Skip to main content

निवडुंगांची सद्दी ...

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 07/09/2026 11:46 या दिवशी प्रकाशित केले.

निवडुंगांची सद्दी, सुकला सोन्याचा पिंपळ
भ्रमास किनखापी अंगरखा, सत्य नग्न, बेहाल
जलपर्णी फोफावे, करपे काठावर हिर्वळ
उत्सव नुरले, उधाण उरले, मंजुळ किती गोंधळ!
तर्क-बिर्क खुंटीवर आता गुद्द्यांचाच सुकाळ
डी जेचा थर्थराट, फुटला मृदंग, तुटला टाळ!


वाचने 93
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

एकसुरी ढोल, ढोलकी, डफ, केवळ एक दोन अथवा तीन स्वरातले किंचाळणे (ज्याला गाणे म्हणोत ज्यांना म्हणायचे ते बिचारे) एकतारीची टिंग टिंग हेच  बहुतांश  समाजाला आवडत असते. हेच गाणे, किंचाळणे याला देवळासमोर भजन, आरती यांची एकसुरी लय लावून दिली की धार्मिक म्हणून मिरवणे सोपे असते अथवा व्यासपीठासमोर लावणी, ठुमरी नाच यांची भ्रष्ट  नक्कल लावून दिली की रसिक म्हणून मिरवता येते... त्याला विज्ञानाच्या सहाय्याने  भोपू, कर्णा, भोंगा यांची साथ मिळाली अन ज्जे बात !! 

आपली रसिकता वा धार्मिकता कळसाला नेऊन पोचवण्याची संधी मिळाली.. वाजवा रे वाजवा !!!! 

चूक विज्ञानाची आहे.. चुकीच्या माणसांना चुकीच्या गोष्टी देऊन चूक केली.. भोगा कर्माची फळे. 

 

 

 


पण मी आशा का सोडू? चांगला बदल ही घडेलच

 

जरी ऋतु हा शुष्क भासतो, माती नाही वांझ.
उमलतील शत नवान्कुर हे, उजाडता प्रभात!
पुन्हा लाभेल सूर संथ तो, गवसेल ती तान,
तृप्त करील या धरणीला, अमृताचे गान!