Skip to main content

भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय ?

लेखक गामा पैलवान यांनी शनिवार, 15/08/2026 02:56 या दिवशी प्रकाशित केले.

लोकहो,

भारताला दिनांक १५ ऑगस्ट १९४७ इंग्रजांच्या शासनापासून स्वातंत्र्य मिळालं. तर हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याविषयी माझ्या मनांत थोडाबहुत संभ्रम आहे. या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हा लेख लिहितो आहे. स्वातंत्र्यासोबत फाळणीही झाली. त्यामुळे तिचा विचारही आपोआप होणार. तर मुद्द्याला हात घालूया.

तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान क्लेमेंट अ‍ॅटलींनी २० फेब्रुवारी १९४७ साली ब्रिटीश संसदेत जाहीर केलं की ०३ जून १९४८ पर्यंत ब्रिटीश इंडियास पूर्णपणे स्वयंशासित करणार. अर्थात, या तारखेपश्चात ब्रिटीश संसदेचा कोणताही कायदा भारतास लागू होणार नाही. या घोषणेस सत्तांतराची घोषणा म्हणतात. १६ जुलै १९४७ रोजी या मसुद्याचं कायद्यात रुपांतर झालं. त्याच वेळेस भारताची फाळणी करायचं ठरलं. तर प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या खंडप्राय देशाची फाळणी फक्त ११ महिन्यांत ( जुलै १९४७ ते जून १९४८ ) कशी करायची? आणि भरीस भर म्हणून सत्तांतराचा दिवस जून १९४८ च्या तब्बल १० महिने आधी म्हणजे १४ व १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत मागे खेचला. म्हणजे फाळणीसाठी अवघा दीड महिनाच उरला होता. ही घिसाडघाई का?

सत्तांतराच्या पश्चात दोन अंमलशाह्या ( = dominions ) उत्पन्न झाल्या. १४ ऑगस्ट १९४७  रोजी पाकिस्तान व दुसऱ्या दिवशी भारत. ह्या दोन्ही अंमलशाह्या स्वायत्त होत्या. म्हणजे भारत व पाकिस्तानी सरकारे स्वयंशासित असणार आणि त्यांचा प्रमुख ब्रिटनचा राजा केवळ नामधारी असणार. आज घडीस इ.स. २०२६ साली कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व जमेका ( यादी अपूर्ण )  या प्रकारच्या अंमलशाह्या आहेत. आता, हाच दर्जा मिळावा म्हणून पहिल्या महायुद्धाच्या नंतर प्रयत्न सुरू केले होते. १९१६ साली लखनौ करार झाल्यावर हिंदू व मुस्लिमांची तेव्हढ्यापुरती एकजूट झाली. हिंदी लोकांना स्वायत्तता मिळावी म्हणून मुस्लीम लीगने काँग्रेसशी सहकार्य करायचं मान्य केलं. याच कारणासाठी टिळकांनी होमरूल चळवळ ( १९१६ ते १९१८ ) याचसाठी राबवली. टिळक १९२० साली स्वर्गवासी झाले. तोवर गांधी भारतीय राजकारणांत स्थिरावले होते. त्यांनी १९२१ मध्ये असहकार चळवळ पेटवली. ती जर नीट तडीस नेली असती तर अंमलशाही स्वायत्तता तेव्हाच मिळाली असती. मात्र चौरीचौरा येथील पोलिसांच्या हत्यांच्या सबबीखाली गांधींनी चळवळ मागे घेतली. तर मग तांत्रिक दृष्ट्या पाहू जाता १९२१ ते १९४७ या वर्षांत हिंदू जनतेने काय कमावलं, असा प्रश्न पडतो. जर  अंमलशाही स्वायत्तताच मिळवायची होती तर पहिल्या महायुद्धानंतर सर्वात चांगली संधी होती. ती वाया दवडल्यामुले दुसरं महायुद्ध संपेपावेतो वाट बघावी लागली. मग गांधी आणि नेहरू पितापुत्रांच्या राजकारणाचं फलित काय? भारताची फाळणी सोडल्यास दुसरं काही दिसून येत नाही. मात्र यावर चर्चा झालेली आवडेल.

मध्यंतरीच्या काळांत १९२८ साली ( मोतीलाल ) नेहरू रिपोर्ट आला. त्यांतही स्वायत्ततेची मागणी होती. तेव्हा लॉर्ड आयर्विनने अनौपचारिक जाहीरनाम्याद्वारे मधाचं बोट चाटवलं होतं ( इ.स. १९२९ ).  मात्र पुढे फारशी प्रगती झाली नाही. म्हणून गांधींनी सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू केलं ( १९३२).

