कृष्ण मिळाला कौरवांना
पांडव कसे जिंकणार
धनानंदांच्या सेने पुढे
विद्यानंद कसे टिकणार?
तूनळीतून बाण सुटले
रिळांची मांदियाळी
कुणासाठी वाॅरंट सुटले,
कुणाला मिळाली नळी.
अंधाऱ्या गल्ली मधे
रोज पेटती मशाली
अजगर सुस्त पडले इथे
विद्यानंदाची वस्ती जळाली
कसले साम्राज्य आणी
कसला पाया?
ज्ञान,सत्य भरते पाणी
ज्यांच्या गाठी आफाट माया
वस्त्र फेडण्या अधीर कौरव
फितूर झाला कृष्णसखा,
कोण पुरवणार आता वस्त्रे
कृष्णेला पडला प्रश्न असा?
कवी डी. जे. व्यास
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
236
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्त्युत्तम !
अत्त्युत्तम !
@सहानाजी,
In reply to अत्त्युत्तम ! by साहना
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपला प्रतिसाद बघून थोडे अश्चर्य आणी जास्त आनंद झाला.
नाही ,एके ठिकाणी कवितेच्या आवडी निवडीबद्दल प्रतिसाद वाचला होता.
@सहानाजी,
In reply to अत्त्युत्तम ! by साहना
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपला प्रतिसाद बघून थोडे अश्चर्य आणी जास्त आनंद झाला.
नाही ,एके ठिकाणी कवितेच्या आवडी निवडीबद्दल प्रतिसाद वाचला होता.
वास्तवतेला धरून असलेले काव्य…
वास्तवतेला धरून असलेले काव्य. समाजाचा ढोंगीपणा कधी कमी होणार कोण जाणे?
@पाभे सर..
In reply to वास्तवतेला धरून असलेले काव्य… by पाषाणभेद
डी जे व्यास हा या कविते पुरता माझा तखल्लुस आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
छान!
छान!
कृष्णेस प्रश्ण तरी का पडावा?
कृष्ण गेला कौरवांकडे,
पांडवांचे मग काय होणार ?
प्रश्न जरी हा कठीण असला,
तरी धर्म कधीही ना हरणार,
धनानंदांच्या सेनेपुढती
विद्यानंद जरी खुजे भासती,
ज्ञानज्योतीची एकच ठिणगीे
सहस्त्र नभांगणे उजळून निघती,
तूणळीतून जरी बाण सुटतील,
वादळांची गर्दी होईल;
धर्माच्या साध्या फटकाऱ्याने
तिमिराची धूळधाण होईल,
तमराजाच्या गल्लीमध्ये
आशेच्या दिपिका उजळल्या,
एक विझली तरी हजार जळती,
प्रखर, कणखर उमेदवाल्या,
अजगर जरी सुस्त जाहले,
वस्ती जरी क्षणभर जळाली;
राखेतून नवजीवन घेऊन
आशेची नव फुले उमलली,
ज्ञान, सत्य कधी का हरते?
जरी वाटे ते झाले क्षीण;
युगायुगांचा इतिहास साक्षी,
धर्मापुढती सारे लीन,
फितूर जाहला कृष्णसखा जरी,
कृष्णेला काळजी नसावी;
मनगटी मधल्या आत्मबळाची
तिला सदोदित जाण असावी,
सत्य, ज्ञान आणि प्रेमयोगे
धर्माचा होय सदा विजय;
एक कृष्ण फितूर झाला तरी,
हजार कृष्णांचा होई उदय,
खोट्याचा गजर मोठा असतो,
सत्याचा स्वर शांत, उदात्त;
परी काळाच्या न्यायासनावर
सत्यच ठरते अंतिम सत्य,
पैजारबुवा,
फितूर जाहला कृष्णसखा जरी…
In reply to कृष्णेस प्रश्ण तरी का पडावा? by ज्ञानोबाचे पैजार
फितूर जाहला कृष्णसखा जरी,
कृष्णेला काळजी नसावी;
मनगटी मधल्या आत्मबळाची
तिला सदोदित जाण असावी,👍️
उत्तर
In reply to कृष्णेस प्रश्ण तरी का पडावा? by ज्ञानोबाचे पैजार
मूळ कविता आणि बुवांचे उत्तर दोनःइ आवडले.
पैजारबुवांची पावती...
In reply to कृष्णेस प्रश्ण तरी का पडावा? by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवांची पावती,शंभर नंबरी सोने,
वेदव्यासांचे पोते...म्हणती,पुणे तेथे काय उणे🤪
धन्यवाद.
