सी पी बेरार सर्किट
In reply to ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर by गवि
In reply to ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर by गवि
In reply to १९६० च्या आधी जन्म, ही अट by खटपट्या
In reply to १९६० च्या आधी जन्म, ही अट by खटपट्या
In reply to मी शाळेत असताना २५ राज्ये आणि by चावटमेला
In reply to त्या दादरा नगर हवेलीची पण एक by गवि
त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.हे माहित नव्हते. आताच नकाशात बघितले- मेघवाल हे त्या ठिकाणाचे नाव. विकिपीडीया म्हणत आहे की जानेवारी २०२२ मध्ये मेघवालचे दादरा-नगरहवेलीमध्ये विलीनकरण करायचा निर्णय घेतला होता पण त्याचे पुढे काही झाले नाही. पूर्वी दिव-दमण आणि दादरा-नगरहवेली हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश होते. पण या दोन त्यामानाने लहान असलेल्या प्रदेशांसाठी स्वतंत्र प्रशासन चालवायचा खर्च जास्त होता म्हणून त्या दोन्हींचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश जानेवारी २०२० मध्ये करण्यात आला. गुजरातमध्ये कागदावर दारूबंदी आहे त्यामुळे हॉटेलांमध्ये वगैरे दारू मिळत नाही. (जुगाड करून घरी दारूची व्यवस्था करता येते पण अधिकृतपणे बाहेर मिळत नाही). त्यामुळे गुजरातचे बरेच लोक या ठिकाणी दारू प्यायला म्हणून जातात :)
In reply to हे पहिल्यांदाच ऐकले by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to कॉलेजे अजूनही मुंबई by गवि
In reply to मस्त by चंद्रसूर्यकुमार
In reply to याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता by गवि
याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.हो डचांचे कोचीन आणि क्विलॉन (आताचे कनन्नोर) या केरळमधील भागांवर तसेच नागापट्टणम या तामिळनाडूतील बंदराच्या शहरावर नियंत्रण होते. आजही कोचीनमध्ये एक डच पॅलेस आहे. पण नंतर डचांनी भारतापेक्षा मसाल्याच्या पदार्थांसाठी अधिक प्रसिध्द अशा इंडोनेशिया आणि श्रीलंकेतील काही भागांवर लक्ष केंद्रीत केले आणि भारतात ते राहिले नाहीत. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तेव्हा महाराजांनी मागितलेली खंडणी देऊन डचांनी त्यांची सुरतमधील वखार वाचवली होती. डॅनिश लोकांचे अंदमानवर नियंत्रण होते. १८६८ मध्ये ते ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले. कौन बनेगा करोडपती मध्ये पहिला ५ कोटी मिळवलेला बिहारचा एक होता त्याला ५ कोटींसाठी अंदमान कोणाच्या ताब्यात होते हा प्रश्न होता. त्याने डॅनिश लोकांच्या हे उत्तर दिले होते. त्यानंतर आंतरजालावर शोधाशोध करून हे समजले. जर पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई बेट हुंड्यात भेट म्हणून दिले नसते तर कदाचित मुंबई पण पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले असते. इतिहासात जर-तरला काहीही अर्थ नसतो पण त्या एका निर्णयामुळे सगळे काही किती बदलले. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यामुळे शहरात व्यापार-शिक्षण यांचा बराच विकास झाला. नाहीतर पोर्तुगीजांच्या ताब्यात असते तर गोव्याप्रमाणे स्वस्त दारू मिळणारे ठिकाण हीच मुंबईची ओळख राहिली असती का?
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to क्विलॉन (आताचे कनन्नोर) by सुबोध खरे
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to अंदमान बद्दल पण जर तर चा प्रश्न by अनामिक सदस्य
In reply to व्हिक्टोरिया टेरिटरी by स्वधर्म
In reply to व्हिक्टोरिया टेरिटरी by स्वधर्म
In reply to जी गोष्ट चित्रपट वितरणाची तीच रेल्वेची by अनिकेत वैद्य
In reply to जी गोष्ट चित्रपट वितरणाची तीच रेल्वेची by अनिकेत वैद्य
In reply to मद्रास राज्य by चंद्रसूर्यकुमार
In reply to गवि, मुळात उत्तर आणि दक्षिण by मनो
In reply to भूगोलातला इतिहास .... by गामा पैलवान
In reply to त्यांची मनीषा by हणमंतअण्णा शंक…
In reply to रूमशान म्हणजे इस्तंबूल नव्हे by प्रचेतस
In reply to धन्यवाद प्रचेतसजी by हणमंतअण्णा शंक…
In reply to रूमशान म्हणजे इस्तंबूल नव्हे by प्रचेतस
In reply to या धाग्याला अनुसरून by हणमंतअण्णा शंक…
अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत!याबद्द्ल धन्यवाद. सवडीने बघावे अशीच साईट आहे.
