Skip to main content

चालू घडामोडी ऑगस्ट २०२६

लेखक अभ्या.. यांनी रविवार, 02/08/2026 18:40 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी,

सध्या सौजन्याचा राष्ट्रीय सप्ताह चालू आहे,

शिव्या देणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या किळसवाण्या (सौ.चंसुकु) झुरळांना मा. पंतप्रधानांनी विशाल हृदयाने वैयक्तिकरित्या माफ केले आहे.

अर्थात हिस्ट्रीशीटर वगैरे जे कुणी आहेत त्यांच्यावर खटले झालेच पाहिजेत. त्यांना त्यांच्या कृत्याची न्यायालय देईल ती शिक्षा मिळालीच पाहिजे. जनतेलाही कळले पाहिजे हे कोण कुरापतखोर लोक आहेत. त्यांना माफ करायचे का नाही हेही जनतेला वैयक्तिकरित्या ठरवता येईल. 

ह्याच पावन सप्ताहात मीही काही लोकांना आणि त्यांच्या कृत्यांना माफ करावे म्हणतो.

एकेकाळी तत्कालीन शिक्षणमंत्र्याच्या पत्रकारपरिषदेत गोंधळ घालून शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विद्यार्थी संघटनेचा अल्पसा भाग म्हणून तत्कालीन पोलीसांनी माझे नाव गाव पत्ता लिहून घेतला होता. थोड्याच दिवसांनी काहिसा तत्कालीन राष्ट्रपतींचा वगैरे दौरा आमच्या भागात होता. तेंव्हा आदल्याच दिवशी रात्री उशीरा वडिलांच्या ओळखीचा एक डीबी(आम्ही साध्या वेशातल्या पोलीसांना म्हणायचो) बुलेट घेऊन घरी आला. साहेब तुमच्या मुलाला उठवा म्हणला. वडीलांशी त्याचे काय बोलणे झाले माहित नाही पण वडिलांनी सांगितले त्याच्यासोबत जा, रात्री राहा, सकाळी मी येतो, काही काळजी करु नकोस. त्याने मला बुलेटवरुन पोलीस स्थानकात नेले. बाहेरुनच हात करुन एका वरिष्ठाला इशारा करुन तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझ्या घरासारखेच साधे घर होते, एक माझ्यापेक्षा जरा लहान मुलगा होता त्याचा. तेथेच अंथरुण पांघरुण देऊन झोपायची सोय केली. सकाळी उठून चहा पाजून मला पोलीस स्थानकात घेऊन गेला. तेथे संघटनेतले इतर मित्रही आलेले होते. नाव गाव पत्याची पुन्हा उजळणी झाली. विद्यार्थी संघटनेतले माझे पद विचारले. मी थाटात कार्यालय मंत्री म्हणून सांगितले. दुसरा एक शहर मंत्री होता. ऐकून आक्खे पोलीस स्थानक गदागदा हसले. डोक्यात रागाची तिडिक गेलेली. थोड्या वेळांने नाष्टा दिला, जरा उन्ह वाढले, व्हीआयपी दौराही बहुधा संपला होता. त्या पोलीसांने मला बुलेटवर घरी सोडले. वडीलांशी बोलला. जाताना मला म्हणला "मंत्री वगैरे वेगळे लोक असतात बाबा, आपण साधे लोक, अभ्यास कर सुखाने राहा"

तेंव्हा ऐकलं नाही पण....

आज मी मला, त्या पोलिसाला, पोलीस ठाण्यातल्या सगळ्यांनाच माफ केलं वैयक्तिक रित्या.

असो....

 


वाचने 3308
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by रामचंद्र

हो, वाण आहे, गुण नाही लागला...

ह्यालाच वास्तागुणहैय्या म्हणतात म्हणे जेन झी...


म्हणजे ते रेकॉर्ड वर येऊन सुद्धा तुम्ही जर्मनी पर्यंत पोचले ? विजा घेऊन ? कमाल आहे ह्या  सरकारची तुमच्यासारख्या गुन्हेगार प्रवृत्तींना कसे मोकाट सोडले आहे कळेना ! . 

 

 

आमच्यासोबत असला किस्सा झाला होता २०११ साली, गावातच नवरात्रीच्या वेळी झाली दंगल ! 

त्यात मूळ मुद्दे अन् कारणे उरली बाजूला, कर्फ्यु लागला जमावबंदी झाली मध्ये ४० फुटांचा (प्रॅक्टिकली कागदोपत्री ९०) रस्ता एकीकडे हिंदू वस्ती एकीकडे मुसलमान वस्ती. मधला रस्ता म्हणजेच आमची पायदळी तुडविली जाणारी लोकशाही ! 

दंगली सुरू झाल्या तेव्हा मी घरी बसून नाश्ता करत होतो , लगेच आठवण आली ती आमच्या रहमान भाईंची, त्याला म्हणले ये मधल्या रस्त्यावर, आपण पण दंगलीची मौज करू. 

