Skip to main content

क्षमस्व

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 11/07/2026 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद

क्षमस्व

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3928
प्रतिक्रिया 70

प्रतिक्रिया

जर्मनच काय पण इतर भाषा शिकण्यात हात दिला तो गटे इन्स्टिट्यूटच्या 50languages.com यानेच नावाप्रमाणे पन्नास भाषेचे शंभर धडे. कोणत्याही भाषेतून कोणतीही शिका.  

आणखी एक छान पुस्तक ( हातात मावणारे) जर्मनीत जाणाऱ्या प्रवाशांसाठीही आणले. ग्रामरबिमर नाही थेट कामाची वाक्येच. फोटो नंतर टाकतो.


छान सुरुवात, मीही तीनेक महिने जर्मन शिकलो डुओलिंगो वरून, माईने बृडा ऊंड मेन श्विस्टर, ईश बिन xxx, डू बिस्ट? वगैरे!


ह्याच्यासोबतच पुढे थोडं थोडं जर्मन लोकजीवन अन् संस्कृतीबद्दल पण येऊ दे म्हणजे उगाच आपलं चवीपुरतं मीठ असतं तसं येऊ दे भले पण येऊ दे. एरवी सिग्फ्रीड अन् ब्रूमहिल्डा किंवा ती वाघाच्या पाठीवर रपेट मारणारी पोरगी किंवा गेलाबाजार ऑक्टोबरफेस्ट मधील "ये तो बावा ऐसे हो गया की मु खोला और बीयर की बरसात" असणारे म्युनिक इतकीच काय ती माहिती ! इथल्या समाजात आदेश मानण्याची वृत्ती इतकी जास्त कशी काय भिनली आहे इथे ? जर्मन लोकांना विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर) कमीच असतो एकंदरीत असे म्हणले जाते ते खरे की खोटे ? जर्मनी मधे निर्वासित प्रॉब्लेम किती आहे ? कुठल्या निर्वासित समूहाला सगळ्यात सकारात्मक आणि कुठल्याला नकारात्मक बघितले जाते ? एएफडी मोठी व्हायला त्यांचे अँटी मुस्लिम रेटोरीक कारणीभूत आहे म्हणतात ते खरे आहे का ? अशा कैक अनुत्तरित प्रश्नांना तुमच्या लेखनातून उत्तर मिळेल अशी अपेक्षा करून शुभेच्छा देतो.


In reply to by वृषभ खोंडे

ती वाघाच्या पाठीवर रपेट मारणारी पोरगी

ती ट्रिपल एक्स वाल्याची भैन कार्मेन झांडर काय? ;) त्यो झांडर केज, ही झांंडर कार्मेन. 'वाईल्ड बीस्ट' डॉक्युमेंटरी पिक्चरवाली?

तिच्या वाघाने फैसिलिटील्या एका सत्त्तरीतल्या माणसावर हल्ला केला. पोलीझीने गोळ्या घालून मारला की तो वाघोबा. ह्या मे महिन्यात.

असो. चांगलेच अपडेट ठिवतायसा जनू...

जर्मनी मधे निर्वासित प्रॉब्लेम किती आहे

महायुध्दानंतर ज्या पोलीश ज्यूंना जगात कुठेच आसरा मिळत नव्हता तेंव्हा आपल्या शाहू छत्रपतींनी कोल्हापूरात वलिवडे जवळ त्यांच्यासाठी वसाहत दिली. त्या शाहूंच्या महाराष्ट्रातला मी, एका पोलीश शिक्षिकेकडून जर्मन भाषेचे धडे खुद्द जर्मनीमध्ये घेतोय ह्यापेक्षा काळाचा फेरा अजून काय असू शकतो? 

असो तुम्हाला पडणारे प्रश्न हे कदाचित माझ्या लिखाणातून उत्तरे मिळवू शकतील की नाही हे मी नाही सांगू शकत. काही नवीन प्रश्न निर्माण करु शकलो तर आनंदच आहे.

 


लेखमालेतून जर्मनी समजून घ्यायला आवडेल. मला तर कोणतीही नवीन भाषा शिकण्याचा भरपूर उत्साह असतो, ती पटकन शिकलीही जाते पण संपर्क राहिला नाही की तितक्याच पटकन विसरलीही जाते.

जर्मनीमध्ये संस्कृतचा भरपूर अभ्यास केला जातो म्हणतात, ते खरंय का? 


माझ्या पाहण्यात आलेले जर्मन भाषा शिकवणारे बहुतेक शिक्षक मूळचे जर्मन नव्हते (non-native speakers)... 


ट्रिपल एक्स वाल्याची भैन कार्मेन झांडर काय? ;) त्यो झांडर केज, ही झांंडर कार्मेन. 'वाईल्ड बीस्ट' डॉक्युमेंटरी पिक्चरवाली?

तिच्या वाघाने फैसिलिटील्या एका सत्त्तरीतल्या माणसावर हल्ला केला. पोलीझीने गोळ्या घालून मारला की तो वाघोबा. ह्या मे महिन्यात.

 

 

इतकं पण लेटेस्ट नाही हो भौ, एकंदरीत ही पण एक जुनी लोककथा होती तिची थीम म्हणजे पोरगी वाघावर बसते गावभर फिरते जिथे जाईल तिथे लोक घरात असतात, अन् रपेट मारल्यावर पोरगी वाघाचा पोटात असते असे काहीसे. हॅन्सेल अँड ग्रेटेल, थांबलिना, रापुंझेल अशा बहुतेक सुप्रसिद्ध "फेरी टेल्स" मूलतः जर्मन आहेत/ जर्मन प्रभाव असणाऱ्या आहेत हेवी. एकेकाळी कंपनी जर्मनीला पाठवणार म्हणून हिरीरीने तयारी सुरू केली होती जर्मनची पण आता काय कंपनीने आम्हाला झब्बू दिला आम्ही कंपनीला टाटा केला अन् विषय क्लोज झाला.


In reply to by वृषभ खोंडे

रिगा गावातली टिगा नावाची मुलगी वाघावर स्वार झाली

नंतर मात्र ती वाघाच्या पोटात मावली अशा अर्थाची कथा आहे


In reply to by विजुभाऊ

आह्ह,

ते तर बडबडगीत आहे, 

There was a young lady of Riga,
Who smiled when she rode on a tiger.
They came back from the ride
With the lady inside,
And the smile on the face of the tiger.
पण त्याचा जर्मनीशी काय संबंध? रिगा तर लाटव्हियाची राजधानी आहे आणि समुद्रमार्गे जर्मनीला जवळ असली तरी गाणे इंग्लिश/आयरिश आहे.

In reply to by वृषभ खोंडे

अवांतर :

 

वृषभ खोंडे,

 

बऱ्याच इंग्रजी बालकथा मूळच्या जर्मन आहेत. हिमगौरी आणि सात बुटके ही कथा जर्मन जंगलातली ( ब्लॅकफॉरेस्ट ? ) आहे. ती जरी बालकथा म्हणून प्रचलित झालेली असली तरी तिचा गर्भितार्थ फारफार वेगळा ( व भयानक ) आहे. तो माहित करून घ्यायचा असल्यास हे तेवीसेक मिनिटांचं इंग्रजी चलचित्र पहा म्हणून सुचवेन : https://www.youtube.com/watch?v=BSZkKM_AjU0

 

आ.न.,

-गा.पै.


