Skip to main content

क्रिकेट - २

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 05/01/2017 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

वाचने 113032
प्रतिक्रिया 435

प्रतिक्रिया

आज दुपारी २:३० पासून भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना आहे. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी दुर्बल असल्याने नाणेफेक जिंकल्यास ते प्रथम क्षेत्ररक्षण करतील. भारताने नाणेफेक जिंकल्यास भारताने सुद्धा प्रथम क्षेत्ररक्षण करावे. १९७५ पासून ऑस्ट्रेलिया मर्यादित षटकांच्या (एकदिवसीय किंवा वी-२० स्पर्धेत) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जवळपास ४० वेळा नॉकआऊट फेरीत आलाय (म्हणजे उपांत्यपूर्व, उपांत्य किंवा अंतिम फेरीत) व फक्त ६ वेळा पराभूत झालाय. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत जिंकणे भारत, न्यूझीलंड किंवा आफ्रिकेसाठी खूप अवघड आहे. विशेषतः न्यूझीलंड व आफ्रिकेने कधीही ऑस्ट्रेलियाला नॉकआऊट फेरीत पराभूत केले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

भारत कालच्या सामन्यात कधीच दडपणाखाली वाटला नाही. उत्तम सांघिक कामगिरी झाली. दुसर्‍या उपांत्य सामन्यात किवींनी आफ्रिकेविरुध्द ३६२ धावांचा डोंगर उभारला आहे. रचिन आणि विल्यमसनची शतके भारत न्युझीलंड अंतिम सामना होण्याची शक्यता वाटतेय. पण आफ्रिका नक्की कडवा प्रतिकार करणार.

जिंकला भारत. २५४/६ (४९) २०२३ चा विश्वचषक जिंकला असता तर १६ महिन्यात रोहितच्या नावावर ३ विजेतेपद असती.

मोठ्या कालखंडानंतर धागा वर आणतोय.

 

आयपीएल तमाशा संपल्यानंतर खरे क्रिकेट सुरू झाले. इंग्लंड दौऱ्यावर न्यूझीलंड गेलेत.आजच पहिला कसोटी सामना सुरू झालाय.

 

आता पहिल्या दिवशी इंग्लंडच्या सर्वबाद १४० धावसंख्येला उत्तर देताना न्यूझीलंड ३६/६ या केविलवाण्या अवस्थेत आहे.

 

गोलंदाजांचे वर्चस्व पाहताना चांगले वाटतंय. चौकार-षटकारांचा वर्षाव, ६ षटकात १०० धावा, ४० चेंडूत शतक, हतबल गोलंदाज व क्षेत्ररक्षक, षटकांच्या व क्षेत्ररक्षकांच्या बंधनामुळे जखडलेले गोलंदाज पाहण्यापेक्षा कसोटी सामना अनेक पटीने चांगला.


आज कसोटी सामन्याचा दुसरा दिवस. 

 

इंग्लंड १४०/१० आणि २२६/१०

न्यूझीलंड ११३/१०

विजयासाठी न्यूझीलंडला २५४ हव्या.