सी पी बेरार सर्किट
आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली.
माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो. त्या माझ्या भारत देशात, ज्यावर माझं प्रेम आहे, ज्याच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मी पाईक आहे, त्या देशात तेव्हा २२ राज्यं आणि ९ केंद्रशासित प्रदेश होते असं मला आठवतं.
अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि गोवा ही त्यावेळी राज्यं झालेली नव्हती. दिल्ली पण. हे सर्व केंद्रशासित प्रदेश होते.
"गोवा दमण दीव" ऊर्फ "गो.द.दी." हा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश. नकाशावर गोवा कुठे, दीव कुठे आणि दमण कुठे..!! पण आम्ही बच्चे लोक ते एकच आहेत हे स्वीकारायचो. आमच्या दैनंदिन जीवनात, म्हणजे काजूची बोंडे चोखणे किंवा पर्ह्यातले बारके मासे पिशवीत पकडणे यात, त्याने काय फरक पडत होता?
मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ही भलीथोरली पसरलेली भव्य राज्यं. जगातल्या अनेक देशांपेक्षा आकाराने मोठी होती. त्यावेळी.
मधल्या काळात बघता बघता वयाची पन्नाशी आली आणि बघता बघता नवीन राज्यंही तयार झाली, जिल्हे फुटले, "केंद्रशासित"ची राज्यं बनली आणि राज्यांचे "केंद्रशासित" बनले.
आता २८ राज्यं आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत असं दिसलं गूगललं तेव्हा.
हे सर्व नॉस्टॅल्जिक पुराण आता का आठवावं? तर पुढच्या मजकुराला प्रस्तावना हवी ना. थेट मुद्द्याला हात घालायचा म्हणजे कायतरीच.
पुन्हा एकदा सुकाणू मूळ विषयाकडे आणतो. तर .. नुकतंच एका ठिकाणी फिल्म डिस्ट्रिब्यूशन ऊर्फ चित्रपट वितरणाच्या प्रदेशांविषयी वाचलं. त्यातली दुर्बोध नावं बघून कळेचना की या कोणत्या टेरिटरीज बुवा ? मला वाटलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यावर यथावकाश जी भाषावार प्रांतरचना झाली त्यानुसारच या सिनेमा वितरणाच्या टेरिटरीजसुद्धा असतील.
पण यांची नावे पाहतो तर, "निझाम टेरिटरी", "सीपी अँड बेरार" वगैरे.
बेळगाव हे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांच्या सोबत. बॉम्बे टेरिटरी ही एक मोठी प्रसिद्ध.
शोध घ्यायला लागलो तर दिसलं की अगदी आजही याच टेरिटरीज त्याच जुन्या काळच्या नावांसहित चित्रपट वितरणाच्या धंद्यात टिकून आहेत. तो धंदा अजूनही त्या काळच्या भूगोलात गोठला आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं काम आहे त्या प्रकारे उत्तम चाललं आहे.
उलट आता त्यात उगाच बदल करणं हे जास्त अडचणीचं आहे. म्हणतात ना की देअर इज नो प्रॉब्लेम टू सॉल्व्ह फॉर देम.
भारतात फिल्म डिस्ट्रिब्यूशन व्यवसायात टेरिटरीसाठी आजही "सर्किट्स" ही संकल्पना वापरली जाते, जी घटनेनुसारच्या, राजकीय राज्यांच्या सीमांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
१९५० मध्ये "सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार" (C.P. Berar) हे "राज्य" (?) संपुष्टात आलं.
१९५६ मध्ये भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाली.
पण चित्रपट वितरणात अजूनही सीपी बेरार जिवंत आहे.
त्यात महाराष्ट्राचा विदर्भ भाग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा काही भाग येतो. चूकभूल देणे घेणे. मराठी सिनेमे या टेरिटरीत चांगले चालतात.
आणखी एक असेच सर्किट, "निजाम सर्किट". यामध्ये तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा भाग येतो.
इथेही मराठी सिनेमे चांगला धंदा करतात.
देश बदलला, नकाशावर रेषा बदलल्या, पण चित्रपट वितरकांनी आपली जुनी पाळंमुळं उखडली नाहीत. ते बदलले नाहीत. आजही "बॉक्स ऑफिस"चे आकडे मोजताना विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग न धरता सीपी बेरारचा भाग मानला जातो.
