Skip to main content

क्रिकेट - २

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 05/01/2017 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

वाचने 113788
प्रतिक्रिया 460

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर... Yes... आजच्या दिवसातली उत्तम बातमी...

आज दुपारी २:३० पासून भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना आहे. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी दुर्बल असल्याने नाणेफेक जिंकल्यास ते प्रथम क्षेत्ररक्षण करतील. भारताने नाणेफेक जिंकल्यास भारताने सुद्धा प्रथम क्षेत्ररक्षण करावे. १९७५ पासून ऑस्ट्रेलिया मर्यादित षटकांच्या (एकदिवसीय किंवा वी-२० स्पर्धेत) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जवळपास ४० वेळा नॉकआऊट फेरीत आलाय (म्हणजे उपांत्यपूर्व, उपांत्य किंवा अंतिम फेरीत) व फक्त ६ वेळा पराभूत झालाय. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत जिंकणे भारत, न्यूझीलंड किंवा आफ्रिकेसाठी खूप अवघड आहे. विशेषतः न्यूझीलंड व आफ्रिकेने कधीही ऑस्ट्रेलियाला नॉकआऊट फेरीत पराभूत केले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ऑस्ट्रेलिया जवळपास ३० वेळा नॉकआऊट फेरीत आलाय व विजयाचे प्रमाण ८०% आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भारत कालच्या सामन्यात कधीच दडपणाखाली वाटला नाही. उत्तम सांघिक कामगिरी झाली. दुसर्‍या उपांत्य सामन्यात किवींनी आफ्रिकेविरुध्द ३६२ धावांचा डोंगर उभारला आहे. रचिन आणि विल्यमसनची शतके भारत न्युझीलंड अंतिम सामना होण्याची शक्यता वाटतेय. पण आफ्रिका नक्की कडवा प्रतिकार करणार.

जिंकला भारत. २५४/६ (४९) २०२३ चा विश्वचषक जिंकला असता तर १६ महिन्यात रोहितच्या नावावर ३ विजेतेपद असती.

मोठ्या कालखंडानंतर धागा वर आणतोय.

 

आयपीएल तमाशा संपल्यानंतर खरे क्रिकेट सुरू झाले. इंग्लंड दौऱ्यावर न्यूझीलंड गेलेत.आजच पहिला कसोटी सामना सुरू झालाय.

 

आता पहिल्या दिवशी इंग्लंडच्या सर्वबाद १४० धावसंख्येला उत्तर देताना न्यूझीलंड ३६/६ या केविलवाण्या अवस्थेत आहे.

 

गोलंदाजांचे वर्चस्व पाहताना चांगले वाटतंय. चौकार-षटकारांचा वर्षाव, ६ षटकात १०० धावा, ४० चेंडूत शतक, हतबल गोलंदाज व क्षेत्ररक्षक, षटकांच्या व क्षेत्ररक्षकांच्या बंधनामुळे जखडलेले गोलंदाज पाहण्यापेक्षा कसोटी सामना अनेक पटीने चांगला.


आज कसोटी सामन्याचा दुसरा दिवस. 

 

इंग्लंड १४०/१० आणि २२६/१०

न्यूझीलंड ११३/१०

विजयासाठी न्यूझीलंडला २५४ हव्या.


In reply to by श्रीगुरुजी

न्यूझीलंडला दुसऱ्या डावात केवळ १३८ धावा करता आल्या व ११५ धावांनी पराभव झाला. 

 

३५ वर्षीय महान फलंदाज केन विल्यमसनचा हा अखेरचा इंग्लंड दौरा. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात तो अपयशी झाला. मागील वर्षभरात तो बहुतांशी अपयशी आहे. ३५ वर्षीय इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्स सुद्धा दोन्ही डावात अपयशी झाला. हे दोघेही नजीकच्या भविष्यकाळात कसोटी क्रिकेटमधून व २०२७ मध्ये विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होतील असं वाटतंय.


In reply to by श्रीगुरुजी

१६ वर्षे आतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून  केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो एक अत्यंत दर्जेदार फलंदाज होता.  त्याने ११० कसोटीत ५४.०६ सरासरीने ९५१५ धावा केल्या.‌ मागील अनेक वर्षे विल्यमसन, जो रूट, कोहली व स्टिव्हन स्मिथ ही चौकडी प्रसिद्ध होती. कोहली आधीच निवृत्त झाला. स्मिथची निवृत्ती जवळ आली आली आहे.