उत्तम विषय. चार वर्षांपूर्वी जर्मन शिकायची सुरुवात Duolingo वर केली होती. एक वर्षाने फ्रेंचकडे वळलो. भाषेतील प्रगतीसाठी शुभेच्छा. मुळात इथून जर्मनीत पोचण्यासाठी काय कशी करिअर तयारी करावी याचीही माहिती आल्यास आता स्वतःला उपयोग नसला तरी पुढच्या पिढीला होईल.


In reply to by गवि

तुम्ही असला हुंब प्रॅक्टिकल सल्ला का देताय? 

 

मस्त खुसखुशीत लिहिले आहे,  नुसत्या त्यातल्या चांगल्या नर्मविनोदासाठी अभ्याने भरपूर लिहायला पाहिजे.


In reply to by हणमंतअण्णा शंक…

हुंब... हा हा हा.. जुन्या आठवणी जाग्या केल्यात. कर्नाटक सीमेवर खूप ऐकलेला शब्द. धन्यवाद..


In reply to by गवि

@गविराज,

कधी कधी मला नवल वाटतं, हाच माणूस ब्राऊ आणि गंदे अंकलसारखं लिखाण लिहायचा, आमच्या सारख्या चिल्लरांना इन्स्पायर करायचा. 

आता म्हणतोय जर्मनीतल्या करियर संधी वर लिही. तुम्ही चाळीसपन्नास वर्षापूर्वी आमच्या पुल्देस्पांड्यांनाही सुचवायला कमी केले नसते "पूर्वरंग काय लिहिता? करीयररंग लिहा" असो... विनोदाचा अन अतिशयोक्तीचा भाग सोडून द्या. ज्यांना जर्मनीत यायचे त्यांना माझी किंवा माझ्या मार्गदर्शनाची गरज नाहिये. त्यांचे ते येतात तिकडे विश्वगुरु असतानाही.  आता परवाच आपल्या नाखुकाकाचा पोरगा येऊन भेटून गेला. म्हण्ला एमेस करतोय, मी म्हणलो कर बाबा. आपल्याला काय कळत नाही त्यातले. सुरक्षित आणि संपन्न देशात हैस. घे पुरवून ही हौस. 

बाकी माझ्या करीयरबद्दल म्हणता तर जर्मन भाषेत कथा लिहाव्या म्हणतोय. नाही खपल्या तर डिझायनिंग हायेच की...;)


In reply to by अभ्या..

त्याचं असं आहे की पन्नाशी ओलांडताना आणि पुढील पिढी करिअरच्या उंबरठ्यावर उभी असताना कुठे कुठे चांगल्या संधी आहेत ते पाहणे आपोआप प्रोग्राम होत जाते. मी जे तीन वेळा जर्मनीत मर्यादित काळासाठी गेलो त्यात मला हायडेलबर्ग हे मुख्यतः शैक्षणिक शहर अत्यंत आवडले होते. काश अशा ठिकाणी आपण नाही तर आपली पुढील पिढी शिकू शकावी.. त्यानंतर अनेकदा तेथील संधींच्या बद्दल खूप ऐकलं. एक नवीन डेस्टिनेशन म्हणून. इंग्रजीत शिक्षण उपलब्ध आणि हल्ली चर्चेत आलेलं opportunity card हेही उत्सुकता वाढवणारं. पण एकूण ही चौकशी अगदीच इनव्हॅलिड होती, विशेषतः माझ्या लेखन पार्श्वभूमीवर, हे कळलं. आता नाही विचारणार. तुझं लिखाण पूर्वीपासून अत्यंत आवडत आलं आहे. यापुढे फक्त विषयाला धरून बोलणे ठेवण्याकडे नक्की लक्ष असेल. पुढील ललित लेखनासाठी शुभेच्छा.


In reply to by गवि

तुम्ही राग मानतच नाहीत गविराज, हेच तर मला आवडतं.

संधी हुडकायचा प्रोग्राम कदाचित थोड्या वर्षात माझाही ॲक्टीव्हेट होइल. (तसा काही असला तर) पण त्याच्या त्याने हुडकल्या तर मला जास्त आनंद होईल. अगदी साधा औस्बिल्डुंग (व्यावसायिक प्रशिक्षण) जरी केले तरी हरकत नाही. अहो कसले थाटात असतात ते. मस्त जाडजूड कापडाच्या ढीगभर खिशे असणाऱ्या थ्री फोर्थ, टीशर्ट आणि सेफ्टी शूज घातलेले मस्त मजेत वावरत असतात. इतकी व्हरायटी मिळते अर्बाईटवेअरची की बस्स. त्यांचे खास फोनही असतात. घड्याळे असतात, त्यांच्यासाठी बनवलेल्या इ सायकलीपासून पार मर्सिडिसपर्यंत व्हॅन्स असतात. इथेच जन्मलो असतो तर तेच झालो असतो. ;)

असो. हायडेलबर्ग उनिव्हर्सिटी अप्रतिम आहेच पण ही तर आम्हा प्रिंटींगवाल्यांची पंढरी. हायडेलबर्गची ऑफसेट मशीन्स म्हणजे प्रिंटींगमधले "गुटेनबर्गाने घातला पाया, हायडेलबर्ग झालासे कळस" ही म्हण सार्थ करणारी. माझे स्वप्न होते एके काळी इथे उच्च शिक्षण घ्यायचे. दुर्दैवाने आता ते दुकान बंद झाले. 

इंग्रजी शिक्षण उपलब्ध आहे पण ते भारतातिल इंग्रजी शिक्षणापेक्षा महाग आहे. किंबहुना सगळ्यातच महाग आहे. 

ऑपॉर्ट्युनिटी कार्ट ही चांगली संकल्पना आहे पण जास्त जर्मनांसाठी. सो त्याबाबत जास्त काही बोलत नाही.

भेटूच...


आपल्याला तेच तेच ऐकुन कितीतरी गोष्टी माहित झालेल्या अस्तात आणि स्टिरिओटाइप देखिल डोक्यात पक्के असतात.

 

मात्र तरीही औट्सायडर ने एका समाजाकडे पाहिल्यावर ज्या संगती विसंगती दिसतात त्या वाचायला नेहमीच मजा येते. अर्थात कधी कधी स्टिरिओटाइपच्या पलिक्डे आणि अलिकडे किंवा बरोबर त्याच मुद्द्यावर देखील अनोखे काहीतरी माहित नसलेले सापडू शकते.

 

त्यामुळे अजून लिहा.

 

दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या क्षेत्राविषयी आणि इन्ट्रेस्ट विषयी देखिल लिहा, प्रिंटिंग, फाइन उपयोजित कला वगैरे या कामाबद्दल आणि एकूण डिजाइन, अस्थेटिक याविषयी जर्मन लोक, कम्युनिस्ट राजवटी यांच्याबद्दल पण तुमची निरिक्षणे मांडा.. विझुअल, रंग अशा अंगाने..

 


In reply to by हणमंतअण्णा शंक…

दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या क्षेत्राविषयी आणि इन्ट्रेस्ट विषयी देखिल लिहा, प्रिंटिंग, फाइन उपयोजित कला वगैरे या कामाबद्दल आणि एकूण डिजाइन, अस्थेटिक याविषयी जर्मन लोक, कम्युनिस्ट राजवटी यांच्याबद्दल पण तुमची निरिक्षणे मांडा.. विझुअल, रंग अशा अंगाने..

 

हं.. 