रोचक भाग असा की ही सर्किटस फक्त मेजॉरिटी लोकांची भाषा हा एकच क्रायटेरिया न मानता प्रेक्षकांच्या आवडीनिवडीवर ठरलेली आहेत असं मला वाटतं. म्हणजे कदाचित, विदर्भातल्या प्रेक्षकांचा आवडता "सिनेमा टाईप", किंवा अभिरुची म्हणू.. मुंबईपेक्षा वेगळी असू शकते, म्हणूनच ते अजूनही स्वतंत्र सर्किट म्हणून ओळखलं जात असू शकेल. राज्यांच्या रेषा आखून तिथल्या माणसांचे सगळेच चॉईसेस बदलत नसतात.
आजच्या आधुनिक भारतात चित्रपट व्यापार आजही ब्रिटीशकालीन आणि संस्थानकालीन नकाशावर चालतो हे मला तरी रोचक वाटलं.
आणि बॉम्बे टेरिटरी या नावावरून लहानपणी कोणाकडून तरी ऐकलेलं वाक्यही आठवलं, "कापडं काय बॉम्बेवरून आणली का?"
तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. नॉस्टॅल्जियाला आताशा* कोण विचारतो!? आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बोलत राहू..
* तळटीप: आताशा..!!! छे... च्यायला वय झालं राव..
याद्या
6241
प्रतिक्रिया
111
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमचे बाबा बोलताना म्हणायचे आज
सी पी म्हणजे सेन्ट्रल
ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर
हो. ह्यांतील बरेचसे लोक
In reply to ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर by गवि
१९६० च्या आधी जन्म, ही अट
In reply to ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर by गवि
त्या स्कीमच्या खाली नसेल.
In reply to १९६० च्या आधी जन्म, ही अट by खटपट्या
कंपनीतील एका सहकार्याच्या
In reply to १९६० च्या आधी जन्म, ही अट by खटपट्या
मी शाळेत असताना २५ राज्ये आणि
त्या दादरा नगर हवेलीची पण एक
In reply to मी शाळेत असताना २५ राज्ये आणि by चावटमेला
हो
In reply to त्या दादरा नगर हवेलीची पण एक by गवि
माहे
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
हे पहिल्यांदाच ऐकले
कॉलेजे अजूनही मुंबई
In reply to हे पहिल्यांदाच ऐकले by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई
In reply to कॉलेजे अजूनही मुंबई by गवि
मस्त
याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता
In reply to मस्त by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता by गवि
हा हा.
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
क्विलॉन (आताचे कनन्नोर)
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद.
In reply to क्विलॉन (आताचे कनन्नोर) by सुबोध खरे
अंदमान बद्दल पण जर तर चा प्रश्न
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
झाले असते.
In reply to अंदमान बद्दल पण जर तर चा प्रश्न by अनामिक सदस्य
व्हिक्टोरिया टेरिटरी
अपघातग्रस्त विमानही व्हीटी च.
In reply to व्हिक्टोरिया टेरिटरी by स्वधर्म
VT बदलले पाहिजे हे
In reply to व्हिक्टोरिया टेरिटरी by स्वधर्म
पंजाब
जी गोष्ट चित्रपट वितरणाची तीच रेल्वेची
रोचक आणि माहितीपूर्ण..
In reply to जी गोष्ट चित्रपट वितरणाची तीच रेल्वेची by अनिकेत वैद्य
भारतीय रेल्वे नावाचा मॅमूथ
In reply to जी गोष्ट चित्रपट वितरणाची तीच रेल्वेची by अनिकेत वैद्य
आमच्या लहानपणी कोकणातील
मद्रास राज्य
प्रतिसाद आवडला
In reply to मद्रास राज्य by चंद्रसूर्यकुमार
काही कायदे देखील पूर्ण राज्य
गवि, मुळात उत्तर आणि दक्षिण
भूगोलातला इतिहास ....
In reply to गवि, मुळात उत्तर आणि दक्षिण by मनो
त्यांची मनीषा
In reply to भूगोलातला इतिहास .... by गामा पैलवान
रूमशान म्हणजे इस्तंबूल नव्हे
In reply to त्यांची मनीषा by हणमंतअण्णा शंक…
धन्यवाद प्रचेतसजी
In reply to रूमशान म्हणजे इस्तंबूल नव्हे by प्रचेतस
इस्तंबूलला कुंस्तुंतुनिया
In reply to धन्यवाद प्रचेतसजी by हणमंतअण्णा शंक…
या धाग्याला अनुसरून
In reply to रूमशान म्हणजे इस्तंबूल नव्हे by प्रचेतस
अगदी मौर्यकाळापासून ग्रीकांशी
In reply to या धाग्याला अनुसरून by हणमंतअण्णा शंक…
कार्टोग्राफर
In reply to या धाग्याला अनुसरून by हणमंतअण्णा शंक…
मस्त. तो नकाशा पाठव मला.
