Skip to main content

भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय ?

लेखक गामा पैलवान यांनी शनिवार, 15/08/2026 02:56 या दिवशी प्रकाशित केले.

लोकहो,

भारताला दिनांक १५ ऑगस्ट १९४७ इंग्रजांच्या शासनापासून स्वातंत्र्य मिळालं. तर हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याविषयी माझ्या मनांत थोडाबहुत संभ्रम आहे. या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हा लेख लिहितो आहे. स्वातंत्र्यासोबत फाळणीही झाली. त्यामुळे तिचा विचारही आपोआप होणार. तर मुद्द्याला हात घालूया.

तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट अ‍ॅटलींनी २० फेब्रुवारी १९४७ साली ब्रिटीश संसदेत जाहीर केलं की ०३ जून १९४८ पर्यंत ब्रिटीश इंडियास पूर्णपणे स्वयंशासित करणार. अर्थात, या तारखेपश्चात ब्रिटीश संसदेचा कोणताही कायदा भारतास लागू होणार नाही. या घोषणेस सत्तांतराची घोषणा म्हणतात. १६ जुलै १९४७ रोजी या मसुद्याचं कायद्यात रुपांतर झालं. त्याच वेळेस भारताची फाळणी करायचं ठरलं. तर प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या खंडप्राय देशाची फाळणी फक्त ११ महिन्यांत ( जुलै १९४७ ते जून १९४८ ) कशी करायची? आणि भरीस भर म्हणून सत्तांतराचा दिवस जून १९४८ च्या तब्बल १० महिने आधी म्हणजे १४ व १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत मागे खेचला. म्हणजे फाळणीसाठी अवघा दीड महिनाच उरला होता. ही घिसाडघाई का?

सत्तांतराच्या पश्चात दोन अंमलशाह्या ( = dominions ) उत्पन्न झाल्या. १४ ऑगस्ट १९४७  रोजी पाकिस्तान व दुसऱ्या दिवशी भारत. ह्या दोन्ही अंमलशाह्या स्वायत्त होत्या. म्हणजे भारत व पाकिस्तानी सरकारे स्वयंशासित असणार आणि त्यांचा प्रमुख ब्रिटनचा राजा केवळ नामधारी असणार. आज घडीस इ.स. २०२६ साली कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व जमेका ( यादी अपूर्ण )  या प्रकारच्या अंमलशाह्या आहेत. आता, हाच दर्जा मिळावा म्हणून पहिल्या महायुद्धाच्या नंतर प्रयत्न सुरू केले होते. १९१६ साली लखनौ करार झाल्यावर हिंदू व मुस्लिमांची तेव्हढ्यापुरती एकजूट झाली. हिंदी लोकांना स्वायत्तता मिळावी म्हणून मुस्लीम लीगने काँग्रेसशी सहकार्य करायचं मान्य केलं. याच कारणासाठी टिळकांनी होमरूल चळवळ ( १९१६ ते १९१८ ) याचसाठी राबवली. टिळक १९२० साली स्वर्गवासी झाले. तोवर गांधी भारतीय राजकारणांत स्थिरावले होते. त्यांनी १९२१ मध्ये असहकार चळवळ पेटवली. ती जर नीट तडीस नेली असती तर अंमलशाही स्वायत्तता तेव्हाच मिळाली असती. मात्र चौरीचौरा येथील पोलिसांच्या हत्यांच्या सबबीखाली गांधींनी चळवळ मागे घेतली. तर मग तांत्रिक दृष्ट्या पाहू जाता १९२१ ते १९४७ या वर्षांत हिंदू जनतेने काय कमावलं, असा प्रश्न पडतो. जर  अंमलशाही स्वायत्तताच मिळवायची होती तर पहिल्या महायुद्धानंतर सर्वात चांगली संधी होती. ती वाया दवडल्यामुले दुसरं महायुद्ध संपेपावेतो वाट बघावी लागली. मग गांधी आणि नेहरू पितापुत्रांच्या राजकारणाचं फलित काय? भारताची फाळणी सोडल्यास दुसरं काही दिसून येत नाही. मात्र यावर चर्चा झालेली आवडेल.

