Skip to main content
लेखक चामुंडराय यांनी गुरुवार, 10/09/2026 16:27 या दिवशी प्रकाशित केले.

 

नुकताच मानवजातीने एक महत्वाचा लोकसंख्याशास्त्रीय टप्पा ओलांडला आहे. मानवाच्या संपूर्ण इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे किंबहुना असे काही घडेल अशी कल्पना कधीही केली गेली नसेल.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या यू.एस. सेन्सस ब्युरोच्या नवीन अंदाजानुसार, जगभरात आता ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची संख्या पाच वर्षांखालील मुलांपेक्षा जास्त झाली आहे. हा बदल एकाच वेळी घडणाऱ्या दोन मोठ्या प्रवृत्तींमुळे झाला आहे. एकीकडे वैज्ञानिक प्रगतीमुळे लोकांचे आयुर्मान वाढत आहे, तर दुसरीकडे कुटुंबांमध्ये मुलांची संख्या कमी होत आहे. किमान पाच अपत्ये असणाऱ्या मागील पिढीपासून आता एक अथवा फार तर दोन अपत्ये  किंवा अपत्यहीन जीवनशैली (DINKs - Double Income No Kids) हा पर्याय निवडण्यापर्यंत मजल गेली आहे.

२०२५ मध्ये अंदाजे १०.५% लोकसंख्या आधीच ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची झाली आहे. २०६० पर्यंत या वयोगटातील जागतिक लोकसंख्या सुमारे २ अब्ज लोकांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्या कालावधीतील एकूण लोकसंख्या वाढीपैकी निम्म्याहून अधिक वाढ ही वृद्ध वयोगटांमधून होण्याची अपेक्षा आहे.

हे केवळ श्रीमंत आणि प्रगत देशांमध्येच घडत असे असे नाही तर आशिया, लॅटिन अमेरिका आणि इतर विकसनशील प्रदेशांमध्येही प्रजनन दरात लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान २०२४ मध्ये जागतिक सरासरी आयुर्मान सुमारे ७३.३ वर्षांवर पोहोचले आहे आणि २०५४ पर्यंत ते ७७.४ वर्षांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

आणि ही तर केवळ सुरुवात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, २०७० च्या दशकाच्या अखेरीस, ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सुमारे २.२ अब्ज लोक असू शकतील. ही संख्या केवळ पाच वर्षांखालील मुलांपेक्षाच नव्हे, तर १८ वर्षांखालील प्रत्येकापेक्षा जास्त असेल.

या परिवर्तनाचा परिणाम जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर होईल ज्यामध्ये आरोग्यसेवा, निवृत्तीवेतन, गृहनिर्माण, रोजगार, नागरी सेवा, कार्यक्षम वयोगटातील घटणारी लोकसंख्या इत्यादी बाबींचा समावेश असेल. ८० वर्षे आणि त्याहून अधिक जगणे हे अपवादात्मक न राहता एक सामान्य बाब होईल.

मानवी इतिहासाच्या बहुतेक काळात, लोकसंख्येच्या पिरॅमिडच्या तळाशी प्रचंड संख्येने मुले आणि शिखरावर तुलनेने कमी वृद्ध लोक असत. आता तो प्राचीन आकार हळूहळू बदलत असून तो एखाद्या घटासारखा (माठासारखा - earthen pot)  होतो आहे. भविष्यात त्याचा पाया (base) लहान आणि वरील भाग रुंद होईल. अशी आकृती अस्थिरता दाखवते.

असा अनुभव मानवजातीने या आधी कधीही घेतलेला नाही परंतु गेल्या काही दशकातील बदलती demography बघता -

ये तो होना ही था ...

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 628
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by कर्नलतपस्वी

खरे आहे कर्नल काका,

सध्या क्वांटम फिजिक्स मधून इतक्या  विचित्र आणि अतार्किक गोष्टी बाहेर येत आहेत कि ऐकावे ते नवलच.
हे ब्रह्मांड स्व जाणीव असलेले (Conscious) आहे असा एक युक्तिवाद आहे.
हे म्हणजे अगदी पिंडी ते ब्रह्मांडी असे झाले.

हे खरे असेल तर निसर्ग तोडगा काढेलही. लोकसंख्या एका मर्यादेवर स्थिर होईल असे वाटते.

