नमस्कार मंडळी,
सध्या सौजन्याचा राष्ट्रीय सप्ताह चालू आहे,
शिव्या देणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या किळसवाण्या (सौ.चंसुकु) झुरळांना मा. पंतप्रधानांनी विशाल हृदयाने वैयक्तिकरित्या माफ केले आहे.
अर्थात हिस्ट्रीशीटर वगैरे जे कुणी आहेत त्यांच्यावर खटले झालेच पाहिजेत. त्यांना त्यांच्या कृत्याची न्यायालय देईल ती शिक्षा मिळालीच पाहिजे. जनतेलाही कळले पाहिजे हे कोण कुरापतखोर लोक आहेत. त्यांना माफ करायचे का नाही हेही जनतेला वैयक्तिकरित्या ठरवता येईल.
ह्याच पावन सप्ताहात मीही काही लोकांना आणि त्यांच्या कृत्यांना माफ करावे म्हणतो.
एकेकाळी तत्कालीन शिक्षणमंत्र्याच्या पत्रकारपरिषदेत गोंधळ घालून शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विद्यार्थी संघटनेचा अल्पसा भाग म्हणून तत्कालीन पोलीसांनी माझे नाव गाव पत्ता लिहून घेतला होता. थोड्याच दिवसांनी काहिसा तत्कालीन राष्ट्रपतींचा वगैरे दौरा आमच्या भागात होता. तेंव्हा आदल्याच दिवशी रात्री उशीरा वडिलांच्या ओळखीचा एक डीबी(आम्ही साध्या वेशातल्या पोलीसांना म्हणायचो) बुलेट घेऊन घरी आला. साहेब तुमच्या मुलाला उठवा म्हणला. वडीलांशी त्याचे काय बोलणे झाले माहित नाही पण वडिलांनी सांगितले त्याच्यासोबत जा, रात्री राहा, सकाळी मी येतो, काही काळजी करु नकोस. त्याने मला बुलेटवरुन पोलीस स्थानकात नेले. बाहेरुनच हात करुन एका वरिष्ठाला इशारा करुन तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझ्या घरासारखेच साधे घर होते, एक माझ्यापेक्षा जरा लहान मुलगा होता त्याचा. तेथेच अंथरुण पांघरुण देऊन झोपायची सोय केली. सकाळी उठून चहा पाजून मला पोलीस स्थानकात घेऊन गेला. तेथे संघटनेतले इतर मित्रही आलेले होते. नाव गाव पत्याची पुन्हा उजळणी झाली. विद्यार्थी संघटनेतले माझे पद विचारले. मी थाटात कार्यालय मंत्री म्हणून सांगितले. दुसरा एक शहर मंत्री होता. ऐकून आक्खे पोलीस स्थानक गदागदा हसले. डोक्यात रागाची तिडिक गेलेली. थोड्या वेळांने नाष्टा दिला, जरा उन्ह वाढले, व्हीआयपी दौराही बहुधा संपला होता. त्या पोलीसांने मला बुलेटवर घरी सोडले. वडीलांशी बोलला. जाताना मला म्हणला "मंत्री वगैरे वेगळे लोक असतात बाबा, आपण साधे लोक, अभ्यास कर सुखाने राहा"
तेंव्हा ऐकलं नाही पण....
आज मी मला, त्या पोलिसाला, पोलीस ठाण्यातल्या सगळ्यांनाच माफ केलं वैयक्तिक रित्या.
असो....
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहा, किस्सा आवडला अभ्याजी!
हाहा, किस्सा आवडला अभ्याजी!
सुरुवात 'परिवारा'तून झालेली…
सुरुवात 'परिवारा'तून झालेली दिसते.
हो
In reply to सुरुवात 'परिवारा'तून झालेली… by रामचंद्र
हो, वाण आहे, गुण नाही लागला...
ह्यालाच वास्तागुणहैय्या म्हणतात म्हणे जेन झी...
अर्र
म्हणजे ते रेकॉर्ड वर येऊन सुद्धा तुम्ही जर्मनी पर्यंत पोचले ? विजा घेऊन ? कमाल आहे ह्या सरकारची तुमच्यासारख्या गुन्हेगार प्रवृत्तींना कसे मोकाट सोडले आहे कळेना ! .
आमच्यासोबत असला किस्सा झाला होता २०११ साली, गावातच नवरात्रीच्या वेळी झाली दंगल !
त्यात मूळ मुद्दे अन् कारणे उरली बाजूला, कर्फ्यु लागला जमावबंदी झाली मध्ये ४० फुटांचा (प्रॅक्टिकली कागदोपत्री ९०) रस्ता एकीकडे हिंदू वस्ती एकीकडे मुसलमान वस्ती. मधला रस्ता म्हणजेच आमची पायदळी तुडविली जाणारी लोकशाही !
दंगली सुरू झाल्या तेव्हा मी घरी बसून नाश्ता करत होतो , लगेच आठवण आली ती आमच्या रहमान भाईंची, त्याला म्हणले ये मधल्या रस्त्यावर, आपण पण दंगलीची मौज करू.
