१ लाख किमी सायकलप्रवास.... एक शुन्य शुन्यशुन्य शुन्य शुन्य
दिनांक - २६ डिसेंबर २०१६ ते २६मार्च २०२६ एकूण कालावधी
आज पर्यंतचा एक लाख किमी सायकल प्रवास हा फक्त प्रवासनाही तर तो जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य आणि इच्छाशक्ती याचाअनोखा संगम आहे. शालेय आणि कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना सायकलचा वापर होत होता... परंतुत्यानंतर आयुष्यात कधी सायकल परत याचा स्वप्नवत विचार पण आला नाहीआणि आता तो विचार जाऊन प्रत्यक्ष कृती रुपात सायकलप्रवास अवतरला आहे.
२६ डिसेंबर २०१६ रोजी सुरूझालेला हा प्रवास काहीदिवसांपर्यंत असेल असे वाटले होते, जसे लावलेले रोपटे त्याला खतपाणी टाकले तर त्याची वाढ होते नाहीतर त्याची वाढ होत नाही अथवा खुंटते, तसाच खतपाणी प्रकार हा सायकलबाबत झाला. रोजचे ऑफिसला सायकलने (जवळपास १० वर्षे) येजा करणे, अधून मधून मोठी सायकल राईड करणे, जवळच्याकामासाठी सायकल वापर त्याचाच परिणाम हा १ लाख वटवृक्षात झाला. डिसेंबर २०१६ मध्ये Enpro Industries कंपनीने सुरू केलेला सायकल टू वर्क हा उपक्रम चांगलाच अंगीकारला गेला. सायकल घेतल्यावर काही दिवस सायकलनेऑफिसला ये जा करू आणि मग बघू असे ठरले होते, पण नशिबात काहीवेगळेच होते.... सायकलने घर ते ऑफिसआणि घर असे करत करत कन्याकुमारी, हंपी, सोमनाथ, गिरनार, अयोध्या, पंढरपूर, शिर्डी, गेट वे ऑफइंडिया मुंबई, गोंदवले, सज्जनगड, सातारा, अकरा मारुती दर्शन, लोणावळा अशा आणि अनेक स्थानिक भरपूर ठिकाणी सायकलवरून भ्रमंती झाली.
रोज ऑफिसला सायकलने ऑफिसला जाऊन येऊन आजपर्यंत २०८४ दिवस झाले आहेत आणि त्याचेच एकूण ६९००० किमीपूर्ण झाले आहेत आणिऑफिस सोडून बाकी ठिकाणी जी सायकलवरून भ्रमंती झाली त्याचे ३१०००किमी पूर्ण झाले आहेत. म्हणजेच इतरत्र सायकल भटकंती पेक्षा ऑफिसला सायकलने ये जा याचेच जास्त किमी झाले आहेत इंधनाची बचत, पैशाची बचत पर्यावरण हित, निसर्ग जवळून पाहण्याचे भाग्य आणि निरोगी आरोग्य हेच याचे याचे फलीतआहे.
खरंतर हे १ लाख किमीपूर्ण करण्याचे उद्दिष्ट गेल्या दोन वर्षापूर्वी ठरवले होते आणि त्याची तारीखपण मी जाहीर केलीहोती, ती म्हणजे माझा ५० वा वाढदिवस ८ नोव्हेंबर २०२६ रोजी...पण गेल्या काही महिन्यांपासून सायकलिंग प्रवास जास्त झाल्याने ते उद्दिष्ट अजुनअलीकडे ठरवले ते म्हणजे मुलीचा वाढदिवस ६ जुलै २०२६....ती पण तारीख पार पुढची असल्याने परत २३ एप्रिल२ ०२६ रोजी लग्नाचा वाढदिवसअसतो त्या दिवशी १ लाख किमी पूर्ण करूअसे ठरले...पण ती पण तारीख नाही..मग १५ एप्रिल२०२६,....३१ मार्च २०२६असे ठरत ठरत शेवटीआज म्हणजेच २६ मार्च २६रोजी हा १ लाख प्रवास पूर्ण झाला.... म्हणजेच २ वर्षापूर्वी १ लाख किमी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आणि त्याचा पाठलागकरून ते आज पूर्णझाले. यामध्ये स्वतःचे स्वतःला घालून दिलेले निर्देश, स्वतःची स्वतःशी स्पर्धा आणि स्वतःचं स्वतःसाठी केलेले नियोजन याचा उत्तम योग म्हणजेच हा एक लाखकिमी प्रवास...... खरंतर ग्रुपमध्ये राहीले की अथवा किमान दोघे असतील तर सायकल राईड होतच असते, कारण गप्पा मारत, हसत खेळत आपण ह्या सायकल राईड करत असतो, परंतु खरा कस लागतोतो एकट्याने सायकल राईड करण्याचा....आणि माझा ६९% सायकल प्रवासहा एकट्यानेच झाला आहे की घर ते ऑफिसते घर यासाठी.. आणि बाकी ३१% सायकल प्रवासहा जोडीने अथवा ग्रुप सोबत झाला आहे.... त्यामुळे सायकल राईड एकट्याने अथवा सोबतीने करा...पण राईड करा हेच महत्त्वाचे आहे.