अभ्या,

लिखाण आवडलं. अजून पटपट येऊ दे. जर्मन लोक हे कमी भावनिक असतात असे मानले जाते. आणि हे कुठेतरी त्यांच्या भाषेत असणार. मध्ये एक लल्लनटॉपची डॉक्युमेंटरी पाहिली होती पिराहा या भाषेबद्दल. डॅनिअल एव्हरेट नावाच्या अमेरिकन माणसाबाबत. ती भाषा म्हणे भाषाशास्त्राचे (युनिफाईड ग्रामर थिअरी वगैरे) सगळे नियम मोडीत काढणारी आहे. जर्मन भाषेच्या गमती लिहा.
तसं खरंच आहे का? बाकी गड्या आपला गांव बरा, असं कधी वाटतं का?

 


In reply to by स्वधर्म

थ्यांक्स स्वधर्ममालक,

माझ्या आतापर्यंतच्या स्वल्प आकलनानुसार कमी भावनिक वगैरे वाटले नाहीत. टिपिकल आपल्या जुन्या गावात जशी माणसे तशीच. तसेच स्वभाव, गुण, सवयी इथल्यांच्या. 

भले प्रचंड संपन्नता, सुबत्ता, तंत्रज्ञान आणि शिस्त त्यांच्या वाट्याला आलेले असले/त्यांनी मिळवले असेच म्हणावे लागेल, तरी नवीन गोष्टींकडे संशयाने बघणे, कष्ट करत राहणे, आपल्या शरीरासह प्रत्येकच गोष्टीला चालते ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे भारी आहे यांचे.

पिराहाचा एपिसोड पाहिलाय मी, तो बहुधा खबरहाट वाल्यांचा आहे.

बाकी भाषा आणी स्वभाव हे येतीलच आगामी भागात हळूहळू.

आणि "गड्या आपला गांव बरा" असं नेहमीच नाही प्रत्येक क्षणी वाटते. पण तोही मेंदूचा एक कप्पाच आहे. बाकी कप्प्यांना काय वाटते त्यासाठी तर लेखमाला. :)


In reply to by अभ्या..

अजून भाषेविषयी. भाषा ही फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. गणित व विज्ञानापेक्षा. एल एल एम मुळे ते आणखीनच जाणवतंय.

मला एक उत्सुकता आहे - जर्मन भाषेत निर्जीव वस्तूंना लिंग असते का? शिवाय आपले क्रियापद कर्माच्या लिंगानुसार चालते. आपल्या भाषेत यामुळे फार अवघडपणा आला आहे. नवीन शिकणाऱ्यांना वस्तूचे लिंग समजतच नाही, ना कुठे त्याची डिकशनरीसारखी सूची आहे. नवीन मराठी शिकणारे तो बाटली फुटला, ती टेबल पडली म्हणतात व त्यांना लिंग कसे समजवायचे ते समजत नाही. ते फक्त ऐकूनच समजते. 


 
 
फार फार वर्षांपूर्वी एका अनावर झटक्यात डॉईच शिकून ग्योथंने लिहिलेलं मूळ जर्मन Faust: Eine Tragödie  वाचायचं असं ठरवून जर्मन शिकायला सुरुवात केलेली. त्यासाठी शिंग मोडून वासरांत जाऊन बसलो. क्लिष्ट व्याकरणाशी झटापटी करून "बे आईन्स" केलं अन् मग तो उत्साह अनेक कारणांनी मागे पडल्यावर म्हटलं आपण आपलं Faust च्या इंग्रजी भाषांतरावर भागवूया.
 
आता जे शिकलो ते ही विसरलो पण जर्मन भाषासुंदरीशी झालेल्या ताटातुटीवरच जणू लिहिलेली Auf Wiedersehen ही James Lowell ची एक तरल इंग्रजी कविता कायमची लक्षात राहिली.
 
The little gate was reached at last,
Half hid in lilacs down the lane;
She pushed it wide, and, as she past,
A wistful look she backward cast,
And said,--'Auf wiedersehen!'

With hand on latch, a vision white
Lingered reluctant, and again
Half doubting if she did aright,
Soft as the dews that fell that night,
She said,--'Auf wiedersehen!'

The lamp's clear gleam flits up the stair;
I linger in delicious pain;
Ah, in that chamber, whose rich air
To breathe in thought I scarcely dare,
Thinks she,--'Auf wiedersehen?' ...

'Tis thirteen years; once more I press
The turf that silences the lane;
I hear the rustle of her dress,
I smell the lilacs, and--ah, yes,
I hear 'Auf wiedersehen!'

Sweet piece of bashful maiden art!
The English words had seemed too fain,
But these--they drew us heart to heart,
Yet held us tenderly apart;
She said, 'Auf wiedersehen!'

In reply to by अनन्त्_यात्री

वा, सुंदर कविता आहे. यावरून ही आनंदी, खेळकर कविता आठवली, A Subaltern's Love Song, by John Betjeman.


खूपच छान. 

जर्मनीतील विविध अनुभवांविषयी खास चित्रकाराच्या नजरेतून आणखी खूप काही लिहावे आणि भरपूर फोटो टाकावेत, असे सुचवतो. चित्रकाराची दृष्टी वेगळी आणि जास्त सूक्ष्म, सखोल असते : जे देखे कवी - तेही चित्रकाराला दिसत असते. 

पुढील सर्व भागांच्या प्रतीक्षेत.


जर्मनीमध्ये स्वागत.  बऱ्याच वर्षांनी मिपा उघडलं आणि योगायोगाने हा धागा दिसला. याच नावाने फार पूर्वी मी लेख लिहीला होता आणि त्यानंतरही काही या सिरीज मधले भाग लिहीले जे इथे नाहीत पण माझ्या ब्लॉगवर आहेत आणि सोशल मिडियावर जर्मन वर्मन वापरून अजूनही काही कंटेंट करत असते. लेखाच्या नावावर माझा कॉपीराइट नसला, तरी याच नावाने याच संस्थळावर पूर्वीचा पहिला माझा लेख आहे, त्यामुळे जमलं तर तुमच्या लेखमालिकेसाठी वेगळं नाव वापरावं असं वाटतं. अर्थात निर्णय तुमचा असेल, फक्त सुचवणी आहे.  माझ्या लेखाची लिंक - https://www.misalpav.com/story/31414


In reply to by मधुरा देशपांडे

अरे व्वा.

तरी मला आठवल्या सारखे होत होते कुणी अजून मिपाकर देशपांडे आहेत जर्मनी मध्ये .

असो, तुमचा लेख वाचला. अप्रतिम आहे.

तुमच्या तुलनेत माझा अनुभव अगदी थोडका आहे. त्यात सुरुवात फेक्त ऍडजस्ट होण्यात महिने गेले.

ह्याच प्रतिसादात मी नाव बदल विनंती पेक्षा तुम्हालाच तुमच्या ब्लॉग वारील लेख ह्याच नावाने क्रमशः प्रसािद्ध करावेत अशी विनंती करतो. तुमच्या त्या लेखांचा मला आणि संमस्त मिपाकरांना उपयोग होईल. 

माझा लेख उडवावा. तसेही इथे माझ्या लेखनाचे आजकाल काय होते हे कळले आहे. माझी इच्छा नाही, लेखन ही फारसे झालेले नाही.

धन्यवाद.

आपल्या लेखमालेच्या प्रतिकशेत......


In reply to by अभ्या..