In reply to कार्टोग्राफर by स्वच्छंदी_मनोज
पाठवलाय
In reply to मस्त. तो नकाशा पाठव मला. by प्रचेतस
धन्स रे मिळाला, तत्कालीन नावे
In reply to पाठवलाय by स्वच्छंदी_मनोज
महाराष्ट्राचे भाग : पश्चिम महाराष्ट्र नावाचे इल्युजन
तळकोकण
In reply to महाराष्ट्राचे भाग : पश्चिम महाराष्ट्र नावाचे इल्युजन by हणमंतअण्णा शंक…
मला वाटते कोंकणातील कोअर भाग.
In reply to तळकोकण by हणमंतअण्णा शंक…
होय बरोबर
In reply to मला वाटते कोंकणातील कोअर भाग. by गवि
पालघर पासुन गोव्याच्या
In reply to महाराष्ट्राचे भाग : पश्चिम महाराष्ट्र नावाचे इल्युजन by हणमंतअण्णा शंक…
जावळीत जावळी नावाचे गावच
In reply to महाराष्ट्राचे भाग : पश्चिम महाराष्ट्र नावाचे इल्युजन by हणमंतअण्णा शंक…
जावळी हे नाव गावावरुन नव्हे
In reply to जावळीत जावळी नावाचे गावच by विजुभाऊ
आहे, चंद्रगडाच्या जवळ.
In reply to जावळी हे नाव गावावरुन नव्हे by प्रचेतस
आहे
In reply to जावळीत जावळी नावाचे गावच by विजुभाऊ
धन्स. हे माहीत नव्हतं.
In reply to आहे by स्वच्छंदी_मनोज
चंद्रराव मोर्यांचा वाडा
In reply to आहे by स्वच्छंदी_मनोज
बरोबर आहे...
In reply to चंद्रराव मोर्यांचा वाडा by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद.
In reply to बरोबर आहे... by स्वच्छंदी_मनोज
५. मावळ नेमका भाग कुठला?
In reply to महाराष्ट्राचे भाग : पश्चिम महाराष्ट्र नावाचे इल्युजन by हणमंतअण्णा शंक…
तळकोकण म्हणजे सध्याचा
In reply to ५. मावळ नेमका भाग कुठला? by प्रचेतस
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण
In reply to ५. मावळ नेमका भाग कुठला? by प्रचेतस
जिल्हाकेंद्रे
ओरोस
In reply to जिल्हाकेंद्रे by हणमंतअण्णा शंक…
ओरोस एक इन्वेस्टमेंट संधी
In reply to जिल्हाकेंद्रे by हणमंतअण्णा शंक…
ओरोस का? कुडाळ किंवा मालवण
In reply to जिल्हाकेंद्रे by हणमंतअण्णा शंक…
नकाशा पाहता
In reply to ओरोस का? कुडाळ किंवा मालवण by गवि
माझ्या माहितीप्रमाणे ओरोस
In reply to नकाशा पाहता by हणमंतअण्णा शंक…
नॉर्थ इस्ट
यासदृश एक आणखी निरीक्षण
In reply to नॉर्थ इस्ट by हणमंतअण्णा शंक…
इतिहासातील भूगोल
इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास ...
In reply to इतिहासातील भूगोल by चंद्रसूर्यकुमार
ब्रिटीशांच्या काळातील मुंबै
कॉलिंग डॉ सुबोध खरे
In reply to ब्रिटीशांच्या काळातील मुंबै by खटपट्या
छान चर्चा..
जिल्हाकेंद्र ...
असे अनेक जिल्हे आहेत,
In reply to जिल्हाकेंद्र ... by कांदा लिंबू
जिल्हे...
In reply to जिल्हाकेंद्र ... by कांदा लिंबू
इचलकरंजी
In reply to जिल्हे... by चंद्रसूर्यकुमार
तमदलगे
In reply to इचलकरंजी by हणमंतअण्णा शंक…
ऑ???
In reply to तमदलगे by अभ्या..
हे सरकारी.
In reply to ऑ??? by गवि
आयला खरेच
In reply to ऑ??? by गवि
तमदलगे
In reply to आयला खरेच by हणमंतअण्णा शंक…
डबल बॅरल नावे
In reply to तमदलगे by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to डबल बॅरल नावे by हणमंतअण्णा शंक…
चिंक हिल
In reply to आयला खरेच by हणमंतअण्णा शंक…
पाट्या
In reply to इचलकरंजी by हणमंतअण्णा शंक…
माझ्याकडे रेल्वेची बरीच
दुरुस्ती:- रेल्वेसाठीचा खर्च
In reply to माझ्याकडे रेल्वेची बरीच by कंजूस
तुमच्या आठवणींत असलेला भूगोल
तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा.१९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत. माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.