आला की भाई दोस्तीच्या जिगर वर, त्यो तिकडून अल्लाह हु अकबर सुरू अन् मी इकडून जय श्रीराम, वाटले चार पाच घोषणा देऊन चालले जाऊन घरी.
पण गावात एस आर पी लागलेली कोणाला ठाऊक तिच्यायला ! आले की दंगल नियंत्रण + एस आर पी मामा लोक एकत्र वरात घेऊन. त्या दुक्कलीने एकाने उजवीकडून अन् एकाने डावीकडून काढला की पट्टा पाठीवर कच्चकन ! दोन सेकंदासाठी श्वास वरचा वर खालचा खाली ! अन् त्यानंतर डायरेक्ट हुंदका ! रहमान अन् माझ्या पाठीवर डायरेक्ट काळे निळे जांभळे इंग्रजी कॅपिटल X चे चिन्ह नक्षी सारखे स्थापन !
परत आलो घरी अन् नंतर १५ दिवस शर्ट काढला नाही घरात वण पाहता घरच्यांनी अजून वण देण्याची शक्यता होती म्हणून ! थोरल्या बहिणीला फक्त माहिती होते तिनेच रोज तेल हळद लावली होती वणावर त्या चरचरत्या.
माझ्या पाठीवरची नक्षी हळूहळू विरत होती पण जवळपास ८ दिवसांनी पंचनामे सुरू झाले तेव्हा पर्यंत होती, एक दिवस आले मामा जीपची वरात घेऊन दरात, वडिलांना म्हणाले खोंडे काका पोराला घेऊन जातो आहे अमुक अमुक ओळख परेड आहे.
पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या दीड शहाण्यांच्या रांगेत मी पण उभारलो ! अर्थातच आपले काही घेणे देणे नव्हते. तिथं भजी उडवत बसलो होतो ठाणे अंमलदारांच्या सोबत कारण त्यांचा पोरगा माझा मित्र होता, घरी येऊन जाऊन.
त्यांनी विचारले वण आहेत का अंगावर मी हळूच बोललो आहेत दोन, तसे मला दाखव म्हणले, मी मोबाईल मधला फोटो दाखवला तसे म्हणाले बरे आहे. पंचनाम्याच्या माझे नाव अन् रेकॉर्ड असलेल्या पानाची एक झेरॉक्स आणून दिली त्यांनीच म्हणाले तहसीलदार कचेरीत जा, हा कागद दाखव, एक डॉक्टर पाठीवर वण आहे का बघेल त्याला दाखव, मला संध्याकाळी १०० रुपये दे ! पैसे कसले ते मला कळेना.
कचेरीत गेलो तर मियाभाई गँग अन् आमची पोरे एकत्र बसून खिदळत होती. तेव्हा कळले वण उमटता सरकार २५० रुपये एका रट्ट्याचे देते, माझे पाचशे होत होते, खुषीत शर्ट काढून डॉक्टरला दाखवला, त्याने सही केली कागदावर, पुढे मामलेदार कचेरीत ५० अन् संध्याकाळी अंमलदार काकांना १०० देता पण ३५० रुपयांची घसघशीत रक्कम हाती उरली !
त्यानंतर ग्रॅज्युएट झालो, पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षण घेतले, सॉफेस्टिकेटेड जनतेत बसायला लागलो ! क्यूबिकल अन् कॉन्फरन्स रूम मधील जनतेचा गावांढळपणा आत्मसात केला, काही वर्षे तिथे बसून गावातल्या गावांढळपणाला माफक शिव्या घातल्या ! मी कर देतो मी लैच मोठा हा माज पण करून बघितला ! शेवटी कळले पळसाला पाने तीनच असतात, कुठेच काही अडलेले नाही.
ख त र ना क..झालगंधर्व हजर…
In reply to अर्र by वृषभ खोंडे
ख त र ना क.
.
झालगंधर्व हजर असतील तर असली झालमूडी झेपत नाही दिसते त्यांना....
तेंव्हा ऐकलं नाही पण....येऊ…
तेंव्हा ऐकलं नाही पण....
येऊ द्या अजुन गोष्टी,ह पण असेच थोड थोड लिहा मग लक्षात राहते😄
इतकी दहशत??.ईतकं घाबरायचं…
इतकी दहशत??
.
ईतकं घाबरायचं मुद्द्यांना???
.
बोर्डावर नाही, फळ्यावर नाही...
फारच शिंगावर घेतले दिसते वृषभाने?
का कामात सूुट्टी मारून शाळेभोवती फिरायची मोशा पोॉलीसी ?
.
फेक - https://www.reddit.com/r/unitedstatesofindia/comments/1vdaeyh/godi_news_channel_aaj_tak_bring_fake_cjp/
"सी.जे.पी" आद्याक्षरे असलेल्या दुसऱ्याच पार्टीचा माणूस चर्चेत बोलावला- आता त्याच्या नावे वाट्टेल ते बोलवून घ्या, आणि सी.जे.पी ला बोल लावा.
हाय काय नि नाय काय.
हे असले सगळे उद्योग करतात म्हणून लोकं वैतागले आहेत.
चाटुगिरीची हद्द पार करा.