मध्यंतरीच्या काळांत १९२८ साली ( मोतीलाल ) नेहरू रिपोर्ट आला. त्यांतही स्वायत्ततेची मागणी होती. तेव्हा लॉर्ड आयर्विनने अनौपचारिक जाहीरनाम्याद्वारे मधाचं बोट चाटवलं होतं ( इ.स. १९२९ ).  मात्र पुढे फारशी प्रगती झाली नाही. म्हणून गांधींनी सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू केलं ( १९३२).

तर मग स्वातंत्र्य म्हणजे सत्तांतराद्वारे मिळालेली स्वायत्तता असं म्हणावयास पाहिजे. आता यांस स्वातंत्र्य का म्हणायचं? बहुधा १९४८ नंतर ब्रिटीश संसदेचा कोणताही कायदा भारतास लागू होणार नाही अशी नि:संदिग्ध घोषणा झालेली असल्याने या सत्तांतरास स्वातंत्र्य म्हणता यावं. असं माझं आकलन आहे.

सत्तांतर म्हंटलं की आजूनेक प्रश्न उपस्थित होतो. जवाहर नेहरूंना शासनप्रमुख म्हणून कोणी नेमलं? त्यांनी १९४६ साली सरकारात शिरतांना साधा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. कृपया हे हिंदी चलचित्र ( साडेपाच मिनिटे ) पाहणे : https://www.youtube.com/watch?v=1FobmFy1qM4

१९५२ साली निवडून आल्यावरच नेहरू पंतप्रधान झाले. मग १९४७ ते १९५२ पर्यंत ते कशाच्या आधारावर पंतप्रधान म्हणवले जातात? याच मुद्द्यामुळे फाळणीच्या अधिकृत दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. मी ती अधिकृत का मानावी? तसंच नेहरूंनी कोणत्या आधारे भारतीय सैन्याच्या विजयी आगेकूचीत हस्तक्षेप केला? भारताने काश्मीरच्या प्रश्नी राष्ट्रसंघाचे निरीक्षक मागवले होते, त्याची मागणी नेहरूंनी केली. ती अधिकृत ठरेल का? त्यावरही प्रश्न उपस्थित होतात.

१९४७ च्या सत्तांतरात काही महत्त्वाचे धागे सुटेच लटकंत आहेत.

यांतला एक धागा पटेलांविषयी आहे. त्यांना जर पोलादी पुरुष मानलं जातं, तर त्यांच्या नजरेतनं नेहरूंचा दर्जा कसाकाय निसटला? त्यांनी संस्थानांच्या एकीकरणाचं काम खमकेपणाने केलं. पण हा खमकेपणा गांधींना संरक्षण देण्यात का कमी पडला? इंग्रजांनी भारत एक केला असं म्हंटलं तर १९४७ साली सत्तांतराच्या वेळेस ५५०+ संस्थाने वेगळी का राहिली? इंग्रजांनी भारत एक केला आणि सरदार पटेल लोहपुरूष आहेत ही दोन विधाने परस्परविरोधी आहेत.

असो.

सध्या इतकच लिहून थांबतो. जसजशा गोष्टी आठवतील तसतशा लिहीत जाईन म्हणतो. चर्चा सुरू होऊद्या.

आपला नम्र,
-गामा पैलवान 

लेख वर्गीकरण

वाचने 2798
प्रतिक्रिया 169

प्रतिक्रिया

In reply to by साहना

"हिंदू धर्म हा अतिशय…

साहना

गुरुवार, 27/08/2026 12:26 

 

नेमके काय म्हणायचे आहे, कळले नाही.


"हिंदू धर्म हा अतिशय बुरसटलेला आहे, हिंदुत्व नष्ट व्हायला हवे, हिंदू ही ओळखच अतिशय लाजिरवाणी आहे" अश्या प्रकारचे narrative सातत्याने मांडत राहणे हे तितकेच निषेधार्ह आहे; त्याचा विरोधच व्हायला हवा. 

