Skip to main content

शाळा

जर्मन वर्मन

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 11/07/2026 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

अकरावी बारावी झाली तसा रुढार्थाने ज्याला अभ्यास म्हणतात त्या गोष्टींशी संबंध सुटलाच. पानेच पाने भरवून वह्यांच्या खरेदीला निमित्त करायचे पण थांबले. बारावीपर्यंतच्या पेपरांच्या वेळी "सर पुरवणी" (काही हुच्चभ्रु गाबडे सब्लिमेंट असे म्हणायचे पण त्या शब्दाचा योग्य उच्चार वा अर्थ हुडकायचेही कष्ट आम्ही कधी घेतले नाहीत.) असे पुकारा करत पेपर संपेपर्यंत कागदाच्या ढिगांना दोऱ्यात ओवायचे. आम्हाला फार आदर असल्या स्कॉलरांचा. लांबच ठेवायचो आदरापोटी त्यांना... असो. 

विविध बोर्ड - SSC स्टेट बोर्ड / ICSE / CBSE

लेखक हेमंत सुरेश वाघे यांनी बुधवार, 03/03/2021 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
१) मी २००८ - २००९ ला मुलीसाठी नवी मुंबईत शाळा शोधत होतो एक ठरले होते कि मराठी माध्यमात घालायचे नाही - त्याचे प्रॉब्लेम मी आणि बायकोने पूर्ण अनुभवले होते आणि त्यामुळे हे तर नक्की होते . आता इंग्लिश माध्यम हे बाकी ठिकाणी नवीन असले तरी मी मुंबईत ते पण पश्चिम उपनगरात राहिलो होतो आणि त्यामुळे आसपासचे सर्व इंग्लिश माध्यमात होते त्यामुळे त्याचा फायदा पाहिला होता आता बोर्ड चा प्रश्न तर ११ वि  १२  वित काही ICSE वाले आणि २ CBSE वाले ओळखीचे होते आणि लक्षात आले ह्या मुंलाना अभ्यास सोपा जातोय .