कृष्णाची वाट पाहता…
कृष्णाची वाट पाहता पाहता
स्वत्वाचा विसर, न्याय आहे?
दाटला अंधार बघता बघता
ज्ञानाचा दिवा तेवता आहे!!
कविता आवडली
फक्त
कुणाला मिळाली नळी.
ह्याचा संदर्भ लागला नाही. नळी लाभली म्हणजे बंदुकीची नळी का मटणाची नळी ? (आमच्यातील खवय्याची आर्त श्रावणी हाक)
(मटन मार्तंड) खोंडे
नळी लाभली म्हणजे....
In reply to कविता आवडली by वृषभ खोंडे
आपल्याला अभिप्रेत असेला अर्थ घ्यावा.
नळी लाभली म्हणजे....
In reply to कविता आवडली by वृषभ खोंडे
आपल्याला अभिप्रेत असेला अर्थ घ्यावा.
तूनळीतून बाण सुटले
रिळांची मांदियाळी
कुणासाठी वाॅरंट सुटले,
कुणाला मिळाली नळी.
👆️या जागी....👇️असे लिहिले असते तर शंकेला वाव नसता राहीला.
तूनळीतून बाण सुटले
रिळांची मांदियाळी
कुणासाठी वाॅरंट सुटले,
कुणाच्या मुखात नळी.
उत्तम कविता
आणि त्याला पैजरबुवांनी लावलेले चार चांद
पढतपांडित्या अज्ञानाचा,…
पढतपांडित्या अज्ञानाचा, बाजार सारा मांडिला,
अध्यात्म लाभे अंतरी, हा मार्ग का हो सांडिला?
जाणावे आता खरे ते, अंतरीचे ज्ञानानंद,
सोडावे हे पाखंडाचे, खोटे मुखवटे विद्यानंद!
चार दिसांचे कौतुक हे, जन भुलतील मिडियाने,
प्रमोशनच्या मिडियावरती, येतील मोठे तोऱ्याने.
परी जनमानसाच्या हृदयात, बाप्पाचा जो भाव असे,
त्या अढळ विठ्ठल-गणरायाचे, प्रेम कधीही कमी नसे.
तंत्रज्ञानाच्या आडोश्याने, धर्मावरती घाला हा,
विद्यानंदाचा कपटवेष, वेळीच आता ओळखा.
नका राहू हो गाफील आता, नंदनवनातले नंद तुम्ही,
जागे व्हा या डावाविरुद्ध, उभे ठाका या भूमी.
खऱ्या ज्ञानाचा प्रकाश घ्या, पाखंडाचा करा अंत,
हृदयी नांदो शुद्ध विवेक, हाच सांगती सर्व संत.
खोटे मुखवटे विद्यानंद!....
आपल्याला नेमके काय म्हणायचे कळले नाही.
मुद्दा खुप सरळ सोपा आहे. लेझर प्रकाश झोताने डोळ्यांना इजा.आणी डि जे मुळे ध्वनिप्रदूषण हृदयरोग,क्वचित मृत्यू,बहिरेपणा, मानसिक स्वास्थ्य यावर निश्र्चित परिणाम होतो. आणी समाजाच्या आरोग्यासाठी हा प्रकार बंद व्हावा एव्हढेच.
सण साजरे करा,जल्लोषात करा,भक्तिभावाने करा,खुप पैसे उधळा याबद्दल काही म्हणणे नाही परंतू हे सर्व करताना एक जरी असामायीक मृत्यू किंवा आयुष्यभर अपंगत्व येत असेल तर त्यावर राजकारण, धर्मकारण न करता सक्षम उपाय करा एव्हढेच.....
वहातूक कोंडी पुणेकरांच्या पाचविला पुजली आहे. मंडप टाकल्याने खड्डेमय रस्ता, विसर्जनानंतर जागोजाग पडलेले भग्न रथ मंडपांचे सांगाडे..... अजून काय सांगावे....
गर्दीत होणारी चेन स्कॅनिंग,पर्स, पिक पॅकेजिंग,महिला,मुलीं बरोबर अभद्र व्यवहार.... एकुणच सार्वजनिक उत्सव नकोसे वाटू लागलेत.
ये उम्र का तकाजा नही,तजुर्बा है
जो रास्ते की ठोकरों को दुआ करता है।
विघ्नहर्त्याच्या नावाने…
विघ्नहर्त्याच्या नावाने रहदारीस अडथळा निर्माण करणे आणि शूर्पकर्णाच्या नावाने कानठळ्या बसवणे हे विडंबन नाही तर काय आहे ?