आताच्या सतीच्या चर्चेत कोणी वरील ईच्छा दाखवली ते पॉईंट आऊट करा ! उगाच तुम्ही दिवाभित आहात ते जनतेवर लादू नका. आम्ही शाखेत नाही आखाड्यात पोसलो आहोत. 

आमचे ज्ञान, विज्ञान, इत्यादी सगळे जागेवर आहे, हिंदू धर्म आणि हिंदुत्व ह्यात फरक असतो, हिंदू धर्म तगडा आहे तो सतीसारख्या प्रथा वेळोवेळी डिस्कार्ड करतो हिंदुत्व = राजकीय मूर्खपणा जो हिंदुधर्माचे रक्षण करण्याचा आव आणतो अन् स्वतःच्या राजकीय चपात्या शेकून घेतो. 

आम्ही हिंदुत्ववादी खचित नाही पण हिंदू नक्कीच आहोत अन् हिंदुत्व जे हिंदुधर्माला अब्राहमिक चौकटीत बांधायचे पाप करते आहे त्यात आम्ही  सहभागी नाही. 

त्यामुळे आमचा धर्म पण धोक्यात नाही अन् पुढे कधी आला तर त्या धोक्याचा समाचार घ्यायला आम्ही समर्थ आहोत. 

हिंदू संपवायला निघालेल्या जगाचा बागुलबुवा फक्त दाखवून राजकीय अजेंडा रेटलेला ह्यापुढे असाच कॉल आऊट करण्यात येणार आहे.

बोला हर हर महादेव

(स्पष्ट विचार धर्मभिमानी) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

बोला हर हर महादेव

हर हर महादेव!

 

आम्ही शाखेत नाही आखाड्यात पोसलो आहोत.

दोन्हींचा इथे संबंध काय? 


In reply to by कांदा लिंबू

हिंदुत्व = शाखेत, भाजपच्या, सेनेच्या एजेंडा मध्ये, गावगुंड मंडित फ्लेक्स बॅनर मधे, महोत्सव साजरे करताना डी जे लावून दहीहंडी फोडणारे. 

 

हिंदुधर्म = आमच्या घरात, ग्रामदेवतेच्या यात्रेत, ज्योतिबा, खंडोबा, सप्तमाता, अकरा मारुती, बिरोबा, म्हसोबा, कुळधर्म कुलाचार, दसऱ्याचे शिलंगण, दिवाळीचे अभ्यंग स्नान इतक्या सगळ्यात आहे अन् आम्ही तो पिढ्यानपिढ्या तलवारीच्या मुठीवर पकड पक्की ठेऊन साधला आहे त्यासाठी आम्हाला बेगडी राजकीय हिंदुत्वाची गरज नाही. 

परत बोला 

ज्योतिबाच्या नावाने चांगभले, 

यळकोट यळकोट जय मल्हार.


In reply to by वृषभ खोंडे

परत बोला 

ज्योतिबाच्या नावाने चांगभले, 

यळकोट यळकोट जय मल्हार.
 

ज्योतिबाच्या नावाने चांगभले, 
यळकोट यळकोट जय मल्हार.


हिंदुत्व = शाखेत, भाजपच्या, सेनेच्या एजेंडा मध्ये, गावगुंड मंडित फ्लेक्स बॅनर मधे, महोत्सव साजरे करताना डी जे लावून दहीहंडी फोडणारे.

साफ चूक. मराठी आधी व्याकरण शिकून या; मग पुढे बोलू. 


In reply to by कांदा लिंबू

विषयावर फोकस करता काही खास हातात लागणार नाही हे लक्षात आले की मग माझे व्याकरण, स्वतः खाल्लेले शिकरण, त्या शिकरणाचा इतिहास, त्याचे मटार ऊसळीसोबत मैत्रीपूर्ण संबंध, असे कैक फाटे सुचतील. 