आला की भाई दोस्तीच्या जिगर वर, त्यो तिकडून अल्लाह हु अकबर सुरू अन् मी इकडून जय श्रीराम, वाटले चार पाच घोषणा देऊन चालले जाऊन घरी. 

पण गावात एस आर पी लागलेली कोणाला ठाऊक तिच्यायला ! आले की दंगल नियंत्रण + एस आर पी मामा लोक एकत्र वरात घेऊन. त्या दुक्कलीने एकाने उजवीकडून अन् एकाने डावीकडून काढला की पट्टा पाठीवर कच्चकन ! दोन सेकंदासाठी श्वास वरचा वर खालचा खाली ! अन् त्यानंतर डायरेक्ट हुंदका ! रहमान अन् माझ्या पाठीवर डायरेक्ट काळे निळे जांभळे इंग्रजी कॅपिटल X चे चिन्ह नक्षी सारखे स्थापन ! 

परत आलो घरी अन् नंतर १५ दिवस शर्ट काढला नाही घरात वण पाहता घरच्यांनी अजून वण देण्याची शक्यता होती म्हणून ! थोरल्या बहिणीला फक्त माहिती होते तिनेच रोज तेल हळद लावली होती वणावर त्या चरचरत्या. 

माझ्या पाठीवरची नक्षी हळूहळू विरत होती पण जवळपास ८ दिवसांनी पंचनामे सुरू झाले तेव्हा पर्यंत होती, एक दिवस आले मामा जीपची वरात घेऊन दरात, वडिलांना म्हणाले खोंडे काका पोराला घेऊन जातो आहे अमुक अमुक ओळख परेड आहे. 

पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या दीड शहाण्यांच्या रांगेत मी पण उभारलो ! अर्थातच आपले काही घेणे देणे नव्हते. तिथं भजी उडवत बसलो होतो ठाणे अंमलदारांच्या सोबत कारण त्यांचा पोरगा माझा मित्र होता, घरी येऊन जाऊन. 

त्यांनी विचारले वण आहेत का अंगावर मी हळूच बोललो आहेत दोन, तसे मला दाखव म्हणले, मी मोबाईल मधला फोटो दाखवला तसे म्हणाले बरे आहे. पंचनाम्याच्या माझे नाव अन् रेकॉर्ड असलेल्या पानाची एक झेरॉक्स आणून दिली त्यांनीच म्हणाले तहसीलदार कचेरीत जा, हा कागद दाखव, एक डॉक्टर पाठीवर वण आहे का बघेल त्याला दाखव, मला संध्याकाळी १०० रुपये दे ! पैसे कसले ते मला कळेना. 

कचेरीत गेलो तर मियाभाई गँग अन् आमची पोरे एकत्र बसून खिदळत होती. तेव्हा कळले वण उमटता सरकार २५० रुपये एका रट्ट्याचे देते, माझे पाचशे होत होते, खुषीत शर्ट काढून डॉक्टरला दाखवला, त्याने सही केली कागदावर, पुढे मामलेदार कचेरीत ५० अन् संध्याकाळी अंमलदार काकांना १०० देता पण ३५० रुपयांची घसघशीत रक्कम हाती उरली !

 

त्यानंतर ग्रॅज्युएट झालो, पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षण घेतले, सॉफेस्टिकेटेड जनतेत बसायला लागलो ! क्यूबिकल अन् कॉन्फरन्स रूम मधील जनतेचा गावांढळपणा आत्मसात केला, काही वर्षे तिथे बसून गावातल्या गावांढळपणाला माफक शिव्या घातल्या ! मी कर देतो मी लैच मोठा हा माज पण करून बघितला ! शेवटी कळले पळसाला पाने तीनच असतात, कुठेच काही अडलेले नाही.


In reply to by अभ्या..

आलेले अनुभव एक बारकी पुरचुंडी करून बाळगायचे सोबत, आदानप्रदान करायला बरे असतात आता उगाच कोणी मेरे मुर्गे की एक ही टांग टाईप आढ्य असला तर फटकावून जागेवर आणायला पण कामी येते. एकंदरीत मी "sexist किंवा मेल chauvenist" नाही तरीही बाप्या माणसाने पोरगा ते मर्द प्रवास करताना आयुष्यात एकदा तरी मार्केटिंग मधले शिक्षण अन् नोकरी पत्करावीच किंवा व्यवसाय करून पहावा. जग बुडावर लाथ घालते अन् लैच भारी धडे देते जागतिक ओपन युनिव्हर्सिटी मधे 😇😇🙏🏾🙏🏾 


इतकी दहशत??

.

ईतकं घाबरायचं मुद्द्यांना???

.

बोर्डावर नाही, फळ्यावर नाही...

फारच शिंगावर घेतले दिसते वृषभाने?

का कामात सूुट्टी मारून शाळेभोवती फिरायची मोशा पोॉलीसी ?


फेक - https://www.reddit.com/r/unitedstatesofindia/comments/1vdaeyh/godi_news_channel_aaj_tak_bring_fake_cjp/

"सी.जे.पी" आद्याक्षरे असलेल्या दुसऱ्याच पार्टीचा माणूस चर्चेत बोलावला- आता त्याच्या नावे वाट्टेल ते बोलवून घ्या, आणि  सी.जे.पी ला बोल लावा.

