Skip to main content

चालू घडामोडी ऑगस्ट २०२६

लेखक अभ्या.. यांनी रविवार, 02/08/2026 18:40 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी,

सध्या सौजन्याचा राष्ट्रीय सप्ताह चालू आहे,

शिव्या देणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या किळसवाण्या (सौ.चंसुकु) झुरळांना मा. पंतप्रधानांनी विशाल हृदयाने वैयक्तिकरित्या माफ केले आहे.

अर्थात हिस्ट्रीशीटर वगैरे जे कुणी आहेत त्यांच्यावर खटले झालेच पाहिजेत. त्यांना त्यांच्या कृत्याची न्यायालय देईल ती शिक्षा मिळालीच पाहिजे. जनतेलाही कळले पाहिजे हे कोण कुरापतखोर लोक आहेत. त्यांना माफ करायचे का नाही हेही जनतेला वैयक्तिकरित्या ठरवता येईल. 

ह्याच पावन सप्ताहात मीही काही लोकांना आणि त्यांच्या कृत्यांना माफ करावे म्हणतो.

एकेकाळी तत्कालीन शिक्षणमंत्र्याच्या पत्रकारपरिषदेत गोंधळ घालून शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विद्यार्थी संघटनेचा अल्पसा भाग म्हणून तत्कालीन पोलीसांनी माझे नाव गाव पत्ता लिहून घेतला होता. थोड्याच दिवसांनी काहिसा तत्कालीन राष्ट्रपतींचा वगैरे दौरा आमच्या भागात होता. तेंव्हा आदल्याच दिवशी रात्री उशीरा वडिलांच्या ओळखीचा एक डीबी(आम्ही साध्या वेशातल्या पोलीसांना म्हणायचो) बुलेट घेऊन घरी आला. साहेब तुमच्या मुलाला उठवा म्हणला. वडीलांशी त्याचे काय बोलणे झाले माहित नाही पण वडिलांनी सांगितले त्याच्यासोबत जा, रात्री राहा, सकाळी मी येतो, काही काळजी करु नकोस. त्याने मला बुलेटवरुन पोलीस स्थानकात नेले. बाहेरुनच हात करुन एका वरिष्ठाला इशारा करुन तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझ्या घरासारखेच साधे घर होते, एक माझ्यापेक्षा जरा लहान मुलगा होता त्याचा. तेथेच अंथरुण पांघरुण देऊन झोपायची सोय केली. सकाळी उठून चहा पाजून मला पोलीस स्थानकात घेऊन गेला. तेथे संघटनेतले इतर मित्रही आलेले होते. नाव गाव पत्याची पुन्हा उजळणी झाली. विद्यार्थी संघटनेतले माझे पद विचारले. मी थाटात कार्यालय मंत्री म्हणून सांगितले. दुसरा एक शहर मंत्री होता. ऐकून आक्खे पोलीस स्थानक गदागदा हसले. डोक्यात रागाची तिडिक गेलेली. थोड्या वेळांने नाष्टा दिला, जरा उन्ह वाढले, व्हीआयपी दौराही बहुधा संपला होता. त्या पोलीसांने मला बुलेटवर घरी सोडले. वडीलांशी बोलला. जाताना मला म्हणला "मंत्री वगैरे वेगळे लोक असतात बाबा, आपण साधे लोक, अभ्यास कर सुखाने राहा"

तेंव्हा ऐकलं नाही पण....

आज मी मला, त्या पोलिसाला, पोलीस ठाण्यातल्या सगळ्यांनाच माफ केलं वैयक्तिक रित्या.

असो....

 


वाचने 3309
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

अयोध्येतल्या राम मंदिर दानपेटी दरोड्याच्या एस आय टी चा अहवाल लोकांना दाखवता येणार नाही, भविष्यात बघू : सुप्रीम कोर्ट 
लोकांना का बरं दाखवता येणार नाही ? 
https://www.aninews.in/news/national/general-news/sc-says-ayodhya-trust…

**


In reply to by अमरेंद्र बाहुबली

सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी ही  एस आय टी चा अहवाल नाही तर अहवालाच्या प्रगती संदर्भात आहे. 