In reply to या धाग्याला अनुसरून by हणमंतअण्णा शंक…
In reply to कार्टोग्राफर by स्वच्छंदी_मनोज
In reply to मस्त. तो नकाशा पाठव मला. by प्रचेतस
In reply to पाठवलाय by स्वच्छंदी_मनोज
In reply to महाराष्ट्राचे भाग : पश्चिम महाराष्ट्र नावाचे इल्युजन by हणमंतअण्णा शंक…
In reply to तळकोकण by हणमंतअण्णा शंक…
In reply to मला वाटते कोंकणातील कोअर भाग. by गवि
In reply to महाराष्ट्राचे भाग : पश्चिम महाराष्ट्र नावाचे इल्युजन by हणमंतअण्णा शंक…
In reply to महाराष्ट्राचे भाग : पश्चिम महाराष्ट्र नावाचे इल्युजन by हणमंतअण्णा शंक…
In reply to जावळीत जावळी नावाचे गावच by विजुभाऊ
In reply to जावळी हे नाव गावावरुन नव्हे by प्रचेतस
In reply to जावळीत जावळी नावाचे गावच by विजुभाऊ
In reply to आहे by स्वच्छंदी_मनोज
In reply to आहे by स्वच्छंदी_मनोज
थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.मोर्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत का? हे विचारायचे कारण म्हणजे एक गोष्ट आठवली. शाळेत असताना आमची सहल प्रतापगड आणि शिवथरघळ येथे गेली होती. तेव्हा शिवथरघळीहून एक दिवस सकाळी 'आपल्याला चंद्रराव मोर्यांचा वाडा बघायला जायचे आहे' म्हणून आम्हाला नेले. डोंगरावरून बराच वेळ चालत गेल्यावरही वाड्याचा पत्ता नव्हता. शेवटी एके ठिकाणी गेल्यावर- इथे चंद्रराव मोर्यांचा वाडा होता अशी आमची बोळवण केली गेली. प्रत्यक्षात तिथे काहीही नव्हते- नुसते गवत होते. एक दगडही नव्हता. बहुदा आमच्या बरोबर आलेल्या शिक्षकांनाही तो वाडा नक्की कुठे होता हे माहिती नसावे त्यामुळे आम्हाला नुसतेच चालत नेले आणि आपण रस्ता चुकलो किंवा आपल्याला माहित नाही हे मान्य करायचे नसेल म्हणून कदाचित 'इथे वाडा होता' असे काहीतरी सांगून आम्हाला पिटाळून लावले असावे.
In reply to चंद्रराव मोर्यांचा वाडा by चंद्रसूर्यकुमार
In reply to बरोबर आहे... by स्वच्छंदी_मनोज
In reply to महाराष्ट्राचे भाग : पश्चिम महाराष्ट्र नावाचे इल्युजन by हणमंतअण्णा शंक…
५. मावळ नेमका भाग कुठला?मावळाचा प्राचीन उल्लेख कार्ले येथील शिलालेखात मामाड असा आलाय. तर ह्या प्रदेशाला त्याकाळात 'मामलाहार' म्हणत. मावळ म्हणजे रूढार्थाने मावळतीकडचा म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश. इकडील नद्यांच्या खोर्यांवरुन त्या त्या मावळाला विशिष्ट नावे पडली. पवनेच्या खोर्यातील पवन मावळ, आंद्रेच्या खोर्यातील आंदर मावळ तर कसबे नाणे गावाभोवतालचे नाणेमावळ.
