्र बाहुबली
गौतम बुद्ध शाकाहारी होते ही तुमची माहिती चुकीची आहे. अहिंसावादी होते हे बरोबर आहे.
अहिंसावाद केवळ यज्ञातील…
In reply to बुद्धांचेच चांगले गुण उदाहरनार्थ शाकाहार नी अहिंसा घेतले गेले by धर्मराजमुटके
अहिंसावाद केवळ यज्ञातील पशुहत्येपुरता होता.... खाण्यासाठी वा मृगयेसाठी हिंसा चालत होती.
होय/नाही
In reply to अहिंसावाद केवळ यज्ञातील… by राज जोशी
होय:
पंचशीलातील अहिंसा ही पशुबळी आणि पशुहत्या ह्यासंबंधात होती. नैसर्गिक मृत्यु झालेल्या पशुचे मांस खाणं निषीद्ध नव्हतं/नाही.
नाही:
मगृगयेसाठी पशुहत्या ही पंचशीलातल्या अहिंसा शीलाचं पालन करत नाही, त्यामुळे ती निषीद्ध आहे.
- (अहिंसक) सोकाजी
माहितीबद्दल धन्यवाद. आगंतुक…
In reply to होय/नाही by सोत्रि
माहितीबद्दल धन्यवाद.
आगंतुक प्रश्न - सध्या जे भारतात आणि भारताबाहेर बौद्ध आहेत ते नैसर्गिकरीत्या मेलेल्या प्राण्याचेच मांस खातात की पशुहत्या करुन आपली भुक शमवतात? यात पंचशीलाचे पालन नेमके कशा पद्धतीने केले जाते?
- अश्वघोष जोशी
बौद्ध धर्म लवचिक आहे,…
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. आगंतुक… by राज जोशी
बौद्ध धर्म लवचिक आहे, प्रदेशानुरुप मांसाहाराची मुभा दिली आहे.
बौद्ध धर्म लवचिक आहे, प्रदेशानुरुप मांसाहाराची मुभा दिली आहे.
In reply to बौद्ध धर्म लवचिक आहे,… by अमरेंद्र बाहुबली
आपला प्रतिसाद चुकीचा आहे असे विनम्रतापुर्वक नमूद करु इच्छितो.
त्यांचे सर्वच प्रतिसाद…
In reply to बौद्ध धर्म लवचिक आहे, प्रदेशानुरुप मांसाहाराची मुभा दिली आहे. by धर्मराजमुटके
त्यांचे सर्वच प्रतिसाद चुकीचे असतात. :)
कसे?
In reply to त्यांचे सर्वच प्रतिसाद… by राज जोशी
कसे?
चांगला प्रश्न.
In reply to कसे? by अमरेंद्र बाहुबली
चांगला प्रश्न.
नास्तिक अभ्यास स्वत …
In reply to >> तरीही त्यांनी तळातल्या… by सोत्रि
नास्तिक अभ्यास स्वत करायच्या ऐवजी वाकड्यातले प्रश्न विचारतात.
हा सरसकट निष्कर्ष (किंवा तुमचं वेयक्तिक मत) तुम्ही कशाच्या आधारावर काढला आहे ?
>> हो माझे वैयक्तिक निरीक्षण आहे. केवळ समोरच्यावर प्रश्न भडिमार करुन, वा उपहासात्मक बोलून बेजार करणारेच अधिक पाहिलेत. पण स्वतः काय समजले हे योग्यपणे सादर करणारे थोडेच, निराळे. बापटच उदाहरण घ्या.तिच्या विचारसरणीचे लोक काय कमी आहेत का? त्याचे सादरणीकरण समतोलित आहे.
>> आस्तिक वैदिकवर इतक भरभरून लिहितात की इतर मानणारे wow फॅक्टरमध्ये वाहवतात.
उलट आहे, अस्तिक तत्त्वज्ञानावर लिहीणारे मुळ मुद्दा सोडून wow फॅक्टरमध्ये वाहवतात आणी सगळा मुद्दा जैसे थे तसाच राहतो.
इतर मानणारे wow फॅक्टरमध्ये वाहवतात>>>. म्हणजे वाचणारे, जाणण्याचे इच्छा असणारे वाहवतात असे म्हणायचे आहे.
तुम्ही दिलेल्या स्त्री बौद्ध संघाविषयी मलाही माहितेय. पण दुर्दैवाने त्याचा प्रसार हवा तसा तळातल्य स्त्रियासाठीच भारतात झालेला दिसत नाही. नाहीतर आज स्त्रियांची परिस्थिती खुप आधीच सुधारलेली असती.