तुमचा लेख कशाला उडवता? प्रत्येकाचे अनुभव वेगळे, ते तुम्हीही लिहाच की. नाव बदलणे पुरेसे आहे. माझे लेख इथे आणण्याबद्द्ल - सध्या तरी इथे आणणे होणार नाही. 


@ केवळ अभ्या यांसी,

 

मी येथे येणार नव्हतो. पण लेखाचे शिर्षक बदलण्याचा सल्ला देणारी अवास्तव, न्याय्य नसलेली मागणी पाहून आश्चर्य वाटले.

 

Direct & Immediate Answer

होय, वेगवेगळे लेखक एकाच नावाचे (शिर्षकाचे) स्वतंत्र पुस्तके लिहू शकतात. पुस्तकाच्या नावावर संपूर्ण मालकी किंवा कॉपीराइट नसतो. मात्र, वाचकांमध्ये गोंधळ उडू नये म्हणून पुस्तकाचा विषय, आतील आशय आणि मुख्य कथा पूर्णपणे वेगळी असणे आवश्यक असते. [1]

कायदेशीर नियम आणि बाबी

कॉपीराइट कायदा पुस्तकाच्या आतील मजकुराला किंवा शब्दांना लागू होतो, संपूर्ण पुस्तकाच्या नावावर (शिर्षकावर) नाही. [1]
 
  • स्वतंत्र लेखन: दोन वेगवेगळ्या लेखकांनी योगायोगाने किंवा स्वतःच्या कल्पनेने एकाच नावाच्या दोन वेगळ्या कादंबऱ्या किंवा पुस्तके लिहिली, तर ते कायदेशीररित्या बेकायदेशीर ठरत नाही.
  • गोंधळ टाळणे: दोन्ही पुस्तकांमधील आशय वेगळा असावा. एका प्रसिद्ध पुस्तकाचे नाव वापरून वाचकांची दिशाभूल करणे किंवा फसवणूक करणे चुकीचे ठरू शकते. [1]
  • ट्रेडमार्क (Trademark): जर एखाद्या पुस्तकाचे नाव किंवा ब्रँड नावासारखा ट्रेडमार्क नोंदवला गेला असेल (जसे की एखादी मोठी मालिका किंवा फ्रँचायझी), तर मात्र ते नाव दुसरा लेखक वापरू शकत नाही.

दोन शक्यता

 
  • वेगवेगळे लेखक, सारखे नाव: दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी स्वतंत्रपणे आपल्या कल्पनेने सारख्याच नावाचे पुस्तक प्रकाशित करणे शक्य आहे.
  • एकत्रित लेखन: अनेक लेखकांनी मिळून एकच पुस्तक एकाच नावाने लिहिणे याला सहलेखन (Co-writing) किंवा संकलन (Anthology) म्हणतात. [1, 2, 3]
तुम्हाला एकाच नावाच्या विशिष्ट पुस्तकाबद्दल माहिती हवी आहे का, किंवा तुम्ही स्वतः पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहात?


 

 
 
होय, मराठी साहित्यात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे वेगवेगळ्या लेखकांनी एकाच नावाचे (शिर्षकाचे) पुस्तक किंवा नाटक लिहिले आहे. मराठीमध्ये जुन्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. [1]
खालील तक्त्यावरून तुम्हाला स्पष्ट समजेल:

एकाच नावाचे पुस्तक / नाटक आणि त्यांचे वेगवेगळे लेखक

पुस्तकाचे / नाटकाचे नावलेखक १लेखक २माहिती / संदर्भ
एकच प्यालाराम गणेश गडकरीडॉ. शशी पाटीलराम गणेश गडकरी यांचे 'एकच प्याला' हे अत्यंत प्रसिद्ध जुने नाटक आहे. तर डॉ. शशी पाटील यांनी निसर्गोपचारावर 'एकच पेला शिवाम्बूचा' या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
राऊना. सं. इनामदारडॉ. सुमती देवस्थळेना. सं. इनामदार यांची 'राऊ' ही बाजीराव मस्तानीवरील अत्यंत लोकप्रिय कादंबरी आहे. तर डॉ. सुमती देवस्थळे यांनीही 'राऊ' नावाचे चरित्र व समीक्षात्मक पुस्तक लिहिले आहे.
मृत्युंजयशिवाजी सावंतसदाशिव आठवलेशिवाजी सावंत यांची 'मृत्युंजय' ही कर्णाच्या जीवनावरील अजरामर कादंबरी आहे. मात्र, सदाशिव आठवले यांनीही 'मृत्युंजय' याच नावाचे एक ऐतिहासिक पुस्तक लिहिले आहे.
गीतारहस्यलोकमान्य बाळ गंगाधर टिळकअनेक संत व आधुनिक लेखकलोकमान्य टिळकांचे 'श्रीमद्भगवद्गीतारहस्य' (गीतारहस्य) हे अत्यंत प्रसिद्ध आहे. परंतु, गीतेचे 'रहस्य' सांगणारी याच नावाशी साधर्म्य असणारी अनेक छोटी-मोठी पुस्तके इतर लेखकांनीही लिहिली आहेत.
शामची आईसाने गुरुजीरामदास फुटाणे (कविता/पॅरडी)मूळ कादंबरी साने गुरुजींची आहे. परंतु, अनेक आधुनिक कवींनी किंवा लेखकांनी याच नावाचा वापर करून उपरोधात्मक (Satire) किंवा आधुनिक काळावर आधारित लेख आणि कवितासंग्रह प्रसिद्ध केले आहेत.

असे का होते?

 
  1. ऐतिहासिक किंवा पौराणिक विषय: जेव्हा दोन लेखक एकाच ऐतिहासिक पात्रावर (उदा. बाजीराव, कर्ण, किंवा शिवाजी महाराज) लिहितात, तेव्हा अनेकदा पुस्तकाचे नाव सारखे किंवा अगदी जवळ जाणारे असू शकते. [1]
  2. साधारण शब्द किंवा म्हणी: 'किमयागार', 'पार्टनर', 'सजा', 'अनुभव' यांसारखे सामान्य शब्द अनेक लेखकांच्या पुस्तकांचे नाव असू शकतात, कारण अशा शब्दांवर कोणाचाही एकाधिकार नसतो. [1, 2]
तुम्ही स्वतः एखाद्या विशिष्ट नावाचे पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहात का? तुमच्या मनात कोणते नाव किंवा विषय असेल, तर सांगा, आपण त्यावर अधिक चर्चा करू शकतो!


 

 
 
जाऊद्या अभ्या. 
 
तसेही लेखिका, ते देखील परदेशातील म्हणजे त्यांचे म्हणणे योग्यच असते. 
 
लेख उडवला ते चांगलेच केले. 
 
आपले दिवस गेले. ओळख असणार्यांचे दिवस आले.

In reply to by पाषाणभेद

मी आधीच लिहिले होते की माझा लेखाच्या टायटलवर कॉपीराइट नाही, ही वर तुम्ही दिलेली माहिती किंवा कॉपीराइट संदर्भातली माहिती आधी शोधली होती, त्यामुळेच कोणताही दावा केलेला नव्हता. विनंती केली होती, आग्रह नाही. अभ्या.. यांना लेख डिलीट करायला सुद्धा मी सांगितले नाही. प्रत्येकाचे अनुभव त्यांनी लिहावे की, उलट मीही वाचेन, लेखच काय पुस्तकही लिहावे. त्यांनी एवढं लगेच टोकाला जाऊन डिलीट करणे हे मलाही समजले नाही. वरच्या माझ्या दोन्ही प्रतिसादात मी हेच सांगितले आहे. तरीही मी आरोप केले आहेत असा तुमच्या प्रतिसादाचा रोख दिसतो आहे, त्याला मी काहीच करु शकत नाही. बाकी मी परदेशात राहते म्हणूनही तुमची काही मतं आहेत त्यालाही मी काही करू शकत नाही.  


