माय मराठीचे पांग
त्यांनी परवा फेडले
उच्चारांची ऐसी तैसी
त्यांना कोणी ना रोखले
श्रद्धांजलीचा कागद
त्यात आधी होती भेळ
त्यात फॉन्ट होता छोटा
मग झाला थोडा घोळ
नको वैषम्य चुकांचे
फेडीन असेच पांग
माझ्या सोशिक भाषेची
आशा अमर, अभंग
~~~~~~~~~~~~~
वाचने
122
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
घोळ व्हायचा तो असताच झाला ...
समयोचीत कविता.
समयोचीत कविता.
त्या नार्वेकरावर सामाजिक…
त्या नार्वेकरावर सामाजिक अपमान केल्याची केस निश्वितच टाकता येऊ शकते.