हे सगळं एका बौद्ध धर्माच्याच जादूच्या कांडीने घडल असतं असाही निष्कर्ष माझा नाही. पण राजश्रय असूनही हे का घडले नाही याचे उत्तर मला अजूनही मिळाले नाही. मी वैयक्तिक अभ्यासाने ते नक्की शोधेल 👍
-आभारी आहे भक्ती 🙏
??
In reply to नास्तिक अभ्यास स्वत … by Bhakti
>> पण दुर्दैवाने त्याचा प्रसार हवा तसा तळातल्य स्त्रियासाठीच भारतात झालेला दिसत नाही.
>> राजश्रय असूनही हे का घडले नाही याचे उत्तर मला अजूनही मिळाले नाही
नेमकं काय अपेक्षित होतं, म्हणजे तळातल्या स्त्रियासाठी प्रसार व्ह्यायला हवा होता म्हणजे काय व्ह्यायला हवं होतं?
- (कनूफ्यूज्ड) सोकाजी
धनिक होता म्हणून त्याला…
In reply to श्रावस्तीतील एका धनिकाचा… by साहना
धनिक होता म्हणून त्याला इतरांना कामाला लावून स्मशानात जाऊन बसायला वेळ मिळत होता, गरीबाला रोजच्या हातावर पोट असलेल्याला कसं जमायचं हे 🙂 गरीबाला किंवा मध्यमवर्गाला त्याचं रुटीनच दुःख विसरायला लावते.
खरे आहे!😁
In reply to धनिक होता म्हणून त्याला… by श्वेता व्यास
खरे आहे!😁
धन सर्व भिक्कू संघाला स्तूप…
In reply to धनिक होता म्हणून त्याला… by श्वेता व्यास
धन सर्व भिक्कू संघाला स्तूप बांधण्यासाठी दान केल्यास रडायला वेळ मिळणार नाही असा सल्ला दिला पाहिजे होता.
😂✅️
In reply to धन सर्व भिक्कू संघाला स्तूप… by साहना
😂✅️
गरीबाचा मुलगा असता तर सादर भिक्खू गेले नसते का ?
रास्त प्रश्न आहे पण विचार करा गरीबांना मोह,माया,धन संपत्ती या सर्वाची वाण असते. एक मेला तर कदाचित थोडावेळ दुख करून एक पोट कमी झाले असा विचार करत मनाचे समाधान करेल.
गरीबा घरी भिक्खू म्हणजे एकाशीच्या घरी शिवरात्र नव्हे काय?
समाज प्रबोधनासाठी धोनीला कडे सर्व काही आहे.
कथा आवडली! नेमक्या शब्दात…
कथा आवडली! नेमक्या शब्दात उपदेश दिला, उगाच जीवन मृत्यू कस असते वगैरे पाल्हाळ न लावता नेमका उपदेश केला आहे! अश्या छोट्या नी नेमका बोध देणाऱ्या पाल्हाळ रहित कथा आणखी युद्यात!
(नाहीतर सकाळचे कोवळे ऊन पडले होते… धनिक चालत स्मशानभूमी गेला, त्याला राख दिसली…… वगैरे वगैरे सारखे….पल्हाळ असते काहींच्या कथेत.)
धनिकच का ?
एकत्र प्रतिसाद लिहीत आहे. कदाचित विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे.
धनिकच का ? गरीबाचा मुलगा असता तर सादर भिक्खू गेले नसते का ? कि धनिकाला इम्प्रेस करून स्तूप वगैरे बांधण्यासाठी पैसे गोळा करण्याचा डाव वाटतो. फ्लॉ लेस नाही.
हा प्रश्न भिक्खूंपेक्षा साहित्य-नाट्य-कथनशास्त्राशी संबंधित आहे. शेक्सपियरचे समीक्षक ए. सी. ब्रॅडली यांनी *Shakespearean Tragedy* (१९०४) मध्ये हे सांगितलं आहे. शोकांतिकेचा नायक उच्च स्थानावर असतो आणि त्याच्या पतनाने संपूर्ण साम्राज्य प्रभावित होते. वैभवाच्या शिखरावरून पराभवाच्या दरीत कोसळणाऱ्या माणसाचे पतन नियतीपुढे मानवाची असहायता दाखवून देते. भारतीय नाट्यशास्त्रातही नायक धीरोदात्त, श्रेष्ठवंशीय असावा असे म्हटले आहे. म्हणजे याला स्तूपनिधीचा डाव म्हणता येणार नाही; ही जुनी कथनशैली आहे.