ही शैली आता जुनी झाली, तुम्ही अगदी त्या तुमच्या झालमुरी सारखे मला काहीही शिव्या घालून बोललात तरी मी फोकस ढळू देणार नाही. हिंदुधर्म हा हिंदुत्व नावाच्या बेगडी फालतू अन् फक्त विशिष्ट राजकीय आयुष्यक्रम असणाऱ्या दिखावा करणाऱ्या संकल्पनेपेक्षा अतिशय गहिरा आणि उच्च आहे(च).

(पक्ष्याचा डोळा पाहणारा स्थिर चित्त आज का अर्जुन) खोंडे हस्तिनापुरकर


In reply to by वृषभ खोंडे

  हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे मुळात वेगळे नाहीत हेच याना समजलेले नाही.

 

यांची हिंदुत्वाची मूलभूत व्याख्याच गंडलेली आहे तेथे चर्चा करणे हा निव्वळ कालापव्यय आहे.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व अजिबात न वाचता  हे केवळ रा स्व संघावर टीका करण्यापुरते हिंदुत्व या शब्दप्रयोगाचा उपयोग करतात.

 

तेंव्हा माझ्याकडुन या चर्चेला पूर्णविराम.

    


In reply to by सुबोध खरे

सहमत. 

 

आम्ही ब्राह्मणांविरूद्ध नाही,  ब्राह्मण्यविरोधात आहोत असा दांभिकपणा करीत प्रत्यक्षात ब्राह्मणांना शिव्याशाप दिले जातात. तसेच आम्ही हिंदूंविरोधात नाही, हिंदुत्वविरोधात आहोत असा दांभिकपणा करून प्रत्यक्षात हिंदू व हिंदू धर्मियांना शिव्याशाप दिले जातात. 


In reply to by सुबोध खरे

>>>स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व अजिबात न वाचता

 

अहो ते माफीवीर !! त्यांनी लिहिलेला (!) माफिनामा (?) फक्त आम्ही वाचतो आणि उगाळतो.... बाकी वाचायला आम्हाला वेळ कुठाय? आणि गरजच काय? आम्ही म्हणतो तेच बरोबर.. कारण आम्ही डावे आहोत. :)


In reply to by राज जोशी

आम्ही डावे हे सोयीने किंवा उत्तरे न मिळाल्यामुळे तडफडून तडफडून लावलेला जावईशोध चूक आहे ना भाई. 

तुम्हाला काही जमत नसेल तर गुरुजींकडून शिका, खरेंच्या उद्धटपणाला श्रीगुरुजींसारखे ठेवणीतले नाक मुरडून मम म्हणा पुरेसे होईल, हे जावईशोध म्हणजे मोराच्या पिसाऱ्या सारखे आहे ! मी किती हिंदू, किती नाही, डावा का उजवा ही सर्टिफिकेट वाटण्या पलीकडे तुम्ही काहीच करू शकत नाही कारण माझ्या वाचनावर प्रश्न उभा करताना आपणही कोरडे पाषाण असल्याचे तुम्ही विसरता आहात साहेब.

 मला हिंदू राहण्यासाठी न ब्राह्मण समाजावर शिंतोडे उडवण्याची गरज आहे ना संघडल्या हिंदुत्वाची. (स्वगत - ब्राह्मण पण आजकाल मुसलमानांसारखे विक्टीम कार्ड खेळू लागले का काय ?

 

वरील सन्माननीय हुच्च सदस्यांनी ज्यांना ज्यांना डावे घोषित केले आहे त्या सगळ्यांसाठी सूचना - कालापव्यय, किंतू परंतु, अस्थानी व्यंगात्मक टिप्पण्या, तुम्ही हिंदू असणे/नसणे सर्टिफिकेट, ब्राह्मण्य (गरज अन् जागा नसताना), झोकदार संस्कृत म्हणी इत्यादी प्रचुर वैयक्तिक अंगाने जाणारे प्रतिसाद आले की संबंधित सदस्याच्या डोक्यातील चिमणीतले रॉकेल संपले आहे हे लक्षात घ्यावं अगत्याने.

(बाळशास्त्री जांभेकर) खोंडे


In reply to by सुबोध खरे

सावरकर प्रणित हिंदुमहसभा असताना मग संघाचा वेगळा पंक्तीप्रपंच करण्याचं काय प्रयोजन होतं ?