In reply to by पाषाणभेद

एक राहीले. अभ्या यांनी लेख डिलीट केला आहे. मी तर माझे अकाउंटच डिलीट करायची मागणी केली होती. माझ्या हातात अकाउंट डिलीट करायचे असते तर हे दोन तिन प्रतिसादही लिहील्या गेले नसते.

 

 


In reply to by मधुरा देशपांडे

वरील संदेशाशी सहमत आहे. पूर्ण माहिती न घेता पाषाणभेद यांनी निष्कर्ष काढले आहेत.

-गा.पै.


In reply to by मधुरा देशपांडे

माझा लेखाच्या टायटलवर कॉपीराइट नाही, ही वर तुम्ही दिलेली माहिती किंवा कॉपीराइट संदर्भातली माहिती आधी शोधली होती, त्यामुळेच कोणताही दावा केलेला नव्हता. विनंती केली होती, आग्रह नाही. अभ्या.. यांना लेख डिलीट करायला सुद्धा मी सांगितले नाही. प्रत्येकाचे अनुभव त्यांनी लिहावे की, उलट मीही वाचेन, लेखच काय पुस्तकही लिहावे. त्यांनी एवढं लगेच टोकाला जाऊन डिलीट करणे हे मलाही समजले नाही.

आता टोकाला जाणे म्हणजे काय?

सद्याचा एक फार फेमस झालेला शब्द 'क्रोनॉलॉजी'.

मला दिसलेला, जाणवलेला घटनाक्रम मी लिहितो. काही चूक असल्यास अवश्य सांगावी.

तर आता क्रोनॉलॉजी समझिये. 

.

मधुराताईंनी सुमारे ११ वर्षापूर्वी 'जर्मन वर्मन' हा धागा लिहिला. मी वाचला असेल सुध्दा पण टायटल हेच होते हे माझ्या लक्षात नव्हते.

माझ्या माहितीप्रमाणे त्या २०१७ पर्यंत वगैरे मिपावर लिहित होत्या, त्यानंतर वाचनमात्र वगैरे असू शकतात.

मी ह्याच नावाचा धागा लिहिला ११ जुलै २०२६ रोजी, म्हणजे त्यांचा प्रतिसाद येण्याच्या जवळपास २५ दिवस आधी.

त्यांनी योगायोगाने ५ ऑगस्टला मिपा उघडले आणि त्यांना हा धागा दिसला आणि त्यांनी प्रतिसाद दिला.

.

संमांतर कालात मिपावर चालू घडामोडी नावाचे धागे प्रत्येक महिन्याला निघत जातात, कुणीतरी उत्साही मिपाकर एक तारखेला तो धागा काढतो आणि तो धागा चालत जातो. चालू घडामोडी धाग्याला मिळणारी प्रतिसादसंख्या इतर लेखनापेक्षा जास्त असते ही वस्तुस्थिती आहे. बरं हा धागा कुणी काढायचा/त्यात काय लिहायचे ह्याचा काही लिखित नियम नाही. ह्याआधी मीही एकदा एका महिन्याचा धागा काढलेला आहे.

ह्या ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला कुणीच धागा काढलेला दिसला नाही म्हणून मी दोन ऑगस्ट रोजी चालू घडामोडी २०२६ हा धागा काढला. तरीही काही सदस्यांनी जुन्या जुलै महिन्याच्या धाग्यातच प्रतिसाद देणे चालू ठेवले, अर्थात उपप्रतिसाद देणे वगैरे गोष्टीत ही बाब चालूनही जाते 

पण...

 त्यात श्रीगुरुजी हे सदस्य जुलै महिन्याच्या धाग्याचे नामकरण जुलै ऑगस्ट २०२६ चालू घडामोडी करता येईल का अशी विचारणा दि. ४ ऑगस्ट रोजी करतात.  

त्यांना सदस्य 'ऑगस्ट २०२६ घडामोडीचा' धागा निघाला आहे असे तिथेच निदर्शनास आणून देतात. 

तरीही दि. ५ ऑगस्ट रोजी कांदालिंबू हे सदस्य ऑगस्ट महिन्याचा धागा तयार करुन जुलै महिन्याच्या धाग्यात त्याची लिंकही देतात. 

.

ह्याचा अर्थ मी उलगडून सांगावा लागतो काय? 

बरं ह्या अशा वागण्यातील नामसाधर्म्या ला लेजिटमसी मिळवण्यासाठी ११ वर्षापूर्वीच्या धाग्याचा वापर? 

.

हे कारण ह्या धाग्यातील कंटेंट उडवण्यामागे. त्यात इगो वगैरे काही नाही. मी इव्हन मधुराताईंना विनंतीही केलेली की तुम्ही ब्लॉगवर लिहिले आहे ते इथेही पुढे प्रकाशित करा, तर तशी इच्छा त्यांची नाहीये. त्यानी त्याला नकार देत फेसबुक किंवा इन्स्टाला हुडकण्यासाठी मार्ग दिला आहे.

प्रतिसाद हे महत्त्वाचे असतातच प्रत्येक लेखकाला, एक किंचित लेखक म्हणून मलाही त्याची भूक आहे पण ह्यासाठी मी कधीही आपलेच लेख पुन्हा पुन्हा वर काढायचे, स्वत:च प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देत धागा वर ठेवायचा, डूआयडी काढून स्वत:चेच धागे चर्चेत ठेवायचे, कंपूना सांगत त्यांच्याकरवी धागे जागे ठेवायचे, त्याच्या लिंका देत रिक्षा फिरवायच्या असले प्रकार कधीही केले नाहीत. माझ्या लेखनाला जितके आणि जे काही प्रतिसाद होते ते माझ्या हक्काचे होते आणि नैतिक मार्गाने मिळवले होते. 

उगी कुणाचे तर स्कोर सेटलिंग करण्यासाठी जिंदगीत कधी जिथे फिरकलो नाही तिथे "वा वा वा काय लिहिलेय" करत जाण्याइतका मूर्ख मी नाही.

राजकारणाच्या धाग्यांना जास्त प्रतिसाद्संख्या लाभते तो मोठा आकडा माझ्या नावापुढे लागावा असली भूक मला तेव्हाही नव्हती, आताही नाही.  

.

तरीही एकाने लिहिलेल्या धाग्यावर न लिहिता दुसरीकडे लिहा असे काही सदस्य कसे सुचवू शकतात? ही एक प्रकारच्या बहिष्काराचीच भाषा नव्हे काय?

राहता रहिला कुणी लिहायचे आणि कसे, हे ठरवायचा पूर्ण अधिकार मालक आणि संपादक मंडळाला आहे. आधी बऱ्याचदा सांगूनही पुन्हा नमूद करु इच्छितो की मी स्वत: संपादक नाहिये, नव्हतो. हेही का सांगतोय तर पुन्हा मला फेवर असतो असा कुणाचा समज नसावा म्हणून.

.

बाकी सगळे समजायला मिपाकर सूज्ञ आहेतच. संपादक/मालक ह्यांनाही ही पोहोच.

कळावे.

 

 


In reply to by अभ्या..