हाय काय नि नाय काय.

हे असले सगळे उद्योग करतात म्हणून लोकं वैतागले आहेत.

चाटुगिरीची हद्द पार करा. 


Cjp चे लोक सांगत आहेत की pm care फंडाचे ऑडिट व्हावे नी होशेब दाखवला जावा, भाजपच्र लोक ऑडिट आणी नहिशेब का दाखवत नाहीयेत pm केर फंड चा? जर काहीही भ्रष्टाचार नसेल तर घाबरायचे काय कारण?


धागा काढत जा रे प्रत्येक महिन्याला येत जाईन धाग्यावर...
ते श्रावण भाद्रपदवाल्याना जाऊ दे तिकडे..... =)) 

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रावण भाद्रपदवाल्याना

.

काय सर... आमच्या एका ईंग्रजीच्या शिंदे सरांची आठवण आणली बघा तुम्ही.

शेक्स्पिअर, कीट्स, बायरन, शेली च्या कविता सांगायचे आणि म्हणायचे "हे खरे प्रेम, नाहीतर आजकाल स्गळीकडे श्रावण भाद्रपदात येणारे प्रेम म्हणजे डॉग लव्ह आहे नुसते"

हे इतक्या वेळेला त्यानी वदवून घेतले होते की आज झटकन आठवण आली.


In reply to by कंजूस

मागे घेतलेली ही रिक्षाच का बरे?

सोपे आहे. रिक्षालाच फक्त रिव्हर्स गिअरचे दांडके वेगळे असते. त्याचा स्पीड आणि न्युट्रल गिअर शी संबध नसतो.

ट्रम्पुल्याचे तसेच आहे. त्याचे पळवायचे आणि मागे घ्यायचे गिअर आणि कारणे वेगवेगळे असतात.


In reply to by अभ्या..

इथे रिक्षा सुद्धा नाही हो. हाती लाटणे दिले आहे, ते हातांत घेऊन मंडळी "फुर्रर बूम बूम" करत आहेत. 


निवडणूक आयोग, एकनाथ शिंदे आणि उध्धव ठाकरे ह्यांच्यात केस चालुय ना खंडपीठापुढे?

काही अपडेटस? 

ॲड. कपिल सिब्बलांचे युक्तीवाद जोरात चालू आहेत म्हणे..


In reply to by अभ्या..

जगाला माहिती आहे की शिवसेना पक्ष कोणाचा आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे हे मान्य करायला मात्र मा. न्यायालयाला जमणार नाही. मा.न्यायालय असे म्हणेल असे वाटते की, सर्व घडामोडी पाहता आणि प्रथमदर्शनी पाहता पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे यांचा शिवसेना पक्ष वाटतो पण, निवडणूक आयोग आणि गुवाहाटी ट्रीपचे सगळे मापदंड पाहता, निवडणूक आयोगाने घेतलेलाच निर्णय योग्य आहे, असे मा. न्यायालय म्हणून शकते,  सद्य युक्तीवाद पाहता असे माझे मत आहे. 

शिवसेना हा पक्ष उद्धवजी ठाकरे यांचा आहे आणि फितूर आमदार हे अपात्र आहेत, असा काही धाडसी निर्णण होणार नाही,  यात मला मात्र काहीही शंका नाही. 

 

-दिलीप बिरुटे 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या जी कलमे लागू आहेत त्यावर युक्तिवाद सुरू आहे.

तांत्रिक बाबींवरच चर्चा आणि मतं मांडणे सुरू आहे. पक्षाच्या अंतर्गत सभेला गैरहजर राहिले तर पक्षातून बडतर्फी करता येते का हाच मुद्दा आहे. न्यायालयच ठरवेल.

पुढे कधीतरी असा कायदा आणावा की पक्षबदल...नाहीच आणि करायचा असेल आणि वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवायची असेल तर. निवडणुक मतदान संपल्यावर पक्षबदल करू इच्छिणाऱ्या सभासदांनी निकाल जाहीर होईपर्यंत आपले अर्ज सदन अध्यक्ष किंवा पक्ष अध्यक्षांकडे द्यावेत.. सोडचिठी. आणि त्यांची उमेदवारी पूर्ण धरण्यात यावी. कारण निवडणूका या कार्यकाल संपण्याअगोदर होतात. आणि नवीन निर्वाचित सरकाराकडे असत्ता सोपवण्यात येते.

पक्षातून बाहेर पडण्याचा मार्गही मोकळा ठेवावा पण त्याचबरोबर मतदान अधिकारही काढून घ्यावा. नाहीतर गोंधळ होईल आणि वचक राहील.


राहुल गांधी यांच्या नंतर सतत हरण्याची परंपरा पुढे चालू ठेवण्यात कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्यात चुरशीची लढत आहे.

