या पूर्वी दिवाळी अंकात महादेववाडीची तोंड ओळख मिपाकरांनाकरून दिली आहे. सेवानिवृत्ती नंतर इथे स्थायीकहोऊन तपाहून जास्त वर्ष झाली.गावकरी, रहिवासी यांच्याशी ओळख,संबंध निर्माणझाले.गावगाड्यात सहज मिसळून गेलो.
ग्लिरिसिडीयाचे वृक्ष
सोसायटी समोर,ढगाई मातेचा डोंगर,उतारावर गायरान,खाजगी जमीनी आणी वनविभागाचे राखीव जंगल.तुरळक देशी प्रजातीची झाडेआणी खुप सारे "ग्लिरिसिडीयाचे",वृक्ष. डोंगर माथ्यावर देवीचे देऊळ आणी देवळाच्यामागे नैसर्गिक तलाव.रोज सोसायटितल्याअधुनिक व्यायामशाळेत व्यायाम केल्यानंतर डोंगरावर भटकंती नित्यक्रम.पक्षीदर्शनाचा छंद लागला. सर्वभक्षी,शाकाहारी,कीटक भक्षी, मांसाहारीआणी अमृतभक्षी अशा प्रकारच्या पक्षांचेदर्शन होऊ लागले.
पक्षीदर्शन करताना विवीध आवाज कानावर येतात.सरावाने आवाजावरून कुठला पक्षी हेओळखता येवू लागले.कायबोलत असावेत त्यांच्या भावना काय,नाते काय? असे अनेक प्रश्नपडू लागले.त्यांची भाषा समजायला निळावंतीहोणे तर शक्य नव्हतेपण देहबोली समजून घेता आली तर!असा विचार मनातआला.निरिक्षण तिव्रता वाढवली.देहबोलीतून सुखांत,दु:खांत,शोकांतिका,प्रेमलिला,भांडणे,अगदी खाजगी,नाजूकक्षण सुद्धा बघावयास मिळाले.शब्द जरी कळालेनाही तरी भावनां हळूहळू समजू लागल्या.यातूनच कधी गोष्टी तरकधी गाणी आठवू लागली. काही वेळेस कविताही सुचल्या.कितीतरी उदाहरणे देता येतील.
एकदा भांगपाडी मैनेची जोडी उंच फांदीवर गुलूगुलू बोलताना दिसली. नक्कीच प्रणयचेष्टा होत्या त्या,ते बघून ही गाणी सुचली..........
रूपासभाळलो मी भुललो तुझ्यागुणाला,
जे वेड मजला लागले तेसांगू नको कुणाला'
कशी चाल तुरुतुरु, उडते केस भुरूभूरू........
डाव मांडून भांडून मोडू नको,डाव मोडू नको.......
अशीच एका शुभ्रकंठी (Indian Silverbill) दांपत्याची शोकांतिका बघीतली.भटकंती मधे सात आठदिवस बघत होतो,एका बाभळीच्या झुडपावर सुरक्षीत जागी,काडी काडीजमवून दोघांनी सुंदर घरटे बनवले. एकदिवस जोडीने बसलेले दिसले.शेजारी बसून पुढील नियोजन कसे करायचे यावरबोलत असावेत.कचकन फोटो काढला. पुढे दोन तीन दिवसमात्र काही घडले नाहीचौथ्या दिवशी ते घरटे, झुडूपआणी भोवताली जमीनीवर पसरलेले ओलेसुके गवत जळून राख झालेले दिसले.कोण्या वाटसरूने चालताना कदाचित जळती धुम्रकांडी फेकली आसावी.त्यामुळेच ही शोकांतिका घडली हे नक्कीच.
शुभ्रकंठी (Indian Silverbill)
हृदयात वाजे समथिंग,सारे जग वाटे हॅपनिंग
मैं तेरी तू मेरा ,दुनियासे क्या लेना
दोन कोतवाल दाम्पत्ये समोरासमोर बसून भांडताना दिसले. जवळपास अर्धातास भांडत होते. नंतर दोन्ही दाम्पत्ये दोन विरुद्ध दिशेला उडून गेली.
