राहिले नाही कधी सुख सोबतीला
दुःख तर पुजलेच होते पाचवीला
बायको असतेच महत्त्वाची परंतू
लागते हल्ली जपावे नोकरीला
संगणक मदतीस आला माणसाच्या
अन विसरले लोक दिडकी पावकीला
स्पर्श मायेचा असावा जाहलेला
उब म्हणून जास्त असते गोधडीला
एवढा तो सूर्य यंदा कोपला की
शोधताना वृक्ष दिसले सावलीला
कैकदा नामोहरम शत्रूस केले
मात्र कायम हारलो मी यादवीला
मायचे फिटणार नाही ऋण कधीही
स्थान वरचे पण तरीही मावशीला!
©️®️ नाहीद नालबंद
'अनघड'
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
62
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
अजून लिहा.
छान आहे प्रॅक्टीकल.
छान आहे प्रॅक्टीकल.
आवडली
आवडली
शेर
हा आवडला नाही, कारण शेर म्हणून काही ट्विस्ट नाही. अपेक्षित दुसरी ओळ असेल तर मजा नाही वाटत.
अनपेक्षित दुसरी ओळ हेच तर मर्म आहे कोणत्याही शेर किंवा गझलेचे असे वाटते.
या मध्ये ते मर्म अगदी सहज दिसते. हा शेर खास आवडला.
पहिला शेर लिहायचा प्रयत्न
कोपला हा सूर्य यंदा एवढा की,
माणसे विकतच घेती सावलीला.
(लोक रात्री ही शोधती सावलीला.)