बाकी सर्वोच्च न्यायालयाने पुढची तारीख पुढच्या आठवड्यात दिलेली आहे.    


In reply to by सुबोध खरे

तुमच्या तोंडात साखर (डायबेटीस नसावा बहुधा)

बाकी बरं असतं ह्या वकील लोकांचं.

हरलं तरी फी चे पैसे कुठे जात नाहीत. 

पोरांच्या केसेस लढवायला एक करोड दिले म्हणे.

 


कपिल सिब्बल  एका सुनावणीचे १५ ते २५ लाख रुपये घेतात.

Senior advocate and politician Kapil Sibal generally charges between ₹15 lakh and ₹25 lakh per appearance or hearing in the Supreme Court of India, with some high-profile or complex outstation matters scaling higher. His fees vary based on the nature of the case, the court, and professional legal opinions.

जिंकले तर माझ्या मुळे. तुमची केस फार कठीण होती पण मी सुरुवातीपासूनच जोर लावला होता.    

हरला तर तुमच्या केस मध्ये तसा काही दम नव्हता किंवा तुम्ही पुरेसे सज्जड पुरावे दिलेले नव्हते किंवा न्यायाधीशांनी सुरुवातीपासूनच  विरोधी पवित्र घेतला होता.  

कोणी जिंको किंवा हिरो आमचा मीटर चालूच    


In reply to by सुबोध खरे

कुठला डॉक्टर पेशंट बरा झाला नाही म्हणून घेतलेले बील परत देतो? 

प्रत्येक केसमध्ये एक वकील हारतोच म्हणून त्याने त्याची फी कमी का घ्यावी ? 

एक कोटी दिलेत सिब्बलनी  हे सहन झालेले दिसत नाही.

 

 


In reply to by आग्या१९९०

आग्या  नाना,

आपली जळजळ समजली. 

इथे कपिल सिब्बल यांनी घेतलेल्या पैशाबद्दल माझे मुळीच काही म्हणणे नाही. त्यांच्या हरण्याच्या  परंपरेबद्दल सुद्धा माझे काही म्हणणे नाही. 

सध्या ते श्री उद्धव ठाकरे यांची केस लढवत आहेत. ती सुद्धा बहुधा हरतीलच. पण चुकून माकून जिंकले तर हरण्याची परंपरा थोडीशी खंडित होईल.      

केवळ वकीलाच्या फी बद्दल  सामान्य माणसांना माहिती व्हावी म्हणून लिहिलेले आहे.    

श्री राम जेठमलानी यांनी केजरिवाल याना केवळ एका सुनावणीचे २१ लाख रुपये बिल पाठवल्यावर त्यांना घाम फुटला होता.  

बाकी डॉक्टरांच्या आणि वकिलांच्या मूलभूत व्यवसायात फरक असतो.    वकिलीत एक बाजू जिंकली तर दुसरी बाजू हरते. 

डॉक्टर नियती/ रोगा विरुद्ध लढत असतात. दुसऱ्या माणसा/ व्यावसायिक विरुद्ध नव्हे.

तेवढं तुम्ही समजून घेतलात तरी पुरे

अन्यथा तुमचं चालू द्या    

 


In reply to by सुबोध खरे

केवळ वकीलाच्या फी बद्दल  सामान्य माणसांना माहिती व्हावी म्हणून लिहिलेले आहे.    

इतक्या अमूल्य माहितीचे आम्ही करावे तरी काय ? आयुष्यात कोर्ट म्हणून बघितले ते एकदा फक्त लायसेन्स (आमच्याच गाढवपणामुळे) जप्त झालेले तेव्हा. टिपिकल जॉली एल.एल.बी. सारखी रूम त्यात जज साहेब, फक्त विचारले गुन्हा कबूल आहे का ? म्हणले हो, तर म्हणाले, जा ५०० रुपये भरून लायसेन्स घेऊन जा, परत असला गुन्हा करू नकोस, म्हणले ओके. 

 

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ह्या तालमीत तयार झालेली पापभिरू मध्यमवर्गीय माणसे आमच्यासारखी कायच करणार सिब्बल/ सिंघानिया/अरोरा/ओबेरॉय वकिलांच्या फिया समजून उमजून !

 

जेनुइनली विचारतोय बरं, उगाच गैरसमज नको म्हणून caveat टाकतो आहे आगाऊ.


In reply to by वृषभ खोंडे

आमच्या शेजारच्या माणसाने आपले घर विकले आणि ते पैसे एका बिल्डरला मोठे घर घेण्यासाठी दिले. बिल्डरकडे राजकारण्यांचे पैसे होते ते त्यांनी काढून घेतले आता बिल्डर कडे पैसे नाहीत. या माणसाने काय करावे?

आमच्या आजूबाजूला अनेक इमारती पुनर्विकासासाठी गेल्या आणि रखडलेल्या आहेत, त्या माणसांनी काय करावे?

आमच्या आईची  मोतिबिंदूची शल्यक्रिया झाली. ८८ हजार रुपये बिल झाले विमा कंपनीने फक्त ४८ हजारच मंजूर केले. आमच्या वडिलांनी ग्राहक न्यायालयात  खटला दाखल करून हे सर्व पैसे खटल्याच्या खर्चासकट परत मिळवले.