अर्थात काळाच्या उदरात काय दडले आहे कोणास ठाऊक?
आणि काळ हा भूत, वर्तमान आणि  भविष्य एकाच वेळी अस्तित्वात आहे असा एक मतप्रवाह शास्त्रज्ञांमध्ये आहे.


ह्या निमित्ताने मांडावे वाटते की भारताची सुद्धा लोकसंख्या स्थैर्याच्या दिशेने दमदार वाटचाल झाली आहे 

टॅग केलेल्या बातमी नुसार मागच्या दोन तीन वर्षात भारताचा टोटल फर्टिलिटी रेट (टी.एफ.आर) हा रिप्लेसमेंट रेट पक्षी २.१ संतती प्रति जननक्षम स्त्री पासून १.९ संतती प्रति जननक्षम स्त्री इतका खाली उतरला आहे. हा फरक फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा दिसून आला असून, ह्या दरात झालेली घसरण ही लोकसंख्या स्फोटात खलनायक भूमिका निभावणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये पण दिसले आहे, दोन्ही राज्यांचा जनन दर हा राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त असला तरी मागच्या जनगणनेपेक्षा अर्ध्यावर आलेला आहे सरासरी. 

विशेष म्हणजे २.१ हा जनन दर हा रिप्लेसमेंट रेशो म्हणवला जातो कारण प्रति जननक्षम स्त्री जर २.१ बालके जन्माला घालत असेल तर त्या दराने एक पिढी पूर्ण रिप्लेस होऊन लोकसंख्या स्थिर राहते. 

सध्या भारताचा जनन दर हा १.९ वर स्थिर झाला असून त्यामुळे लोकसंख्या कमी होत होत काही दशकांत वरिष्ठ नागरिक असणारी लोकसंख्या जास्त होऊन तरुण लोकसंख्या कमी होईल. 

कोटीमध्ये गेलेला हा आकडा बऱ्याच परिमाणांना परत री-डिफाइन करण्यास भाग पाडेल. 

त्यामुळे मला वाटते जर भारताने जननदर मेन्टेन ठेऊन २.१ टी एफ आर काटेकोर पाळून लोकसंख्या स्थिर ठेवली तर पुढे येणाऱ्या प्रॉब्लेम्सला एक उत्तम कुशनिंग मिळून जाईल.

 

(मालथस महालनोबीस) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

अरे व्वा वृषभभाऊ तुम्ही तर सांख्यिकीय आकडेवारीच सादर केली कि, छान.

एप्रद (एकूण प्रजनन दर) २.१ वर स्थिर होऊन लोकसंख्या देखील भविष्यात स्थिरावेल अशी आशा आहे.
वंश सातत्य हीच निसर्गाची आदिम प्रेरणा आहे.
 


In reply to by वृषभ खोंडे

भारतात सरासरी जननदर प्रतिस्त्री १.९ इतका खाली आला आहे त्याचे आणखी वेगळे (डूम्सडे वाटणारे) परीणाम होतील असे मला वाटते. एक तर हा १.९ हा आकडा एकसमान नाही. म्हणजे समाजाच्या सर्व वर्गांमध्ये- अशिक्षित, सुशिक्षित, स्वत:चे पोट भरू शकणारे, स्वत:चे पोट भरू न शकणारे या सगळ्या वर्गांमध्ये तो एकसमान नाही. सुशिक्षित आणि 'वेल-टू-डू' लोकांमध्ये तो दर कमी आहे तर अशिक्षित, हातावर पोट असलेल्यांमध्ये त्यामानाने अधिक आहे. याचा नक्की पुरावा द्या म्हणून अंगावर येऊ नका- हे एक निरीक्षण कुठेही करता येईल. हल्लीच्या पिढीत- म्हणजे २५ ते ३२-३३ या वयोगटातील आपल्यासारख्या लोकांची दोन मुले आहेत हे त्यामानाने बरेच कमी बघायला मिळते पण झोपडपट्ट्यांमध्ये ३-४ पोरे सुध्दा असतात हे आपल्या आजूबाजूला दिसतेच. आपल्यासारख्या कुटुंबांमध्ये अनेकांना वेळेत लग्नच करायची नसतात, लग्न केले तरी मुले नको असतात आणि झाले तर एकच असे बहुसंख्य ठिकाणी बघायला मिळेल. 

