Skip to main content

काथ्याकूट; राजकारण; समाजकारण; ताज्या घडामोडी; बातम्या; चर्चा; घटना; नोंद; लोकसभा; विधानसभा; निवडणुका; निकाल; मतमोजणी

भारतातील विधानसभा निवडणूका २०२४

लेखक वामन देशमुख यांनी रविवार, 02/06/2024 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतीय प्रजासत्ताकाच्या १८व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाचे वारे वाहत आहेत. कालच्या एक्झिट पोल निकालांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. "मोदींची 'अब की बार चार सौ पार' घोषणा सार्थ ठरली" असा आनंद रालोआ गट व्यक्त करणार की "मोदींची ती घोषणा व्यर्थ ठरली" असा आनंद इंडी गट व्यक्त करणार हे मंगळवारी स्पष्ट होईल. लोकसभेच्या निवडणुकांशिवाय काही राज्यांत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही होत आहेत. त्याशिवाय काही ठिकाणी विधानसभेच्या रिक्त जागांवरदेखील निवडणुका होत आहेत. त्यांची चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे. विषयानुरुप, अभिनिवेशरहित, न-अप्रस्तुत प्रतिसादांसाठी आधीच धन्यवाद.