६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो?बेरार म्हणजे सर्वसाधारणपणे अमरावती, वर्धा, नागपूर. बहमनी साम्राज्याची पाच छकले होऊन अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळाकोंड्याची कुत्बशाही आणि बेरारची इमादशाही अशा पाच सल्तनती स्थापन झाल्या. इमादशाहाची राजधानी एलिचपूर (आजचे अचलपूर). विस्ताराने जरी मोठं असलं तरी ह्यांचे सैनिकी सामर्थ्य तुलनेने कमी होते पण नरनाळा, गाविलगड असे बलाढ्य किल्ले त्यांच्या आधिपत्याखाली होते.
कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे.कोंकणाचे पूर्वीचे नाव म्हणजे अपरान्त. पहिल्या शतकातला परकीय प्रवासी स्ट्राबो कोंकणाचा उल्लेख 'कोनियकोई' असा करतो. कोंकणाची व्युत्त्पत्ती तशी नीट लागत नाही मात्र कोण म्हणे डोंगरमाथा व रेणुकादेवीचे इकडील नाव कुंकुणा अशा नावावरुन कोंकण नाव आले असे मानले जाते. मध्ययुगात लाट (दक्षिण गुजरात), शूर्पारक (आजचे नालासोपारा), अष्टागर (अक्षी, नागाव, किहिम वगैरे प्रदेश) आणि त्या खालचे कोंकण व तदनंतर गोमंतक असे मानले जात असे. तळकोकण मात्र चिपळूणपासून पुढे हे सहज मानता यावे.
In reply to ५. मावळ नेमका भाग कुठला? by प्रचेतस
In reply to ५. मावळ नेमका भाग कुठला? by प्रचेतस
In reply to जिल्हाकेंद्रे by हणमंतअण्णा शंक…
In reply to जिल्हाकेंद्रे by हणमंतअण्णा शंक…
In reply to जिल्हाकेंद्रे by हणमंतअण्णा शंक…
In reply to ओरोस का? कुडाळ किंवा मालवण by गवि
In reply to नकाशा पाहता by हणमंतअण्णा शंक…
In reply to नॉर्थ इस्ट by हणमंतअण्णा शंक…
या नकाशावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधायच्या उद्योगात पोर्तुगीज लोक पुढे का होते. त्याचे कारण पश्चिमेकडे अटलांटिकचा अॅक्सेस त्यांना जवळ होता आणि आफ्रिका खंडही जवळ होता. तीच गोष्ट स्पॅनिश लोकांची. त्यामानाने इंग्लंड बरेच लांब आहे. त्यामुळे भारतात युरोपिअनांनी हातपाय पसरायला सुरवात केली त्या काळात पोर्तुगीज दिसतील- मग फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश. त्याचे कारण या भूगोलात दडले आहे. त्यात इटालियन, ग्रीक आणि जर्मनांचे नावही दिसणार नाही. त्याचे कारणही हा नकाशा बघून समजेल. इटली आणि ग्रीसला अटलांटिकचा डायरेक्ट अॅक्सेसच नाही कारण भूमध्य समुद्र आणि आजूबाजूचे जमिन यातून जहाजे जाणार कुठून? जर्मनीला थोडासाच अटलांटिकचा अॅक्सेस आहे पण त्या भागात कदाचित चांगले बंदर असायला परिस्थिती अनुकूल नसावी. त्या तुलनेत डच लोक भारतात पोचले आणि इंडोनेशियातही पोचले. कारण नॉर्थ सी मधून त्यांना अटलांटिकचा अॅक्सेस आहे. तीच गोष्ट डेन्मार्कची. ते मर्यादित प्रमाणात का होईना भारतात पोचले. कारण त्यांना अटलांटिकचा अॅक्सेस होता.
इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास अशा बर्याच गोष्टींचा उलगडा होतो.In reply to इतिहासातील भूगोल by चंद्रसूर्यकुमार
In reply to ब्रिटीशांच्या काळातील मुंबै by खटपट्या
In reply to जिल्हाकेंद्र ... by कांदा लिंबू
In reply to जिल्हाकेंद्र ... by कांदा लिंबू
प्रकाशम -- ओंगोलया प्रकाशम जिल्ह्याची नेहमी गंमत वाटते. प्रकाशम नावाचे कोणतेही गाव आहे असे वाटत नाही कारण त्या जिल्ह्याचे नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी.पी.प्रकाशम यांच्या नावावरून दिले आहे. मुख्यमंत्र्याच्या नावावरून जिल्हा हा जरा गंमतीचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात चव्हाण, पवार, नाईक किंवा फडणवीस नावाचा जिल्हा असेल तर कसे वाटेल? तसेच तिकडे केले आहे. उत्तर प्रदेशात मायावतींनी जिल्ह्यांचे नामकरण करून मूर्खपणाची परिसीमा गाठली होती. अमेठी जिल्ह्याचे नामकरण केले छत्रपती शाहूजी महाराज नगर. शाहू महाराजांच्या कामाविषयी आदर असला तरी शतकानुशतके असलेले एखाद्या ठिकाणाचे अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर करायचे? शाहू महाराजांचा कधी अमेठीशी संपर्क आला असेल असे वाटत नाही. मग अचानक अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर हे नाव देणे तसे विचित्रच वाटते. तीच गोष्ट अमरोहाची. अमरोहा जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर असे केले. मग यथावकाश ज्योतिबा फुले नगरचे लोकांनी जेपी नगर केले. अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर ही नावे बदलली पण समजा अशी नावे बदलली नसती तर जेपी नगर म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या नावाने नाव दिले आहे असे कोणाला वाटले असते. असे ऐकले आहे की कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी विद्यापीठ असे सुटसुटीत नाव ठेवावे असा आग्रह धरला होता. त्याचे कारण वडोदर्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे एम.एस.युनिव्हर्सिटी झाले तसे कोल्हापूरमधील विद्यापीठाचे सी.एस.एम युनिव्हर्सिटी व्हायला नको- जसे युपीत जेपी नगर झाले. जिल्ह्याविषयी आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे सांगली जिल्ह्याची. सांगली जिल्ह्याचे मुख्यालय अर्थातच सांगली शहर आहे. पण सांगली जिल्ह्यात सांगली हा तालुकाच नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सांगली शहर येते मिरज तालुक्यात. असेही फार कुठे बघायला मिळत नसावे.
In reply to जिल्हे... by चंद्रसूर्यकुमार
In reply to इचलकरंजी by हणमंतअण्णा शंक…
In reply to तमदलगे by अभ्या..
In reply to ऑ??? by गवि
In reply to ऑ??? by गवि
In reply to आयला खरेच by हणमंतअण्णा शंक…
मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे.मी पण. माझी पहिली अस्थायी नोकरी कोल्हापुरात होती- २००२ मध्ये. तेव्हा विश्रामबागहून सकाळी सव्वाआठच्या सुमारास येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजरने दररोज कोल्हापूरला जायचो. तेव्हा जयसिंगपूर आणि हातकणंगले या दोन स्टेशनच्या मध्ये निमशिरगाव-तमदलगे हे स्टेशन होते. ते एक बिना प्लॅटफॉर्मचे स्टेशन होते. नुसत्या दोन पाट्या त्यावेळेस त्या स्टेशनला होत्या. पहिली पाटी म्हणजे स्टेशन सुरू झाले आणि दुसरी पाटी म्हणजे स्टेशन संपले :) त्या स्टेशनवर ती पॅसेंजर थांबायची. तमदलगे हेच नाव त्या स्टेशनवर आणि पुढारी वगैरे स्थानिक पेपरांमध्येही वाचल्याचे चांगलेच आठवते. गुगल मॅपवर मराठीत तांदळगे हे नाव वाचल्यावर त्या नावाला तमदलगे हे एडिट सुचवले होते. पण गुगल मॅपने ते मान्य केले नाही. बाकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीकाही गावांची नावे अगदीच विचित्र आहेत. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, गैबी कुडुत्री, येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, यशवंंतराव चव्हाणांचे जन्मगाव देवराष्ट्रे, विठुरायाचीवाडी, दिघंची, बेळंकी, बेळुंडगी वगैरे.
In reply to तमदलगे by चंद्रसूर्यकुमार
In reply to डबल बॅरल नावे by हणमंतअण्णा शंक…
In reply to आयला खरेच by हणमंतअण्णा शंक…
In reply to इचलकरंजी by हणमंतअण्णा शंक…
In reply to माझ्याकडे रेल्वेची बरीच by कंजूस
तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा.
१९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत.
माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.
आमचे बाबा बोलताना म्हणायचे आज