काका, ह्या लेखाच्या निमित्ताने, तुम्ही लहानपणी मैत्रिणीबरोबर पावसांत भिजायचा ते समजले. आता पाउस सुरु होइल.
बाकी लेख नेहमीप्रमाणेच छान, जाता जाता काही सांगून जाणारा.
मलाही भारतातला, विशेषतः महाराष्ट्रातला पावसाळा खूप आवडतो. ढगाळ वातावरणात उन्हाचा त्रास नाही. छानसा गारवा असतो. मस्त काळे काळे ढग आलेले असतात. गडगडाट, चमचमाट होऊन यथावकाश पाऊस सुरु होतो. थोडे दिवस पाऊस झाला की सगळे कसे हिरवे गार होते.
गोर्यांच्या देशात बर्फ पडण्याचे कौतुक असते तसे मला आपल्या देशातील पावसाळा कौतुकाचा वाटतो.
शी! काय ढगाळ हवा आहे असे मला कधीही वाटले नाही आणि वाटणार नाही.
प्रतिक्रिया
काका, ह्या
छान लेख...
पावसाळी हवा