धुरंधरचे गाणे आणि बायकोचा दंडा"

विवेकपटाईत जनातलं, मनातलं

एक गायक होता, जो आयुष्यभर फक्त दुःख आणि वेदनांनी भरलेली गाणीच गात असे. तुटलेलं हृदय, दगा, उदासी आणि एकाकी रात्री - हे त्याच्या गाण्यांचे नेहमीचे विषय होते.

त्याच्या लग्नाची २५वी वर्षगाठ होती. सकाळपासूनच बायकोने स्पष्ट इशारा दिला होता, “आज आनंदाचा दिवस आहे. कोणतंही नकारात्मक किंवा दुःखी गाणं म्हणू नकोस. नाहीतर बघून घेईन!”

संध्याकाळी पार्टीचे वातावरण खूप सुंदर होते. मित्र-नातेवाईक आले होते. रंगीबेरंगी दिवे, हास्य-विनोद, स्वादिष्ट पदार्थांचा सुगंध सर्वत्र पसरलेला होता, आणि सर्व अतिथी मौजमस्ती करत होते.

त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी गायकाला गाण्याची विनंती केली. त्याने आनंदी गाणी सुरू केली. लोक टाळ्या वाजवू लागले आणि म्हणाले, “वाह! या वयातही आवाजात तीच जादू आहे!”

तेव्हा कोणीतरी धुरंधर सिनेमातील प्रसिद्ध गाणं म्हणायला सांगितलं: “ना तो कारवां की तलाश है, ना हमसफर की तलाश है…”
बायकोचा इशारा आठवताच गायकाने ताबडतोब गाण्याचे बोल बदलले. “ना” च्या जागी “हाँ” घालून त्याने गाणं सुरू केलं:

“हाँ आज कारवां की तलाश है… हाँ आज नए हमसफर की तलाश है…”

गाणं ऐकताच सारा हॉल टाळ्यांच्या आणि शिट्ट्यांच्या गजराने भरून गेला. त्याचा एक मित्र मोठ्याने ओरडला, “अरे वा! या वयातही नवीन हमसफर हवा आहे! कमाल आहे भाऊ!”

हे बोल बायकोच्या कानावर पडताच तिचा राग सातव्या आकाशाला पोहोचला.

दुसऱ्या दिवशी गायक रुग्णालयाच्या बेडवर पडला होता. चेहऱ्यावर पट्ट्या, हात-पायात दुखापत. त्याला काहीच समजत नव्हतं की शेवटी काय झालं. त्याने तर बायकोचा सल्ला मानला होता, मग बायकोने तिच्या भावांसोबत मिळून त्याला मारहाण का केली?

वर्गीकरण

4 टिप्पण्या 183 दृश्ये

Comments