 

"कायद्याबद्दल अज्ञान" हि सबब कुठेही चालत नाही.
          


In reply to by सुबोध खरे

"कायद्याबद्दल अज्ञान" हि सबब कुठेही चालत नाही.

          

असे जर मी कुठेही ध्वनीत झालो असेल तर स्पष्ट करतो मी मला कायद्याचे ज्ञान नाही अशातला भाग नाही. पण वकिलांच्या फिया हे बाळगण्या लायक वर्ग होणाऱ्या कायदेशीर ज्ञानात मोडेल का नाही ह्याबाबतीत मी मजबूत साशंक आहे. 

 

वकिलांच्या फिया, त्यांच्या तऱ्हा, त्यांच्या राजकीय विचारांची दिशा व गती ही माहिती ऍट बेस्ट प्रोफेशनल गॉसिप असेल, पण त्या प्रोफेशनमध्ये नसल्यामुळे मला ती बाळगण्याची गरज वाटली नाही इतकेच.


In reply to by सुबोध खरे

राहुल गांधी यांच्या नंतर सतत हरण्याची परंपरा पुढे चालू ठेवण्यात कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्यात चुरशीची लढत आहे.

केवळ वकीलाच्या फी बद्दल  सामान्य माणसांना माहिती व्हावी म्हणून लिहिलेले आहे.

 तुम्ही त्यांचे PR चे काम करता का? किती घेता हे विचारत नाही. शोले चित्रपटात अमिताभ बच्चन मित्रासाठी हे काम फुकट करत असे त्याची आठवण झाली.

वकिलीत एक बाजू जिंकली तर दुसरी बाजू हरते. 

हे मी माझ्या प्रतिसादात मांडले आहे. अशावेळी तुम्हाला हरणाऱ्या वकीलाकडून काय अपेक्षीत  आहे ?

येथे आमचेच चालणार


In reply to by आग्या१९९०

सतत हरणाऱ्या वकिलाबद्दल आपले काय म्हणणे आहे?  


In reply to by आग्या१९९०

आग्या नाना

माझे प्रतिसाद न वाचताच परत प्रश्न विचारताय.

असो.

उत्तर अगोदरच दिलेले आहे तेच देतो आहे   

 

जिंकले तर माझ्या मुळे. तुमची केस फार कठीण होती पण मी सुरुवातीपासूनच जोर लावला होता.    

हरला तर तुमच्या केस मध्ये तसा काही दम नव्हता किंवा तुम्ही पुरेसे सज्जड पुरावे दिलेले नव्हते किंवा न्यायाधीशांनी सुरुवातीपासूनच  विरोधी पवित्र घेतला होता.  


In reply to by सुबोध खरे

सध्या ते श्री उद्धव ठाकरे यांची केस लढवत आहेत. ती सुद्धा बहुधा हरतीलच. पण चुकून माकून जिंकले तर हरण्याची परंपरा थोडीशी खंडित होईल.      

 तुम्ही तरी काय वेगळे करत आहात ? स्वतःवरच विश्वास नाही.

वकीलाची फी आणि केसचा निकाल हा त्या व्यवसायाचा भाग असतो. खरी पोटदुखी त्यांची फी आहे. त्यावर औषध घ्या. 

 

 


In reply to by आग्या१९९०

खरी पोटदुखी त्यांची फी आहे. त्यावर औषध घ्या. 

 

नसलेली पोटदुखी गृहीत धरून तुम्ही प्रतिसाद देणार असाल त्याला कोणीच काही करू शकत नाही.

खयाली  पुलाव तिखट झाला आणि त्याने तुम्हाला जळजळ झाली तर कोण काय करणार?

तुमचं चालू द्या.    


सुस्पष्ट कायदे कलमं नसतात त्यामुळे खटले रेंगाळतात.

१.एखाद्या पक्षातील दोन चार सभासद पक्षाविरुद्ध वागले की पक्षाध्यक्ष त्यांना बडतर्फ करू शकतो.

२.६६%वर सभासद विरुद्ध गेले की तोच वेगळा गट पक्ष आहे म्हणू शकतो, बडतर्फ होत नाहीत.

३.-- विधीमंडळ पक्ष का राजकीय पक्ष यावर आता वाद चालू आहे.

४. व्हिप नावाचा जो प्रकार आहे तो केव्हा आणि कोण लागू करू शकतो यावरही वाद सुरू आहे.

५. पक्षाच्या खाजगी बैठकीत व्हिप लागू होतो का? वाद सुरू.

६. पक्षातून बाद म्हणजे निवणुकीने झालेली आमदारकीही बाद होते का? वाद सुरू.

७. पक्षाची अंतर्गत संघटना - अध्यक्ष , समिती याची निवडणूक तसेच सभा याची माहिती सदन अध्यक्ष किंवा निवडणूक निर्वाचन आयोग यांना लेखी पाठवली पाहिजे का? आणि ती दिली नसेल तर मान्यता रद्द होते का? किंवा कधी दिली आहे तोपर्यंतचे निर्णयच विचारात घेतले जातात का? 