 सावरकर - विज्ञाननिष्ठ + आधुनिक + दांभिक कर्मकांड वजा केलेलं हिंदू धर्माचं आधुनिक स्वरूप. गायीच्या मूत्रात रोगप्रतिकार शक्ती आहे तर नगरपालिका रोज टँकरने ते गावभर का शिंपडत नाही विचारणारं. सावरकरांचे विचार यज्ञाचे कार्यकारण विचारणारे 

 

संघ - कर्मकांडात ओढून ताणून विज्ञान शोधणार हिंदुत्व ! गायीच्या मुतांतील अमृत शोधायला उतावळे ! संघाचे हिंदुत्व म्हणजे यज्ञात तूप ओतणाऱ्या गोळवलकरांचे फोटो 🤣🤣


In reply to by वृषभ खोंडे

हिंदू महासभा हा राजकीय पक्ष होता आणि रा स्व संघ हि सामाजिक (गैर राजकीय) संघटना आहे.

दोघांचे काही हेतू सारखे ( हिंदू हितासाठी) असले तरी मूलभूत फरक बराच आहे.    

हिंदू महासभा समाजसेवेसाठी काम करत नसे तर रा स्व संघांच्या संलग्न संस्था बऱ्याच समाजसेवेच्या क्षेत्रात आहेत.    

रा स्व संघ अजूनही झापडबंद विचारसरणीने चालतो तरीही त्यांचा मूळ हेतू चांगलाच आहे. 

त्यांचे पुराण मतवादी विचार न पटणारे असले तरीही त्यांचे बरेचसें कार्य स्पृहणीय आहे.    

एखाद्याच्या दृष्टीने  कोणतीच  व्यक्ती/ संघटना  १०० टक्के अचूक असत नाही.        

वैयक्तिक  दृष्ट्या मला स्वा. सावरकरांचे परखड हिंदुत्ववादी विचार पटतात. ज्यात गायीला केवळ उपयुक्त पशु मानलेले आहे. त्यामुळे बीफ खाण्यात मला काही गैर वाटत नाही आणि गोमूत्राला मी मुळीच पवित्र मानत नाही.

पण म्हणून पुराणमतवादी हिंदू लोकांचा मी असा द्वेष करत नाही.      


In reply to by सुबोध खरे

हिंदू महासभा समाजसेवेसाठी काम करत नसे तर रा स्व संघांच्या संलग्न संस्था बऱ्याच समाजसेवेच्या क्षेत्रात आहेत. 

स्थापना आणि प्रायोरिटी बघितल्या तर महासभेचा कार्यकारणभाव लक्षात येतो खरे साहेब. म्हणजे जर स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही महासभा अस्तित्वात असती तर त्यांनी सामाजिक कार्य केलेच नसते असे सांगता येणार नाही ना ! बरं ऐतिहासिक उदाहरणे , सावरकरांचे - काळाराम मंदिर आंदोलनाला पाठिंबा देणे, जातीपाती विरहित समूहभोजन कार्यक्रम, रत्नागिरी मंदिर बांधणे, महाड सत्याग्रहाला आंदोलन इत्यादी पाहता वाटचाल तसली होतीच हे म्हणायला प्रचंड वाव आहे. 

 

रा स्व संघ अजूनही झापडबंद विचारसरणीने चालतो तरीही त्यांचा मूळ हेतू चांगलाच आहे. 

 

मूळ हेतू मध्ये जर आपत्ती व्यवस्थापन, वनवासी कल्याण इत्यादी असेल तर नाही म्हणायला मी मूर्ख नाही पण राजकीय फ्रंट वर संघ प्रॉपर पो टाकतोय, राममंदिर आंदोलन सफल झाल्यावर आता ह्यापुढे आम्ही असले आंदोलन करणार नाही असे परस्पर जाहीर करणे, म्हणजे काशी विश्वेश्वर अन् मथुरा सोडणार ?, नको तिथे लवचिकता नको तिथे हात पुढे करायची वृत्ती, वनवासी कल्याण + शिक्षा भारती मधे इतके हाय स्टेक लागलेले असताना सुद्धा शिक्षणाचा हक्क कायदा (आर टी आय) मध्ये हिंदू/ बहुसंख्यक शाळा वाऱ्यावर सोडणे/ त्याच्याविरोधात आवाज न उठवणे असे कैक मुद्दे पाहता जर मला ते मूळ हेतू पासून ढळलेले वाटले तर मला किमान तसे वाटण्याचा हक्क आहे की नाही तितके सांगा पाहू ?

