साहेब , एक नवी धून शोधा , धून
मग बघा वैरीही मित्र बनतील स्वतःहून
सोडूनि द्या त्या सर्व तक्रारी ,
त्रागा नको पुनः तो विखारी
काय फायदा तुम्हास त्याचा,
स्वतःचे मन दुखावून
साहेब , एक नवी धून शोधा , धून
वळू , खोंड इथे रानोमाळी
हवी त्यांसी धाग्यांची मोळी
एक उडाला , तमा नसावी
विणत सुटा धाग्यांची जाळी
साहेब , एक धून शोधा नवी
गुणगुणत बसा इथे आंजावर
एकेकाला घ्या फैलावर
मग तक्रार कशाला हवी ?
साहेब ,एक धून शोधा नवी
समर बघुनी तुम्हा दोघांचे
गुणगुणलो मी गाणे माझे
मनाला फुटे नवी पालवी
क्षणात नाहीसे झाले ओझे
बनलो नव्याने कवी
आंजावर राहायचे असेल तर
नक्कीच एक छान धून हवी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
101
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
आयजीच्या जीवावर बायजी उदार ही मराठी म्हण आठवली ! कविता डिसेंट आहे, संबंधितांनी मनावर घेतले तरी शैली (अन् त्रागा) लपेल का नाही सांगता येत नाही.
उत्तरार्ध
In reply to हम्म by वृषभ खोंडे
आमच्या कडे ह्या म्हनिचा उत्तरार्ध पण प्रचलित आहे.
सासूच्या xxxxवर जावई शिलेदार...
समयोचित, सपोर्टिव्ह...
एखादा धागा उडणे
म्हणजे का जग बुडणे?
बंद करून रडणे
पुढे चालणे.... बेतुक्या म्हणे.
धागा उडला, पक्षी बुडलावैरी न…
धागा उडला, पक्षी बुडला
वैरी न राहीला , शेंडा खुडला
शुक्लकाष्ठाने आधीच पिडला.
नवस बोलुनी, देवाला सोडला.
शुभेच्छा
एखादा धागा तुटणे
म्हणजे का धर्म बुडवणे?
करून पतंगी मांजा
जा नवे नभी उडवणे...