या बाकी कोणत्याही घडामोडी, त्यावरचे धागे त्यातले नामबदल, ती पार्श्वाभूमी याबद्द्ल मला काहीही माहिती नाही. यात उल्लेख आला आहे त्या कोणत्याही आयडीशी माझा कोणताही संपर्क नाही. मिपावर तीन चार महिन्यातून एखाद्या वेळी, त्यात यावेळी हे दिसलं म्हणून लॉगइन केलं एवढंच. स्कोर सेटलिंग वगैरे काहीही मला करायचे नाही.  इति लेखनसीमा. 


In reply to by मधुरा देशपांडे

तुमचा काही दोष नाही👍तुम्ही नक्की इथे नवनवीन   लिहीत रहा 💐


In reply to by अभ्या..

अरे बापरे हे कारण आहे तर 🙄

मी चालू घडामोडीकडे अजिबात पाहत नाही, तेव्हा इतकं घडलंय हे माहितीच नव्हतं. पण चालू घडामोडी आम्हीच लिहू /सुरु करू तर खरं हे चुकीचे आहे.

बरं ह्या अशा वागण्यातील नामसाधर्म्या ला लेजिटमसी मिळवण्यासाठी ११ वर्षापूर्वीच्या धाग्याचा वापर? 

हे ज्यांनी केले त्यांना इतर मिपाची/मिपाकारांची काळजी नाहीये का? खुप चुकीचे आहे.

हसतखेळत वातावरण पाहिजे, मिपा विरंगुळा हवा. इथे येऊन टेन्शन/अपमान कोणाला आवडेल?

पण तुम्ही(अभ्या) नाव बदलून पुन्हा लेखन इथे द्यावे ही विनंती 🙏


In reply to by अभ्या..

ही एक प्रकारच्या बहिष्काराचीच भाषा नव्हे काय?

 

माझी ललित लिहिण्याची सेटिंग बदलली अशाने. ठीक आहे, प्रत्येक संस्थळाचे आपले एक स्वरूप असते, दुर्दैवाने मिसळपाव आखाडा आहे असे पर्सेप्शन तयार होते आहे त्याला निरुपाय आहे, कारण ह्या बहिष्कारी तंत्राला जाब विचारणारे कोणी नाही. 

मला काय, मला फक्त (संसदीय भाषिक अन् संस्कारिक मर्यादेत) व्यक्त व्हायचे आहे, आता ते कोणाला कसे वाटेल हा ज्याचा त्याचा प्रश्न पण भाषिक शुध्दीची ग्वाही मी देतो. बाकी मी काय बोलणार 

 

(बाळशास्त्री) खोंडे


लेखन कॉपी करुन ठेवलं असेल तर, लेखन पुन्हा टाका. 
लेखन नव्हतं काढायला पाहिजे. 

 

-दिलीप बिरुटे


पण लेखाचे शिर्षक बदलण्याचा सल्ला देणारी अवास्तव, न्याय्य नसलेली मागणी पाहून आश्चर्य वाटले.

 

योगायोगाने मधुरा ताई आणि श्री अभ्या यांच्या लेखाचे नाव एकच आले तर श्री अभ्या  यांनी नावात किंचित बदल करा असे सांगण्यात काय चूक आहे?

माझ्या कडे एकाच नावाचे दोन रुग्ण आले तर मी त्यांना दोघात गोंधळ होऊ नये म्हणून किंचित बदल करायला सुचवतो. 
उदा  प्रियांका पाटील या नावाच्या दोन मुली माझ्या कडे गरोदर पणा च्या सोनोग्राफी साठी आल्या. आणि पहिलीचे नाव प्रियांका पाटील अगोदरच लिहिले गेलेले असेल तर  दुसरीला प्रियांका अ  पाटील (अविनाश त्यांच्या नवऱ्याचे नाव ) असे लिहिण्यास सुचवतो. ( सोनोग्राफी उपकरणात नंतर नाव बदलता येत नाही)

यात इगो किंवा अहंभाव असण्याचे काय कारण? हि मागणी काही अवास्तव नाही  किंवा त्यात अन्याय झाल्याची भावना यायचं कारण  नाही.

अभ्या यांनी जर्मन वर्मन हा लेख जर्मन वर्मन (अभ्या) असा ( किंवा तत्सम) शीर्षकात किंचित बदल करून लेख मालिका पुढे चालू ठेवायला हरकत नाही.

यात केवळ योगायोग दिसतो आहे कुणाचा काहीही दुसरा हेतू दिसत नाही.

पा भे केवळ राईचा पर्वत करत आहेत.      

आपले दिवस गेले. ओळख असणार्यांचे दिवस आले.

मी तर माझे अकाउंटच डिलीट करायची मागणी केली होती. माझ्या हातात अकाउंट डिलीट करायचे असते तर हे दोन तिन प्रतिसादही लिहील्या गेले नसते.

आपलं धुणं वेगळा धागा काढून धुवा कि.

(योगायोगाने एकच शीर्षक असलेल्या) दोन चांगल्या लेखांचा विचका कशासाठी करताय? 

 

 


In reply to by सुबोध खरे

त्यांनी आधी मला नवीन आयडी म्हणून ट्रोल करणे सुरू केले, नंतर नंतर त्याची पातळी अतिरेकी घसरली, वाटेल ते बोलू लागले धागे काढून त्यात मी एकदा म्हणले की संपादक लक्ष द्या आणि त्यांचे धागे उडाले तेव्हापासून ते असेच सैरभैर झालेत. त्यांना मिसळपाव कायमचे सोडायचे होते (असे ते म्हणाले आहेत) तरीही ते इथे येऊन वैयक्तिक धुणी धूत आहेत. त्यांना लवकर बरे व्हावे ह्यासाठी शुभेच्छा.

 

(वार्ताहर) खोंड्या


शेजारच्य्या पोराचे आणि बाईंच्या पोराचे नाव सेम असेल तर म्हणतील , मझ्या पोराचे नाव आधी ठेवले आहे , तुमच्या पोराचे नाव बदला !

 


In reply to by कपिलमुनी

आणी गंंमत म्हणजे नंतर पोर झालेले आपल्या पोराला मारुन टाकतात..... घोर कलियुग ते हेच....  :)

मागणी करणारे शहाणे... मानणारे शतशहाणे.... :)


In reply to by राज जोशी

बारशातली आत्या बाई आली !

मिपाने नवीन  आय डी द्यायला  चालू केलेले दिसते !

 


In reply to by कपिलमुनी

शेजारच्य्या पोराचे आणि बाईंच्या पोराचे नाव सेम असेल तर म्हणतील , मझ्या पोराचे नाव आधी ठेवले आहे , तुमच्या पोराचे नाव बदला !

 

हा प्रकार आमच्या घरी खरोखर झालेला आहे; आणि त्यात मी व माझा सक्खा मामेभाऊ आहोत!

माझे नाव खरंतर लसूण ठेवायचे ठरले होते कारण माझ्या मोठ्या भावंडांच्या नावांशी ते साजेशे होते. पण माझा एक मामेभाऊ माझ्यापेक्षा पंधरा दिवस आधी जन्मला व मामा मामींनी किंवा त्याच्या दुसऱ्या आत्याने (माझ्या आईने नव्हे!) त्याचे नाव कांदा ठेवले. नंतर मला कझिन्सची नावे एकसारखी नकोत म्हणून कांदा हे नाव मिळाले. तरीही माझी आई व इतर काही मोजके लोक्स मला काही वेळा लसूण म्हणूनच बोलावतात.