ह्या प्रवासात आतापर्यंत असंख्य सायकल मित्र भेटत गेले.... कधीऑफिसला जाताना तर कधी मोठ्यासायकल राईड सोबत नवीन सायकल मित्र जोडले गेले. ज्यांची नावे घेतली तर किमान ३५० ते ४०० फक्त सायकल मित्रांची नावे द्यावी लागतील. सायकलिंग ग्रुपमध्ये रोजच्या दैनंदिनी सायकल राईड होत असल्याने त्या सायकल राईड साठी जाणेआणि परत ऑफिसला सायकलने जाणे असे दुहेरी सायकलिंगक करण्यापेक्षा त्या दैनंदिनी सायकलराईड साठी न जाता फक्त ऑफिससाठी सायकलने जाऊ म्हणजे सकाळची रोजची राईड पण होईल, सक्तीचा व्यायाम होईल आणि ऑफिससाठी सायकलने गेले म्हणजे इंधनबचत, निरोगी जीवन, पर्यावरण हित याचा फायदा... त्यामुळे अशा दैनंदिनी सायकलमित्रांसोबत ग्रुप राईड साठी जमले नाही त्याबद्दल क्षमस्व तरअशा ह्या समस्त सायकलमित्रांचे खूप खूप आभारआणि धन्यवाद...
१८ ऑक्टोबर २०१८ रोजी पहिला १० हजार किमी टप्पा पार पडला, त्यानंतर १८ ऑक्टोबर २०२०रोजी २५ हजार किमी, ३० जुलै २०२२ रोजी५० हजार किमी, तर २६ सप्टेंबर २०२४ रोजी ७५हजार किमी....आणि २६ मार्च२०२६ रोजी एक लाख किमी सायकल प्रवास पूर्ण झाला.....
२६ तारीख अथवा हा आकडा कायम लक्षात राहणार आहे... कारण २६ डिसेंबर २०१६ रोजी पुन्हा सायकलिंग सुरुवात, २६ सप्टेंबर रोजी ७५ हजार किमी पूर्ण, २६ मार्च २६ ( तारीख आणि वर्ष) एक लाख किमीपुर्ण.......हा एक निव्वळयोगायोग आहे की अजुन काही हे माहिती नाही
१ लाख किमी साठी गेल्या काही महिन्यांपासून फोटोसाठीवेगळा काहीतरी फोटो घ्यायचा विचार होता, पण तो काय असेल हे प्रत्यक्ष कृती रुपात येत नव्हते.... सायकल घेऊन सायकल सोबत फोटो घ्यायचा की काय याचा विचार करत असताना एक वेगळीच डोक्यात कल्पना आली की १लाख किमी साठी १च्या पुढे ५ शुन्यअसतात...मग पाच शुन्य कसे घ्यायचे तर सायकलच्या ५रिम टायर सोबत घ्यायच्याआणि १ म्हणून मीउभा राहून फोटो घ्यायचा...पण त्यासाठी किमान ३ ते ४ सायकल पाहिजेत आणि त्या कोठेतरी जाऊन फोटोसेशन केले पाहिजे.... म्हणून कॉलेज मित्र धनराज साबळे, गणेश नवजेकर आणि सचिन लोहार यांना २२ मार्च रोजीआपण कासारसाई येथे राईड साठी जाऊ असे ठरले, पण सचिन लोहार एक महत्वाचे कामअसल्याने त्यास यायला जमले नाही..मगआम्ही तिघेच (मी, धनराज आणि गणेश) गेलो...२ Hybrid Cycle आणि एक MTB सायकल... कासारसाई येथे गेल्यावर थोडावेळ थांबून २ हायब्रीड सायकलचे ४ टायर आणि एक MTB चे पुढचे टायर काढून तेजमिनीवर दगड लाऊन उभे केले आणि अशा प्रकारे १ लाख किमी चे फोटोसेशन झाले.....