SC says Ayodhya trust SIT status report cannot be made public at this stage; allows petitioners to submit suggestions
Read more At: 
https://www.aninews.in/news/national/general-news/sc-says-ayodhya-trust…


In reply to by अमरेंद्र बाहुबली

खरं आहे..दाखवायलाच हवा.. अण्णा तुम्ही सुप्रोम कोर्टा विरुध्द केस टाकाच... 


ऑपरेशन सिंदूर मधे भारताचे ६ सैनिक

हुतात्मा झाल्याचे बाहेर आलेय.

म्हणजे संसदेत जीवितहानी झालेली नाही असे जे राजनाथ सिंहांनी सांगितले ते खोटे होते? किती खोटारडे लोक आहेत? देशासोबत खोटे बोलतात? तेही संसदेतून?

https://www.thehindu.com/news/national/in-a-first-government-releases-n…


In reply to by अमरेंद्र बाहुबली

> बाहेर आलेय.

बिळांतून उंदीर यावेत तसे काही बाहेर आले नाही. भारतीय सरकारने योग्य प्रकारे जीवितहानीची माहिती दिली आहे आणि बलिदान दिलेल्या व्यक्तींना योग्य तो सन्मान सुद्धा दिलेला आहे.

युद्धाच्या धामधुमीत कुठलाही कार्यक्षम मंत्री आपल्या हानीची माहिती देत बसणार नाही. 


In reply to by साहना

म्हणजे खोटे बोलले होते ना? सांगायचं होत की आता काही सांगू शकत नाही, खोट का बोलायचं?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपण भक्त संप्रदायात नाही, त्यामुळे तात्विक विरोध हा तात्विक पातळीवरच ठेऊ शकतो आपण. भक्तांना जसे प्रत्येक जागी आंतरराष्ट्रीय कट, कारस्थाने, मास्टरस्ट्रोक इत्यादी ठराविक पठडीबाहेर बघायला ट्रेनिंग नसते तसे आपले नाही, त्यामुळे आपण तसेच रहावे. उगाच भांड्याला भांडे विरोध केला का विषय होतो नको तितका खोल. कारण आपण काय पोथीनिष्ठ नाही ना, विरोध करायचा म्हणून करायलाच हवा असे काहीसे. सहज वाटले म्हणून बोललो, राग मानू नका, पटले नसेल तर सरळ इग्नोर मारा.


आताचे पंतप्रधान विरोधी पक्ष आणि टीकाकारांना बौद्धिक नक्षली म्हणतात त्यावरुन- 

'मी बौद्धिक नक्षल आहे आणि त्याचा मला अभिमान आहे,' अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, तसेच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले. 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणीतरी , बेकार तरुणांना  झुरळ म्हणून हिणवतो, लगेच तरुण विद्यार्थी CJP स्थापन करून सरकारला जेरीस आणते. आता ' आ बैल मुझे मार ' अशी हौस फिटवण्यासाठी  लाल किल्यावरून " दिमागी नक्सल " पार्टीला जन्म दिला गेला आहे.

तुम्ही आम्हाला दगडं मारा,  आम्ही त्याचा महल बांधण्यासाठी वापर करू  असे जनतेने सरकारला संदेश दिला आहे. सरकारकडे दगडांची कमी नाही , किंवा फक्त दगडच आहेत.

गृहमंत्री नेहमी तुकडे तुकडे गँग  किंवा अर्बन नक्सल असे विरोधकांना संबोधत असते . परंतू माहितीच्या  अधिकारात गृहमंत्रालयाने अशी अधिकृतपणे  व्याख्या नसल्याचे कळवले आहे. " दिमागी नक्सल"  बाबत माहित नाही . कळेल लवकरच . 

 


In reply to by आग्या१९९०

पूर्वीच्या भाषनामधे देशातीची धर्मनिरपेक्षता, राजकीय स्थिरता आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहन वारंवार केले जायचे, देशातील समस्या त्याचा नीपटारा पुढील आव्हाने असे विषय असायचे अभ्यासु भाषणे असायची. 

आता दिमागी नक्षल, राजकीय चिखलफेक, समान नागरी कायद्याचा वापर, जुन्या सरकारांनी काय केले ते जुनेच दाखले..