 

 


 

महान अष्टपैलू खेळाडू व महान क्षेत्ररक्षक सर गारफिल्ड सोबर्स यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. अजून ११ दिवसांनी त्यांच्या वयाला ९० वर्षे पूर्ण झाली असती. 

 

२० व्या शतकातील ५ महान खेळाडूंपैकी ते एक होते (सर डॉन ब्रॅडमन, सर जॅक हॉब्ज, सर विवियन रिचर्ड्स व शेन वॉर्न हे उर्वरित ४). 


In reply to by श्रीगुरुजी

श्री. गारफील्ड सोबर्स यांना श्रद्धांजली. त्यांचा ३६५ हा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम अनेक वर्षे अबाधित होता.

-गा.पै.


In reply to by श्रीगुरुजी

क्रिकेटचा तथाकथित देव नाही? महान खेळाडूत?


बाकी सध्या फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू आहे, आपल्या इथले क्रिकेटविकृत जसे महत्वाची मॅच असेल त्यादिवशी रस्ते अडवून मोठमोठ्या स्क्रीन लावतात, डफ वगैरे वाजवतात, डीजे लाऊन दारू पिऊन नाचतात तसे प्रकार हे फुटबॉल खेळणारे देशही करतात का? 😝


In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्ते अडवून मोठमोठ्या स्क्रीन लावतात, डफ वगैरे वाजवतात, डीजे लाऊन दारू पिऊन नाचतात तसे प्रकार हे फुटबॉल खेळणारे देशही करतात का?

 

हो करतात. ह्याच्यापेक्षा जास्त करतात. प्रत्यक्ष बघूनच सांगतोय.

तुम्ही मित्र आहात म्हणून सांगतो, काहीही माहिती नसताना उगा फुटेज खायचा आणि द्यायचा प्रयत्न करु नका.


In reply to by अभ्या..

पण ते मैच जिंकल्यावर करत असतील ना?  की आधीच? म्हणजे आनंद साजरा करणे वेगळे नी लोकांना त्रास द्यायच्या उद्देशाने करणे ह्या फरकाने विचारतोय.


In reply to by अभ्या..

बाकी तुमचा सल्ला मान्य! पण क्रिकेट विकृतांचा प्रचंड त्रास झाले आहे, रात्री २ वाजता दणादण आदळणारा डीजेच्या आवाजाचा फटाक्यांचा वगैरे. बीसीसीआय चा संघ कधीही जिंकू नये असे मनोमन वाटते. क्रिकेटविकृत देशप्रेमाचा मुलामा देऊन बीसीसीआय चा संघ जिंकल्यावर प्रचंड प्रमाणात त्रास देतात. असो. 

सल्ल्याबद्दल पुन्हा धन्यवाद.


In reply to by अभ्या..

२०२० मधील युरोप कपचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध इटली होता जो इटलीने पेनल्टी शूटआऊट मध्ये जिंकल्यानंतर भीषण दंगे झाले होते. अनेक इटालियन प्रेक्षकांना इंग्लिश प्रेक्षकांनी झोडपून काढले होते. काही जणांना अक्षरशः वस्त्रहीन करून चोपले होते. 

 

अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको अश्या देशात फुटबॉल सामने मोठ्या चौकात पडद्यावर दाखविले जातात.


In reply to by श्रीगुरुजी

ते त्यांच्या देशाचे अधिकृत राष्ट्रीय संघ असतात ना? को बीसीसीआय सारखे प्रायव्हेट संघ? देशाचा संघ जिंकल्यावर आनंद साजरा करणे समजण्यासारखे आहे. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हाला चेतन शर्मा म्हणूनच अमर व्हायचे आहे त्याला आख्खा देश काही करू शकत नाही अमरेंद्र.....


In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यांच्या संघटना पण bcci सारख्याच स्वायत आहेत, आता नका फायनल बघू त्या खाजगी संघांचे.


In reply to by धनावडे

कोणत्या?

Argentine Football Association (AFA). The AFA operates as the governing body of football in Argentina and selects the country's national representatives from professional players. 
 

AFA ही एक बिगर-नफा (non-profit) नागरी संघटना आहे. तिचे नियंत्रण अर्जेंटिना सरकारचे क्रीडा मंत्रालय आणि फिफा (FIFA) च्या नियमांनुसार चालते.