तर मग स्वातंत्र्य म्हणजे सत्तांतराद्वारे मिळालेली स्वायत्तता असं म्हणावयास पाहिजे. आता यांस स्वातंत्र्य का म्हणायचं? बहुधा १९४८ नंतर ब्रिटीश संसदेचा कोणताही कायदा भारतास लागू होणार नाही अशी नि:संदिग्ध घोषणा झालेली असल्याने या सत्तांतरास स्वातंत्र्य म्हणता यावं. असं माझं आकलन आहे.

सत्तांतर म्हंटलं की आजूनेक प्रश्न उपस्थित होतो. जवाहर नेहरूंना शासनप्रमुख म्हणून कोणी नेमलं? त्यांनी १९४६ साली सरकारात शिरतांना साधा मंत्री म्हणून शपथ घेतली होती. कृपया हे हिंदी चलचित्र ( साडेपाच मिनिटे ) पाहणे : https://www.youtube.com/watch?v=1FobmFy1qM4

१९५२ साली निवडून आल्यावरच नेहरू पंतप्रधान झाले. मग १९४७ ते १९५२ पर्यंत ते कशाच्या आधारावर पंतप्रधान म्हणवले जातात? याच मुद्द्यामुळे फाळणीच्या अधिकृत दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. मी ती अधिकृत का मानावी? तसंच नेहरूंनी कोणत्या आधारे भारतीय सैन्याच्या विजयी आगेकूचीत हस्तक्षेप केला? भारताने काश्मीरच्या प्रश्नी राष्ट्रसंघाचे निरीक्षक मागवले होते, त्याची मागणी नेहरूंनी केली. ती अधिकृत ठरेल का? त्यावरही प्रश्न उपस्थित होतात.

१९४७ च्या सत्तांतरात काही महत्त्वाचे धागे सुटेच लटकंत आहेत.

यांतला एक धागा पटेलांविषयी आहे. त्यांना जर पोलादी पुरुष मानलं जातं, तर त्यांच्या नजरेतनं नेहरूंचा दर्जा कसाकाय निसटला? त्यांनी संस्थानांच्या एकीकरणाचं काम खमकेपणाने केलं. पण हा खमकेपणा गांधींना संरक्षण देण्यात का कमी पडला? इंग्रजांनी भारत एक केला असं म्हंटलं तर १९४७ साली सत्तांतराच्या वेळेस ५५०+ संस्थाने वेगळी का राहिली? इंग्रजांनी भारत एक केला आणि सरदार पटेल लोहपुरूष आहेत ही दोन विधाने परस्परविरोधी आहेत.

असो.

सध्या इतकच लिहून थांबतो. जसजशा गोष्टी आठवतील तसतशा लिहीत जाईन म्हणतो. चर्चा सुरू होऊद्या.

आपला नम्र,
-गामा पैलवान 


वाचने 993
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हलालात कबुलीजबाब प्रकार होता, तसा सती प्रथेत नव्हता! सती ही अफूचे दूध पाजून पाय चितेला खांबाला बांधून मग जाळले जायचे, जिवाच्या आकांताने स्त्री बाहे रायू लागली तर तिला बांबूने पुन्हा आत लोटले जायचे, तिच्या किंकळ्या ऐकू येऊ नये म्हणून ढोल वाजवले जायचे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

हलालात कबुलीजबाब प्रकार होता

हे काय असते, जरा सविस्तर माहिती मिळेल का ?


In reply to by श्वेता व्यास

मला वाटते दोन कारणे असावीत-

१. सतीची प्रथा मुळात होती का, असल्यास किती व्यापक होती वगैरे मुद्दे आता बाजूला ठेऊ. निदान काही ठिकाणी तरी सतीच्या नावाने हत्या करायचे प्रकार निश्चितपणे झाले होते असे म्हणायला जागा आहे. तो क्रूरपणा होता आणि तो संपवायला हवा होता यात कोणतेही दुमत नसावे. त्या प्रकाराविरोधात हिंदू समाजातील सुधारकांनीच आवाज उठवला होता. तसा आवाज आस्मानी पुस्तक आदर्श मानणाऱ्या समाजातील कोणी तिकडच्या अनिष्ट प्रथांविरोधात उठवला होता असे वाटत नाही. त्या समाजात मुळात सुधारक किती प्रमाणात होते हा पण प्रश्नच आहे.

२. सती जायच्या घटना उघड्यावर होत असल्याने कोणालाही- अगदी इंग्रजांनाही दिसत असाव्यात. त्याउलट हलाला, खतना वगैरे प्रकार चार भिंतीआड होत असल्याने सहजपणे ते प्रकार दिसणे अशक्य होते. त्यामुळे इंग्रजांनाही सती मधील अमानुषता जितकी समजली तितकी अस्मानी पुस्तक पाळणाऱ्या समाजातील अनिष्ट प्रथांमधील अमानुषता समजली नसावी.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

त्या प्रकाराविरोधात हिंदू समाजातील सुधारकांनीच आवाज उठवला होता.