मागेच् म्हणालो यांचे पालथे सल्लागार कोण आहेत याचा तपास झाला पाहिजे. :)

 

 

-दिलीप बिरुटे


२० हजार रुपयाची लाच मागितली म्हणून cm पोर्टल ला तक्रार केल्यानंतर पोलिसानी त्या मुलाला बोलवून मारहाण करून गंभीर जखमी केले आहे, घटना उत्तर प्रदेशची आहे. 

योगीच्या राज्यात हे घडले आहे, आणी हा माणूस अनेकांना पुढील पंतप्रधान हवा आहे. पंतप्रधान झाल्यास पूर्ण देशात गुंडाराज का मग?

https://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/si-assaults-14-year-ol…


लोकसत्ता बातमी: https://www.loksatta.com/nashik/trimbakeshwar-hospital-demolition-kumbh-mela-darshan-path-relocation-amy-95-6080570/

केवळ भक्तांचा प्रदक्षिणा मार्ग मोठा करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पाडणे

- तोटा गोरगरीब लोकांचा आहे. त्यांना आता लांब जावे लागणार किंवा खाजगी दवाखान्यात पैसे मोजावे लागणार.

- फायदा राजकारण्यांचा आहे - भक्तांची मते मिळणार आणि दुसरे नवे रुग्णालय बांधताना खूप मोठमोठी कंत्राटे वाटायला मिळणार. आधीच मंत्र्यांच्या नातेवाईकांनी ५३० कोटींची बनावट कंत्राटे वाटून झालीही होती, त्यात मलिदा खाल्लाही होता, पण ते उघडकीला आले. रुग्णालयाच्या कंत्राटाची संधी कुंभमेळा झाल्यावर मिळेलच. धर्माने आंधळ्या झालेल्या जनतेला असेच सरकार हवे.


In reply to by स्वधर्म

अरे अरे राम मंदिर दरोडा दानपेटी नंतर ह्यांनी हिंदूंचा पवित्र कुंभेमळाही सोडला नाही पैसे खायला?


साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आहे, त्याचा अर्थ असा की जो भाग्यवंत असतो त्याला देव देतच जातो वगैरे, नंतर साखरेचे खाणार त्याला मधुमेह होणार असे म्हटल्या जाऊ लागले.  'गोबरयुगात' साखरेचे खाणार त्याला महागात पडणार अशी नवी म्हण आहे, असे म्हणावे लागते.   गेल्या पाच वर्षात साखरेचे भाव सातत्याने वाढतच गेले आहेत.  आता मार्च मधे ४५ रुपये असलेली साखर आता ६०/६५ वर आली आहे. दिवाळीपर्यंत ती ८० रुपये किलो पर्यंत जाईल असा अंदाज आहे.

साखरेचे दर अचानक एवढे वाढण्यामागे इथेनॉल निर्मितीसाठी झालेला उसाचा वापर, साखरेचा घटलेला साठा आणि आगामी सणांमुळे वाढलेली प्रचंड मागणी ही मुख्य कारणे आहेत, साखरेच्या  दरावर नियंत्रणासाठी आता दहा लाखटन कच्ची  साखर आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची बातमी आहे. एकीकडे शेतक-याच्या उसाच्या भावाला मिळणारे कमी दर, उस उत्पादन कमी होत आहे त्याचाही फटका महागाईला बसत आहे.
 

पालथं सरकार असल्यामुळे एक निर्णय म्हणून सामान्याच्या हिताचा होत नाही. बाकी, पंतप्रधान यांचा सोशीयल मिडियात पहिला नंबर आला म्हणून भक्तमंडळी खुश आहे.  

-दिलीप बिरूटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोबरयुगीन महात्म्याचे चमत्कार म्हणावेत हे!


Ashutosh Ranka Attack : CJP प्रवक्ता आशुतोष रांका यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण; सरकारी शाळेच्या पाहणीवरून राडा, भाजपवर गंभीर आरोप

Ashutosh Ranka Assault : राजस्थानमध्ये सरकारी शाळेच्या पाहणीदरम्यान CJP प्रवक्ता आशुतोष रांका आणि त्यांच्या टीमवर हल्ला झाल्याचा आरोप आहे. CJPने या हल्ल्यामागे भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा दावा केला आहे.
 