- (अडजस्टमेन्ट मधून नाव मिळालेला) कांदा लिंबू 


In reply to by कांदा लिंबू

मामा मामींनी किंवा त्याच्या दुसऱ्या आत्याने (माझ्या आईने नव्हे!) त्याचे नाव लसूण असे ठेवले. 


खरंतर मिपावर शक्यतो वादापासून दूर राहायचं व लिहीलं तर सकारात्मकच (टीका/सुधारणा सुचविली तरी) हे मी काही काळपासून स्वतावर घालून घेतलेले नियम. पण आज श्री. अभ्या यांच्याबाबत जे घडले आहे, ते वाचल्यावर लिहील्यावाचून राहावत नाही.

सगळ्यात प्रथम कोणत्याही लेखकाने/लेखिकेने  कॉपीराईट नसताना देखील एखाद्याला शीर्षकात बदल करायला सुचवणे हे योग्य आहे का? कारण ज्या गोष्टीवर आपला अधिकार नाही त्या गोष्टीची मालकी दुसऱ्याकडे असू नये असे सांगण्याारखेच आहे हे. मला हे मान्य आहे की आपले लेखन कोणी कॉपी करू नये हे वाटणे नैसर्गिकच. परंतु शीर्षकही वापरू नये असे म्हणणे मला वाटते की हे अयोग्य  आहे. जेव्हा की त्याबाबत कोणताही कॉपीराईट घेतलेला नाही किंवा स्वतःच्या लेखात सुद्धा तसे काही स्पष्टपणे म्हटलेले नाही. त्यामुळे मला स्वतःला वाटते की श्री अभ्या यांनी याबाबत काहीही बदल करण्याची खरंतर गरजच नव्हती. कारण लेखिकेने देखील तसे काही म्हणले नव्हते. पण एखाद्या वेळेस काही सुचवणे हे देखील एखाद्या नैतिकतेचे पालन करणाऱ्या माणसावर नैतिकदृष्ट्या बंधनकारक होते. तसेच श्री अभ्या यांच्या बाबतीत झालेले दिसते. त्यामुळे ज्या गोष्टीबाबत अधिकारच नव्हता त्याबाबत लेखिकेने असे सुचवणे गरजेचे नव्हते असे मला वाटते. माझ्या बाबतीत असे काही झाले असते तर मी शीर्षकावरून तरी नक्कीच कुणाला असे काही सुचवले नसते आणि जिथे मला असे काही वाटते तिथे मी कॉपीराईट संदर्भात उल्लेख केलेला आहे तशी मी दक्षता घेते आणि अशी दक्षता घेऊन जरी एखाद्याने काही साहित्य प्रकाशित केलेच तरीही मी त्यावरती काही आक्षेप घेतला नसता.  अर्थात मी हे माझे वैयक्तिक मत सांगत आहे.

आता थोडे मिसळपाव प्रशासनाबद्दल मला काही मुद्दे उपस्थित करावेसे वाटत आहेत. 

 येथे असणाऱ्या राजकारण या विषयापासून मी पूर्णतः अलिप्त असते. अशा प्रकारच्या कोणत्याही टिप्पणी मी शक्यतो करत नाही. परंतु कधीतरी येथे या विषयावरती हिरीरीने वाद घालणारे लोक आणि त्यांचे प्रतिसाद वाचत असते तेव्हा मला त्यातून एकच प्रश्न पडतो की खरंच याची आवश्यकता आहे का?

 कारण यातून कुणाला काही ज्ञान मिळते असे वाटत नाही. पण थोडेफार मिळतही असेल कारण काही सदस्य अभ्यासपूर्ण मध्ये मांडतही असतील. पण त्यातून जी काही सकारात्मकता तयार होत असेल त्याहीपेक्षा काही अधीक पटीने नकारात्मकता एकमेकांबरोबर घातलेल्या वादामुळे निर्माण होत नाही का आणि त्यामधून एकमेकांसंबंधी तयार झालेल झालेले तणावपूर्ण संबंध व त्यामुळे एक प्रकारचे नकारात्मक वातावरण या संस्थळावर तयार होत नाही का?

 याचाच परिणाम म्हणून अनेक चांगल्या साहित्यावरती सुद्धा जशी सकारात्मक चर्चा व्हायला हवी ती होताना दिसत नाही हे असं खेद नमूद करावेसे वाटते.

 खरंतर मिसळपाववरती काही ठराविकच लोक साहित्यिक चर्चा करायला किंवा साहित्य पोस्ट करायला येथे येतात.  पण येथे असलेल्या कंपुबाजीमुळे कोणाला भरभरून प्रोत्साहन देखील मिळत नाही, असे मला बऱ्याचदा जाणवते. आता यावरूनही माझ्यावरती येथे यथेच्छ टीका करायला बरीच लोक येतील. मी इथे मिसळपाव वरती आले तेव्हाचे वातावरण आणि आताचे वातावरण यात जमीन अस्मानाचे अंतर जाणवते.

 पटत नसेल तर चपला घालून चालते व्हा वगैरे अनेक जण सांगतील. परंतु त्याच्यामुळे खरोखर चांगली गेलेली लोकं परत येणार नाहीत.  या सगळ्याचे मूळ पाहिले तर साहित्यिक वादविवाद नसून राजकीय वादविवाद आहे हे लक्षात घेतले तर संस्थावरचे वातावरण नेमके कशामुळे बिघडते आणि सदस्य का जात आहेत किंवा वाचन मात्र राहत आहेत यावरती खरच गांभीर्यांना विचार व्हायला हवा असे कुठल्याही साहित्य प्रेमी माणसाला वाटणार नाही का? असा कळकळीचा प्रश्न विचारावासा वाटतो.

 राजकीय चर्चा जर खेळीमेळीत पार पडणार नसतील, एकमेकांचा विरोध हा तर्काने, विवेकाने आणि सौजन्याने  करता येत नसेल, तर असे सदर पूर्णपणे बंद का करता येऊ नये? याचाही विचार व्हायला हवा.

 मला व्यक्तिशः राजकारण या विषयांमध्ये रस आहे. परंतु इथे ज्या पद्धतीने त्यावर चर्चा होते, त्यामुळे मला येथे कधीही त्याबाबत व्यक्त व्हावे असे वाटले नाही आणि वाटणारही नाही.

 परंतु या निमित्ताने काही गोष्टी इथे मांडाव्याशा वाटल्या.  माझे हे विचार ऐकून बरेच जण मला आपल्याला पटत नसेल तर वाचू नका, मिसळपाव सोडून दुसरीकडे चालू लागा, अशा पद्धतीचे प्रतिसाद देतीलच.  परंतु मला वाटते की जे प्रश्न मी इथे उपस्थित केले आहे त्यावर मिसळपाव प्रशासनाने जरूर विचार करावा. मी इथे कोणाच्याही बाजूने बोलत नाही आहे. मी इथे केवळ साहित्याच्या बाजूने बोलत आहे. इथे मिसळपावरती पूर्वीप्रमाणेच जास्तीत जास्त लेखन यायला हवं. लेखकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळायला हवं. आणि त्या अनुषंगाने चर्चा व्हायला हव्यात. इतकेच माझी माफक अपेक्षा आहे.