सुधारणा आपल्याला हव्या होत्या म्हणून झाल्या, इंग्रजांना हव्या होत्या म्हणून नाही. हेच अधोरेखित करायचं होतं.


In reply to by श्वेता व्यास

सुधारणेला “आपण” भरपूर विरोध केला होता, धर्मसभेने हा हिंदूंचा अंतर्गत प्रश्न आहे असे म्हटले पण इंग्रजानी ऐकले नाही, सिंधचे ब्राह्मणही आमची प्रथा आहे म्हणून टाहो फोडत इंग्रजाकडे गेले होते, पण माझ्या देशाची प्रथा जोवंत जाळनार्या व्यक्तीला फाशी देणे अशी आहे, तुम्ही तुमची प्रथा पाळा मी माझी पाळतो असे त्याने सांगितले नी नंतर कुणी त्यांच्याशी वाद घातला नाही. 


In reply to by अप्पा जोगळेकर

ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८१५ ते १८२८ या १४ वर्षांत बंगाल प्रेसिडेन्सीत एकूण ८,१३५ सतींची नोंद केली (सरासरी दरवर्षी ३७८ ते ८३९), त्यापैकी ७५% सती एकट्या बंगालमध्येच झाल्या. वयाचा विचार करता, इ.स. १८२३ मधील ५७५ सतींपैकी २४० महिला ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या.

इ.स. १८२३ मध्ये बंगालमध्ये झालेल्या ५७५ सतींची नोंद पाहता:
३२ बायका २० वर्षांखालील होत्या.
२०८ बायका २० ते ३० वयोगटातील होत्या.
उर्वरित ३३५ बायका ३० वर्षांपेक्षा मोठ्या होत्या.
कारण: कुलीन ब्राह्मणांमधील बहुपत्नीत्व प्रथा आणि लहान वयातील बालविवाह यामुळे अनेक स्त्रिया लवकर विधवा होत असत

जातीच्या बाबतीत, ब्राह्मण व राजपूत यांचे प्रमाण सर्वाधिक होते, तर सामाजिक-आर्थिक स्तरात मध्यमवर्गीय जमीनदार वर्गातील विधवांच्या मालमत्तेच्या हक्कामुळेही ही प्रथा टिकून होती. ही आकडेवारी बंगाल गॅझेट्स, बिनॉय भुषण रॉय यांचे 'Socioeconomic impact of Sati in Bengal', डी. सुब्रमण्यम रेड्डी यांचे 'Social and Cultural Awakening in India' तसेच विकिपीडियावरील 'Sati (practice)' या लेखात तपशिलाने वाचायला मिळेल.


In reply to by अप्पा जोगळेकर

स्वातंत्र्योत्तर भारतात १९४७ ते १९८७ दरम्यान अधिकृतपणे सुमारे ४० सतीप्रकरणांची नोंद आहे, त्यापैकी एकट्या राजस्थानात २९ घटना घडल्या. या काळातील पहिली नोंदलेली घटना १९७९ मध्ये उत्तर प्रदेशातील बंदा जिल्ह्यात जावित्री तिवारी हिची होती. त्यानंतर सोना कंवर (१९८१, राजस्थान, वय ६२), वैजयंत्री (वय २०), जानकरानी (२००२, मध्य प्रदेश, वय ४०) आणि लालमती वर्मा (२००८, छत्तीसगढ, वय ७५) या घटना घडल्या. मात्र, या सर्वांपेक्षा सर्वाधिक चर्चित आणि केंद्र सरकारला कठोर कायदा करण्यास भाग पाडणारी घटना म्हणजे ४ सप्टेंबर १९८७ रोजी राजस्थानातील देवराला गावात घडलेली १८ वर्षीय रूप कंवर हिची सती होती. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला तिच्या पतीच्या जळत्या चितेवर बसवण्यात आले; ती विवाहित वस्त्रे परिधान करून होती आणि हजारो लोकांनी हा प्रकार पाहिला. या घटनेनंतर देशभर मोठा आक्रोश झाला. याचा परिणाम म्हणून सरकारने 'सती (प्रतिबंध) अधिनियम, १९८७' लागू केला. या नवीन कायद्याने केवळ सती करणेच नव्हे, तर तिचा 'महिमा गायन' (ग्लोरिफिकेशन) करणेही प्रथमच गुन्हा ठरवले. रूप कंवर ही भारतातील शेवटची नोंदलेली सती मानली जाते; तथापि, अधिकृत आकडेवारीनुसार १९८७ नंतर कोणतीही यशस्वी सती झाली नसली, तरीही २००८ मध्ये छत्तीसगढमध्ये लालमती वर्माचा मृत्यू ही शेवटची घटना मानली जाते.