BCCI ची रचना (खाजगी आणि स्वायत्त): भारताची BCCI ही तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणीकृत झालेली एक खाजगी संस्था (Private Body) आहे. ती भारताच्या क्रीडा मंत्रालयाकडून थेट निधी घेत नाही आणि माहिती अधिकाराच्या (RTI) कक्षेतही पूर्णपणे येत नाही.


काहीही ठोकून देण्याआधी माहिती घेतलेली बरी की नाही धनावडे सर? 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपण ही ठोकून देण्याच्या अगोदर काय लिहलंय वाचा, ती पण स्वतंत्र आहे, असो तुमच्याशी वाद आणि दगडाशी वाद यात तसा काही फरक नाही, आणि नाही आवडत तर क्रिकेट तर इथे येऊन पुन्हा पुन्हा गरळ ओकायची काय गरज आहे, लहानपणी गल्लीतल्या पोरांनी तुमचीच बॅट वापरून तुम्हाला batting दिली नाही वाटत. आता इथे फुटबॉल न आवडणारे पण लोक असतील त्यातला एक तरी बोलला का की फुटबॉल बद्दल काही. मला हॉकी आवडते आणि मिपावर हॉकी बद्दल नाही लिखाण होत तर क्रिकेट आणि फुटबॉल ला शिव्या देयाच्या का? आता म्हणाल की काढा हॉकी चा धागा कुणी अडवलय. 


In reply to by धनावडे

तथाकथित मित्र व कदाचित शत्रु अशा दोघांकडूनही थोबाड फोडून घेतलं जाण्याची मिपावरची ही पहिलीच घटना असावी! 

😂


तसं नसेल तर हा प्रतिसाद अप्रकाशीत समजावा.


In reply to by धनावडे

आपण ही ठोकून देण्याच्या अगोदर काय लिहलंय वाचा, >>> सर मी काय ठोकलय हे जरा एक्सप्लेन करता का? ठोकून तुम्ही दिलय की फायनल खेळणारे क्लब आहेत, तुम्हाला फुटबॉल चा आणी क्रिकेटचा ओ का ठो कळत नाही हे लक्षात आले आहे.

 

असो तुमच्याशी वाद आणि दगडाशी वाद यात तसा काही फरक नाही >>>
 तरी सुद्धा तुम्ही अपुर्या तयारीनिशी आलात नी त्याच दगडावर तोंड फोडून घेतलेत. काय म्हणावे अशा आततायी पणाला? कुणी आला का दुसरा मी सांगितले ते खोडायला? माग काय इतकी घाई?

 

आणि नाही आवडत तर क्रिकेट तर इथे येऊन पुन्हा पुन्हा गरळ ओकायची काय गरज आहे >>> परत ठोकाठोकी? मी कुठे लिहिले आहे, मला क्रिकेट आवडत नाही ते? जरा दाखवता का? ठोकाठोकी करण्यात तुम्ही तर विश्वगुरुचेही बाप आहात!

 

 

आता इथे फुटबॉल न आवडणारे पण लोक असतील त्यातला एक तरी बोलला का की फुटबॉल बद्दल काही. मला हॉकी आवडते आणि मिपावर हॉकी बद्दल नाही लिखाण होत तर क्रिकेट आणि फुटबॉल ला शिव्या देयाच्या का? आता म्हणाल की काढा हॉकी चा धागा कुणी अडवलय.  >>>>
 लवकर बरे व्हा! काय लिहिताय ते तुम्हाला तरी कळतय का? 

  

बाकी  तुम्ही मूळ आय डी आहात! मूळ आयडीने पळून जाऊन डू आय डीने कंड शमवणाऱ्यातले नाहीत त्यामुळे तुमची रिस्पेक्ट आहेच!


भारतीय क्रिकेट संघ हा भारत देशाचा नसून भाक्रिनिमं या खाजगी संस्थेचा संघ आहे असा आधारहीन मुद्दा पुन्हा एकदा मांडण्यात आला आहे. हा मुद्दा तथ्यहीन आहे हे पूर्वीच  एका धाग्यात सबळ पुराव्यांनिशी दाखवून दिले होते. परंतु वारंवार हा मुद्दा काही जण पुढे आणताहेत ज्यांना क्रिकेट या खेळात शून्य रूची नाही व या खेळातील कंवा   कशातच काही समजत नाही. त्यांना पुन्हा पुन्हा हे सांगणे म्हणजे गाढवापुढे वाचली . . . ! 

 

असो. पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगून पाहतो. 