नायक धनिक का, तर कथेचा अपेक्षित बोध त्याच्याशिवाय सिद्धच होत नाही. ज्याच्याकडे वैद्य, औषध, संपत्ती सगळे आहे, तोही आपल्या मुलाला परत आणू शकत नाही. म्हणून मग अनित्यतेपुढे सगळे समान, हे आपोआपच सिद्ध होते. गरीबाचा मुलगा असता तर, "वेळेवर उपचार मिळाले असते तर?" हा प्रश्न आला असता आणि मग कथा विषमतेची झाली असती.
गरीबांचे दुःख साहित्य परंपरेत नाही का? आहे. याच श्रावस्तीतली किसा गोतमी मृत बाळ घेऊन आली, तेव्हा स्वतः बुद्धांनी तिला "जिथे कुणी मेले नाही अशा घरातून मोहरी आण" असे सांगितले. बोध तोच, फक्त बाजू वेगळी.
धनिक होता म्हणून त्याला इतरांना कामाला लावून स्मशानात जाऊन बसायला वेळ मिळत होता, गरीबाला रोजच्या हातावर पोट असलेल्याला कसं जमायचं हे गरीबाला किंवा मध्यमवर्गाला त्याचं रुटीनच दुःख विसरायला लावते.
ब्रॅडलींच्या वरील मतावरही हीच टीका झाली. आर्थर मिलरने "Tragedy and the Common Man" लिहून सामान्य माणसाची शोकांतिकाही तितकीच उदात्त असते हे मांडले.
रास्त प्रश्न आहे पण विचार करा गरीबांना मोह,माया,धन संपत्ती या सर्वाची वाण असते. एक मेला तर कदाचित थोडावेळ दुख करून एक पोट कमी झाले असा विचार करत मनाचे समाधान करेल.
गरीबाचे दुःख लहान नसते. तुकोबांची गाथा दुष्काळात पत्नी आणि मूल गमावल्याच्या दुःखातूनच जन्मली.
कथेतला धनिक हा at receiving end नसून केवळ एक guinea pig आहे. सूर्य-चंद्राची चाके कुणालाच मिळत नाहीत, धनिकालाही नाही. कथा फ्लॉलेस आहे की नाही हा वाद ठीक आहे, पण कथेतला फ्लॉ हा नाही!
- (मागच्या सहस्रकातील साहित्य समीक्षक) कांदा लिंबू
तंतोतंत!
In reply to धनिकच का ? by कांदा लिंबू
>> कथेतला धनिक हा at receiving end नसून केवळ एक guinea pig आहे. सूर्य-चंद्राची चाके कुणालाच मिळत नाहीत, धनिकालाही नाही. कथा फ्लॉलेस आहे की नाही हा वाद ठीक आहे, पण कथेतला फ्लॉ हा नाही!
_/\_ _/\_ _/\_
तंतोतंत!
- (आभारी) सोकाजी
सामान्य माणसाची शोकांतिकाही…
In reply to धनिकच का ? by कांदा लिंबू
सामान्य माणसाची शोकांतिकाही तितकीच उदात्त असते
गरीबाचे दुःख लहान नसते.
नक्कीच! दुःखाचे प्रकार वेगवेगळे असतात पण दुःख कोणाला चुकले आहे. पण धनिक ज्या गोष्टीचे दुःख करत बसतो ते दुःख गरिबाला त्याची परिस्थिती विसरायला लावते कदाचित गरीब धनिकापेक्षा जास्त भावनिक असेल तरीही! याउलट गरिबाला ज्या प्रकारचं दुःख असेल ते धनिकाला ठाऊकही नसेल. आणि त्याहीवर कडी म्हणजे सध्याच्या काळात चित्रपट, रिऍलिटी शो यांद्वारे गरीबांचे दुःखच कसे मोठे हे दाखवून सहानुभूतीचा वापर करून स्वतःची पोटे भरणारे कमी नाहीत.
>>>मुलाच्या विरहाने व्याकुळ…
>>>मुलाच्या विरहाने व्याकुळ होऊन तो रोज स्मशानभूमीत जाई, मुलाच्या चितेच्या राखेजवळ बसे आणि आक्रोश करत राही.