 
शाळेचे ऑडिट करण्याला एक विशिष्ट पक्षीयांचा विरोध का आहे? शाळा चांगल्या झाल्या तर ह्यांचे पैसे खाण्याचे वंदे होतील आणी दुसरी गोष्ट म्हणजे मुले शिकली तर ह्याना कच्चा माल मिळणार नाही. १०० - १५० वर्षाआधी ह्यांचेच पूर्वज सावित्रीमाईना शेण नी दगड मारत होते आज हे शाळा सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्याना मारताहेत. गोबरयुग दुसरे काय?

औसा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी जेव्हा अभिजित दिपके आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले, तेव्हा त्यांना वर्गात विद्यार्थी बसलेले दिसले. मात्र, जेव्हा या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला, तेव्हा सत्य ऐकून तपासणी करणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वर्गात बसलेली मुले जिल्हा परिषद शाळेची नसून, ती शहरातील 'पीपल्स प्रायमरी स्कूल' या खासगी शाळेतील होती!


https://divyamarathi.bhaskar.com/amp/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/abhijit-dipke-school-theek-karo-campaign-latur-ausa-expose-138782534.html


अभिजीत दिपके ह्यांनी एका लहान मुलीला विचारले की तुझी स्कूल बैग कुठेय? तिने सांगितले की बैग तिच्या शाळेत आहे, ह्यावरून बोगस विद्यार्थी आणून बसवण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले! गोबरयुगात अश्या फसवणुकीच्या घटना सर्रास होताहेत. 

दीपके हे चांगले काम करत आहे, बॅग विद्यार्थी आणून बसवून त्याना फसवू असा शासनाने विचार केला होता पण तो प्रयत्न फसला! 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

फ २० राहूल गांधींचे महाराष्ट्रातील स्टार प्रचारक.


आशुतोष रांका यांच्या फेसबूकवरचा व्हीडीयो बघत होतो, ते पोष्ट मधे लिहितात-

 

 ''रामपुरा, कंवरपुरा येथे गेल्या अनेक वर्षांपासून शाळा म्हशीच्या गोठ्यात सुरू आहे. पण जेव्हा आम्ही तिथे पाहणी करण्यासाठी पोहोचलो, तेव्हा उघडपणे मारहाण आणि दगडफेक करण्यात आली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, पथकावर दगड भिरकावण्यात आले. कपडे फाडण्यात आले. ट्यूबमध्ये दगड घालून पथकाला मारण्यात आले. माझे कपडे फाडण्यात आले. ​हे सर्व मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून घडले. मदन दिलावर यांना मुले म्हशीच्या गोठ्यात शिकावीत, हे मान्य आहे; पण शाळा ठीक व्हावी, हे मान्य नाही. मदन दिलावरजी - तुम्ही आज गुंड पाठवून संपूर्ण देशामध्ये राजस्थानची मान खाली घालायला लावली आहे. पण आम्ही या गुंडगिरीला घाबरणारे लोक नाही आहोत, शाळा तर, चांगल्या झाल्याच पाहिजेत''

 

शाळा चांगल्या नको, मुलं शिकायला नको. चांगलं शिक्षण नको. अशिक्षित आणि गुंडाचा भरणा असणारी पिढी निर्माण करायची असाच हेतू समजायचा ? सगळं कठीण आहे. 

-दिलीप बिरूटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रांका ह्यांच्या नंतर abp चे प्रतिनिधी त्याच शाळेच्या ठिकाणी गेले होते, गोठ्यात शाळा सुरू होती, अतिशय वाईट परिस्थिती होती, त्या प्रतिनिधीलाही दमदाटी करण्यात आली. शाळा चांगल्या होऊ नयेत ह्यासाठी भाजपेयी रस्त्यावर हाणामाऱ्या करायला उतरलेत असे दिसतेय.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

काल फेसबूकवर एबीपीच्या वार्ताहाराचे वार्तांकन आणि त्याची डेरींग बघितली. 

मस्त, आवडले. नाही तर, सध्या गोदीमिडियात टीव्ही पाहणे जवळ जवल सोडले होते. 

