Skip to main content

भावना

"सुमन",सुगंध.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 01/06/2026 09:54 या दिवशी प्रकाशित केले.

 

ऐकले किती तरीही, कान माझा अतृप्त आहे,

सुमनांच्या गर्दीतले ते "सुमन", वेगळेच आहे....

 

"निंबोणीच्या झाडा मागे",चंद्र मी ही शोधला होता,

"केतकीच्या बनी मधे" ,नाचरा मोरही ऐकला आहे

 

"उठा उठा चिऊताई ",ऐकून जाग मजला येत होती,

"आली बघ गाई गाई"झोप अंगणात अजुनही येत आहे.

 

सरले लहानपण माझे,"उमलली एक नवी भावना",

"मज नकोत अश्रु घाम हवा",दिला,हाच खरा मंत्र आहे.

 

पिवळी पिवळी हळद लागली","नकळत सारे घडले",

"रे क्षणांच्या संगतीने", किती सांगू,सारे मी ऐकले आहे.

 

भितीत फायदा नसतो?

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 08/08/2020 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
'डर के आगे जीत है' हा हिंदी वाक्प्रचार बर्‍याचदा धाडसाचं महत्त्व सांगण्यासाठी वापरला जातो.पण खरंच भितीमुळे दरवेळी नुकसानच होतं का?दरवेळी 'भिती' ही प्रगतीतली धोंडच ठरते का?