आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली.
माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो. त्या माझ्या भारत देशात, ज्यावर माझं प्रेम आहे, ज्याच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मी पाईक आहे, त्या देशात तेव्हा २२ राज्यं आणि ९ केंद्रशासित प्रदेश होते असं मला आठवतं.
अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि गोवा ही त्यावेळी राज्यं झालेली नव्हती. दिल्ली पण. हे सर्व केंद्रशासित प्रदेश होते.
"गोवा दमण दीव" ऊर्फ "गो.द.दी." हा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश. नकाशावर गोवा कुठे, दीव कुठे आणि दमण कुठे..!! पण आम्ही बच्चे लोक ते एकच आहेत हे स्वीकारायचो. आमच्या दैनंदिन जीवनात, म्हणजे काजूची बोंडे चोखणे किंवा पर्ह्यातले बारके मासे पिशवीत पकडणे यात, त्याने काय फरक पडत होता?
मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ही भलीथोरली पसरलेली भव्य राज्यं. जगातल्या अनेक देशांपेक्षा आकाराने मोठी होती. त्यावेळी.
मधल्या काळात बघता बघता वयाची पन्नाशी आली आणि बघता बघता नवीन राज्यंही तयार झाली, जिल्हे फुटले, "केंद्रशासित"ची राज्यं बनली आणि राज्यांचे "केंद्रशासित" बनले.
आता २८ राज्यं आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत असं दिसलं गूगललं तेव्हा.
हे सर्व नॉस्टॅल्जिक पुराण आता का आठवावं? तर पुढच्या मजकुराला प्रस्तावना हवी ना. थेट मुद्द्याला हात घालायचा म्हणजे कायतरीच.
पुन्हा एकदा सुकाणू मूळ विषयाकडे आणतो. तर .. नुकतंच एका ठिकाणी फिल्म डिस्ट्रिब्यूशन ऊर्फ चित्रपट वितरणाच्या प्रदेशांविषयी वाचलं. त्यातली दुर्बोध नावं बघून कळेचना की या कोणत्या टेरिटरीज बुवा ? मला वाटलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यावर यथावकाश जी भाषावार प्रांतरचना झाली त्यानुसारच या सिनेमा वितरणाच्या टेरिटरीजसुद्धा असतील.
पण यांची नावे पाहतो तर, "निझाम टेरिटरी", "सीपी अँड बेरार" वगैरे.
बेळगाव हे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांच्या सोबत. बॉम्बे टेरिटरी ही एक मोठी प्रसिद्ध.
शोध घ्यायला लागलो तर दिसलं की अगदी आजही याच टेरिटरीज त्याच जुन्या काळच्या नावांसहित चित्रपट वितरणाच्या धंद्यात टिकून आहेत. तो धंदा अजूनही त्या काळच्या भूगोलात गोठला आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं काम आहे त्या प्रकारे उत्तम चाललं आहे.
उलट आता त्यात उगाच बदल करणं हे जास्त अडचणीचं आहे. म्हणतात ना की देअर इज नो प्रॉब्लेम टू सॉल्व्ह फॉर देम.
भारतात फिल्म डिस्ट्रिब्यूशन व्यवसायात टेरिटरीसाठी आजही "सर्किट्स" ही संकल्पना वापरली जाते, जी घटनेनुसारच्या, राजकीय राज्यांच्या सीमांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
१९५० मध्ये "सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार" (C.P. Berar) हे "राज्य" (?) संपुष्टात आलं.
१९५६ मध्ये भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाली.
पण चित्रपट वितरणात अजूनही सीपी बेरार जिवंत आहे.
त्यात महाराष्ट्राचा विदर्भ भाग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा काही भाग येतो. चूकभूल देणे घेणे. मराठी सिनेमे या टेरिटरीत चांगले चालतात.
आणखी एक असेच सर्किट, "निजाम सर्किट". यामध्ये तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा भाग येतो.