-दिलीप बिरुटे

 

 


Indian Army issue statement regarding Minamarg Check Post Incident | Ladakh Sector
A video from the Minamarg (Minimarg) check post has circulated showing a tourist arguing with security personnel over a temporary road restriction.
The Indian Army, in coordination with local police and civil administration, implements such measures as a routine and essential part of anti-terrorism and security operations in this highly sensitive high-altitude border region near the LoC.
Road closures, cordons, and regulated movement are standard when:
• Intelligence or operational requirements demand a search/cordon to neutralise potential threats
• Weather, landslides, or convoy movements require safety clearances
• The safety of residents, tourists, and troops must be prioritised
These are not arbitrary or “anti-tourist.” They exist precisely so that civilians, including tourists can travel safely in an area that has historically faced infiltration and terror risks.
Compromising a security protocol for individual convenience could endanger dozens of lives.
To the individual in the video and similar voices:
Being “Gen Z” (or any generation) is not a qualification, a badge of entitlement, or a licence to disregard security protocols. National security does not pause for slogans, tax receipts, or generational self-identification.
Comparing legitimate operational restrictions to “locking Kashmiris” is both factually misleading and disrespectful to the forces who protect every citizen, Kashmiri, tourist, or otherwise in this challenging terrain.
Threatening Parliament while creating a public confrontation at a sensitive post does not strengthen democracy; it risks operational security.
We urge all visitors and residents:
Support these measures. They are conducted for your safety and the nation’s security. Patience and cooperation save lives.
The Army and police work hand-in-hand daily so that tourism and normal life can continue in J&K and Ladakh.
Respect the uniform. Respect the protocol. Respect the reality of the frontier.
 

काल जातिय आरक्षणाच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर वर जनरल कॅटेगरी व सवर्ण समाजाने मोठे जोरदार आंदोलन केले.

हिंदू द्रोही हुकुमशाह कोबींनी या आंदोलनाचे दमन करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले. मागे युजीसी आंदोलनाच्या विरोधात जसे घरातच नजरबंदीत ठेवले गेले होते तसेच यावेळी देखील काहींच्या बाबतीत घडले. राष्ट्र विरोधी शक्तींचा पाठिंबा असलेल्या व कोबींच्या विरोधी असलेल्या कॉकरोच ला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली पण युजीसी आणि आता या आंदोलनाच्या वेळी मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली, परंतु फार मोठ्या प्रमाणात जनता पोहचल्याने शेवटी बहुतेक परवानगी देण्यात आली. कॉकरोच आंदोलोकांनी मोदींना यथ्थ्येच्च शिव्या हासडल्या होत्या पण आत्ताच्या आंदोलनात मात्र तसे काही झाले नाजी व कोणतीही तोडफोड झाली नाही.उलट हनुमान चालिसा चे पठण करण्यात आले. या लोकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला.

काल घडलेली आणि अनेकांच्या लक्षात आलेली व सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हुकुमशाह कोबींनी देशात मिडिया ब्लॅक आऊट केला. कोणत्याही प्रमुख वृत्तवाहिन्यांनी हे आंदोलन दाखवणार नाहीत व सगळे फुटेज राहुल गांधीला दिले जाईल याची काळजी घेतली. [ आत्ता कुठे काही चॅनल थोड बहुत दाखवायला लागले आहेत. ]  

कोबींच्या पापाचा घडा भरला आहे! त्यांच्या तुकड्यांवर जगणारे आणि भुंकणारे श्वान आजही त्यांचे गुणगान करताना दिसतात. 

दुवे:

Reservation Hatao Andolan

Anti-Reservation Protest Turns Tense at Jantar Mantar as Protesters Clash With Delhi Police

 JANTAR MANTAR PROTEST: जातीय आरक्षण के खिलाफ दिल्ली में बड़ा प्रदर्शन! | RESERVATION PROTEST | DELHI 

 Jantar Mantar Protest: जंतर-मंतर पर 'आरक्षण हटाओ आंदोलन' में बवाल, जुट रहे सैंकड़ों युवा | Delhi 

 Jantar Mantar पर लाठीचार्ज के बाद आधी रात में फिर मचा बवाल...रिपोर्टर के कैमरे पर...|| UGC Protest  [ अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण ! ]

 

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:  Saanwariya Saanwariya  (8K) | Swades | 


छात्रो की गूंज कार्यक्रम काय अपडेट ? तिकडे Rss चे तरुणासाठी मेळावे कार्यक्रम सुरु झाले.