 

______________________

 

- भारतीय संघातील खेळाडूंच्या मस्तक संरक्षकावर सर्वात वर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असते. प्रत्येक सामन्याच्या आधी भारतीय राष्ट्रध्वजाच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रगीताचे गायन होते.  स्वतःच्या अधिकृत संकेतस्थळावर क्रिकेट संघाचा उल्लेख 'भाक्रिनिमंचा संघ' असा कोठेही न करता सर्वत्र 'भारतीय संघ' असाच उल्लेख असतो. जगभरातील सर्व सामन्यात क्रिकेट संघाचा उल्लेख 'भाक्रिनिमंचा संघ' असा न करता अधिकृतरित्या 'भारतीय संघ' असाच उल्लेख असतो.‌

 

याउलट आयपीएल स्पर्धा पाहिली तर प्रत्येक खाजी  संघाचा उल्लेख स्वतःच्या नावाने असतो, त्या संघाचे परिचयचिन्ह मस्तक संरक्षक, रंगीबेरंगी सदरे अश्यांवर असतो. तेथे भारत हे नाव कोठेही नसते.‌

 

- २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रात स्पष्टपणे सांगितले आहे की "Both state governments and the Union government gave full autonomy to the BCCI which selects the national team."

 

The court ruled that BCCI is a public body and that its actions are amenable to judicial review. BCCI's functions are "public functions" and as such it is "amenable" to the writ jurisdiction of the High Court under Article 226 of the Constitution.

 

The Supreme Court has set up an independent committee that will make recommendations on amendments to the BCCI’s constitution and by-laws, as well as sports fraud and conflict of interest. They will no longer be able to function in secret and shadow. Their decisions and intentions will be scrutinised and if found wanting, challenged and possibly overturned.

 

कोणीही भाक्रिनिमंला न्यायालयात खेचू शकतो कारण ती खाजगी संस्था नाही.

 

-  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात खालील वाक्ये आहेत. The majority verdict of the court ruled that BCCI was not a state but it did point out that, by picking an Indian team, controlling the activities of players and others like match officials, scorers, administrators, the BCCI was performing public functions. Any violation made it open to litigation under Article 226 of the Constitution of India, the court ruled.

 

- एखाद्या देशाविरूद्ध खेळायचे की नाही हा निर्णय भाक्रिनिमं घेऊ शकत नाही. तो निर्णय भारत सरकारचा असतो. १९९० पर्यंत भारत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळत नव्हता. आता पाकिस्तानाविरूद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी सरकारने प्रतिबंध लावला आहे. अगदी आयपीएल संघात सुद्धा कोणत्या देशाचे खेळाडू घ्यायचे नाहीत याविषयी केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत. पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये २००९ पासूनच प्रतिबंध आहे. यावर्षी बांगलादेशच्या संघातील खेळाडूंविरूद्ध सरकारने आक्षेप घेतल्याने आधी समावेश केलेल्या बांगलादेशी खेळाडूला एका संघातून काढून टाकावे लागले होते.‌ भाक्रिनिमं खाजगी संस्था असती तर केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकले नसते.

 

 

- आयपीएल मधील फिक्सिंग व बेटिंग प्रकरणाची चौकशी करणासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायाधीश लोढा समितीने जे निर्णय  निर्णयानुसार, १) गुरूनाथ मयप्पन व राज कुंद्राला क्रिकेटशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्यावर आजीवन बंदी लादण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे ते भारतात ते स्वतः कोणताही संघ विकत घेणे, आयपीएल शी संबंध ठेवणे इ. करू शकणार नाहीत. २) या दोघांचे संघ - चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स, या दोन्ही संघावर आयपीएल स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी २ वर्षे बंदी घालण्यात आली होती.

 

भाक्रिनिमंचे ततकालीन   अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांची सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी केलेली आहे. भाक्रिनमंमध्ये वर्षानुवर्षे पदे बळकावून बसलेल्या श्रीनिवासन, शरद पवार, निरंजन शहा यांना सर्वोच्च न्यायालयानेच पायउतार होण्यास भाग पाडले. अन्यथा आजही पवार अध्यक्षपदावर दिसले असते. भाक्रिनिमं खाजगी संस्था असती तर हे झाले नसते. 

 

सारांश - भाक्रिनिमं ही खाजगी संस्था नसून स्वायत्तता असलेली भारत सरकारची क्रीडा संघटना आहे. ही संस्था स्वतःचा खाजगी संघ निवडत नसून भारत देशाचा संघ निवडते व या संस्थेला न्यायालयाचे निर्णय पाळावेच लागतात. जेव्हा जेव्हा ही संस्था मनमानी करते किंवा भ्रष्टाचार होतो तेव्हा तेव्हा न्यायालय हस्तक्षेप करून निर्णय घेते जे बंधनकारक आहेत. 

