ऐकले किती तरीही, कान माझा अतृप्त आहे,
सुमनांच्या गर्दीतले ते "सुमन", वेगळेच आहे....
"निंबोणीच्या झाडा मागे",चंद्र मी ही शोधला होता,
"केतकीच्या बनी मधे" ,नाचरा मोरही ऐकला आहे
"उठा उठा चिऊताई ",ऐकून जाग मजला येत होती,
"आली बघ गाई गाई"झोप अंगणात अजुनही येत आहे.
सरले लहानपण माझे,"उमलली एक नवी भावना",
"मज नकोत अश्रु घाम हवा",दिला,हाच खरा मंत्र आहे.
पिवळी पिवळी हळद लागली","नकळत सारे घडले",
"रे क्षणांच्या संगतीने", किती सांगू,सारे मी ऐकले आहे.
"समाधी घेऊन जाई ज्ञानदेव",विरळे सूर ते, विरलेत आता,
"रिमझीम झरती श्रावणधारा", अश्रु नयनी तरळलेत आहे.
"वाट इथे स्वप्नातील संपली जणू",परी आस आहे अंतरी,
"घाल घाल पिंगा वाऱ्या","सुमन",सुगंध अखंड दरवळणार आहे.
स्वर लाभले ज्यांना अमृताचे, त्या माऊलीला नमन आहे,
गर्दीतल्या या जगात, तुमचे स्थान नेहमी वेगळेच आहे.
https://www.aathavanitli-gani.com/Swar/Suman_Kalyanpur
सुमनताई कल्याणपूर यांच्या मराठी गाण्याचे संकलन.
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
डोळे बंद करातो...
आणी सुमनताईंची गाणी ऐकतो मन शांत होते.
https://youtu.be/qXWewPnO4yk?si=kqjygp-K4X7MOsos
केतकीच्या बनी तिथे नाचला गं…
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर,जिथे सागरा धरणी मिळते, नाविका रे वारा वाहे रे ही माझ्या रोजच्या प्ले लिस्टमधली गाणी आहेत..
खुप दुःखद घटना.
रसाळ गायिका सुमन कल्याणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
वाट इथे स्वप्नातील संपली जणू…
In reply to केतकीच्या बनी तिथे नाचला गं… by Bhakti
वाट इथे स्वप्नातील संपली जणू, थांबवितो धारांनी सावळा घनू
शाळेत असताना माझ्या मैत्रिणीने स्नेहसंमेलनाला हे गाणं गायिले होते, तेव्हापासुन आवडते हे गाणं!
https://youtu.be/UHlYxTWj8K0?si=fgf9bS4MxXMFdSKV
समयोचित कविता
आवडत्या गायिका. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली....
छान लिहिलंय. सुमन कल्याणपूर…
छान लिहिलंय. सुमन कल्याणपूर व लतादीदींच्या आवाजात इतके साधर्म्य आहे की गीत दोघींपैकी नक्की कोणी गायले आहे हे नीट कान देऊन ऐकले तरच समजते. सुदैवाने दोघींनाही खूप सुंदर श्रवणीय गीते मिळाली.
मराठी संगीताच्या इतिहासात सुमनताईंचे नावही अजरामर राहील.
छान कलेक्षन.सुमन कल्याणपुर…
छान कलेक्षन.
सुमन कल्याणपुर यांचा जन्म ढाका येथे झाला. त्याचे आई वडील तिकडे नोकरीला होते काय?
भावपूर्ण श्रद्धांजली
समयोचित कविता; सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!