 

आता हे सर्व मुद्दे घेऊन न्यायालयात बाजू मांडायची असेल तर नामचीन वकीलच कशाला हवेत? कुणा नवीन वकीली परीक्षा पास झालेल्या वकीलासही केस देता येईल.

 


In reply to by कंजूस

face value is case value in court.

अशी म्हण आहे. 

बऱ्याच वेळेस वकिलाच्या एकंदर प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेकडे पाहून न्यायधीश त्यांचे म्हणणे निदान ऐकून घेतात.  

जेंव्हा तुमच्या बऱ्याच गोष्टी पणाला लागलेल्या असतात तेंव्हा नवीन वकिलाला केस देणे हे धोक्याचे ठरते.

माझा सर्वोच्च न्यायालयात खटला चालू होता तेंव्हा दोन महिन्याच्या पूर्ण पगाराएवढी रक्कम मी  एका वरिष्ठ वकिलाला एका सुनावणी साठी अग्रिम देत होतो.

शिवाय ऍडव्होकेट ऑन  रेकॉर्ड याना केवळ  मम्  म्हणण्यासाठी( साधे मीच लिहिलेले शपथ पत्र सर्वोच्च न्यायालयात केवळ सादर करण्यासाठी)  १० दिवसाचा पगार देत असे.  

कारण विरोधी बाजूला अतिरिक्त महाधिवक्ता( ऍडिशनल सॉलिसिटर जनरल)  सरकारची बाजू मांडण्यासाठी उभे होते.  

       


अभिजीत दिपके ह्यांनी मोदीना डिग्री दाखवा/सार्वजनिक करा असे आवाहन केल्यानंतर ह्यावर एकही मोठा भाजप नेता काही बोलला नाही, मोदीनीही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवणे बंद केले, असे का?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

बंद नाही केले.

आज हात्माग दिवस की शुभेच्छा दिल्यात न.

 तव्हामास (GRWM) vdo करा म्हणताहेत. 


In reply to by अभ्या..

च्यायला, मा.पंतप्रधान यांचे खासगी सल्लागार कोण आहेत सध्या ? सगळे पालथे सल्ले दिल्या जात आहेत असे वाटते. रीलचा तर फारच येडपटपणा सुरु आहे असे वाटते. पोरं,  महिला वाटेल ते बोलत आहेत बघवत नाही.  युवकांना रीलच्या माध्यमातून आपलं करुया असे कोणीतरी सुचवले असावे.   मा.पंतप्रधान या पदाची जी गरिमा  वगैरे असते ती आता दुर्दैवाने रसातळाला नेण्यात यांचा  एकमेव अद्वितीय  वाटा राहिला आहे,  आता त्या पदाची इमेज बिल्ट व्हायला पाच पंचवीस वर्ष लागतील असे वाटते. पंतप्रधान पदाचा आपला एक मान सन्मान असतो. देशाचं सर्वोच्च पद आहे, त्याला जपलं पाहिजे, पण सांगेल कोण ?

 

-दिलीप बिरूटे 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

खूप टिंगल होत असल्याने सध्या आऊटसोर्स करून घेत आहेत . अर्धी चड्डीवाला घाबरू ( Z + घेणारे ) जेनझीशी संवाद साधत आहेत.   


In reply to by आग्या१९९०

कुणीही संवाद साधला तरीही उपयोग नाही. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

संवाद साधलेले जेनझी हे अगोदर ब्रेनवॉश केलेली जमात. नावाला तरुण. 


In reply to by आग्या१९९०

प्रयागराज  " छात्रो की गुंज " मध्ये राहूल गांधींनी खऱ्या जेनझीला व्यासपीठावर आणले आणि त्यांनी व्यक्त होताना  "डरो मत "  हे प्रत्यक्ष अमलात आणले. सिस्टीमला " टाटा बाय बाय खतम " करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रथमच राहूल गांधींना पिंक रंगाच्या शर्टमध्ये बघितले. खूप हँडसम दिसत होते.  

  

 


In reply to by आग्या१९९०

राहुल गांधीनी जपलेली फिटनेस वाखाणण्यासारखी आहे, ज्या वयात इतर नेते टकले, ढेरपोटे नी गेंड्यासारखे दिसू लागतात, त्या वयात इतकी उत्तम तब्येत सांभाळणे कौतुकास्पद आहे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यांना आणखीन काम काय आहे ? कुठलीच निवडणूक न जिंकल्याने कॅबिनेट मिटिंग, आंतरराष्ट्रीय प्रवास, वेगवेगळ्या time झोन मध्ये मिटींग्स असले काहीच लागत नाही. त्याशिवाय निर्लज्जम सदा सुखी न्यायाने आणखीन काहीही स्ट्रेस नाही. 