 

 


In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी,

 

संदेशाशी जवळजवळ सहमत. इ.स. २०१५ पूर्वी जरा गोंधळ होता. मी तर भारतीय संघास बक्कीचा संघ असं संबोधायला सुरुवात केली होती. पण न्यायालयाचा आदेश आल्याने या गोंधळावर पडदा पडला आहे.

 

फक्त या एका वाक्यावर शंका आहे :

 

भाक्रिनिमं खाजगी संस्था असती तर केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकले नसते.

 

माझ्या मते भारतात होणाऱ्या कोणत्याही खेळ वा तत्सम समारंभात सहभागी होण्यापासून पाकिस्तानी नागरिकांना रोखू शकते. मग आयोजक संस्था खाजगी असो वा सरकारी. उदा. : समजा ठाण्याच्या हनुमान व्यायाम शाळा या खाजगी संस्थेस कबड्डीच्या स्पर्धा भरवायच्या आहेत. त्यासाठी कुण्या परदेशी संघामार्फत एखाद्या पाकिस्तानी खेळाडूस आमंत्रित केलं. यावर भारत सरकार आक्षेप घेऊन पाकिस्तानी खेळाडूवर प्रतिबंध घालू शकतं. मात्र याबाबत चूकभूल देणेघेणे.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

पाकिस्तानी खेळाडूंना भारतातील कोणत्याही खाजगी संस्थेने संघात समावेश करण्याची सरकारने बंदी घातली आहे. ज्या देशांवर बंदी नाही त्या देशाचे खेळाडू भारतीय खाजगी संघात घेता येतात (उदा. इंडियन सॉकर लीग, आयपीएल, इंडियन बॅडमिंटन लीग इ. स्पर्धेत परदेशी खेळाडू असतात), परंतु त्यासाठी अर्थातच सरकारी मान्यता, प्रवेश अनुमती इ. आवश्यक आहे. 

 

भारतातील सर्व अधिकृत क्रीडा संघटना स्वायत्त असल्या तरी त्या सरकारच्या व न्यायालयाच्या नियंत्रणाखाली आहेत. जोपर्यंत त्या नियमभंग, भ्रष्टाचार इ. करीत नाहीत तोपर्यंत त्यात सरकार हस्तक्षेप करीत नाही. त्या संघटना आपले पदाधिकारी स्वतः निवडतात, त्यात सरकारी हस्तक्षेप नसतो. पण गरज भासल्यास न्यायालय पदाधिकारी निवडीत हस्तक्षेप करते व न्यायालयाचा निर्णय बंधनकारक आहे. अनुराग ठाकूर, अजय शिर्के, शरद पवार, निरंजन शहा, श्रीनिवासन यांना न्यायालयानेच पायउतार होण्यास भाग पाडले होते.

 

टीसीएससारखी खाजगी कंपनी असते त्यात न्यायालय तथा सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. ते कोणालाही पदाधिकारी करू शकतात, कोणालाही  नोकरी देऊ शकतात, वेतनवाढ ठरवू शकतात, परंतु हे सर्व नियमानुसार. त्यांनी घटनाभंग किंवा नियमभंग केला तर न्यायालय व सरकार हस्तक्षेप करते.


भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना -

 

इंग्लंड २९३/२ (४३.३)

 

हा सामना रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा सामना असण्याची वदंता आहे.


कालच्या सामन्यानंतर रोहित निवृत्त होणार (की त्याला निवृत्त व्हायला भाग पाडणार) ही वदंता पसरलेली असताना, काल इंग्लंडच्या ३८७ धावांचा पाठलाग करताना रोहितने डावाची सुरूवात करून ११० चेंडूत १३८ धावा करून सर्वांचे तोंड बंद केले. विराटनेही ६० चेंडूत ७४ धावा केल्या व २०२७ मधील विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित व विराटचा विचार करावाच लागेल अशी कामगिरी केली.

 

भारताने ३६० पर्यंत मजल मारली. रोहित व विराटच्या खेळीने खूप आनंद दिला. 

 

विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित, विराट, शमी व भुवनेश्वर हे अनुभवी खेळाडू संघात हवे असे माझे मत आहे.


लॉर्ड्स वर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय हा मान पटकावल्याबद्दल रोहित शर्माचे अभिनंदन.