अल्प माहितीनुसार ऋग्वेदकालापूर्वीपासून दहनाच्या दुस-या वा तिस-या दिवशी राख नदीत/तलावात/पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा होती. आजही भारतातील भारतात जन्मलेले बहुतांश धर्म/संप्रदाय/ जाती/जमाती दहन संस्कारानेच अंतिम संस्कार करतात. (अल्प जाती जमाती दफन करतात) अशा परिस्थितीत राख स्मशानभुमीतच इतके दिवस कशी काय होती? की धनिकांची खास राख राखून ठेवण्याची परंपरा होती? तेव्हा आणि आजही बौध्द धम्मात दहनानंतर काय केले जाते?
कथा म्हणून छान आहे मात्र
कथा म्हणून छान आहे मात्र फ्लॉलेस आहे असे दुर्दैवाने म्हणवत नाही. पृत्थ्वीवरील कोणतीही गोष्ट फ्लॉलेस नाही त्यामुळे तो सोत्रींचा दोष नाही.
कथेतील भिक्खू म्हणा किंवा अजून कोणी दुसऱ्याला उपदेश करतो त्यातला सगळ्यात मोठा फ्लॉ (दोष) म्हणजे दुसऱ्याला पोपटपंची सांगणे सोपे असते मात्र स्वत:वर वेळ आली म्हणजे भले भले ग्यानी आपले सगळे बोध विसरुन जातात . प्रत्येकालाच बुद्ध किंवा गेला बाजार धर्मराज बनणे शक्य नसते.
तथागतांचे निर्वाण समोर दिसायला लागले तेव्हा त्यांचा चुलत बंधू आनंद दु:खी झाला होता आणि कित्येक दिवस रडत होता. (संदर्भ : महापरिनिब्बान सुत्त) . कायम बुद्धाच्या छायेत राहिलेल्या सेवकाची ही कथा असेल तर इतरांची काय कथा ?
तथागतांनी निर्वाणानंतर आपल्या शरीराच्या अंत्यविधीमध्ये गुंतून राहू नये अशा स्पष्ट सुचना केल्या असतानादेखील कुशीनगरच्या मल्लांनी बुद्धांच्या शरीराची अत्यंत आदराने पूजा केली तेही सात दिवस.
एवढेच नव्हे तर तथागतांच्या अस्थी कोणाला मिळाव्यात यावरुन अनेक राजे / राज्यांत वाद झाला त्यामुळे शेवटी त्या अस्थींचे आठ भाग करण्यात आले आणि त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी स्तूप बांधले.
यात मी तथागतांना किंवा बौद्ध धर्माला कमी लेखण्याचा उद्देश नाही मात्र कोणत्याही ग्रेट धर्माचा / धम्माचा मानव असला तरी त्याचे पाय मातीचेच असतात.
जगातल्या सगळ्याच थोर व्यक्तींच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम त्या त्या व्यक्तीचे अनुयायीच करत असतात. त्यामुळे कोणताही धर्म दुसऱ्या धर्मापेक्षा लहान किंवा थोर ठरत नाही.
कोणत्याही व्यक्तीच्या मृत्युचा शोक करतो म्हणून त्याला अज्ञानी ठरवणे आणि उपदेश करणे म्हणजे नैसर्गिक भावनेवर घाला घालणे होय.
>> पृत्थ्वीवरील कोणतीही…
In reply to कथा म्हणून छान आहे मात्र by धर्मराजमुटके
>> पृत्थ्वीवरील कोणतीही गोष्ट फ्लॉलेस नाही
१००% सहमत.
>> कोणत्याही व्यक्तीच्या मृत्युचा शोक करतो म्हणून त्याला अज्ञानी ठरवणे आणि उपदेश करणे म्हणजे नैसर्गिक भावनेवर घाला घालणे होय.
मृत्युचा शोक करतो म्हणून कोणालाही अज्ञानी ठरवता येत नाही. त्याला फक्त नैसर्गिक भावना म्हणजे काय, त्यांचं मूळ काय, त्या भावना प्रबळ कशा होतात, त्यांचा आपल्या इहलौकिक जीवनात काय परिणाम होतो ज्याने 'दु:ख' निर्माण होते हे समजून घेणे आणि ते समजून घेण्यासाठी काय करायचे हे समजावून द्यायचं असतं, ते जाणून घेण्याहा मार्ग दाखवायचा असतो. हे जाणल्यानंतर आलेली अनुभूती म्हणजे 'ज्ञान', ती इहलौकिक जीवन सुकर व्हायला मदत तर करतेच पण जे पारलौकिक अनुभूतीचे साधक आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचे ठरते. (पुस्तकी ज्ञान फक्त इहलौकिक जीवनात दोन वेळची जेवण मिळवण्यासाठी गरजेचं असतं)
- (फ्लॉलेस नसलेला) सोकाजी