ह्यासगळ्या सायकल प्रवासात कंपनीचे मालक श्री. श्रीकृष्ण करकरे सर, करकरे मॅडम, अनुज सर यांचे खूप खूप आभार की त्यांनी Cycle 2 Work ही संकल्पना राबविली. Indo Athletic Society चे प्रमुख गजानन खैरे सर, अजितपाटील सर, गणेश भुजबळ सर आणि समस्त कोअरकमिटी यांचे मनापासून आभार की ज्यांच्यामुळे मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या सायकल राईड करता आल्या... ऑफिसमधील सहकारी, वरिष्ठ अधिकारी, समस्त सायकल मित्र परिवार, संपूर्ण आप्तेष्ट आणि नातेवाईक यांचेही खुप खुप आभार की इतके दिवस तुम्ही आमच्याआणि माझ्या सायकल राईडच्या पोस्ट ग्रुप वर बघत आलात... इच्छा असो वा नसो..... कॉलेज मित्र यांचेही खुप खुप आभार की इतके दिवस तुम्हीपण माझ्या दैनंदिनी सायकल राईड पोस्ट वाचतआलात आणि सहन केलात... तसेच त्यापासून तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष देऊन सायकलिंगसुरू केले अथवा व्यायामास सुरुवात केली त्याबद्दल तुमचेअभिनंदन......आणि काहींनी घरातून बोलणी खाल्ली असतील त्याबद्दल क्ष.... तसेच माझ्या सर्व सायकलींचे खुप खुप आभार की ज्यांनी इतके वर्ष मला साथ दिली... ऊन,वारा आणिपाऊस यात न डगमगता खंबीरपणे ठाम राहिल्या आणि माझ्याबरोबर प्रवास केला
ह्या १ लाख किमी प्रवासातअजुन तरीही कसलीही व्याधी नाही की कुरकुरनाही..... रोजचा थोडा थोडा सायकलप्रवास हा हळूहळू मोठाहोतो....थेंबे थेंबे तळे साचे....तसाचहा प्रवास आहे.....आणि इथून पुढे हा प्रवास आता थांबणार नाही....तो असाच पुढेसुरू राहणार.... फक्त त्याचा वेगकमी होणार..पण हा प्रवासआता इतरांना घेऊन होणार याची खात्री आहे
आणिआता आभार कुटुंबाचे.... आई, वडील, मुलं यांचे मनापासूनआभार की तुम्ही मला पाठिंबा दिलात आणि सगळ्यात सगळ्यात शेवटी बायकोचे अगदी हाताच्या दोन्ही कोपऱ्यापासून (जेवढे सरळ होतील तेवढे) आभार, नमस्कार, सलाम, मानाचा मुजरा आणि शत कोटी प्रणामकी जिने सतत साथ दिली आणि पाठिंबा दिला.... तसेच मी ही बघतेआणि पाहते किती दिवस सायकल चालवतात....त्या शब्दाने जी काही ठिणगी पडली... त्या ठिणगीचा आता वणवा पेटलाय आणि तो १लाख किमी पर्यंत पोहचला...
धन्यवाद
अभय खटावकर
पिंपळेगुरव
९७६५५५४९८०
सायकलप्रेमी
रक्तदाता - १४० वेळा
Cycle 2 Work
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन ... उत्तम उपक्रम आहे…
अभिनंदन ... उत्तम उपक्रम आहे ..
अशा प्रकारे १ लाख किमी चे फोटोसेशन झाले.....
अभिनंदन, फोटो पण येऊ द्या.
अभिनंदन। आपल्या अनुभववार लेख…
अभिनंदन। आपल्या अनुभववार लेख ही लिहा।
अभिनंदन.
ऐसी लागी लगन,अभय हो गया मगन
वो तो गली गली सायकल घुमाने लगा.....
किंवा,
अपनी धुनमें रहता हूं..... जिद्द, आवड आणी लक्षपुर्ती साठी आपण केलेले परिश्रम तारिफे काबील आहेत.
पुढील वाटचालीस नाही सायकल सवारी साठी शुभेच्छा.
एकदम खास
अभय खटावकर,
पहिल्याप्रथम अभिनंदन. तुमची जिद्द खरोखरंच कौतुकास्पद आहे. साधारण २१०० दिवसांत सुमारे ७०००० किमी म्हणजे दिवसाला ३३ पडतात. तुमची कचेरी १५/१६ किमीवर दिसते आहे. हे अंतर सतत १० वर्षं दररोज कापायला चिकाटी हवी. शिवाय बाकीचे नैमित्तिक ३०००० किमी वेगळेच. त्याचे सुमारे वर्षाला ३००० किमी पडतात. त्याकरिता नियोजन व आवड हवी. तिन्हींचा उत्कृष्ट मिलाफ दिसून येतो. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
आ.न.,
-गा.पै.