इथेही मराठी सिनेमे चांगला धंदा करतात.
देश बदलला, नकाशावर रेषा बदलल्या, पण चित्रपट वितरकांनी आपली जुनी पाळंमुळं उखडली नाहीत. ते बदलले नाहीत. आजही "बॉक्स ऑफिस"चे आकडे मोजताना विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग न धरता सीपी बेरारचा भाग मानला जातो.
रोचक भाग असा की ही सर्किटस फक्त मेजॉरिटी लोकांची भाषा हा एकच क्रायटेरिया न मानता प्रेक्षकांच्या आवडीनिवडीवर ठरलेली आहेत असं मला वाटतं. म्हणजे कदाचित, विदर्भातल्या प्रेक्षकांचा आवडता "सिनेमा टाईप", किंवा अभिरुची म्हणू.. मुंबईपेक्षा वेगळी असू शकते, म्हणूनच ते अजूनही स्वतंत्र सर्किट म्हणून ओळखलं जात असू शकेल. राज्यांच्या रेषा आखून तिथल्या माणसांचे सगळेच चॉईसेस बदलत नसतात.
आजच्या आधुनिक भारतात चित्रपट व्यापार आजही ब्रिटीशकालीन आणि संस्थानकालीन नकाशावर चालतो हे मला तरी रोचक वाटलं.
आणि बॉम्बे टेरिटरी या नावावरून लहानपणी कोणाकडून तरी ऐकलेलं वाक्यही आठवलं, "कापडं काय बॉम्बेवरून आणली का?"
तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. नॉस्टॅल्जियाला आताशा* कोण विचारतो!? आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बोलत राहू..
* तळटीप: आताशा..!!! छे... च्यायला वय झालं राव..
वाचने
7129
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण
In reply to ५. मावळ नेमका भाग कुठला? by प्रचेतस
जिल्हाकेंद्रे
ओरोस
In reply to जिल्हाकेंद्रे by हणमंतअण्णा शंक…
ओरोस एक इन्वेस्टमेंट संधी
In reply to जिल्हाकेंद्रे by हणमंतअण्णा शंक…
ओरोस का? कुडाळ किंवा मालवण
In reply to जिल्हाकेंद्रे by हणमंतअण्णा शंक…
नकाशा पाहता
In reply to ओरोस का? कुडाळ किंवा मालवण by गवि
माझ्या माहितीप्रमाणे ओरोस
In reply to नकाशा पाहता by हणमंतअण्णा शंक…
नॉर्थ इस्ट
यासदृश एक आणखी निरीक्षण
In reply to नॉर्थ इस्ट by हणमंतअण्णा शंक…
इतिहासातील भूगोल
इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास ...
In reply to इतिहासातील भूगोल by चंद्रसूर्यकुमार
ब्रिटीशांच्या काळातील मुंबै
कॉलिंग डॉ सुबोध खरे
In reply to ब्रिटीशांच्या काळातील मुंबै by खटपट्या
तुम्ही म्हणताय ते येलो गेट पोलिस स्टेशन
In reply to कॉलिंग डॉ सुबोध खरे by अनिकेत वैद्य
२६/११ चा हल्ला झाल्यानंतर भारताने मरीन पोलिसिंग कॉन्सेप्ट अजून घट्ट करायला मरीन पोलिस इत्यादी स्थापन केले (आणि राज्यांना पण तशा सूचना केल्या कारण पोलिस हा राज्य सूची विषय आहे) त्यात परत कोस्टल सिक्युरिटी स्कीम वगैरे आणली, त्याचा आता तिसरा फेज लागू करण्याचे चालू आहे, सुरक्षा कारणांसाठी जास्त खोलात तर मला जाता येणार नाही पण सागरी सुरक्षेत तीन स्तर असतात पहिले काही सागरी मैल मरीन पोलिस/ कस्टम्स, नंतर कोस्ट