सदाहरित घनदाट जंगल,पाण्याची सोय, तरीही जैववैविध्य मात्र जंगलाच्या आकारमानानुसार अगदीच नगण्य आहे.जे काहीथोडेफार पक्षी दिसतात ते पिंपळ,कडुलिंब,बाभळ, बहावा, टोकामा,कचनार,वडासारख्या देशी तुरळक झाडांमुळे आणी गायरानातल्या गवतामुळे. जैववैविध्य कमी असण्याचे मुख्य कारण असे की जंगलात प्रामुख्यानं Gliricidia sepium, मराठीत 'उंदीरमारी' या विदेशी वृक्षाचे साम्राज्य, जवळपास पच्चाण्णव टक्के जंगल यांनीच व्यापले होते.सदाहरित जंगलचा पट्टा वरवर अतीशय सुशोभित,सुंदर दिसायचा पण
"सतरा लुगडीआणी बाई उघडी".
"उंदीरमारी", झाडांचे वैशिष्ट्य म्हणजे,वृक्षांची वाढ भरपूर.नत्रखत यांपासून बनते. झाडांवर कुठलेही पक्षी बसत नाहीत.या वृक्षाची लाकडे जळणासाठी वापरता येत नाहीत.झाडांच्या जवळून जाताना एक विशिष्ट कडवटसा वास येतो त्यामुळे अस्वस्थ वाटते.पाने,फळे विषारीअसल्यामुळे जनावरे,पक्षी खात नाहीत. याच्याआसपास कुठलाही अन्य वृक्ष किंवा गवत, हरीत वनस्पती उगवत,रूजत नाही. हा वृक्ष भारतातील उष्ण प्रदेशात सर्वत्रआढळत असला तरी,मूलतः परकिय,मध्य अमेरिकेतील आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात याची बरीच लागवड केली गेली.
खुप मोठा सरकारी जमीनपट्टा,एकटा दुकटा निसर्गप्रेमी काय करणार? तरीही दरवर्षी जिथे जागा मिळेल तीथे देशी झाडे लावण्याचा प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर अनेक स्थानीक लोक करत होते.
अचानक, एक दिवस घराच्या बाल्कनीतून डोंगरावर हालचाली वाढलेल्या दिसल्या. डंपर बुलडोझर,जेसीबींच्या फेऱ्या वाढल्या. हळूहळू झाडांची कत्तल होत होती. बघता बघता ग्रीन कव्हर नष्ट झाले,डोंगर बोडका झाला.मन दुखी झाले.
वाढती वस्ती, होणारी भविष्यातली वहातूक कोंडी लक्षात घेऊन मनपाने सन दोन हजार दहा मधे एक डी पी रोडचे नियोजन या भागासाठी केले होते.प्रत्याक्षात काम दोन हजार चोवीस मधे चालू झाले. वाटले त्या साठीच झाडांची कत्तल होत असावी, किंवा एखादी बांधकाम कंपनी जागा घेऊन तीथे सिमेंटचे जंगल बनवण्याचा उपक्रम राबवणार असेल. खड्ड्यात माती, दगडांचा भराव पडू लागला. डोंगरमाथ्यावरल्या ढगाई मातेचे दर्शन थेट घरातून होऊ लागले. एकविस हेक्टरमधे, (बावन्न एकर) पसरलेले आरक्षित वन सुदैवाने अजून अतिक्रमित झालेले नव्हते.स्थानीक आपली गुरेढोरे चरायला गायरानात घेऊन येतात किवा महादेववाडी, वानवडी, हडपसर कडे जाणारे दुचाकी पायवाटेने घेऊन येतात एवढेच काय ते.
"आनंदवन फाउंडेशन" ,"माय नेचर माय रिस्पाॅन्सिब्लिटी" संस्था वन विभागाचे कर्मचारी, स्वयंस्फूर्त स्थानीक नागरिकांनी हे शिवधनुष्य तोलण्याचा संकल्प सोडला.
वनविभागाने मशिनद्वारे वेगाने जमिनीला आकार दिला. झाडे रोपण्यासाठी खड्डे खणले. नाला बंडिगची कामे केली.डोंगर उतारावरून वाहणारे पाणी अडवण्यासाठी,जमिनीची धूप (Soil Erosion) रोखण्यासाठी या भागात काँटूरट्रेंच (Continuous Contour Trench, CCT) आणि पाझर तलाव बांधण्याचे काम एप्रिल-मे महिन्यात सुरूकेले. सर्वात महत्वाचे म्हणजे झांडांची रोपे उपलब्ध करणे, उन्हाळ्यात लावलेल्या रोपांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकणे (जोपर्यंत झाडे रूजून मोठी होत नाहीत तोवर संवर्धन करणे जरूरी असते)आशी सर्व कामे युद्धपातळीवर चालू झाली. मे जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने चित्र पालटले. बनावटी तळी भरली. झाडे तरारली. दोन मोठे तलाव व चार छोटे तलाव पाण्याने लबालब भरले.
सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. मी दररोज भेट देणारा, मलाही विदेशी झाडांच्या वासा पासून मुक्ती मिळाली. राखी वटवट्या, कवडी, माळमुनिया, फुलचुखी,बुलबुल, तितर, स्पाॅट बिल डक, कोतवाल अशा अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या पक्षांच्या संख्येत वाढ दिसून आली.या वर्षी प्रथमच रेन क्वेल पक्षाने हजेरी लावली. तितरांची संख्या वाढली. तीन प्रकारचे कुक्कूपक्षी दिसले. त्यांचा "पेरते व्हा, पेर्ते व्हा"(काॅमन हाॅक कुक्कू),"वळीव, वळीव", (ग्रे बिल्ड कुक्कू)तर "पिहूं पिहूं", (पाईड कुक्कू) आवाज जंगलात घुमू लागला.मला पुर्ण खात्री आहे की येत्या तीन चार वर्षात संपूर्ण चित्र पालटेल.स्थानिक प्रजातीची झाडे पक्षांना अन्न आणी निवारा दोन्ही उपलब्ध करतील.
आता "ग्लिरिसिडीया मुक्त जंगलात भटकताना मला ना धो महानोर यांच्या गीताची आठवण होते......
मी रात टाकली
मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली.....
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला उपक्रम केला आहे.
चांगला उपक्रम केला आहे.
प्रतिसादबद्दल
मनापासून आभार कन्जूस भाऊ.
अरे वा. खूपच आशादायक आणि सकारात्मक उपक्रम आहे.
वाचून खूप आनंद झाला. चांगल्या सकारात्मक गोष्टी घडत आहेत ही खूप समाधानाची बाब आहे.
मुख्य गोष्ट...
In reply to अरे वा. खूपच आशादायक आणि सकारात्मक उपक्रम आहे. by चित्रगुप्त
स्थानिक नागरिक पाणी,प्रदुषण व अतिक्रमण या विरूद्ध सक्रिय झाले आहेत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
उपक्रम आणि त्यातील अनेकान्चा…
उपक्रम आणि त्यातील अनेकान्चा सहभाग सगळेच स्तुत्य. त्याचे वर्णनही सुन्दर.
बनावटी तळी भरली. झाडे तरारली. दोन मोठे तलाव व चार छोटे तलाव पाण्याने लबालब भरले.
कुणालाही अशा जलसन्चयात निर्माल्य किन्वा इतर काही टाकून त्यान्चा समतोल बिघडवण्याची दुर्बुद्धी न होवो.
जलसन्चयात निर्माल्य किन्वा इतर काही टाकून
In reply to उपक्रम आणि त्यातील अनेकान्चा… by शेखरमोघे
खरेच आहे.
गणेश विसर्जन पालिकेच्या कृत्रिम, अस्थायी तलावात होते.
मागील वर्षांपासून या तलावात कमळाची फुले लावण्यास सुरूवात केली आहे.
सध्या तरी तो धोका नाही कारण तलाव मानवी वस्तीपासून थोडा दूर आहे. पण भविष्यात शक्यता नाकारता येत नाही.
अतिशय स्तुत्य उपक्रम !…
अतिशय स्तुत्य उपक्रम ! ह्याटस ऑफ ! सर्वांचं अभिनंदन करायलाच हवं !
लिहिलंही नेहमी प्रमाणेच छान...निसर्ग, झाडे, किटक पक्षांचे प्रचि म्हणजे मेजवानीच !
पक्षांचे प्रचि खासच. असं…
पक्षांचे प्रचि खासच. असं काही वाचलं की अजूनही निसर्गाची ओढ माणसाला, माणसाला पेक्षा प्रशासनाला आहे हे पाहून बरं वाटलं. नाहीतर पुण्यात सगळीकडे टेकड्या फोडून बांधकामे करण्याचाच धडाका चालू आहे. आमच्या वेताळ टेकडीची खंदके खोदून अर्धी वाट लावून झाली आहे.
*पक्ष्यांचे
In reply to पक्षांचे प्रचि खासच. असं… by श्वेता व्यास
*पक्ष्यांचे
खूप छान
या प्रेरणादायी प्रवासाचे अत्यंत सुंदर आणि सकारात्मक शब्दांत चित्रण केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनन्दन
वाचक,प्रतिसादकांचे मनापासून आभार.
पर्यावरण विषय ऐरणीवर आलाय व नागरीक त्याबाबत सजग, सक्रिय झाले नाही तर त्या भागाचे वाटोळे होण्यास फार काळ लागणार नाही.