In reply to by साहना

निवडणूक जिंकलेल्यांनी, करदात्यांच्या पैशावर विक्रमी आंतरराष्ट्रीय प्रवास करणारांनी काय दिवे लावलेत ते वाचायला आवडेल?


एकीकडे देशभर विकासासाठी सौरप्रकल्प उभारले जात आहेत, जागोजागी सौरप्रकल्पांना प्रोत्साहन, सबसीडी, सरकारी जागा बळकावून तिथे सौरप्रकल्प उभारणे सुरु आहे, पण देशभर निर्माण होणारी वीज वाहून नेण्याची पुरेशी क्षमताच नसल्यामुळे आणि दिवसा निर्माण होणारी वीज तीला मागणीच नसल्यामुळे सौरप्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज ८१३ कोटी ३० लाख युनीट वीज निर्माण होऊन ती वापरताच आली नाही.  एकीकडे नीव्वळ भविष्यात सौरवीजेवर अवलंबून राहण्याचे स्वप्न पाहत असताना केंद्रसरकारकडे त्याचं निश्चित धोरण आणि नियोजन नसल्यामुळे केवळ पैशांचा घाट आणि सौर उर्जेची वाट अशी स्थिती आहे, उर्जा मंत्रालय आणि सौर उर्जा नवीकरणीय उर्जा असे दोन दोन मंत्रालये असल्यामुळे आणि एकमेकांशी एकमेकांचा अजिबात समन्वय नसल्यामुळे सौरविजेचा घोळ पुढे सुरु राहील. 

लोकांनी घरावर बसवलेले सौरप्लेटा त्यातून निर्माण होणारी वीज इम्पोर्ट आणि एक्सपोर्टॅ याचा असलेला घोळ येणारी वीज बीले पाहून असून अडचण नसून खोळंबा प्रकार आहे. 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सौर ऊर्जेकरता खासगी प्रकल्पांना  गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देताना परताव्याचे  करार आकर्षक केले गेले. आता वहनाच्या कृत्रिम समस्या  निर्माण करून गुंतवणूकदारांना कोंडीत पकडून परताव्यात सोईस्कर बदल केले जातील.  सामान्य ग्राहकांना लुबाडण्यासाठी  स्मार्ट मीटरची जबरदस्ती हा तोच प्रकार आहे. उंट तंबूत घ्यायचा की नाही  हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.  


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकारकडे घेणारे खाते आणि देणारे खाते वेगवेगळे असते आणि त्यांची उभ्या संसारी भेट होत नसते.


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारनियमन म्हणून बोंब मारण्यापेक्षा वापराशिवाय वीज वाया जाते हि समस्या कधीही चांगली. वापराशिवाय वीज जाण्याचे एक कारण म्हणजे  स्मार्ट मीटरिंग नाही. स्मार्ट मीटरिंग केले तर आपोआप विजेची मागणी वाढवू शकतो. आता संपूर्ण ग्रीड इंटेलिजन्ट होत आहे, IES इंडिया एनर्जी स्टॅक मार्फत कुठलीही वीज देशांत कुठेही विकणे शक्य आहे. त्यामुळे वीज वाया जाणार नाही. देशांत भले मोठे AI प्रकल्प सुद्धा येत आहेत त्यामुळे विजेची मागणी वाढत जाणार आहे.

सौर प्रकल्प हे बहुतांशी रिअल इस्टेट स्कॅम आहेत हे मात्र सत्य आहे. 


ज्या इम्रान खानने कर्तारपूर कॅरिडोर चालू करून शीख बांधवाना त्यांच्या धार्मिक स्थळी विना विसा जायची परवानगी दिली त्याच्या नावाने बाजूच्या गल्लीत बोंबाबोंब चाललीय! बोंबला.😝


In reply to by आग्या१९९०

सध्या दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थीनींचा व्हीडीयो आणि आंदोलन बघितले. भाज्या तेथील स्वच्छता गृह सगळं दिव्यच होतं. दोन व्हीडीयो पाहण्यात आले. एक भाज्या निव्वळ पाणी सरकारी वस्तीगृह तेथील भाज्या पोळ्या कायम विषय राहीले आहेत. व्हीडीयोमुळे मुख्यध्यापक आणि जेवण बनविणारे निलंबित केले गेले आणि  आणखी एक व्हीडीयो बघितला,  दोन शाळेतल्या जाणा-या विद्यार्थीनी यांनी खड्ड्याच्या रस्त्याबाबत  केलेले वार्तांकन आणि नंतर, त्या रस्त्याबाबत झालेली कार्यवाही. एकंदर सोशीयल मिडिया आणि दुसरं जेन अल्फा आंदोलन बदल चांगला वाटला. 

लोक विचारतात कॉकरोच आंदोलनाने काय मिळवलं. लोकांमधे एक ताकद बनली की आपण काही केलं तर, बदल होऊ शकतो, काहीच न करणारे, आणि कोणत्याच दबावाला न जुमानणारे सरकार  सरकार झूकू शकते हा संदेश दिला.  आता भविष्यात रील बनवूनच उत्तरं मिळतील की खरंच आपण लोकांना उल्लू  बनवत होतो ती झप्पी आता चालणार नाही, हे लक्षात आलं तरी पुष्कळ आहे. 