गार्ड अन् सगळ्यात बाहेर नौदल. आधी प्रत्येक राज्यात एक एक येलो गेट पोलिस स्टेशन स्थापन केले गेले होते मुंबईत ते इंदिरा डॉक जवळ आहे पी डिमेलो रोड सिन्दुर ब्रीज (जुना कार्नक ब्रीज संपतो तिथे इंदिरा डॉक फायर स्टेशनच्या शेजारी) , महाराष्ट्रात सागरी हद्दीत काही विशिष्ट सागरी मैलाच्या आत जर एखाद गुन्हा झाला तर त्याची तक्रार नोंद तिथे होते. आता अर्थातच हाय सी वर गुन्हा घडला तरी त्या गलबताला किनाऱ्यावर यावेच लागणार , किंवा कोस्ट गार्ड ने जरी काही कॉन्ट्रबँड पकडले, किंवा VBSS करून काही माणसे धरली तरी शेवटी ती माणसे किनाऱ्यावर आणावीच लागतात, त्यांच्यासाठी सिंगल पॉईंट म्हणजे येलो गेट. अर्थात नंतर येलो गेटच्या मदतीला मरीन पोलिस स्टेशन (सागरी पोलिस ठाणे) अशी शृंखला पण सुरू करण्यात आली आहे, बेलापूर नवी मुंबई मध्ये किल्ल्याजवळ असेच एक सागरी पो स्टे आहे, रत्नागिरीला पण आहे. ह्यात काही चूक असल्यास कोणी तज्ञ माणसाने दुरुस्त करावी.
अशी प्रत्येक राज्याची…
In reply to तुम्ही म्हणताय ते येलो गेट पोलिस स्टेशन by वृषभ खोंडे
अशी प्रत्येक राज्याची स्वतःची येलो गेट आणि मारीन पो स्टे arrangement आहे आणि कोस्टल पोलिसांचे राष्ट्रीय ट्रेनिंग सेंटर गुजरात मध्ये स्थापन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा ह्यांनी गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग चे भूमिपूजन २०२३ मध्ये केले होते
छान चर्चा..
जिल्हाकेंद्र ...
असे अनेक जिल्हे आहेत,
In reply to जिल्हाकेंद्र ... by कांदा लिंबू
जिल्हे...
In reply to जिल्हाकेंद्र ... by कांदा लिंबू
इचलकरंजी
In reply to जिल्हे... by चंद्रसूर्यकुमार
तमदलगे
In reply to इचलकरंजी by हणमंतअण्णा शंक…
ऑ???
In reply to तमदलगे by अभ्या..
हे सरकारी.
In reply to ऑ??? by गवि
आयला खरेच
In reply to ऑ??? by गवि
तमदलगे
In reply to आयला खरेच by हणमंतअण्णा शंक…
डबल बॅरल नावे
In reply to तमदलगे by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to डबल बॅरल नावे by हणमंतअण्णा शंक…
चिंक हिल
In reply to आयला खरेच by हणमंतअण्णा शंक…
पाट्या
In reply to इचलकरंजी by हणमंतअण्णा शंक…
माझ्याकडे रेल्वेची बरीच
दुरुस्ती:- रेल्वेसाठीचा खर्च
In reply to माझ्याकडे रेल्वेची बरीच by कंजूस
तुमच्या आठवणींत असलेला भूगोल
तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा.१९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत. माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.फ्रान्सची सीमा सगळ्यात जास्त
रोचक आहे.
In reply to फ्रान्सची सीमा सगळ्यात जास्त by अमरेंद्र बाहुबली
आपली अंदमान निकोबार बेटं ही
दक्षिण निकोबार चा इंदिरा
इंडोनेशियाच्या हालचाली ....
