सांगू सखे तू काय हो
पसरवी किरणे रवीची
असा शीतल चंद्र हो
सोसूनी थकल्या घराचा
निखळ तो आनंद हो
माझिया माता पित्यांचे
सद्गुणी अपत्य हो
ना ढासळे कधीही असा
माझा दृढ विश्वास हो
साथ ना सुटते जयाची
असा माझा श्वास हो
- अक्षरदास
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
158
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
विषयवस्तू आणि
कवितेत दर्शविलेला उत्कट भाव खूप खूप आवडला.
धन्यवाद
In reply to विषयवस्तू आणि by वृषभ खोंडे
धन्यवाद 🙏
सुंदर रचली आहात कविता!
सुंदर रचली आहात कविता!
धन्यवाद 🙏
In reply to सुंदर रचली आहात कविता! by अनिशासूत
धन्यवाद 🙏
काव्यार्थ
नवीनच लग्न झालेलं आहे आणि नवविवाहित स्त्रीकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या दिसत आहेत.
अपेक्षित असं ध्येय जेव्हा कठीण आणि आवाक्याच्या बाहेर असलं की असं माध्यम लागतं.
आशय असा असावा असा आपला अंदाज. :)
-दिलीप बिरूटे