-दिलीप बिरुटे


आदरणीय यांनी काल ८० व्या  स्वातंत्र्यादिनानिमित्त शनिवारी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना जे काही मुद्दे सांगितले प्रॉम्प्टरवरुन त्यात सशस्त्र नक्षलवादाचा धोका कमी झाला असला तरी बौद्धिक नक्षली च्या वैचारिक आव्हानापासून सावध राहा असे आवाहन त्यांनी देशवासियांना केले. 
 
बाकी, ते विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, आणि शक्तीची तप्त धारा सॉरी सप्तधारा यावर  त्यांनी आपल दळण टाकलं त्याचबरोबर शेती, तंत्रज्नान, पायाभूत सुविधा, संरक्षण, हरित अर्थव्यवस्था , सॉफ्टपॉवर, वगैरे भर दिला.  

बाय द वे, ते बौद्धिक नक्षली विचार म्हणजे  अंधभक्तांच्या   पुरात  जी वैचारिक लाकडं आडवी येतात ते सर्व बौद्धिक नक्षली आहेत असे असावे असे वाटते.  अडाणी, अंधाळु, गोबाळु, मंदाळु, कोबाळु, अशी सर्व भोपळी जमात यांना घडवायची असल्यामुळे यांना अडथळा आहे तो  बुद्धीनिष्ठ व्यवस्थेचा,  तोच  बौद्धिक नक्षली यांच्या विकासातला अडथळा असावा असे वाटते. 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल प्रियांका गांधी विश्वघाबरूवर चांगलीच कडाडली. ते कायर आहेत असे स्पष्टपणे बोलून दाखवले . आता संसदेत घराणेशाहीचा " घ " म्हणायची विश्वधाबरूची हिम्मत होणार नाही. 

राहूल गांधी द्रष्टे आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. विश्वघाबरू पाच मिनीट टिकणार नाही असे दोन दिवसांपूर्वी भाकीत केले होते.  काल टेलिप्रॉम्टर बंद पडला आणि लगेच प्रत्यय आला. अब्बा डब्बा चब्बा .


In reply to by आग्या१९९०

>>>>  काल टेलिप्रॉम्टर बंद पडला आणि लगेच प्रत्यय आला. अब्बा डब्बा चब्बा .

=)) 

बरं मी म्हणतो, समजा कागद घेऊन वाचला तर काय अडचण असते. 

लैच गोंधळुन गेले बोलता बोलता. कशासाठी करायचं नाटक ? 

-दिलीप बिरूटे 


मोदींच कालच भाषण ऐकलं नाही पण हिथले प्रतिसाद बघता चांगलंच झालं असेल याची खात्री वाटतेय.


In reply to by रात्रीचे चांदणे

मोदींच कालच भाषण ऐकलं नाही >>
पाप लागेल.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

 सोशल मीडियावरून हे भाषण एडिट केले जाईल.  original आहे तोपर्यंत बघता येईल. 


 गंमतच आहे.

मोदी भक्त त्यांची भाषणे ऐकत नाहीत

पण

मोदी रुग्ण मात्र  त्यांची भाषणे आवर्जून ऐकतात असं पाहण्यात येते आहे.

मौज वाटली   


In reply to by सुबोध खरे

हा हा हा... त्यांच्याकडे पहावा असा नेता नसल्यामुळे... ;)


In reply to by सुबोध खरे

मोदी भक्त त्यांची भाषणे ऐकत नाहीत 

मान्य करतो मी थर्ड क्लास भाषणे ऐकतो. 


In reply to by सुबोध खरे

काय आहे, भाट मंडळींना राजाने नक्की काय विधान केले हे ऐकायची गरजच नाही. भाषण संपले कि टाळ्या वाजविणे आणि नंतर प्रत्येक गोष्टीला मास्टरस्ट्रोक म्हणणे हेच काम असल्याने फक्त वरून टाळ्यांचा सिग्नल आला कि झाले. ऐकायची गरज त्यांना आहे ज्यांना मसुदा पाहायचा आहे. 


In reply to by साहना

  तुम्ही ऐकून काय क्रांती करताय?

केवळ मनाची मळमळ ओकण्यापलीकडे?  


In reply to by सुबोध खरे

असं कसं.... विचारांमधूनच क्रांती होत असते... थोडा वेळ लागेल..... पण नक्की होईल.. क्रांती  बर का.. नाहीतर तुम्ही समजाल... :)

 

च्यायला ! लोक ९-९ महीने वाट पहातात आणि या माणसाला लगेच चेंज हवाय !! ;)


In reply to by सुबोध खरे

गोबीचे भाषण ऐकून आधी "विनोद" येतो, त्यांच्या मागे लोग "विकास' ला शोधायला बाहेर पडतात. "क्रांती"ची वाट पाहायची गरज नाही, "थट्टा" आणि "दया" आधी येईल !