 

 बाकी तुमचे न भरती केलेले जे.सी.ओ./एन.सी. ओ. मंडळ पक्षी गुरुजी अन् राजो ह्यांना मी सिरीयसली घेत नाही. 😂😂😂😂

 

(मुद्द्यास मुद्दा व्यक्तिगत न होता) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

मला किमान तसे वाटण्याचा हक्क आहे की नाही तितके सांगा पाहू ?

 

तुम्हाला राहुल गांधी हेच पंतप्रधान व्हावे आणि मल्लिकार्जुन खर्गे राष्ट्रपती असे वाटण्याचा १००  टक्के हक्क आहे.

किंवा

रा स्व संघाने संपूर्ण भारतात शरिया लागू करण्यासाठी प्रयत्न करावे  असेही वाटण्याचा १०० % हक्क आहे     

हा का ना का 


In reply to by सुबोध खरे

आले का पहिले पाढे पंचावन्न ? संघावर किंवा त्यांच्या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करण्याचा हक्क म्हणजे राहुल गांधी पंतप्रधान आणि खरगे राष्ट्रपती व्हायची ईच्छा इतपत बाळबोध मांडणी तुम्ही करताय ह्याचेच नवल वाटते मला , का उठल्या सुटल्या हमरीतुमरीवर येणे स्थायीभाव आहे तुमचा ? 

उगाच काहीतरी डोक्यावर पडल्यासारखे प्रतिवाद करत बसता साहेब तुम्ही. अतिशय साधी मांडणी आहे, एक हिंदू म्हणून मला संघाच्या हिंदुत्वाला प्रश्नांकित करण्याचा हक्क नाही का ? 

(आता ह्यावर मुसलमान शरिया प्रश्न इत्यादी वर जाऊ नये ही नम्र विनंती, दोन हिंदूंमध्ये हिंदू फर्स्ट संकल्पनेवर बोलतो आहे मी इतपत समजण्या लायक तुमची बुद्धी स्थिर असेल ही शेवटची अपेक्षा)

 

(फेसपाम ईमोजी) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

नको तिथे लवचिकता नको तिथे हात पुढे करायची वृत्ती, वनवासी कल्याण + शिक्षा भारती मधे इतके हाय स्टेक लागलेले असताना सुद्धा शिक्षणाचा हक्क कायदा (आर टी आय) मध्ये हिंदू/ बहुसंख्यक शाळा वाऱ्यावर सोडणे/ त्याच्याविरोधात आवाज न उठवणे असे कैक मुद्दे पाहता जर मला ते मूळ हेतू पासून ढळलेले वाटले तर मला किमान तसे वाटण्याचा हक्क आहे की नाही तितके सांगा पाहू ?

 

सहमत आहे. 👍️


 

भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय ? हा विषय होता का ? ? 

अरे वा!! चान चान. चालू द्या...  


In reply to by नावातकायआहे


भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय ? 

 

हिंदूंच्या सध्या फारशा गंभीर नसलेल्या समस्या खूपच आहेत यावर मस्त चर्चा करण्याची संधी मिळणे. 

बाकी कुणीही हुंडाबळी, सासरच्यांकडून सुनेला/माहेरच्यांना हिणवून त्यांचा मनोभंग करत रहाणे या सध्या तरी अस्तित्वात असलेल्या प्रथांविषयी (भले त्यांना धार्मिक, संवैधानिक अधिष्टान नसो) याबद्दल बोलत नाही हे नोंद घेण्यासारखे आहे. 

 

बाकी चालू द्या.