त्याचे कारण आपणच आपल्या गरजा वाढवून ठेवलेल्या आहेत त्यामुळे एकूणच खर्च वाढले आहेत. मी शाळेत असताना १० वीत महिन्याला ८ रूपये फी होती. अजूनही तशा शाळा असतीलच- म्हणजे महिना ८ रूपये नाही तरी आटोपशीर फी असलेल्या. पण आपल्यासारखे लोक आपल्या मुलांना अशा शाळांमध्ये पाठवत नाहीत. माझा बालवाडी ते इंजिनिअरींगपर्यंत फी साठी जेवढा खर्च होता त्यापेक्षा जास्त फी माझ्या मुलीची शाळेची एक वर्षाची आहे. आपल्याला वर्षा-दोन वर्षातून एक परदेश ट्रीप करायची असते. आपण भारतात जरी फिरायला गेलो तर लाल डब्बा एस.टीने किंवा रेल्वेच्या सेकंड क्लासने कुठे फिरणार नाही. आपल्याला जायला विमान हवे असते किंवा रेल्वेचा एसी डबा. आपण लॉजसारख्या ठिकाणी उतरणार नाही तर किमान थ्री-स्टारमध्ये उतरणार. महिन्यातून एक तरी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये आपल्याला बघायचा असतो आणि किमान ५००-६०० रूपयांचे पॉपकॉर्न खायचे असतात. हॉस्पिटलमध्ये जावे लागले तर आपण महापालिकेच्या के.ई.एम किंवा तत्सम हॉस्पिटलमध्ये जाणार नाही तर लीलावती किंवा हिंदुजा अशी पंचतारांकित हॉस्पिटल लागणार. अशा प्रकारांमुळे आपण आपलेच खर्च इतके वाढवले आहेत की त्यात दोन मुलांचा खर्च परवडणे बहुसंख्य नोकरदार वर्गांना परवडणे शक्य नाही. आपल्या लहानपणी बहुतेक ठिकाणी आई गृहिणीच असायची. म्हणजे एका पगारात २-३ मुलांचे खर्च पण भागायचे. आता दोन पगारांमध्ये एकाचेच सांभाळताना फे फे उडते. त्याउलट झोपडपट्टी आणि अशा ठिकाणी लोक महापालिकेच्या शाळेत मुलांना टाकणार, कुठेही जायचे झाले तर सेकंड क्लासने जाणार वगैरे. त्यामुळे त्यांना मुलांना कसे वाढवायचे हा प्रश्न इतका मोठा वाटत नाही.

आपल्याकडे कोणताही पक्ष सत्तेत असला तरी करदात्यांकडून पैसे घ्यायचे आणि तथाकथित दारिद्र्यरेषेखालील लोकांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात/ सवलतींमध्ये वाटायचे हाच प्रकार असतो. जर वेलफेअरवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आणि त्यासाठी कर भरणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली तर हे मॉडेल कसे चालायचे? झोपडपट्टीतूनही पुढे जाणारे लोक असतात पण झोपडपट्टीतून वर आलेला कोट्याधीश झाला अशी उदाहरणे एकूण लोकसंख्येच्या मानाने फारच कमी असतात. 

त्यामुळे मी एकूणच भविष्याविषयी बराच 'बेअरीश' आहे. हा सगळा फरक एका दिवसात किंवा एका वर्षात दिसायचा नाही पण जशीजशी वर्षे जातात त्याप्रमाणे- २५/३० वर्षांनंतर कशी परिस्थिती असेल या कल्पनेने घाबरायला होते.

 

 

 

 

 

 


आणखीही एक मुद्दा याला जोडून पाहणे रोचक ठरेल. तो म्हणजे जगातील माणसाची काम करण्याची गरज कमी कमी होत जाणे. ए आय मुळे अनेक लोक कामातून मुक्त होतील व कदाचित त्यांना फुकट पोसावे लागू शकते. अशी लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढू शकते कारण तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे हा बदल येत्या एका दशकातच घडू शकतो. असे कामरहित लोक वाढले तर मानवजातीवर काय परिणाम होईल? 