प्रथा किंवा परंपरा यांचे उत्तम उदाहरण म्हणजे कुंभमेळा शेकडो वर्षे प्रत्येक ३ वर्षांनंतर ठरलेल्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. यादृष्टीने सती ही परंपरा किंवा प्रथा नाही. 

 

सती ही घृणास्पद प्रथा भारतात कशी होती यावर प्रचंड टीका करणारा मुग्धा कर्णिकचा लेख पाहिला. त्यामुळे भारतात सती ही परंपरा किंवा प्रथा नसून काही अपवादात्मक घटनांचा बागुलबुवा केला आहे हे नक्की झाले.


In reply to by श्रीगुरुजी

त्या लेखाचा दुवा कृपया द्यावा. 

बाकी सती प्रथा भारतात सर्वत्र होती, दक्षिणेतील अनेक राजस्त्रिय सती गेल्या होत्या, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई तसेच माधवराव पेशव्यांच्या पत्नी सती गेल्या होत्या, महाराणा रणजितसिंह ह्यांच्याही पत्नी सती गेल्या होत्या. बंगालात ब्रिटिश सत्ता असल्याने त्यांनी व्यवस्थित नोंदणी ठेवली, इतर ठिकाणी व्यवस्थेचा अभाव असल्याने सती गेलेल्यांची नोंद झाली नाही. स्वतंत्र भारतातही बऱ्याच सती गेल्या. 

१९८७ ला राजस्थानच्या देवराला गावात रूप कण्वर ही अठरा वर्षांची विधवा सती गेली होती, तिला अफूचे दूध पाजण्यात आले होते नी ती बाहेर पळण्याचा प्रयत्न करत होती पण तिला बांबूने परत ढकलण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिल्याचे सांगितले होते.


In reply to by श्रीगुरुजी

 १८१५ ते १८२८ या १४ वर्षांत बंगाल प्रेसिडेन्सीत एकूण ८,१३५ सतींची नोंद केली (सरासरी दरवर्षी ३७८ ते ८३९), त्यापैकी ७५% सती एकट्या बंगालमध्येच झाल्या. वयाचा विचार करता, इ.स. १८२३ मधील ५७५ सतींपैकी २४० महिला ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. आता ८१३५ स्त्रिया चौदा वर्षात म्हणजे वर्षाकाठी सरासरी ५८१ स्त्रिया म्हणजेच रोज १.५ स्त्रिया. 

 

आणि हो आता मूळ मुद्दा : 

स्त्री म्हणजे भाजीपाला/ बकरी कोंबडी नाही ना हो ८१३५ आणि सरासरी १.५ मांडून मोकळे व्हायला. अतिशय क्लेशातून जाऊनही हा प्रतिसाद लिहितो आहे कारण आकडेवारी रक्ताळलेली असली तरी आरसा दाखवते. अर्थात ८१३५ स्त्रिया काय किंवा अगदी एकटी एक स्त्री म्हणा काय ? भयावह आहे हे किमान भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या कुठल्याही सामान्य माणसाला माझ्यासारख्या.

 

 तरीही, 

रोज जवळपास २ स्त्रिया जाळल्या जात ते पण १४ वर्षे ह्या फॅक्ट नंतर सुद्धा आपला स्टँड सती प्रथाच नव्हती असा असेल तर माझी लेखनसीमा आणि हात जोडून निरोप ह्या विषयावर. 

 

(अंतर्मुख चाबरा) खोंडे


In reply to by झालमुरी

हा एक अतिशय अश्लाघ्य, अश्लील व सभ्य सभेत व्यत्यय आणणारा प्रतिसाद असून तो तडक उडवून संबंधित सभासदांना कडक समज देऊन ती पण त्यांना न समजल्यास त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी ही नम्र विनंती. 

 

(संसदीय कार्यमंत्री मिसळपाव सरकार) 

किरेन खोंडिज्जू


गामांनी काडी टाकून विरेचक दिले आहे,.,, अनेकांची पोटे ढवळून येत साफ होत आहेत... 

 

चांगले आहे.. आरोग्यं धनसंपदा !! 


In reply to by राज जोशी

मिसळपाववरच इतरत्र उजव्या इतिहासकारांची काही व्यवच्छेदक लक्षणे मांडली होती. 

त्याला सप्रमाण लाईव्ह विदा तुमच्या प्रतिसादातून मिळणे हे आमचे भाग्यच. 

 

(भारावून गेलेला पीएसपीओ) पंखा खोंडे