In reply to दक्षिण निकोबार चा इंदिरा by सुबोध खरे
अवांतर : वऱ्हाडचं स्पेलिंग
गा.पै. मी परवा एका इंग्रज
In reply to अवांतर : वऱ्हाडचं स्पेलिंग by गामा पैलवान
महाराष्ट्रातील सर्वात मोठा
एखाद्या तालुक्यात चार मोठे
In reply to महाराष्ट्रातील सर्वात मोठा by अमरेंद्र बाहुबली
सांगली-कोल्हापूर
कोल्हापुरात राहणाऱ्या कन्येला
In reply to सांगली-कोल्हापूर by चंद्रसूर्यकुमार
मीच लिजंड
In reply to सांगली-कोल्हापूर by चंद्रसूर्यकुमार
रोचक
In reply to मीच लिजंड by अभ्या..
कुलवंतीन कोड्याचा माळ
धन्यवाद.
In reply to कुलवंतीन कोड्याचा माळ by हणमंतअण्णा शंक…
शिलावर्तूळ
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
याबद्दल अनेक प्रवाद आहेत
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
काय पण धागा काढलायं
मुविभाई ! तो मी नव्हेच..!!
In reply to काय पण धागा काढलायं by धर्मराजमुटके
माहितीपूर्ण
चुकीच्या पत्त्यामुळे झालेला गोंधळ
सहीच विषय
आमच्या ओळखीतील एक जण ह्या लाईन मध्ये होता, ज्या काळी आजच्यासारखे UFO satellite प्रोजेक्टर IMAX इत्यादी लाड नसत आणि सिंगल स्क्रीन असत त्या काळी हे गृहस्थ स्पेसिफिक डिस्ट्रिब्यूशन कंपनी साठी फिल्मच्या रिल घेऊन गावोगाव हिंडत, त्यांची स्वतःची अशी एक लोखंडी पेटी होती (रेल्वेत लोको पायलट किंवा तिकीट चेकर मंडळींची असते तशी) त्यात रिल्स कपडे, थोडे खायचे सुके राशन, पार अमृतांजनच्या डब्या, सुई दोरा इत्यादी असत, आयुष्याच्या शेवटी शेवटी ते काका पोराबाळांना सेटल करून अतिशय कृतार्थ निवृत्त जीवन जगताना कधीतरी त्यांची ती त्यांनी प्रेमाने जतन केलेली पेटी दाखवत आणि किस्से सांगत, मुघले आझम अकोल्याला घेऊन गेलो होतो तेव्हा प्रचंड गर्दी होती पार स्टेशन ते थिएटर reels न्यायला पोलिस बंदोबस्त केला होता थिएटर मालकाने इत्यादी. बाय द वे हा धंदा सुद्धा स्पोक्स अँड हब मॉडेल वापरत असे वितरणाला. सीपी अँड बेरार सर्किट मध्ये अमरावती हे शहर एक मोठे फिल्म डिस्ट्रिब्यूशन हब होते/ आहे. पूर्ण पश्चिम विदर्भ (वऱ्हाड प्रांत) म्हणजे अकोला अमरावती वाशिम (अकोल्यातून वेगळा झाल्यावर) यवतमाळ आणि बुलढाणा जिल्हे आणि त्यांतील तालुका ठिकाणे आठवडी बाजाराच्या दिवशी बऱ्यापैकी गजबजलेली गावे अन् त्यातील टुरिंग टॉकीज इत्यादी मधे वरती सांगितलेल्या काकांसारखी माणसे reels घेऊन प्रवास करत, कित्येक ठिकाणी ग्रामपंचायत/ नगरपालिका दवंड्या देत की "अमर अकबर अँथनी ह्या आठवडी बाजारात नीलम टुरिंग टॉकीज मधे फक्त पुसदवासियांसाठी" रसिक प्रेक्षक पार स्टेशन वर बस स्टँड वर गाड्या येण्याची वेळ अन् दिवस मोजून reel runner उतरतोय का नाही ते बघून गावभर वर्ड टू माऊथ मौखिक प्रसिद्धी इत्यादी करत अशा आज कालबाह्य वाटू शकणाऱ्या पण त्याकाळी ट्रेडिंग असणाऱ्या गोष्टी ते काका कायम सांगत.