In reply to by स्वधर्म

हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही अचूक नाडीवर बोट ठेवलंय. आपण आतापर्यंत विचार करत होतो एआय मुळे नोकऱ्या जातील. पण खरा प्रश्न नोकरी जाण्याचा नाही. खरा प्रश्न आहे, जेव्हा कामाचीच गरज संपेल, तेव्हा माणूस काय करेल?

पोटासाठी काम करायची गरज संपेल, तेव्हा माणसाला स्वतःचा स्वधर्म, म्हणजे मी कशासाठी जन्मलोय हेच शोधावे लागेल. जो समाज हा अर्थ लवकर शोधेल, तो टिकेल. जो फक्त फुकट पोसण्यावर अवलंबून राहील, तो आतून कोलमडेल, असे वाटते.


In reply to by चामुंडराय

ह्याला superabundance असे म्हणतात. ह्यामुळे माणूस हा अंतर्मुख होईल. 


यात एक मोठा धोका समोर येतोय

ज्या राष्ट्रांची लोकसंख्या घटत आहे तेथे  मुस्लीम लोकसंख्या वाढत आहे.

हे बहुतेक लोक शरणार्थी म्हणून  आलेले होते. त्यानी बहुतेक देशांच्या लोकसंख्येचे ( डेमॉग्राफी)  गणीत पार उलटे पालटे करून टाकले आहे.

न्यूऑर्क किंवा लंडन चा मेयर हा एखादा अशियायी मुसलमाल होऊ शकेल हे कोणी स्वप्नातही पाहिले नसेल


In reply to by विजुभाऊ

महापौर हा धर्माच्या आधारकर होतो की स्वतच्या कर्तृत्वावर होतो?


London (2021 Census)

  • Christian: 40.7%
  • No religion: 27.1%
  • Muslim: 15.0%
  • Hindu: 5.1%
  • Jewish: 1.7%
  • Sikh: 1.6%
  • Buddhist: 0.9%
  • Other religion: 1.0%
  • Not stated: 7.0%
New York City (Averages)
  • Christian: 48%
  • No religion: 26%
  • Jewish: 10%
  • Muslim: 9%
  • Hindu: 2%
  • Buddhist: 2%
  • Other religion: 2%
 

In reply to by विजुभाऊ

न्यूऑर्क किंवा लंडन चा मेयर हा एखादा अशियायी मुसलमाल होऊ शकेल हे कोणी स्वप्नातही पाहिले नसेल

 

The bill for establishing religious freedom, the principles of which had, to a certain degree, been enacted before, I had drawn in all the latitude of reason and right. It still met with opposition; but, with some mutilations in the preamble, it was finally passed; and a singular proposition proved that its protection of opinion was meant to be universal. Where the preamble declares, that coercion is a departure from the plan of the holy author of our religion, an amendment was proposed, by inserting the word "Jesus Christ," so that it should read, "a departure from the plan of Jesus Christ, the holy author of our religion;" the insertion was rejected by a great majority, in proof that they meant to comprehend, within the mantle of its protection, the Jew and the Gentile, the Christian and Mahometan, the Hindoo, and Infidel of every denomination.  - थॉमस जेफरसन - १८२१ 

 

लंडन चे मला ठाऊक नाही पण न्यूयॉर्क चा मेयर भारतीय - युगांडन मुस्लिम आहे ह्यांत काहीच आश्चर्य नाही.  अर्थांत वर्णद्वेषी मॅगट अमेरिकेत भरपूर आहेत आणि "परप्रांतीयांच्या" नावाने बॉम्ब मारणारे आपल्याकडे सुद्धा आहेत पण बहुतेक पाश्चात्य शहरे खूप काळापासून अतिशय वैविध्यपूर्ण आहेत. 


In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ही वाढ होण्यामागे काही खास कारणे दिसून येत आहेत. एकाच प्रकारच्या धर्माने सर्व फायदे घ्यायचे आणि सार्वत्रिक लोकसंख्या वाढवत सुटायची या धोक्याची नोंद घेतलीच पाहिजे. 

कारण यांचे शिक्षण काय होते आहे? हा मुद्दा पुढील पीढी मुक्तपणे जगणार आहे की नाही यासाठी महत्त्वाचे असू शकेल.


In reply to by निनाद

एकाच प्रकारच्या धर्माने सर्व फायदे घ्यायचे आणि सार्वत्रिक लोकसंख्या वाढवत सुटायची

म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे ते समजून घेणे आवडेल.

 

खोंडे