 

डर अच्छा होता है .:)

 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते गुंज की काय आहे ते फुल टू धमाल आहे. मस्त कॉमेडी होत असणार. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्या कार्यक्रमाला मुलींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला! अतिशय यशस्वी कार्यक्रम झालाय, सोशल मीडिया त्या कार्यक्रमाच्या रिल्स नी ओसंडून वाहतोय! coep च्या मुलीना दमबाजी करण्यात आल्याच्या बातम्या होत्या पण मुली ह्याला घाबरलेल्या नाहीत.


राहुल गांधीच्या सभेला मुलींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.  मुलींकडे, महिलांकडे देशात कसे पाहिले जाते, त्यांना कसे नियंत्रित केले जाते, असुरक्षित ठेवले जाते, त्यांच्यावर हिंसा केली जाते, याच्या प्रातिनिधिक कहाण्यांची 'गूँज' देशाला ऐकवत आणि याचे मूळ 'मनुस्मृती'च्या शिकवणीत असल्याचे व तीच शिकवण पंतप्रधान, सरसंघचालकांसह भाजप नेत्यांच्या वक्तव्यांतून प्रतीत होत असल्याचे अधोरेखित करत, 'पितृसत्ताक पद्धती ठेचून काढा,' असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी महिलांना केले. वगैरे इत्यादि. 

तरुणांनी सरकारच्या चड्डीत हात घातला तेव्हापासून केंद्रसरकार आणि राज्यसरकारे जागे झाली आहेत.  मा.मुख्यमंत्र्यांचे 'हॅलो फ्रेंड्स' हा शाळेतील मुलांसाठी कार्यक्रम सुरु झाला आहे. आमच्या संभाजीनगरात महाविद्यालयातील एन एस एस मुलांना कंपलसरी उपस्थिती करुन  रॅलीला गर्दी करण्याचा प्रयत्न झाला.  एकूण काय तर, मुलं आपल्या विरोधात जाऊ नये म्हणुन सद्य सरकार आणि त्यांची मातृसंस्था मेळावे घेऊन प्रयत्न करीत आहेत. 

चला मुलांना अच्छे दिन आलेत ही चांगली गोष्ट आहे. 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

**पितृसत्ताक पद्धती ठेचून काढा**

 

तोच तोच खडू पुन्हा पुन्हा घासला म्हणून चंदन होईल ह्या आशेने राहुल गांधी बिचारा आपला खडू घासत आहे. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेजारी बुरख्यातली महिला उभी करून बुरखासक्ती करणाऱ्या   त्या पुस्तकाविरोधात चकार शब्द न उच्चारता हा यडछाप खूप पूर्वीच कालबाह्य झालेल्या व एक लक्ष हिंदूंमधील जेमतेम एकाला माहिती असलेल्या मनूस्मृतीला शिव्या घालतोय आणि ते ऐकून मंदबुद्धी सेवक तालिकावादन करताहेत. 

 

धन्य आहे. कोणत्याही वर्तमान महत्त्वाच्या विषयावर न बोलता, अत्यंत निरर्थक आणि कालबाह्य विषय कवटाळून बसलाय. त्यामुळे मोदी निश्चिंंत आहेत.


चला मुलांना अच्छे दिन आलेत ही चांगली गोष्ट आहे. 

आज सूर्य  कुठे  उगवला  आहे  ते  पहायला  हवा! 


बाराचे पुणे आता एकसष्ट चे होणार. 

 

MH12 आता MH 61 होणार आश्या बातम्या आहेत म्हणजे वाहन संख्या 67.5 मिलियन झाली असे समजायला हरकत  नाही.


In reply to by कर्नलतपस्वी

दोन ते तीन महिन्यांसाठीच MH६१  आहे, MH १A ला मंजुरी मिळाली की त्या ६१ दिलेल्या प्लेट्स पुन्हा बदलून मिळणार आहेत अशी बातमी वाचली.