छान लेख. माहिती मिळतेय…
छान लेख. माहिती मिळतेय.
रुमाल टाकून ठेवला आहे.
हा प्रश्न मी आधी कधीतरी…
हा प्रश्न मी आधी कधीतरी दुसर्या चर्चेमध्ये विचारला होता.
अजूनही आपल्या देशात केंद्रशासित प्रदेश का आहेत? जवळच्या राज्यात विलीन न करण्याचे काय कारण आहे?
मला वाटते
In reply to हा प्रश्न मी आधी कधीतरी… by अमेरिकन त्रिशंकू
इथे तार्किक आणि संयुक्तिक उत्तर मिळेल
धन्यवाद. लदाख, जम्मू/काश्मिर…
In reply to मला वाटते by वृषभ खोंडे
धन्यवाद. लदाख, जम्मू/काश्मिर, अंदमान/निकोबार, दिल्ली हे समजू शकतो
पण चंदिगड (हरियाणा आणि पंजाब यांना वेगळी राजधानी करायला हवी), दीव, दमण, पुदुचेरी इ. केंद्रशासित का आहेत अजूनही?
माझ्या माहितीप्रमाणे
In reply to धन्यवाद. लदाख, जम्मू/काश्मिर… by अमेरिकन त्रिशंकू
चंडीगड - planned city तसेच तुम्ही म्हणाले तसे दोन्ही राज्यांना सामायिक. दमण, दीव - वेगळी सांस्कृतिक ओळख (पोर्तुगीज) पुद्दुचेरी - वेगळी सांस्कृतिक ओळख (फ्रेंच)
एस्टी महामंडाळाचे आणि…
एस्टी महामंडाळाचे आणि न्यायालयांची खंडपीठे देखील अशीच असतात.
भरकटलेले कर्नाटकी गाव
कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात असलेले चौंडी मुखेड हे गाव चक्क महाराष्ट्र्रात आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात हे गाव येऊन पडले आहे. चहुबाजुना महाराष्ट्र आणि मध्ये हे एकच कर्नाटकी गाव अशी विचित्र स्थिती इथे तयार झाली आहे. यामुळे गावाला प्रशासन, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे असे का, कधी आणि कुणामुळे झाले याचे उत्तर कोणाकडेही नाही. गावातील सर्व व्यवहार मराठीमध्ये चालतात, मुले शिकायला लातूर, उदगीरला जातात. गावात मराठी माध्यमाची एकमेव शाळा आहे. कर्नाटकाशी या गावाला जोडण्यासाठी रस्ता हवा म्हणून काही वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेतली आणि रस्ता बनला. विशेष म्हणजे कर्नाटक राज्यातील प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र या गावात आहे. गाव सर्व सुविधांसाठी महाराष्ट्रावर अवलंबून असले तरी गावकऱ्यांना महाराष्ट्रात विलीन व्हायचे नाही. यामुळे चौंडी मुखेडला भारतातील सर्वात गुंतागुंतीचे गाव असे म्हटले जाते. या गावावर ABP News ने आणि बोलभिडुने केलेल्या रिपोर्टची लिंक खाली दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=N8NAUImDcdI
https://www.youtube.com/watch?v=ZJ5XEtUBUg4
कापसाच्या सुतावर चालणार अशी ख्याती असणारी
इचलकरंजी, सोलापूर, मालेगाव भिवंडी इत्यादी गावे आहेत हे कायम ऐकून होतो काल एका यंत्रमाग (पॉवरलुम) कारखान्याला भेट देण्याचा योग आला , कालच्या दिवशी आयुष्यात काहीतरी नवीन शिकायला मिळाले. व्हिव अँड व्हार्प असे काहीसे .