 श्री. अभ्या यांनी लिहीलेला लेख खरोखर चांगला होता. परंतु या एका विचित्र प्रसंगामुळे कदाचित ही लेखमाला ते पूर्ण करणार नाहीत. असे कितीतरी लेखक जर हिरमोड होऊन लेखन करणे बंद करू लागले, तर ते साहित्य प्रेमी म्हणून माझ्यासारख्या अनेकांना निश्चित दुःखदायक आहे असे मला वाटते. आणि याचा एक मिसळ पाव सदस्य म्हणून मिसळपाव प्रशासनाला आग्रहाची विनंती करण्याचा अधिकार मला आहे असं वाटतं, म्हणून कळकळीने लिहीत आहे.

 लेखिका मधुरा देशपांडे यांचा कोणताही अनमान करण्याचा हेतू नाही. तसेच माझ्या प्रतिसादावर येणाऱ्या कोणत्याही प्रतिसादांना मी प्रत्युत्तर देणार नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छिते.


खरे तर बऱ्याच दिवसांनी मिपावर ‘शब्द झाले मोती’ या डायरीचा तिसरा भाग सुरू करावा, या उद्देशाने आलो होतो. वेळ कमी असल्याने आणि येथील वातावरण पूर्वीसारखे राहिलेले नाही, अशी वैयक्तिक भावना असल्याने लिहावे की नाही, या विचारात होतो. अनेक विचार आणि लेख त्यामुळे येथे लिहिलेही नाहीत. अशातच हा धागा पाहिला आणि विचारात पडलो.


मुळात मधुरा देशपांडे यांनी शीर्षक बदलावे, अशी विनंती केली किंवा तशी सूचना केली, हे नैतिकतेच्या दृष्टीने चुकीचे आहेच; पण काहीसे हास्यास्पदही वाटते. त्यात त्यांना त्या नावाने लिहिलेले इतर भाग येथेही द्यायचे नाहीत, मग नेमकी मागणी कशासाठी?


एखादे लिखाण त्याच नावाने दुसऱ्याने लिहिले तर त्याने मूळ लिखाणाला नक्की काय धक्का लागतो?
मी स्वतः कधीकाळी कविता लिहायचो. माझ्या कविता, नाव सोडा, पूर्णच्या पूर्ण ओळी चोरीला गेल्या तरी ‘जाऊ दे, काय हरकत आहे?’ असे तेव्हाही वाटायचे आणि आजही वाटते. काही कविता नाव बदलून वापरल्या गेल्या तरी त्याने फारसा फरक पडत नाही.
मुळात हे माझे वैयक्तिक मत आहे; पण लिखाण प्रामाणिक असेल आणि त्यात आपले विचार असतील, तर त्यानंतर ते कुठे गेले, कोणी नेले किंवा कोणी कॉपी केले, याला फारसा अर्थ उरत नाही. आपण लिहिलेल्या विचारांना स्वतःचा चेहरा नसतो. त्यांना आपले नाव आणि ओळख चिकटली की त्यामागे अहंकाराचा एक पुसटसा गंध येतो, असे माझे मत आहे.
त्यामुळे इतक्या वर्षांनी, तेही फारसे सक्रिय नसताना, पुन्हा येऊन एवढेच सांगून जाणे मला वैयक्तिकरीत्या पटले नाही. कृपया त्यांनी माझ्या या मताचा वाईट अर्थ घेऊ नये.


दुसरे म्हणजे, चाल घडामोड आण त्यामागून चालणार   ‘राजकारण’ आणि या धाग्यावरून मीच धागा काढावा, जुन्या धाग्याला नवे नाव द्यावे, वगैरे वगैरे मला थोडे बालिश वाटते. जर तसे खरेच झाले असेल, तर त्याची मुळात गरजच नव्हती.


वैयक्तिक :
मिपा प्रशासनाने राजकीय धागेच प्रथम बंद करावेत, असे मला वैयक्तिकरीत्या वाटते.
राजकारण या विषयावर मला बोलायला आवडते. पण इथे जे आखाडे चालतात, ‘मीच खरा’ हा जो काही प्रकार असतो, तो अशोभनीय आहेच. त्यापेक्षा मिपा प्रशासनाने अशा गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याची काही तरतूद आहे का, असा प्रश्न मला कायम पडतो.

आज मी जाहिर करतो राजकारण या विषयावर मी येथे लिहिणार नाही.. चालुद्या राजकारण्यांची तळी उचलणे.


वरती श्वेता ताईंनी अगदी बरोबर सांगितले आहे. त्यांचे आणि माझे लिखाण आम्ही कित्येक वर्षांपासून एकमेकांचे वाचत आलो आहोत. पण कंपूगिरी आम्ही कधी केली नाही.
मात्र असे प्रकार पाहून वाईट वाटते. यातून नेमका कोणता संदेश दिला जातोय, हाच खरा प्रश्न आहे.

--

अभ्या यास.

 

मित्रा, मला वाटते इतर काही लोका मुळे जास्त वाईट का वाटून घ्यायचे?

पुन्हा लिही वेगळे येथे तू एकटाच आहे असे काही नाही..

धागा जरी डिलीट केला असेल तरी इतर लिखाण दुसऱ्या लोकांना न जुमानता चालू ठेवावे..

कोणाची कशावर हि मक्तेदारी नसते.. आणि आपण का सोडायचं लिहायला?

 

आमच्या कवितेवर 1-2 रिप्लाय येतात.. तरी त्याच काही आम्ही बाळगत नाही, इथं तर तुला वाऱ्यापैकी वाचतात लोकं..

 

 

 


एखादा नावाचा धागा आगोदरच असेल म्हणून आगोदरच्या धागा लेखकांने विनंती केली तर बिघडले कुठं?

मिपा प्रशासनाने राजकारणाचे धागे तर आजिबात बंद करू नये. बरीच माहिती जी इतर कुठं मिळतं नाही ती राजकारणाच्या धाग्यावर सहज मिळत असते. मला कविता समजत नाहीत म्हणून मी ते उघडत पण नाही पण म्हणून कवितेचे धागेच बंद करावे हे योग्य नाही. तेच राजकारणाच्या धाग्या बद्दल, तिथं काहीच चांगल वाटत नसेल तर कशाला वाचायचे?


In reply to by रात्रीचे चांदणे

तुमच्या वयक्तिक मताचा आदर आहेच..

प्रत्येकाचं मत वेगळं.. त्याबद्दल  Respect आहेच..

बस इतकंच.

 


सध्याचे मिपावरचे वातावरण आणि माझा गेल्या दिवाळी अंकांतील स्वानुभव यांमुळे वाचनमात्र राहायचे ठरवले आहे. आवडलेल्या लेखांना मात्र आवर्जून प्रतिक्रिया देणार हे नक्की. 😃


कोणीही शीर्षकात बदल करायला सुचवणे हे मात्र अजिबात पटले नाही. मिपा प्रशासन यासंदर्भातील नियमावली स्पष्ट करेल का ?


बाकी राजकारणादि विषयांवरील चर्चा शक्यतो वाचत नाही, कारण कुठल्याही विषयांची माहिती हवी असल्यास त्याच्या ऑफिशिअल संस्थळ, ओरिजिनल सोर्स इथेच वाचते. इतर ठिकाणी बऱ्याचदा out of context or totally different perspectives असा गोंधळ उडतो आणि मग healthy discussion ( मराठी शब्द ?) न राहता चर्चेची गाडी भलतीच कडे वळते. 😂

तरीही सकारात्मक चर्चा नक्कीच आवडतात. 😀